Navra Bayko Marathi Emotional Story : घटस्फोटाच्या पाच वर्षानंतर नवरा बायको समोर आले तेव्हा…

Navra Bayko Marathi Emotional Story

Navra Bayko Marathi Emotional Story पल्लवी एका छोट्या गावात राहणारी साधीसुधी मुलगी. परंतु ती खूप हुशार होती. लहानपणापासूनचं तिने खूप शिकण्याचं स्वप्न पाहिलं होतं. परंतु घरची परिस्थिती जेमतेम असल्यामुळे, तिची बारावी झाली आणि तिच्या बाबांनी तिचं लग्न करण्यासाठी मुलांची शोधाशोध सुरू केली.

गावात राहणारा ओमकार हा दोन वर्षांपूर्वीचं पोलीस दलात सामील झाला होता. तो हवालदार म्हणून नोकरी करत होता. मुंबई सारख्या ठिकाणी हवालदार म्हणजे खूपच चांगली नोकरी आणि त्याच्याशी लग्न म्हणजे आपल्या मुलीच्या आयुष्याचं कल्याण होईल, असा विचार करून पल्लवीच्या वडिलांनी तिचं स्थळ ओंकारसाठी नेलं.

Navra Bayko Marathi Emotional Story

पल्लवी ही गावातील सर्वात सुंदर आणि हुशार मुलगी असल्यामुळे ओंकारच्या कुटुंबालाही आनंद झाला आणि त्यांनी लगेचं या लग्नासाठी होकार कळवला. ओमकारला सुद्धा पल्लवी खूप आवडायची, त्यामुळे त्याचा नकार द्यायचा प्रश्नचं नव्हता. परंतु पल्लवी मात्र खूप दुःखी झाली, कारण तिला एवढ्या लवकर लग्न करायचं नव्हतं. पण तिचाही नाईलाज झाला, कारण आपल्या आई-बाबांच्या शब्दाला ती नकारही देऊ शकत नव्हती.

पल्लवी आणि ओंकार या दोघांचं लग्न खूप धुमधडाक्यात झालं. पल्लवी लग्नाच्या दोन महिन्यानंतर ओमकारबरोबर मुंबईला राहायला गेली. परंतु तिथे गेल्यावर मात्र तिला सत्य समजलं. गावात साधासुधा राहणारा, भोळा भाबडा वाटणारा ओमकार हा पूर्णपणे बदलला होता.

तो पल्लवीवर Navra Bayko Marathi Emotional Story खूप चिडायचा. पल्लवीवर नेहमी हातही उचलायचा. त्याचबरोबर त्याला दारूचही व्यसन लागलं होतं. पल्लवीने कधी काही प्रश्न विचारला, तर तो पल्लवीला मारहाणी करायचा. पल्लवीने ही गोष्ट आपल्या आई-बाबांना सांगितली होती. परंतु आता तुझं लग्न करून दिलंय, तर तुला संसार करावाचं लागेल, असं आई-बाबांनी सांगितल्यामुळे तिचाही नाईलाज झाला.

आता या दोघांच्या लग्नाला एक वर्ष झालं. पल्लवी ही गरोदर होती. लवकरचं आई बनणार होती. परंतु ओमकारच्या वागण्यामध्ये काहीही बदल घडला नाही आणि त्याचा राग हा दिवसेंदिवस वाढतचं गेला. पल्लवी आता आई होणार आहे, तिच्याशी नीट वागलं पाहिजे, ही समजही त्याला नव्हती आणि तो पल्लवीला त्रास द्यायचा.

एक दिवस Navra Bayko Marathi Emotional Story ओमकार दारू पिऊन घरी आला. पल्लवी त्याला समजावत होती, ‘आता आपण दोघे आई-बाबा होणार आहोत. आपल्या घरात एक गोंडस बाळ येणार आहे. तुम्ही अशी दारू पीत जाऊ नका.’ परंतु ओमकार तिच्यावर खूप चिडला आणि चक्क त्याने पल्लवीला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याने पल्लवीला जोरात ढकलून दिलं आणि पल्लवी पोटावरचं पडली. पल्लवीच्या पोटात खूप दुखू लागलं. तर ओमकार हा नशेत बेशुद्ध होऊन पडला.

मराठी इमोशनल स्टोरी

शेजारच्या लोकांनी पल्लवीला Navra Bayko Marathi Emotional Story हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं, तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की, पल्लवीच्या पोटातलं बाळ आता या जगात नाहीये. हे ऐकून पल्लवी ढसाढसा रडू लागली. हा दिवस तिच्या आयुष्यातील सर्वात वाईट दिवस होता. दुसऱ्या दिवशी शुद्ध आल्यावर ओमकार हॉस्पिटलमध्ये आला आणि म्हणाला, जे काही घडलंय, त्यात तुझी चुक आहे. तू जर मला काही बोलली नसती, तर हे घडलंच नसतं आणि तो ड्युटीवर निघून गेला.

पल्लवीने ठरवलं की, Navra Bayko Marathi Emotional Story मला आता या माणसाबरोबर नाही राहायचं. मी आता हे सगळं सहन नाही करणार. आपल्या आई-बाबांकडे परत जायचं नाही, हे तर तिने आधीचं ठरवलं होतं आणि त्या दिवशी ती गायब झाली. ओंकारला हॉस्पिटल मधून फोन आला, त्याने हॉस्पिटलमध्ये चौकशी केली, घरी जाऊन चौकशी केली, गावाकडे चौकशी केली, पण त्याला पल्लवी कोठेचं सापडली नाही.

काही दिवसानंतर ओंकार Navra Bayko Marathi Emotional Story आपली बायको आता आपल्याजवळ राहत नाही, हेही विसरून गेला आणि आपल्या कामात आणि दारूच्या व्यसनातचं त्यांने स्वतःला पूर्णपणे बुडवून घेतलं. या घटनेला पाच वर्षे झालीत. पहिल्या बायकोबरोबर असं केलं, ही गोष्ट सगळीकडे पसरल्यामुळे त्याचं दुसरं लग्नही झालं नाही.

पाच वर्षानंतर एक दिवस ओंकार पोलीस स्टेशनमध्ये येतो. तर पोलीस स्टेशनमध्ये खूप धावपळ सुरू असते. ओंकार आपल्या साथीदाराला विचारतो, आज काही खास आहे का ? त्याचा साथीदार त्याला सांगतो, हो आज आपल्या येथे नवीन साहेब येणार आहेत. Navra Bayko Marathi Emotional Story हे ऐकल्यावर ओमकारसुद्धा आपला युनिफॉर्म नीटनेटका करून उभा राहतो. सर्वात आधी आपणचं गाडीचा दरवाजा उघडून साहेबावर इम्प्रेशन पाडायचं, असं त्याने ठरवलं.

थोड्यावेळानंतर मोठ्या Navra Bayko Marathi Emotional Story साहेबांची गाडी येते. ओंकार धावत पळत जाऊन सर्वात आधी गाडीचा दरवाजा उघडतो. तर गाडीतून दुसर तिसर कोणी नाही, चक्क पल्लवी उतरते. पल्लवीला पाहून ओंकारला जबर धक्काचं बसतो. कारण ही तीचं पल्लवी होती, जी पाच वर्षांपूर्वी त्याची बायको होती आणि आज ही पल्लवी त्याची सीनियर ऑफिसर आहे. एक आयपीएस ऑफिसर आहे.

ओमकार पल्लवीला सॅल्यूट करतो. Navra Bayko Marathi Emotional Story पल्लवी एक नजरभर त्याच्याकडे पाहते आणि आपल्या केबिनमध्ये निघून जाते. ओमकार तिच्याकडे एकटक पाहतचं राहतो. ओमकारचा साथीदार विचारतो, “काय झालं रे, असं का पाहतोय मॅडमकडे ?” ओमकार विचारतो, “कोण आहेत या मॅडम ?”

ओमकारचा साथीदार सांगतो, “अरे या आपल्या नवीन एसपी मॅडम आहेत. आयपीएस ऑफिसर आहेत, पल्लवी मॅडम.” हे ऐकून ओंकारच्या पायाखालची जमीनचं सरकते. क्षणभर त्याला वाटतं की, आपण स्वप्नचं पाहतोय. परंतु हे स्वप्न नाही, तर सत्य आहे, याची जाणीवही त्याला लगेचचचं होते.

पल्लवीच्या समोर जाण्याची Navra Bayko Marathi Emotional Story ओमकारची हिम्मतचं होत नाही. पल्लवीने जर आपला बदला घेतला, आपण तिच्याबरोबर जे काही केलं, त्याची शिक्षा आपल्याला दिली, तर आपलं काय होईल, या विचाराने तो खूप घाबरलेला असतो.

पल्लवी एक एक करून आपल्या पोलीस Navra Bayko Marathi Emotional Story स्टेशनमधील प्रत्येकाला केबिनमध्ये बोलवून घेत होती आणि त्यांची ओळख करून घेत होती. ओमकारचा साथीदार केबिन बाहेर येतो आणि ओंकारला सांगतो, “मॅडमने तुला बोलावलंय.” हे ऐकून ओंकार खूप घाबरतो आणि म्हणतो, “मला नाही जायचं.” साथीदार म्हणतो, “वेडा वेडा झालास की काय, सीनियर मॅडम आहेत आपल्या, सस्पेंड करतील तुला, जा गुपचूप.”

आपल्या नोकरीच्या भीतीने ओंकार नजर खाली करून आणि मान खाली घालून कसा बसा मॅडमच्या केबिनमध्ये येतो. पल्लवी त्याला विचारते, “नाव काय आहे तुमचं ?” ओमकार म्हणतो, “माहीतच आहे ना ते तुम्हाला.” पल्लवी म्हणते, “हो माहितीये ना. तुमचं नाव काय आहे आणि तुम्ही काय काय केलंय आयुष्यात, ते सगळं माहिती आहे.”

ओमकार खूप घाबरतो आणि धावत Navra Bayko Marathi Emotional Story जाऊन चक्क पल्लवीचे पायचं पकडतो आणि म्हणतो, “माफ कर मला पल्लवी. मी खूप मोठी चूक केली. मी जे काही केलं, त्यासाठी मी आयुष्यभर तुझी माफी मागत राहील. पण कोणाला काही सांगू नको. मला शिक्षा देऊ नको. या नोकरीवरचं कसाबसा जगतोय मी. मला सस्पेंड नको करूस.”

पल्लवी म्हणते, “हवालदार ओंकार सोडा माझे पाय आणि जागेवर जाऊन उभे राहा.” पल्लवीच्या आवाजातला दरारा ऐकून ओंकार चांगलाचं घाबरतो आणि आपल्या जागेवर जाऊन उभा राहतो.

पल्लवी म्हणते, “तुम्हाला हाचं प्रश्न Navra Bayko Marathi Emotional Story पडला असेल ना, बारावी शिकलेली एका छोट्या गावातली मुलगी, आज तुमची सीनियर ऑफिसर कशी झाली ? आयपीएस ऑफिसर कशी झाली ?” ओमकार एक शब्दही बोलत नाही त्याची नजर जमिनीकडेचं असते.

पल्लवी सांगते, “त्या दिवशी तुम्ही हॉस्पिटलमध्ये मला भेटायला आलात आणि म्हणालात, जे काही झालं त्यात तुझी चूक आहे आणि तुम्ही निघून गेलात. त्या क्षणी मी विचार केला, आता परत तुमच्या घरी यायचं नाही. तुमच्या आयुष्यात यायचं नाही. माझ्या आई-बाबाही मला साथ देत नव्हते. त्यामुळे मी माझ्या एका मैत्रिणीच्या मदतीने पुण्याला निघून गेले.

तेथेचं मी माझं ग्रॅज्युएशन Navra Bayko Marathi Emotional Story पूर्ण केलं आणि विचार केला, जर तुम्हाला तुमची खरी जागा दाखवून द्यायची असेल, तर तुमच्यापेक्षा जास्त यशस्वी होऊन दाखवावं लागेल. तेव्हाचं एका स्त्रीचा सन्मान कसा करावा, तिला कसं वागवावं हे तुम्हाला कळेल. एक स्त्रीची शक्ती काय असते, हे तुम्हाला कळेल.

मी माझं शिक्षण पूर्ण केलं. खूप अभ्यास केला आणि  आज एक आयपीएस ऑफिसर बनले. जाणून बुजून मी या पोलीस स्टेशनमध्येचं माझी पोस्टिंग करून घेतली. कारण मला तुम्हाला दाखवून द्यायचं होतं की, तुम्ही माझ्याबरोबर जे वागलात, ते खूप चुकीचं वागलात आणि यानंतर कधीही कोणाबरोबर अशी वागण्याची हिंमत करू नका.”

ओमकार निमूटपणे हे सगळं Navra Bayko Marathi Emotional Story ऐकून घेतो. त्याच्या डोळ्यात पाणी येतं. पण पल्लवीच्या नजरेला नजर देण्याची त्याची हिंमत होत नसते. पल्लवी म्हणते, “समजलं ना सगळं, मग आता गुपचूप बाहेर जाऊन आपलं काम करायचं आणि हे लक्षात ठेवायचं की, मी तुमची बायको होते, आता नाही, आपला कोणताही संबंध नाही. लवकरचं आपण कायदेशीर पद्धतीनेही एकमेकांपासून वेगळ होऊ. त्यामुळे मला कोणतीही पर्सनल गोष्ट या पोलीस स्टेशनमध्ये नकोय. त्यामुळेचं सगळं आत्ताचं क्लिअर करते.

ओमकार होकारार्थी मान डोलावतो आणि तेथून निघून जातो. पल्लवीला समाधान मिळतं, तीने जे स्वप्न पाहिलं होतं, जे मनाशी ठरवलं होतं, ते आज तिने पूर्ण केले. इकडे ओमकार पोलीस स्टेशनपासून थोडा दूर येतो आणि रडू लागतो. त्या दिवशी त्याला समजतं की, त्याने काय गमावलंय. आयुष्यात किती मोठी चूक केली आहे.  पण आता खूप उशीर झाला आहे, हेही त्याच्या लक्षात येतं.

तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला आजची Navra Bayko Marathi Emotional Story कथा, नक्कीचं कमेंट करून सांगा आणि अशाचं नवीन कथांसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.

खूप खूप धन्यवाद ! 

Scroll to Top