Muramba Serial Actress With Rohit Sharma : मुरांबा मालिकेतील या अभिनेत्रीचा क्रिकेटर रोहित शर्मासोबतचा फोटो व्हायरल

Muramba Serial Actress With Rohit Sharma 

Muramba Serial Actress With Rohit Sharma मुरांबा ही मालिका सध्या प्रेक्षकांची खूपच आवडती बनली आहे. अक्षय आणि रमाची ही मालिका प्रेक्षकांना अतिशय आवडते. मालिकेची कथा आणि सर्वच कलाकार खूप लोकप्रिय झालेत. ही मालिका नवनवीन येणाऱ्या ट्विस्टमुळे  खूप चर्चेत असते.

आता मालिकेतील अभिनेत्री काजल काटेने क्रिकेटर रोहित शर्मासोबतचा फोटो (Muramba Serial Actress With Rohit Sharma) इंस्टाग्रामवर शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आज रोहित शर्माचा वाढदिवस आहे. या फोटोमध्ये रोहित शर्मा खूपच कॅज्युअल लूकमध्ये दिसून येतोय. त्याच्याबरोबर अभिनेत्री काजल काटे रेड कलरच्या ड्रेसमध्ये अतिशय सुंदर दिसतेय.

Muramba Serial Actress With Rohit Sharma 

काजलने या फोटोला कॅप्शन दिलंय की, ‘Wish you a very Happy Birthday Rohit.’ काजलने हा फोटो शेअर करत रोहितला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या कारण काजलचा नवरा प्रतीक कदम हा मुंबई इंडियन्स संघाचा फिटनेस कोच आहे. त्याच्याच ओळखीने काजल काही दिवसांपूर्वी रोहित शर्मा आणि मुंबई इंडियन्स टीमच्या दुसऱ्या खेळाडूंना भेटली होती.

Muramba Serial Actresses Met Mumbai Indians Team
Muramba Serial Actresses Met Mumbai Indians Team

काही दिवसांपूर्वी काजलचा नवरा प्रतीकच्याच ओळखीमुळे मुरांबा मालिकेतील रमा आणि रेवा म्हणजेच अभिनेत्री शिवानी मुंढेकर आणि अभिनेत्री निशाणी बोरूले या रोहित शर्मा, सुर्यकुमार यादव आणि मुंबई इंडियन्सच्या दुसऱ्या खेळाडूंना भेटल्या होत्या. त्या दोघीही आपल्या आवडत्या खेळाडूंना भेटून खूप खुश झाल्या होत्या. त्यांनीदेखील या खेळाडूंसोबतचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले होते.

अभिनेत्री काजल काटे रोहित शर्मासोबत  

आता काजलसुद्धा या फोटोमध्ये रोहित शर्माला भेटून खूप खुश दिसतेय. तिचं एक स्वप्नचं पूर्ण झालंय. काजलला रोहित शर्मासोबत पाहून तिचे फॅन्स खूप आनंदात आहेत आणि या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्स करत रोहितला बर्थडेच्या शुभेच्छा देत आहेत.

अभिनेत्री काजल काटे ही याआधी ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत दिसली होती. नेहाच्या मैत्रिणीच्या भूमिकेत काजल चांगलीच लोकप्रिय झाली होती. त्यानंतर सध्या ती मुरांबा या मालिकेत महत्वपूर्ण भूमिकेत दिसतेय. तिची ही नवीन भूमिकासुद्धा प्रेक्षकांना फार आवडतेय.

घरोघरी मातीच्या चुली मालिकेतील कलाकार

सध्या आयपीएल (Muramba Serial Actress With Rohit Sharma) हे एकदम जल्लोषात सुरू आहे आणि त्यात रोहित शर्माचा वाढदिवस आल्याने रोहितचे फॅन्स खूपच आनंदात आहेत. सगळेजण त्याचा बर्थडे खूपच जल्लोषात साजरा करतील हे नक्की.

मनोरंजनविश्वातील अशाच नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला नक्की फॉलो करा. 

तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top