भारतीयांनी खाल्ली चक्क 600 कोटी पॅकेटस मॅगी. तूम्हाला अचानक भूक लागली आहे. पण ही दुपारच्या जेवणाची वेळ नाहीये आणि संध्याकाळच्या जेवणाचीही वेळ नाहीये. नाष्ट्याचीही वेळ नाहीये, अशा वेळेस काय खावं हा प्रश्न तुमच्यासमोर पडतो आणि मग लगेच तुमच्या नजरेसमोर टीव्हीवरील एक जाहिरात येते की, अशा छोट्या भुकेसाठी दोन मिनिटात बनणारी मॅगी बनवून खायची आणि मग तुम्ही सुद्धा या जाहिराती प्रमाणेचं दोन मिनिटात ही मॅगी बनवण्याचा प्रयत्न करतात. खरं तर ही मॅगी कधीही दोन मिनिटात बनत नाही.
भारतीयांनी खाल्ली चक्क 600 कोटी पॅकेटस मॅगी
परंतु नेसले इंडिया या कंपनीने मॅगीची केलेली ही जाहिरात प्रत्येक भारतीयाच्या मनात चांगलीच वसली आहे आणि या जाहिरातीनेचं कमाल केलीये. कारण मागील आर्थिक वर्षात नेसले इंडियाने भारतात चक्क 600 कोटी मॅगीच्या पाकिटांची विक्री केली आहे. जगभरातील कोणत्याही देशाच्या तुलनेत ही सर्वात जास्त मॅगी या उत्पादनाची विक्री आहे.
आपण सगळेचं नेस्ले कंपनीला ओळखतो. ते अनेक प्रॉडक्ट बनवतात. मॅगी हे त्यांचं प्रॉडक्ट आहेचं. त्याचबरोबर त्यांचं किटकॅट हे चॉकलेट सुद्धा खूप प्रसिद्ध आहे. मागील आर्थिक वर्षात नेसलेने किटकॅट या चॉकलेटच्या 420 कोटी पॅकेटसची विक्री केली आहे आणि हे दोन त्यांचे बेस्ट सेलर प्रॉडक्ट्स आहेत.
2015 मध्ये नेसलेच्या मॅगीमध्ये लीडचं प्रमाण खूप जास्त आढळलं होतं. त्यामुळे पुढील काही महिन्यातचं मॅगीवर देशात बंदी घालण्यात आली आणि मॅगीची विक्री शून्य झाली होती. परंतु त्यानंतर नेसलेने मॅगीमध्ये बदल घडवून आणले. पुन्हा या प्रॉडक्टची जाहिरात केली आणि आता मॅगी ही जगात सर्वात जास्त भारतातचं विकली जाते.
एलन मस्क यांचा पगार कितीये माहितेय का ?
नेसले कंपनीने आटा मॅगी, मसाला मॅजिक मॅगी अशा अनेक प्रकारांमध्ये मॅगी लॉन्च केली, जी भारतीयांना खूप आवडतेय. लहान मुलांसाठी आटा मॅगी अनेक लोक विकत घेतात आणि त्यांना खाऊ घालतात. फक्त घराघरातचं नाही, तर रस्त्यावर विविध स्टॉल्सवर सुद्धा मॅगी मिळते. एक प्लेट मॅगीची किंमत 25 ते 30 रुपयांपेक्षाही जास्त असते. त्यामुळे अनेकांना रोजगार मिळवून देण्याचं कामही मॅगीने केलंय.
तर तुम्ही मॅगी खाता का ? तुम्हाला मॅगी आवडते का ? नक्कीचं कमेंट करुन सांगा. मॅगीला एखादा पर्याय तुम्ही शोधलाय का तेही सांगा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !