NDTV Marathi Channel Number पत्रकारितेला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटलं जातं. देशात कुठे काय चाललंय, याबद्दलची सर्व माहिती न्यूज चैनलच्या माध्यमातून देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवली जाते. सध्या आपल्या देशात मोठ्या प्रमाणात न्यूज चैनल्स सुरू आहेत. हिंदी बरोबरचं विविध प्रादेशिक भाषा आणि इंग्लिशमध्येही न्यूज चॅनल सुरू आहेत.
काही वर्षांपूर्वी सह्याद्री प्रादेशिक वाहिनीवर संध्याकाळी सात वाजता बातम्या लागायच्या आणि संपूर्ण दिवसभराच्या घडामोडी याच अर्ध्या तासात आपण पहायचो. परंतु आता 24 तास सुरू राहणारी न्यूज चैनल्स सुरू आहेत. यावर ब्रेकिंग न्यूज दिल्या जातात. क्षणाक्षणाच्या अपडेटस आणि घडामोडी सांगितल्या जातात.
आपल्या मराठीमध्येही अनेक न्यूज चॅनेल्स सुरू आहेत. यामध्ये एबीपी माझा, झी 24 तास टीव्ही 9 मराठी, आयबीएन लोकमत आणि पुढारी न्युज यांसारखे प्रसिद्ध न्यूज चॅनल्स आहेत.
NDTV Marathi Channel Number
परंतु आता या सर्व न्यूज चॅनलला टक्कर देण्यासाठी एका नवीन न्यूज चॅनेलची एन्ट्री होतेय नाव आहे एनडीटीव्ही मराठी. एनडीटीव्ही ही मोठी कंपनी आहे. त्यांचे अनेक हिंदी आणि इंग्लिश न्यूज चैनल्स आहेत. आता त्यांनी मराठीमध्ये पाऊल ठेवलंय.
सरकार देतंय ३०० युनिट फ्री वीज तुम्ही अर्ज केला का ?
महाराष्ट्र दिनी 1 मे रोजी एनडीटीव्ही मराठी (NDTV Marathi Channel Number) लॉन्च केलं जाईल. इतर न्यूज चैनलपेक्षा एनडीटीवीची न्यूज दाखवण्याची शैली थोडीशी वेगळी आहे. त्यामुळे मराठी न्यूज चैनल्समध्ये एनडीटीव्ही आपलं वेगळं स्थान निर्माण करेल, अशी सर्वांना खात्री आहे.
एनडीटीव्ही मराठी न्यूज चॅनेल
काही वर्षांपूर्वी तोट्यात असलेलं एनडीटीव्ही मागील काही महिन्यांमध्ये फायद्यात आलंय. त्यामुळे आता त्यांना भारत सरकारकडून चार रीजनल न्यूज चैनल्स सुरू करण्याची परवानगी मिळाली आहे. त्यात मराठीचासुद्धा समावेश होता आणि आता एनडीटीव्ही मराठी लवकरचं प्रेक्षकांच्या सेवेत रुजू होईल.
सर्व आघाडीच्या डीटूएच सर्विसेस आणि केबल नेटवर्कवर तुम्ही एनडीटीव्ही मराठी पाहू शकतात. परंतु चैनल नंबर कोणता असेल याबद्दल अजून माहिती समोर आलेली नाहीये. NDTV Marathi Channel Number On Dish TV, NDTV Marathi Channel Number On Airtel D2H, NDTV Marathi Channel Number On Tata Sky येत्या काही दिवसात हे चित्र स्पष्ट होईल.
एनडीटीव्ही मराठी प्रस्थापित न्यूज चैनल ला चांगलीचं टक्कर देईल आणि प्रेक्षक वर्ग वळवेल यात शंका नाही. तर तुम्ही उत्साहीत आहात का, हे नवीन मराठी न्यूज चैनल पाहण्यासाठी नक्कीचं कमेंट करून सांगा.
अशाचं नवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !