Old Mother Sad Story म्हाताऱ्या आईला घरी एकटी सोडून मुलगा आणि सून युरोप टूरला गेले

Old Mother Sad Story ममता आणि समीर हे दोघे आज खूप खुश होते. कारण त्यांचं एक मोठं स्वप्न पूर्ण झालं होतं. समीरने ऑफिसमध्ये चांगलं काम केल्यामुळे त्याला बोनस मिळाला होता आणि त्याने ममताला विचारलं, या पैशांचं काय करायचं, तर ममता लगेच म्हणाली युरोप टूरला जायचं. माझं लहानपणीचं स्वप्न आहे. समीरसुद्धा यासाठी लगेचं तयार झाला आणि या दोघांनी युरोप टूरची तिकीट बुक केली. जवळपास पंधरा दिवसांची त्यांची ही युरोप टुर होती.

समीर ममताच्या हातात युरोप टूरची तिकिट आणून देतो. त्यामुळे ममता आनंदाने नाचू लागते. परंतु नाचता नाचता अचानक तिच्या मनात काहीतरी विचार येतो आणि ती शांत होते. समीर विचारतो, “अगं काय झालं ममता, एवढा वेळ तर नाचत होती ना, मग अचानक शांत कशी झालीस ?”

Old Mother Sad Story

ममता म्हणते, “समीर आपल्याला एक गोष्ट लक्षातचं नाही आली. त्या युरोप टूरला जायच्या आनंदात आपण हा विचार केला नाही की, तुझ्या आईचं काय ? त्यांना कुठे ठेवायचं ?” हे ऐकून समीरसुद्धा डोक्यावर हात मारून घेतो आणि म्हणतो, “हो ना यार, मीसुद्धा विसरलो आईचं काय करायचं ?”

ममता म्हणते, “तुझ्या आईचा डोक्याला त्रासचं झालाय. कुठेही बाहेर जायचं म्हटलं की, सर्वात आधी त्यांचा विचार करावा लागतो. त्यांची सोय लावून जावी लागते. दोन-तीन दिवसाचं ऍडजेस्ट होतं. परंतु पंधरा दिवसांचं कसं ऍडजेस्ट होईल ? तुझी आई कसं बसं त्यांचं टॉयलेट बाथरूमचं मॅनेज करतात. बाकीची कोणतीही काम त्यांच्याकडून होत नाही.

मग पंधरा दिवस त्यांना कोण खायला प्यायला देईल ? कसं होईल त्यांचं ?” समीर म्हणतो, “हो ना माझ्याही डोक्यात तोच विचार चालला आहे. आईचं काय करायचं ? आपला कोणी जवळचा नातेवाईकही नाही जो पंधरा दिवस तिची काळजी घेईल, तिला खायला प्यायला घालेल.” हे दोघेही विचारत पडतात.

समीरची आई आदिती अपंग होती. चार वर्षांपूर्वी समीरच्या बाबांचा आणि तिचा एक अपघात झाला होता. या अपघातात समीरचे बाबा देवाघरी गेले. परंतु अदिती कशीबशी वाचली. पण अपघातात तिचे पाय निकामी झाले होते. त्यामुळे ती व्हीलचेअरवरचं होती व अपघात झाल्यापासून तिला कशातही इंटरेस्ट राहिला नव्हता. समीरचे बाबा गेले, मग देवाने मला असं का जिवंत ठेवलं, हाच विचार तिच्या मनात यायचा.

कशीबशी देवाचं नाव घेत ती जगत होती. व्हीलचेअरवर बसून स्वयंपाक करणं किंवा घरातील इतर काम करणं तिला काही जमत नव्हतं. ममता आणि समीर जेवणाचं ताट आणून द्यायचे, तेवढचं जेवायचं आणि गपचूप बसून राहायचं, एवढंच त्या करायच्या.

Marathi Sad Story

अदितीच्या अशा अवस्थेमुळे समीर आणि ममताला त्यांचं ओझं झालं होतं. अवघ्या एक वर्षांपूर्वी या दोघांचं लग्न झालं होतं. त्यामुळे मस्त फिरावं, एन्जॉय करावं, अशी समीर आणि ममताची नेहमी इच्छा असायची. परंतु अदितीच्या अशा अवस्थेमुळे त्यांना ते काही शक्य होत नव्हतं. त्यामुळे दिवसेंदिवस त्यांच्या मनात Old Mother Sad Story अदिती विरुद्ध राग तयार होत होता आणि आता इतकी मोठी संधी मिळाली आहे, तर ती अशी वाया जाऊ नये, पण आता करायचं काय, हा त्यांच्यापुढे मोठा प्रश्न निर्माण झाला होता.

तेवढ्यात समीरला एक आयडिया सुचते आणि तो म्हणतो, “अरे त्या पाटील काकू आहे ना, चौथ्या मजल्यावाल्या, त्या घरपोचं डबे देतात. आपण आईसाठी त्यांच्याकडे पंधरा दिवस जेवणाचे डबे लावूया. त्या सकाळ संध्याकाळ डबे आणून देतील. आई डबे उघडून मस्तपैकी खात जाईल. Old Mother Sad Story थोडे जास्त पैसे दिले तर त्या डबेही धुवून घेऊन जातील, काही प्रॉब्लेम नाही.”

ही कल्पना ममतालासुद्धा खूप आवडते आणि ती म्हणते, “एकदम भारी आयडिया आहे, आपला सगळा प्रॉब्लेमचं मिटला. असंच करूया आपण.” समीर लगेचं पाटील काकूंकडे जातो आणि त्यांना पुढील पंधरा दिवसांसाठी आपल्या घरी डबे पोहोच करायला सांगतो.

समीर घरी येतो आणि ममताला सांगतो, “मिशन कंप्लिट झालंय. Old Mother Sad Story आता उद्या रात्री निघायचं युरोप टूरला. मस्त एन्जॉय करायचा, कशाचाही विचार करायचा नाही.” ममताला ही खूप आनंद होतो आणि ती समीरला घट्ट मिठी मारते. दुसऱ्या दिवशी ममता आणि समीर दिवसभर त्यांची कामं करत असतात. त्यांची बॅग पॅक करतात. अगदी निघायच्या वेळेस समीर आदितिच्या रूममध्ये येतो. आदिती नामस्मरण करत असते. समीर आदितीला म्हणतो, “आई मी आणि ममता दोघे युरोप टूरला चाललो आहोत. Old Mother Sad Story पंधरा दिवसांचा दौरा असणार आहे. तो जेवणाची काळजी करू नकोस. पाटील काकू आहेत ना चौथ्या मजल्यावरच्या, त्या तुला दोन्ही वेळेला डबा आणून देतील. डबा खा आणि निवांत रहा.”

आदितीला आता कशाचंही देणंघेणं राहिलेलं नसतं. ती फक्त मान डोलावते. समीर आणि ममता हे दोघेही तेथून निघून जातात. Old Mother Sad Story पुढील पंधरा दिवस समीर आणि ममता युरोप टूरमध्ये खूप एन्जॉय करतात, मजा करतात. परंतु या पंधरा दिवसांमध्ये या दोघांनी एकदाही आदितीला फोन केलेला नसतो. तिची विचारपूस केलेली नसते. आदिती बरी तर आहे ना, तिला जेवण वेळेवर मिळतं की नाही, हेही विचारलेलं नसतं.

एवढंच नाही तर समीरने पाटील काकूंनाही फोन केलेला नसतो की, तुम्ही आईला डबा देताय ना. Old Mother Sad Story आई जेवतेय ना. समीर आणि ममताला फक्त त्यांची हौस मौस, मजा महत्त्वाची असते. त्यांच्या मनातून अदितीचा विचार पूर्णपणे निघून गेलेला असतो.

पंधरा दिवसानंतर समीर आणि ममता हे दोघे घरी परततात. ते फ्लॅटचा दरवाजा उघडतात. Old Mother Sad Story त्यांना खूप घाणेरडा वास येऊ लागतो. समीर दिवे लावतो, तर समोरचं दृश्य पाहून या दोघांना जबर धक्काचं बसतो. कारण आदिती जमिनीवर पडलेली असते. ती बेशुद्ध असते. घरात अन्न सगळीकडे सांडलेलं असतं आणि त्याचाचं वास सुटलेला असतो.

समीर आणि ममता खूप घाबरतात. समीर आदितीला उठवण्याचा प्रयत्न करतो. “आई काय झालं तुला, उठ ना.” परंतु आदिती काही हालचाल करत नाही. ममता लगेचं हॉस्पिटलमध्ये फोन करते आणि ॲम्बुलन्स बोलावून घेते. हे दोघे आदितिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करतात. डॉक्टर आदितीला चेक करतात आणि बाहेर येऊन समीर आणि ममताला सांगतात की, “त्यांची तब्येत खूप नाजूक आहे. मागील दहा दिवसांपासून त्यांच्या पोटात अन्नाचा एक कण गेलेला नाहीये. उपासमार झाली आहे त्यांची. आम्हाला पोलिसांना कळवावं लागेल.”

समीर आणि ममताच्या पायाखालची जमीन सरकते त्यांना काय झालं, ते समजतचं नाही. डॉक्टर पोलिसांना फोन करून या घटनेबद्दल सांगतात. पोलीस हॉस्पिटलमध्ये पोहोचतात. डॉक्टर त्यांना सगळ्या प्रकरणाबद्दल सांगतात. पोलीस इन्स्पेक्टर समीर आणि ममताला विचारतो, “ही तुमची आई आहे ना. मग त्यांची अशी अवस्था कशी झाली ? त्यांची उपासमार झाली आहे. दहा दिवसांपासून तुम्ही स्वतःच्या आईला उपाशी मारलं. का तिचा छळ केलात ? लाज नाही का वाटत तुम्हाला ?”

समीर म्हणतो, “साहेब चिडू नका. माझ ऐकून घ्या. आम्ही दोघे 15 दिवस युरोप टूरला गेलो होतो. घरी नव्हतो. परंतु जाण्याआधी आम्ही आईची सगळी सोय लावून गेलो होतो. आमच्या बिल्डिंगमध्येचं पाटील काकू मेस चालवतात. त्यांना दोन वेळचा डबा द्यायला सांगितला होता. हे कसं झालं आम्हाला नाही माहित.” इन्स्पेक्टर पाटील काकूंचा नंबर घेतो आणि त्यांना फोन करून लगेच हॉस्पिटलमध्ये बोलवतो.

पाटील काकू हॉस्पिटलमध्ये पोहोचतात. तेव्हा इन्स्पेक्टर त्यांना विचारतो, “या दोघांनी तुम्हाला त्यांच्या घरी डबा पोहोच करायला सांगितला होता का ?” पाटील काकू सांगतात, “हो सांगितला होता. मी पाच दिवस त्यांना डबा पोहोच केला. परंतु दहा दिवसांपूर्वी माझ्या वडिलांचा एक्सीडेंट झाला. त्यामुळे मी माझ्या माहेरी गेले होते. मी यांना फोन करायचा खूप प्रयत्न केला. पण ते विदेशात गेल्यामुळे त्यांचा नंबर लागत नव्हता आणि नवीन नंबर त्यांनी दिला नव्हता. त्यांनीही मला फोन करून काही चौकशी केली नाही. आता मला माझे वडील सर्वात जास्त महत्त्वाचे आहेत ना साहेब. मी तरी काय करणार.”

इन्स्पेक्टर समीर आणि ममताकडे रागाने पाहतो. हे दोघे शरमेने मान खाली घालतात. Old Mother Sad Story तेवढ्यात डॉक्टर बाहेर येतात आणि म्हणतात की, “पेशंटला शुद्ध आलीये. तुम्ही त्यांना भेटू शकता.” इन्स्पेक्टर, समीर आणि ममता हे तिघेही आतमध्ये जातात.

इन्स्पेक्टर आदितीला विचारतो, “आई तुम्ही काय घडलं, ते सगळं खरं खरं सांगा.Old Mother Sad Story दहा दिवसांपासून तुमची उपासमार झाली आहे. हे सगळं तुमच्या मुलामुळे आणि सुनेमुळ झालंय का ? त्यांनी असं जाणून-बुजून केलं आहे का ?”

आदिती खूप अशक्त झालेली असते. ती थरथरत्या आवाजात म्हणते, Old Mother Sad Story “नाही रे बाळा. माझ्या मुलाने आणि सुनेने असं जाणून बुजून नाही केलं. ते तर खूप चांगले आहेत. माझी अशी अवस्था असतानासुद्धा ते मला सांभाळतात. मला दोन वेळचं खायला मिळेल, याची सोय ते करून गेले होते.

परंतु दहा दिवसांपूर्वी पाटील बाईने सांगितलं की, मी डबा नाही देणार. Old Mother Sad Story मग मीच विचार केला की, चांगलंच झालं. मलाही देवाघरी जायचंचं आहे.” हे ऐकून सगळ्यांना मोठा धक्का बसतो. इन्स्पेक्टर विचारतो, “आई तुम्ही अस का बोलताय ?”

आदिती म्हणते, “बाळा माझा नवरा चार वर्षांपूर्वी मला सोडून गेला. Old Mother Sad Story आमच्या दोघांचाही एक्सीडेंट झाला होता. तो तर देवा घरी गेला, पण मी येथेच राहून गेले, अशी अपंग बनून. माझ्या अशा अवस्थेचा माझ्या मुलाला आणि सुनेला खूप त्रास होतो. ते माझा सांभाळ करतात, परंतु मला जगणं नकोस झालंय. त्यांच्या शिवाय जगायला मजाचं येत नाही रे मला.

श्वास चालतोय, म्हणून मी जिवंत आहे, असं तुम्ही म्हणू शकता.Old Mother Sad Story परंतु मी तर केव्हाचं त्यांच्याबरोबर गेले होते. मला कळतंय, माझ्या सुनेला आणि मुलाला माझी अडचण होतेय. त्यांचं नवीन नवीन लग्न आहे, त्यांना हौस मौस करायची आहे. माझ्यामुळे ती करता येत नाहीये.

मला वाटलं ही चांगली संधी मिळालीये. दहा दिवस काही खाल्लं पिल्लं नाही, Old Mother Sad Story तर आपोआपचं जीव निघून जाईल. खूप त्रास होत होता, भूक लागत होती. पण मी ठरवलं होतं की, ओरडायचं नाही. कुणाला काही सांगायचं नाही. एक दिवस अचानक शुद्ध हरपली आणि आज येथे डोळा उघडला.

म्हातारपण खूप अवघड असतं रे बाळा. म्हातारपणात जोडीदाराची गरज असते. Old Mother Sad Story म्हातारपणात काही उद्देश्य नसतो. पण जोडीदार असला, कोणाची साथ असली की, जगण्याला अर्थ असतो आणि तोच नसला तर काही अर्थचं उरत नाही. असं निरर्थक जगून तरी काय फायदा, म्हणून मी हे सगळं केलं.”

हे ऐकून सर्वांच्या डोळ्यात पाणी येतं. समीर रडू लागतो. तो आईच्या पायावर डोकं ठेवतो आणि रडता रडता म्हणतो, Old Mother Sad Story “आई मला माफ कर. मी खूप चुकीचं वागलो. खूप स्वार्थी वागलो. पंधरा दिवसांपासून मी एकदाही फोन करून तुझी चौकशी केली नाही. मी माझीच हौस मौस करत बसलो. माझ्याचं आयुष्यात रमलो. माझ्यासारखा नालायक मुलगा या जगात नसेल.”

ममता म्हणते, “हो आई मलाही माफ करा. खरंच आज तुम्ही मला माझ्या चुकीची जाणीव करून दिली. जर हेच माझ्या आईबरोबर घडलं असतं, तर मला किती वाईट वाटलं असतं. तुम्ही माझ्या सासू आहात, हा विचार करून मी तुमच्याशी वाईट वागत राहिले. परंतु जगातील प्रत्येक सुनेने सासूच्या जागी तिच्या Old Mother Sad Story आईचा विचार केला पाहिजे, तेव्हा कधीचं कोणती सून माझ्यासारखी चुकीचं नाही वागणार. आई मी तुम्हाला वचन देते, आजपासून मी तुम्हाला आईसारखी माया लावेल. कधीही तुम्हाला एकटं नाही वाटू देणार.”

समीर म्हणतो, “आई आम्हाला तुझी गरज आहे. तु खूप जग. तुझ्या नातवंडांना सांभाळायचंय तुला.” Old Mother Sad Story आदितीच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती म्हणते, “हो बाळा मी नक्की प्रयत्न करेल.”

समीर आणि ममता या दोघांना त्यांची चूक समजलेली असते. हे दोघेही अदितीच्या पाया पडून तिची Old Mother Sad Storyमाफी मागतात. इन्स्पेक्टर या दोघांना माफ करतो आणि म्हणतो, “तुम्हाला दोघांना पश्चाताप झालेला दिसतोय. म्हणून मी हे प्रकरण रजिस्टर नाही करणार. परंतु नक्कीचं मी आईना दर महिन्याला भेटायला येत जाईल. काही चुकीचा केलं, तर गाठ माझ्याशी आहे, हे लक्षात ठेवा.”

समीर आणि ममता हो चालेल, असं म्हणतात. इन्स्पेक्टर तेथून निघून जातो. त्या दिवसानंतर समीर Old Mother Sad Story आणि ममता अदितीची खूप काळजी घेतात. तिच्यावर इलाज करतात. आदितीआता तिच्या पायावर कशी बशी चालूही लागते. समीर आणि ममताला बाळ होतं.  आदिती नातवंडांचा चांगला सांभाळ करते. एकूणचं त्यांचं कुटुंब खूप आनंदी आणि सुखी कुटुंब होतं.

तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, कशी वाटली आजची कथा. नक्कीचं कमेंट करून सांगा आणि अशाचं नवीन नवीन कथांसाठी आमचे इतर लेखही नक्कीच वाचा.

धन्यवाद !

Scroll to Top