प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गुंतवणूक. सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशमधील वाराणसी या मतदारसंघातून भरलेल्या निवडणूक अर्जाबद्दल. या अर्जात त्यांनी आपल्या संपत्तीबद्दल माहिती दिली आहे आणि या सगळ्यामध्ये खास गोष्ट म्हणजे त्यांनी केलेली आर्थिक गुंतवणूक.
देशाच्या पंतप्रधानांनी ज्या योजनेत गुंतवणूक केली आहे, ती योजना नेमकी आहे तरी काय ? आज आपण याबद्दलचं जाणून घेणार आहोत.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गुंतवणूक केलेली योजना
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांनी पोस्टाच्या नॅशनल सेविंग सर्टिफिकेट (NSC) या योजनेमध्ये 9 लाख 12 हजार रुपयांची गुंतवणूक केली आहे. पोस्टाची ही स्कीम चांगलीचं लोकप्रिय आहे. मग या योजनेत कसे पैसे गुंतवता येतात ? योजनेचे फायदे काय आहेत ? नियम काय आहेत ? आपण त्याबद्दल जाणून घेऊया.
नॅशनल सेविंग सर्टिफिकेट (NSC) ही एक मुदत ठेव योजना आहे. ज्या योजनेमध्ये तुम्ही 5 वर्षांसाठी गुंतवणूक करू शकतात. गुंतवणुकीची कमीत कमी 1 हजार रुपये मर्यादा आहे, तर जास्तीत जास्त पैसे गुंतवण्याची कोणतीही मर्यादा नाहीये.
पोस्ट ऑफिसची किसान विकास पत्र योजना
तुम्ही एका व्यक्तीसाठी नॅशनल सेविंग सर्टिफिकेट योजनेअंतर्गत गुंतवणूक करू शकता किंवा जॉइंट अकाउंटसुद्धा उघडू शकता. दोन पेक्षा जास्त व्यक्तीही एकत्र जॉईंट अकाउंट उघडू शकता. जर तुम्हाला तुमच्या पाल्यांसाठी अकाउंट उघडायचं असेल, तर दहा वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांसाठी या योजनेअंतर्गत अकाउंट उघडू शकता.
पोस्टाची नॅशनल सेविंग सर्टिफिकेट योजना
सध्या या योजनेवर 7.70% व्याजदर मिळतंय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या योजनेमध्ये 9 लाख 12 हजार रुपयांची गुंतवणूक केली आहे. म्हणजेचं जेव्हा 5 वर्षानंतर त्यांची या योजनेमधील गुंतवणूक मॅच्युअर होईल. तेव्हा त्यांना चक्क 4 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळू शकतं म्हणजेचं त्यांच्या 9 लाख रुपयांचे चक्क 13 लाख रुपये झालेले असतील.
अनेकदा लोकांकडे पैसे असतात, त्यांना ते गुंतवण्याची इच्छा असते. परंतु पैसे गुंतवायचे कोठे हा प्रश्न त्यांच्यासमोर असतो ? अशा लोकांसाठी पोस्टाच्या योजना खूपचं फायदेशीर आहेत. कारण या योजनेवर इतर योजनांपेक्षा जास्त व्याजदर मिळतं. तसंच पोस्टाची योजना असल्यामुळे पैसे सुरक्षित राहतात.
तर तुम्ही या योजनेमध्ये पैसे गुंतवणार का ? नक्कीचं कमेंट करुन सांगा आणि अशाचं नवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !