New Maruti Swift आपल्या देशातील सर्वसामान्य नागरिकांची सर्वात आवडती कार म्हटलं की मारुती सुझुकी स्विफ्ट हे नाव डोळ्यांसमोर येतं. देशात सर्वात जास्त विकली जाणारी हॅचबॅक कार मारुती सुझुकी स्विफ्ट आहे. 2004 मध्ये पहिल्यांदा स्विफ्ट लॉन्च करण्यात आली होती. तेव्हापासून भारतीय ग्राहकांच्या मनावर ती अधिराज्य गाजवतेय.
New Maruti Swift
आतापर्यंत मारुती सुझुकी स्विफ्टच्या तीन जनरेशन लॉन्च करण्यात आल्या आहेत आणि आता चौथं जनरेशन (New Maruti Swift) आज लॉन्च करण्यात आलंय. यावेळेस गाडीमध्ये खूप बदल करण्यात आले आहेत. आता स्वीट पुन्हा एकदा मार्केट गाजवायला तयार आहे. मग कोणते आहेत हे बदल आणि नवीन स्विफ्टमध्ये असं काय खास आहे ? आज आपण त्याबद्दल जाणून घेणार आहोत.
(New Maruti Swift) नवीन मारुती स्विफ्टच्या इंटेरियर आणि एक्सटेरिअरमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. जसं की, हेडलॅम्पचं डिझाईन नवीन आहे. त्याचबरोबर रेडिएटर ग्रील आणि फॉग लॅम्प सुद्धा गाडीला नवीन लुक देतात. याआधीच्या मॉडेलमध्ये मारुती सुझुकीचा लोगो जो ग्रीलमध्ये असायचा, तो आता बोनेटवर देण्यात आला आहे.
आता लॉन्च झालेली नवीन मारुती स्विफ्ट ही थर्ड जनरेशन स्विफ्टपेक्षा 15 mm ने लांब आणि 30 mm ने उंचही आहे. म्हणजे गाडीमध्ये जास्त स्पेस मिळेल, एवढं मात्र नक्की.
ही तर झाली झाली नवीन स्विफ्टच्या एक्सटेरियरची गोष्ट. मग आता इंटेरियरमध्ये काय बदल झाला आहे ? तर सर्वात जास्त बदल इंटेरियरमध्येच केले गेले आहेत आणि गाडीला आणखीन प्रीमियम बनवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. जर तुम्ही आधीची स्वीट वापरत असाल, तर तुम्हाला वाटेल की, तुम्ही एखाद्या नवीन गाडीतच आला आहात. मारुती सुझुकीची Fronx आणि Baleno या दोन गाड्यांमध्ये असलेलं इंटिरियर या स्विफ्टमध्ये वापरण्यात आलंय.
New Generation Maruti Swift Features
नवीन मारुती स्विफ्टच्या केबिनमध्ये नवीन डॅशबोर्ड, लेदर सीट्स, इन्फोटेंमेंट सिस्टम, नवीन डिजाईनचे एसी व्हेंट्स असे अनेक फीचर्स ऍड केले गेलेत.
नवीन मारुती सुझुकी स्विफ्टमध्ये सर्वात मोठा बदल म्हणजे गाडीमध्ये दिलं गेलेलं इंजिन. या आधीच्या मॉडेलमध्ये K सिरीजचं इंजिन दिलं जात होतं. तर या स्विफ्टमध्ये Z सिरीज इंजिन दिलं गेलंय. जे जवळपास 26 किलोमीटर पर लिटरचं एव्हरेज देतं. जे आधीच्या मॉडेलपेक्षा 3 किलोमीटरने जास्त आहे.
बजाजने लॉंच केली सर्वात धमाकेदार पल्सर
या गाडीच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 6.49 लाख रुपये असून गाडीच्या बुकिंगही सुरू झाल्या आहेत. तर तुम्ही नवीन स्विफ्ट खरेदी करणार का नक्कीचं कमेंट करून सांगा आणि अशाचं नवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !