New Sim Card Rule आपल्या देशात 26 जूनपासून एका नवीन कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. या कायद्याचं नाव आहे (Telecommunication Act 2024) टेलिकम्युनिकेशन ऍक्ट 2023. मागील वर्षी हा कायदा संसदेतून पास झाला होता आणि आता देशात या कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. या कायद्याने मागील 136 वर्षांपासून देशात सुरू असलेला भारतीय टेलिग्राम अधिनियम या कायद्याला रिप्लेस केलंय.
New Sim Card Rule
देशातील नवीन टेलिकम्युनिकेशन ऍक्ट 2023 मध्ये अनेक नवीन नियम संमिलित करण्यात आले आहेत आणि सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे आता कोणत्याही भारतीयाला संपूर्ण आयुष्यात जास्तीत जास्त 9 सिम कार्ड खरेदी करता येणार आहेत. त्यापेक्षा जास्त सिमकार्ड खरेदी केले, तर आर्थिक दंड ठोठावण्यात येईल.
जर तुम्ही तुमच्या संपूर्ण आयुष्यात 9 पेक्षा जास्त सिम कार्ड खरेदी केले, तर तुम्हाला 50 हजार रुपये ते 2 लाख रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो. तसंच अनेकवेळेस पाहिलं गेलंय की, दुसऱ्याच्या आयडेंटिटी कार्डवरही खोटी ओळख दाखवून सिम कार्ड खरेदी केली जातात आणि जर असं कोणी करत असेल तर 50 लाखांपर्यंत दंड आणि 3 वर्षांचा कारावास होऊ शकतो.
या नवीन कायद्यानुसार गरज पडल्यास सरकार तुमचं नेटवर्क सस्पेंड करू शकते आणि तुमचे मेसेजसुद्धा इंटरसेप्ट करू शकते.
महाराष्ट्रात सुरू होणार लाडली बहना योजना
जम्मू काश्मीर आणि नॉर्थ ईस्टमधील राज्यांसाठी 9 सिम कार्ड ऐवजी 6 सिमकार्डचा नियम लावण्यात आला आहे.
एकूणचं या नवीन टेली कम्युनिकेशन 2018 च्या नियमामुळे सरकार देशातील जनतेला टेली कम्युनिकेशन क्षेत्रात सुरक्षा देण्याचा प्रयत्न करतेय.
तर तुम्हाला काय वाटतंय या नवीन New Sim Card Rule नियमाबद्दल ? नक्कीचं कमेंट करून सांगा आणि अशाचं नवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !