Mukhyamantri Vayoshri Yojana 2024
Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 महाराष्ट्र राज्य सरकारने मुख्यमंत्री वयोश्री योजनेची सुरुवात केली आहे. या योजनेनुसार राज्यातील लाभार्थी वरिष्ठ नागरिकांना 3 हजार रुपयांची वार्षिक आर्थिक मदत करण्यात येईल.
ही मदत आर्थिक स्वरूपात असणार आहे आणि लाभार्थी वरिष्ठ नागरिकांच्या बँक अकाउंटवर दरवर्षी 3000 रुपये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच DBT द्वारे पाठवण्यात येतील. नुकतीचं महाराष्ट्र सरकारने या योजनेची घोषणा केलीये. सर्व स्तरांतून या योजनेचं स्वागत केलं जात आहे आणि वरिष्ठ नागरिकांना सरकारने खूप मोठी आर्थिक मदत केल्याचं बोललं जातंय.
मग आता तुमच्या मनातही हा प्रश्न नक्कीचं आला असेल की, Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 मुख्यमंत्री वयोश्री योजना नेमकी आहे तरी काय ? मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी अर्ज कसा करायचा ? मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी अर्ज कोठे करायचा ? आणि मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी कोणकोणत्या अटींची पूर्तता करावी लागेल ? चला आज आपण तेच जाणून घेणार आहोत.
मुख्यमंत्री वयोश्री योजना नेमकी आहे तरी काय ?
मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू करण्याचं महाराष्ट्र राज्य सरकारचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे महाराष्ट्र राज्यातील वरिष्ठ नागरिकांना आर्थिक मदत करणं असं आहे. महाराष्ट्र राज्यातील ज्या वरिष्ठ नागरिकांना वयोमानानुसार एखादं अपंगत्व आलं असेल किंवा अशक्तपणाचं निराकरण करण्यासाठी एखादं उपकरण खरेदी करायचं असेल, तर राज्य सरकार त्यांना आर्थिक मदत करेल.
वरिष्ठ नागरिक असलेल्या लाभार्थ्यांना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे 3 हजार रुपये वार्षिक आर्थिक मदत करण्यात येईल. त्याबरोबरचं मन स्वास्थ्य ठीक ठेवण्यासाठी मनस्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्रद्वारे प्रबोधन आणि प्रशिक्षण या योजनांचाही समावेश आहे.
महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी वार्षिक 480 कोटी रुपयांचं बजेट ठेवलं आहे. येत्या भविष्यात या योजनेचा विस्तार होऊ शकतो आणि बजेटमध्येही वाढ होऊ शकते.
Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत कोणती उपकरणे खरेदी करता येतात ?
या योजनेअंतर्गत वरिष्ठ नागरिकांना खालील उपकरणांची खरेदी करता येऊ शकते.
- कमोड चेअर
- चष्मा
- व्हील चेअर
- श्रवण यंत्र
- ट्रायपॉड
- सर्वाइकल कॉलर
- बॅकसपोर्ट बेल्ट
मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत मिळणारे लाभ
या योजनेअंतर्गत लाभार्थी वरिष्ठ नागरिकांच्या बँक अकाउंटवर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे 3 हजार रुपये वर्ग केले जातील. या 3 हजार रुपयांचा वापर त्यांना अपंगत्व किंवा अशक्तपणा दूर करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या उपकरणांची खरेदी करण्यासाठी होईल.
मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ घेण्यासाठी अटी
Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील अटींची पूर्तता करावी लागेल.
- लाभार्थी वरिष्ठ नागरिक महाराष्ट्र राज्याचा कायमस्वरूपी नागरिक असावा.
- लाभार्थी वरिष्ठ नागरिकाचे वय 65 वर्षांपेक्षा जास्त असावे.
- लाभार्थी वरिष्ठ नागरिकांचे आर्थिक उत्पन्न 2 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावं.
मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी अर्ज कसा करावा ?
महाराष्ट्र सरकारने नुकतीचं या योजनेची घोषणा केली आहे. येत्या काही दिवसात या योजनेसंदर्भात एक ऑनलाईन पोर्टल लॉन्च करण्यात येईल. जेथे वरिष्ठ नागरिक आपली संपूर्ण माहिती भरून ऑनलाईन अर्ज करू शकतील.
या योजनेसाठी तुम्ही ऑफलाइनही अर्ज करू शकतात. लवकरचं याबद्दल माहिती अपडेट करण्यात येईल.
मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असेल ?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील कागदपत्रांची आवश्यकता आहे.
- लाभार्थी वरिष्ठ नागरिकांचे आधार कार्ड
- लाभार्थी वरिष्ठ नागरिकाचा रहिवासाचा पुरावा
- लाभार्थी वरिष्ठ नागरिकाचा वयाचा दाखला
- लाभार्थी वरिष्ठ नागरिकाचं रेशन कार्ड
- लाभार्थी वरिष्ठ नागरिक अपंग असल्यास अपंगत्वाचे प्रमाणपत्र
- लाभार्थी भविष्य नागरिकाचे पासपोर्ट फोटो
- लाभार्थी वरिष्ठ नागरिकाचे बँक अकाउंट
मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे महत्त्व
समाजात आपण अशा अनेक वरिष्ठ नागरिकांना पाहतो, ज्यांना वाढत्या वयामुळे एखादं अपंगत्व किंवा अशक्तपणा आला आहे. या वरिष्ठ नागरिकांना हा अशक्तपणा किंवा अपंगत्वाचा सामना करण्यासाठी काही उपकरणांची गरज असते.
जसं की, एखाद्या वरिष्ठ नागरिकाला ऐकू येत नसेल, तर त्याला कानाच्या मशीनची गरज पडते. एखाद्या वयोवृद्ध माणसाला दिसत नसेल, तर चष्म्याची गरज पडते. परंतु अनेकवेळेस आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना या उपकरणांची खरेदी करता येत नाही आणि त्यांचं जीवन आणखीनचं कठीण बनतं.
महाराष्ट्र सरकारने ही समस्या हेरली आहे आणि वरिष्ठ नागरिकांच्या या समस्येवर उतारा म्हणून Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 मुख्यमंत्री वयोश्री योजनेची मुहूर्तमेढ रोवली.
बदलत्या काळानुसार आपल्या देशात शहरीकरण वाढलं. अनेक तरुण मुलं गावातून शहरात राहायला आली. तर त्यांचे आई वडील गावातचं राहत आहेत. ही मुलं शहरातून त्यांच्या पगारातील काही पैसे गावी आई-वडिलांना, आजी-आजोबांचा घरचा खर्च चालवण्यासाठी पाठवतात. परंतु शहरातील वाढत्या महागाईमुळे त्यांना जास्त पैसे घरी पाठवता येत नाहीत.
गावी असलेल्या वरिष्ठ नागरिकांना त्यांचा महिन्याचा खर्च भागवण या पैशातून अवघड जातंय. त्यामुळे अपंगत्व किंवा अशक्तपणासाठी उपयोगी असलेल्या उपकरणांची खरेदी त्यांना करता येत नाही. त्यामुळेचं महाराष्ट्र सरकारने आपली जबाबदारी ओळखत मुख्यमंत्री वयोश्री योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे या वरिष्ठ नागरिकांना उपयोगी उपकरणांची खरेदी करता येईल आणि त्यांना या योजनेचा फायदा होईल. या उपकरणांच्या मदतीने वरिष्ठ नागरिक त्यांना असलेल्या शारीरिक अडचणींपासून नक्कीच सुटकारा मिळवू शकतात.
Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत फक्त उपकरणांची खरेदीचं करण्यात येणार आहे, असं नसून इतरही उपक्रम राबवले जातील .
महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री वयोश्री योजना का सुरु केली ?
महाराष्ट्र सरकारने या योजनेसाठी 480 कोटी रुपयांचं बजेट पास केलंय. या योजनेअंतर्गत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर तर केले जाणार आहे त्याचबरोबर वरिष्ठांचं मानसिक आरोग्य चांगलं राहायला हवं, यासाठी त्यांना मनस्वास्थ्य केंद्राद्वारे प्रशिक्षणही दिले जाणार आहे.
आपण समाजात पाहतो की, अनेक वरिष्ठ नागरिकांना शारीरिक समस्या तर आहेतच. त्याचबरोबर त्यांना मानसिक समस्याही आहेत. कधी कधी घरात ते एकटेचं असतात. आयुष्याचा जोडीदारही नसतो, अशावेळेस डिप्रेशन येण, मानसिक तणाव याही समस्या वरिष्ठ नागरिकांना असतात.
या समस्यांवर उतारा म्हणून वरिष्ठ नागरिकांना मनस्वास्थ्य केंद्राद्वारे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. म्हणजे त्यांच्या शारीरिक समस्याही दूर होतील आणि मानसिक स्वास्थ्यही ठीक राहील. अनेकदा वयस्कर माणसांच्या मानसिक स्वास्थ चांगलं नसल्याने त्यांना आरोग्यविषयक समस्यांचा सामना करावा लागतो.
मुख्यमंत्री वयोश्री योजनेद्वारे फक्त मानसिक स्वास्थ्य सुधारण्यावरचं भर दिला जाणार नसून, शारीरिक स्वास्थ्य चांगलं रहावं यासाठी योग उपचार केंद्राद्वारे वरिष्ठ नागरिकांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे.
मुख्यमंत्री वयोश्री समाजासाठी किती महत्वाची ?
आधुनिक युगातील जीवनमानानुसार नागरिकांचा व्यायाम करण्यावर कमी भर दिसतो. त्यामुळे तब्येतीच्या विविध तक्रारी होऊ शकतात. अशा वेळेस आपण आपल्या भारतीय योग पद्धतीचा वापर करून आयुष्यात त्याचा अवलंब केला तर तब्येतीच्या अनेक तक्रारी आपण टाळू शकतो.
घरात वरिष्ठ नागरिक असणं खूप महत्वाचं असत. ते एखादं काम करून घरात हातभार लावणं किंवा पैसे कमावणे असं काम करत नसतील तरीही त्यांच्याकडे अनुभवाचा एक खूप मोठा खजिना असतो. या खजिन्याचा वापर तरुण पिढीला होतो. कारण तरुण पिढीकडे काम आणि काम करण्याचा उत्साह असतो. पण अनुभव नसल्याने त्यांच्याकडून चुका होऊ शकतात. जर घरातील तरुणांनी वरिष्ठ नागरिकांच्या अनुभवाचा फायदा करून घेतला तर त्यांना नक्कीच खूप फायदा होऊ शकतो.
वरिष्ठ नागरिक घरात एक आधार म्हणूनही खूप फायदेशीर ठरतात. जेव्हा कधी घरावर एखादं मोठं संकट येतं. घरातील माणसं पूर्णपणे कोलमडून जातात. तेव्हा घरातील हि मोठी माणसं संपूर्ण घराला आधार देतात. परंतु आता बदलत्या काळानुसार अनेक घरामंध्ये वरिष्ठ नागरिकांना ओझं समजलं जातं आणि त्यांना वृद्धाश्रमात पाठवलं जातं. घरातील वरिष्ठ नागरिकांना वृद्धाश्रमात पाठवण्याचं एक मोठं कारण म्हणजे त्यांच्या आजारपणावर होणारा खर्च. आता या समस्येसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना खूप फायदेशीर ठरणार आहे. कारण महाराष्ट्र राज्य सरकार वरिष्ठ नागरिकांना दरवर्षी ३ हजार रुपयांची आर्थिक मदत देईल जेणेकरून त्यांच्या कुटुंबावरील आर्थिक बोझा कमी होईल.
म्हणजे एकूणचं आज मुख्यमंत्री वयोश्री योजनेद्वारे सरकार वरिष्ठ नागरिकांच्या आयुष्यात एक अमुलाग्र बदल घडवण्याचा प्रयत्न करतंय. ज्यामुळे त्यांचं मानसिक शारीरिक स्वास्थ्य योग्य राहील आणि त्यांचं आर्थिक सबलीकरणही होईल.
वरिष्ठ नागरिकांबरोबरचं सरकार समाजातील महिलांचंही आर्थिक सबलीकरण करण्यासाठी पाऊल उचलतंय. म्हणूनचं सरकारने लेक लाडकी योजना Maharashtra Lek Ladki Yojana 2024 सुरु केली आहे.
FAQ’s About Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 मुख्यमंत्री वयश्री योजनेबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न
- प्रश्न : मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ कोणत्या वरिष्ठ नागरिकांना मिळेल ?
उत्तर : महाराष्ट्र राज्यातील ज्या रहिवाशांचं वय 65 वर्षांपेक्षा जास्त आहे आणि ज्यांना अपंगत्व किंवा अशक्तपणाच्या उपचारासाठी एखादं उपकरण खरेदी करायचं असेल, अशा नागरिकांना मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ मिळेल.
- प्रश्न : Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 किती रुपयांचा लाभ देण्यात येईल ?
उत्तर : या योजनेअंतर्गत वरिष्ठ नागरिकांना 3 हजार रुपये वार्षिक लाभ देण्यात येईल. ज्याचा वापर उपकरण खरेदी करण्यासाठी करू शकता.
- प्रश्न : महाराष्ट्र राज्याबाहेरील वरिष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येईल का ?
उत्तर : नाही, जे वरिष्ठ नागरिक महाराष्ट्र राज्याचे कायमस्वरूपी रहिवासी आहेत. त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल.
- प्रश्न : मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत कोणत्या उपकरणांची खरेदी करता येईल ?
उत्तर : या योजनेअंतर्गत खालील उपकरणांची खरेदी करता येईल.
- कमोड चेअर
- चष्मा
- व्हील चेअर
- श्रवण यंत्र
- ट्रायपॉड
- सर्वाइकल कॉलर
- बॅकसपोर्ट बेल्ट
तुम्हाला Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 या योजनेबद्दल आणखीन काही माहिती हवी असल्यास नक्कीचं कमेंट करून विचारा. आम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करू. आणि आमच्या या संकेतस्थळावर आम्ही भारत सरकार आणि राज्य सरकारच्या इतर योजनांची माहितीही दिलीये. सरकारच्या इतर योजनाबद्दल माहिती मिळवण्यासाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
धन्यवाद !