Navra Bayko Romantic Marathi Story भक्तीसाठी आजचा दिवस खूप दुःखाचा होता. कारण तिचे बाबा हे जग सोडून गेले होते. भक्ती अवघ्या सोळा वर्षांची होती. तिने नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती. सुट्टीमध्ये बाबांबरोबर खूप फिरायचं, असा तिने प्लॅन बनवला होता. परंतु प्रॉमिस करूनही बाबांनी ते मोडलं आणि तिला सोडून कायमचे देवाघरी निघून गेले. त्यामुळे भक्ती खूप रडत होती आणि तिला सावरणं सर्वांनाचं कठीण जात होतं.
परंतु भक्तीची आई नियतीच्या डोळ्यातून मात्र एकही अश्रू येत नव्हता. ती फक्त भक्तीच्या बाबांच्या मृतदेहाकडे एकटक पाहत होती. तिच्या डोळ्यात अश्रू नव्हते, त्यामुळे सर्वांनाचं आश्चर्य वाटत होतं. काहींना वाटलं की, तिला मोठा धक्का बसला असेल, म्हणून असं होत असेल.
Navra Bayko Romantic Marathi Story
भक्तीच्या बाबांचा अंत्यसंस्कार होतो. त्यांच्या पार्थिवाला अग्नी देताना सुद्धा नियतीच्या डोळ्यात अश्रू येत नाही. बघता बघता या घटनेला सहा महिने उलटून जातात. आयुष्य पूर्वपदावर आलेलं असतं. भक्ती आता कॉलेजात जायला लागली होती. परंतु अजूनही रोज तिला बाबांची आठवण यायची आणि तिचे डोळे पानवायचे.
भक्तीची आई नियतीने एक नवीन नोकरीला सुरुवात केली होती आणि ती तिच्या आयुष्यात रमली होती. कंपनीतील लोकांबरोबर पिकनिक, कंपनीच्या पार्ट्या अशा सगळ्या गोष्टी ती करायची. तिच्या राहणीमानातही खूप बदल झाला होता. सहा महिन्यांपूर्वीची नियती आणि Navra Bayko Romantic Marathi Story आजची नियती यामध्ये जमीन आसमानाचा फरक होता.
हा फरक भक्तीलाही जाणवत होता. परंतु आपली आई बाबा गेले, या दुःखातून सावरतेय, याचं तिला बरं वाटत होतं. परंतु एक दिवस सोसायटीतील भक्तीची मैत्रीण जागृती तिला भेटायला आली आणि तिला सांगू लागली की, “सोसायटीमध्ये एक वेगळी चर्चा सुरू आहे, तुझ्या आईबद्दल.”
भक्ती विचारते, “कोणती चर्चा ?” तर जागृती सांगते की, “तुझी आई रोज रात्री बारा वाजता सजून धजून छोटे वेस्टर्न कपडे घालून बिल्डिंगच्या गच्चीवर जाते.” हे ऐकून भक्तीला मोठा धक्काचं बसतो. तिचा तर यावर विश्वासचं बसत नाही आणि Navra Bayko Romantic Marathi Story ती जागृतीवर चिडून म्हणते, “तू काय बोलतेस, हे तरी कळतंय का तुला ? तोंडाला येईल ते बोलायला लागलीस ? माझी मैत्रीण आहे, म्हणून ऐकून घेतलं, नाही तर हाकलून दिलं असतं तुला.”
जागृती म्हणते, “भक्ती तुझा राग मला कळतोय. आईबद्दल असं कोणीही ऐकून घेणार नाही आणि तेही बाबा या जगात नसताना. परंतु मी खरं बोलतेय, अनेक लोकांनी तुझ्या आईला तसं पाहिलंय. तुला जर विश्वास पटत नसेल, तर आज रात्री तू जागी राहा Navra Bayko Romantic Marathi Story आणि मग तुझ्या आईच्या मागे मागे जा.” भक्तीचा यावर विश्वास बसत नाही. परंतु ती या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावायचा ठरवते.
ती जाणून बुजून आज नियतीच्या रूममध्ये झोपण्याचा हट्ट करते. भक्ती झोपण्याचं नाटक करते. रात्री साडेअकरा वाजता नियती बेडवरून उठते आणि आवरायला लागते. ती छान मेकअप करते आणि एक नवीन ड्रेस घालून रूम बाहेर जाते. थोड्याच वेळात भक्तीला दरवाजा लावल्याचा आवाजही येतो. भक्तीने हे सगळं पाहिलेलं असतं आणि तिला धक्काचं बसतो. ती लगेचचं उठते आणि नियतीच्या मागे मागे टेरेसवर जाते.
नवरा बायको रोमँटिक मराठी स्टोरी
तेथे गेल्यानंतर तिला नियती टेरेसवर उभी राहून आकाशाकडे पाहताना दिसते. भक्तीला वाटतं की, नक्कीचं ती कोणाची तरी वाट पाहत असेल. परंतु दहा पंधरा मिनिटे होऊन जातात, तरीही कुणी येत नाही. भक्तीला कळतचं नाही, हे नेमकं काय चाललंय ? भक्ती विचार करते, Navra Bayko Romantic Marathi Story आईला याबद्दल विचारायलाच हवं. नाही तर ही गोष्ट सगळीकडे पसरेल आणि आईची खूप बदनामी होईल.
भक्ती पुढे येते आणि नियतीच्या खांद्यावर हात ठेवते. Navra Bayko Romantic Marathi Story नियती दचकून मागे पाहते. तर भक्तीला पाहून ती आणखीनचं घाबरते. भक्ती विचारते, “आई तू येथे इतक्या रात्रीची काय करतेस आणि तेही या कपड्यांमध्ये ?” नियती सांगते, “काही नाही घरात खूप गरम होत होतं ना, म्हणून आले.”
भक्ती चिडून म्हणते, “आई मी काय आता लहान नाही राहिले, अशी कारण मला द्यायला आणि मला ती पटायला. लवकर सांग मला, संपूर्ण सोसायटीमध्ये ही चर्चा आहे की, तू रोज रात्री मध्यरात्री येथे येते आणि तेही अशा कपड्यांमध्ये. Navra Bayko Romantic Marathi Story सगळे तुझ्याबद्दल वाईट साईट बोलत आहेत. माझ्या कानावर आलं, म्हणून मी खर का खोटं करायला येथे आले. आता मला तरी सत्य सांग.”
नियतीला समजतं की, आता भक्ती पासून सत्य लपवून काही फायदा नाहीये. नियती तिला म्हणते, “भक्ती तुला मी सगळं सत्य सांगते. तुला आठवतंय का, जेव्हा तुझे बाबा होते, आम्ही आठवड्यातून एक दिवस रोज रात्री असेच गच्चीवर यायचो आणि तासंतास ताऱ्यांकडे पहात बसायचो.
काही महिन्यांपूर्वी आम्ही असेच एकदा इथे Navra Bayko Romantic Marathi Story आलो होतो. तर तुझे बाबा मला म्हणाले होते की, नियती जर मी हे जग सोडून गेलो. तरीसुद्धा तू येथे असंच यायचं. सजून धजून यायचं आणि आकाशाकडे पाहायचं. कारण मीसुद्धा एखादा तारा बनून तुझ्याकडे पाहत असेल. तुझ्या बाबांची तीच इच्छा पूर्ण करण्यासाठी मी रोज रात्री येथे येते.” हे ऐकून भक्तीला मोठा धक्काचं बसतो.
नियती म्हणते, “भक्ती अनेक लोकांना तर ही सुद्धा शंका आहे की, मी तुझे बाबा गेल्यानंतर आणि त्यांच्या अंतयात्रेलाही रडलं नाही. माझ्या डोळ्यात अश्रूंचा थेंब आला नाही. कारण तेच मला म्हणाले होते की, मी गेल्यानंतर रडत बसू नको. तुला भक्तीला सांभाळायचंय. तू किती खंबीर आहे, हे सगळ्या जगाला दाखवून दे.
भक्ती मी त्या दिवशी सर्वांसमोर नाही रडले. हे प्रत्येकाला दिसलं. परंतु मी खोलीमध्ये जाऊन रात्रभर रडत होते, हे कोणाला नाही दिसलं. आजही मी रडत बसते, ते कोणाला नाही दिसत. लोक काय बोलणारच, त्यांच्याकडे किती लक्ष द्यायचं. बाईचा नवरा गेला की, लोकांना बोलायला एक विषय भेटतो.
तिच्याबद्दल बोलायला, शंका काढायला, त्यांना खूप आवडतं आणि मी Navra Bayko Romantic Marathi Story अशी येथे मध्यरात्री येते, मग ते तर बोलणारचं ना. भक्तीच्याही डोळ्यात पाणी येतं आणि ती म्हणते, “आई मग तू मला का नाही सांगितलं, तू रोज रात्री इथे बाबांशी बोलायला येतेस, मी सुद्धा त्यांना खूप मिस करते. मी त्यांच्याशी बोलले असते ना.”
नियती म्हणते, “तुला खरं सांगायचं तर इथे Navra Bayko Romantic Marathi Story आल्यावर माझा दिवसभराचा ताण निघून जातो. असं वाटतं की, खरंच ते येथेच आहेत. त्यांच्या सहवासात राहिल्याचं सुख मला पुन्हा एकदा इथे अनुभवता येतं.”
भक्ती विचारते, “आई बाबा माझ्याबद्दल काय म्हणायचे, जसं ते तुला म्हणाले की, Navra Bayko Romantic Marathi Story मी गेल्यानंतर असं कर, तसं माझ्याबद्दल काही म्हणाले नव्हते का ?” नियती सांगते, “ते नेहमी तुझ्याबद्दलचं बोलत राहायचे, आपली मुलगी किती हुशार आहे, किती सुंदर आहे, मला काही झालं, तर तिचं चांगलं पालन पोषण कर, तिचं शिक्षण पूर्ण कर. तिला स्वतःच्या पायावर उभं कर, असं ते मला नेहमी सांगायचे.
आणि त्यामुळेचं मी ही नोकरी सुरू केली. तुझ्या बाबांच्या इन्शुरन्सच्या Navra Bayko Romantic Marathi Story पैशातून माझं उरलेलं आयुष्य निघून गेलं असतं, परंतु तुला तुझ्या मनाप्रमाणे शिकता यावं, यासाठीचं मी ही नोकरी केली आहे.”
हे ऐकून नियतीच्या डोळ्यातही पाणी येतं. ती आकाशाकडे पाहते आणि म्हणते, “बाबा मला तुमची खूप आठवण येते. तुम्ही असं मला का सोडून गेला ? मला दुसर काही नकोय, फक्त तुम्ही हवे आहात. तुम्ही दोघे हवे आहात. एका मुलीच्या आयुष्यात तिच्या बाबाचं स्थान Navra Bayko Romantic Marathi Story दुसरं कोणीही घेऊ शकत नाही. जशी आई तुमच्याशी रोज येऊन बोलते, तशी आता मीही येणार आणि तुमच्याशी गप्पा मारणार.”
नियती भक्तीला घट्ट मिठी मारते. दोघींच्याही डोळ्यांतून अश्रू वाहत असतात.
मैत्रिणींनो आणि मित्रांनो, कशी वाटली आजची कथा. नक्की कमेंट करुन सांगा आणि अशाच नवीन नवीन कथांसाठी आमचे इतर लेखही नक्कीच वाचा.
खूप खूप धन्यवाद !