चला हवा येऊ द्या कार्यक्रम बंद झाला आणि सध्या निलेश साबळे कलर्स मराठीवरील हसताय ना ? हसायलाचं पाहिजे या कार्यक्रमात दिसून येतोय. परंतु खऱ्या अर्थाने चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातून तो संपूर्ण जगभरात पोहोचला. त्याने पैसा, प्रसिद्धी सगळं काही कमावलं. आता एका इंटरव्ह्यूमध्ये त्याने खूप मोठा खुलासा केला आहे.
या मुलाखतीत निलेश साबळेला प्रश्न विचारला गेला की, अनेक वेळेस तुला ट्रोल केलं जातं की, चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात तू कपिल शर्माची कॉपी केली होती. त्याच्यासारखाचं कार्यक्रम बनवला होता.
चला हवा येऊ द्या कॉपी केलेला शो
तेव्हा निलेशने उत्तर दिलं की, हे खरं आहे. मी कधीही नकार देणार नाही. जे सत्य आहे, ते सत्य आहे. मला चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम सुचला नव्हता. 2014 मध्ये लय भारी या चित्रपटाच्या प्रमोशनवेळी फक्त एका एपिसोडसाठी आम्ही चला हवा येऊ द्या सुरू केलेला. तेव्हा रितेश देशमुखने आम्हाला सुचवलं होतं की, कपिल शर्मा सारखा मराठीत मराठी चित्रपट आणि नाटकांचं प्रमोशन करण्यासाठी एक कार्यक्रम असायला हवा आणि त्यानंतरचं आम्ही चला हवा येऊ द्याची सुरुवात केली.
2014 मध्ये सुरू झालेला हा शो पुढील दहा वर्ष झी मराठीवर चालला. नुकताचं या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला. या कार्यक्रमातून निलेश साबळे, भाऊ कदम, भारत गणेशपुरे, सागर कारंडे कुशल बद्रिके आणि श्रेया बुगडे रातोरात स्टार बनले. सगळ्यांनी भरपूर पैसा आणि प्रसिद्धी कमवली.
Nilesh Sable Copied Kapil Sharma Show
कपिल शर्मा हा हिंदीमधील प्रसिद्ध कॉमेडियन आहे. त्याने द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज या कार्यक्रमातून प्रसिद्धी मिळवली होती. त्यानंतर कॉमेडी सर्कस, कॉमेडी नाईट्स विथ कपिल आणि द कपिल शर्मा शो या कार्यक्रमातून तो जगभर प्रसिद्ध झाला आणि अब्जाधीश बनला.
कपिल शर्माच्या या कॉमेडी शो च्या धरतीवरचं फक्त मराठी चला हवा येऊ द्या नाही, तर अनेक प्रादेशिक भाषांमध्ये प्रादेशिक भाषेतील चित्रपट आणि नाटकांना प्रमोट करण्यासाठी शो बनले आहेत. जेथे सेलिब्रिटी आपलं नाटक किंवा चित्रपट घेऊन येतात आणि मग तेथे प्रेक्षकांचं मनोरंजन केलं जातं.
तर तुम्हाला काय वाटतं याबद्दल नक्कीचं कमेंट करुन सांगा आणि अशाचं नवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !