Mukhyamantri Tirth Yatra Yojana | मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजनेची माहिती

Mukhyamantri Tirth Yatra Yojana

Mukhyamantri Tirth Yatra Yojana

Mukhyamantri Tirth Yatra Yojana आपल्या भारत देशामध्ये तीर्थयात्रेला खूप महत्त्व आहे. प्रत्येकाची इच्छा असते की, आयुष्यात एकदा तरी देशातील सर्व तीर्थस्थानांना भेट द्यावी, देवाचं दर्शन घ्यावं. परंतु यामध्ये विविध अडचणी असतात. कारण आपला देश खूप मोठा आहे. तीर्थक्षेत्रही खूप आहेत. त्यामुळे जर या सर्व तीर्थक्षेत्रांना भेट द्यायची म्हटलं, तर पैसेही खूप लागतात आणि त्याचबरोबर वेळही द्यावा लागतो. त्यामुळे अनेक लोक असा विचार करतात की, जेव्हा आपण रिटायर होऊ, वयाची साठ वर्षे ओलांडू, सगळ्या जबाबदाऱ्या आपल्या डोक्यावर नसतील. तेव्हा तीर्थयात्रा करता येईल.

परंतु जेव्हा वयाची 60 वर्षे उलटून जातात. जबाबदाऱ्याचं ओझं कमी होतं. तेव्हा मात्र शरीर साथ देत नाही. एकट्याने तीर्थयात्रा करणं शक्य होत नाही, किंवा पैशांची अडचण असते. आता या सर्व अडचणी लक्षात घेऊनचं दिल्ली सरकारने एक नवीन योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजना.

मग ही मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजना नेमकी आहे तरी काय ? या Mukhyamantri Tirth Yatra Yojana योजनेसाठी कोण पात्र आहे ? या योजनेमध्ये कोणत्या कोणत्या ठिकाणची तीर्थयात्रा करता येईल ? खर्च किती असेल ? अर्ज कसा करायचा ? पात्रता आणि अटी काय आहेत ? आज आपण त्याबद्दलचं जाणून घेणार आहोत.

मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजनेची संपूर्ण माहिती

2018 मध्ये दिल्ली सरकारने मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजना Mukhyamantri Tirth Yatra Yojana सुरू करण्याचा ठरवलं होतं. 2020 मध्ये कोरोना लॉकडाऊनमुळे ही योजना बंद करण्यात आली. परंतु आता ही योजना पुन्हा सुरू झाली आहे. या योजनेअंतर्गत दिल्लीतील वरिष्ठ नागरिक ज्यांना स्वतःहून तीर्थयात्रा करता येत नाही, त्यांना दिल्ली सरकार आपल्या खर्चाने तीर्थयात्रा घडवते.

मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजनेची वैशिष्ट्ये

आता आपण या Mukhyamantri Tirth Yatra Yojana योजनेच्या वैशिष्ट्यांबद्दल जाणून घेऊया.

1) मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजनेअंतर्गत दिल्लीतील 60 वर्षांवरील वरिष्ठ नागरिकांना दिल्ली सरकार तीर्थयात्रा घडवते.

2) जे वरिष्ठ नागरिक स्वतःहून तीर्थयात्रा करण्याचं जोखीम उचलत नाही. त्या नागरिकांसाठी ही योजना सुरू करण्यात आली.

3) मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजनेअंतर्गत जो काही खर्च होतो, मग तो दळणवळणाचा, राहण्याचा किंवा खाण्यापिण्याचा असो, तो संपूर्ण खर्च दिल्ली सरकारतर्फेचं केला जातो.

4) 71 वर्षांवरील वरिष्ठ नागरिक जे स्वतःची काळजी घेऊ शकत नाही. त्यांना आपल्याबरोबर 21 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या एखाद्या व्यक्तीला साथीदार म्हणून नेण्याची मुभा असते. या व्यक्तीचा संपूर्ण खर्चसुद्धा दिल्ली सरकारचं करतं.

5) या यात्रेसाठी ज्या ट्रेन, ज्या रेल्वे बुक केल्या जातात. त्या वातानुकूलित म्हणजेचं AC असतात.

मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजना पात्रता अटी

या Mukhyamantri Tirth Yatra Yojana योजनेत तुम्हाला जर अर्ज करायचा असेल, तर खालील पात्रता आणि अटींची पूर्तता होणे आवश्यक आहे.

1) अर्ज करणारी व्यक्ती दिल्ली या शहराची मूळ निवासी असावी.

2) निवासी प्रमाण पत्रासाठी त्यांना विधानसभा क्षेत्रातील आमदाराकडून निवासी प्रमाणपत्र आणावे लागते.

3) अर्ज करणाऱ्या व्यक्तीचं वय 60 वर्षांपेक्षा जास्त असायला हवं.

4) अर्ज करणाऱ्या वरिष्ठ व्यक्तीचं वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावं.

5) 71 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या वरिष्ठ व्यक्तींना त्यांच्याबरोबर एक 21 वर्षांपेक्षा जास्त वय असलेली व्यक्ती सहाय्यक म्हणून नेता येते.

6) ज्या वरिष्ठ नागरिकांना सरकारी नोकरी होती आणि ते सरकारी नोकरीतून रिटायर झाले आहेत, त्यांना या योजनेचा लाभ घेता येत नाही.

हेही वाचा : LIC Kanyadan Policy In Marathi | एलआयसी कन्यादान पॉलिसी

मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

या Mukhyamantri Tirth Yatra Yojana योजनेत अर्ज करण्यासाठी खालीलप्रमाणे कागदपत्र आवश्यक आहेत.

1) अर्जदाराचं आधार कार्ड

2) अर्जदाराचे निवासी प्रमाणपत्र

3) अर्जदाराचा उत्पन्नाचा दाखला

4) अर्जदाराचा वयाचा दाखला

मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजनेत अर्ज कसा करायचा ?

या Mukhyamantri Tirth Yatra Yojana योजनेत सहभागी होण्यासाठी ऑफलाईन अर्ज करता येत नाही. मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजनेत सहभागी होण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो.

1) दिल्ली सरकारच्या ई डिस्ट्रिक्ट या ऑनलाइन पोर्टलवर लॉगिन करावे लागते.

2) येथे तुम्हाला सर्वात आधी तुमची वैयक्तिक माहिती भरून साइन अप करावा लागेल.

3) साइन अप केल्यानंतर मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजना या पर्यायावर क्लिक करून तुम्ही अर्ज करू शकता.

मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजनेत कोणत्या देवस्थानाच्या तीर्थयात्रा समाविष्ट आहेत.

आता तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीचं आला असेल की, तीर्थयात्रा तर सरकार घडवते. परंतु कोणत्या देवस्थानांना या तीर्थयात्रेच्या निमित्ताने भेट देता येईल. दिल्ली सरकारने विविध तीर्थयात्रांसाठी टूर पॅकेज डिझाईन केले आहेत. आपण त्याबद्दल जाणून घेऊया.

1) दिल्ली – मथुरा – वृंदावन – आग्रा – फतेपुर सिक्री – दिल्ली या Mukhyamantri Tirth Yatra Yojana योजनेअंतर्गत हे सर्वात पहिलं तीर्थयात्रा टूर पॅकेज आहे. ही संपूर्ण यात्रा 5 दिवसात घडवली जाते. तीर्थयात्रा दिल्लीतून सुरू होऊन पुन्हा दिल्लीत संपते. या तीर्थयात्रेचा संपूर्ण खर्च दिल्ली सरकारतर्फे केला जातो.

2) दिल्ली – हरिद्वार – ऋषिकेश – नीलकंठ – दिल्ली – 4 दिवस

3) दिल्ली – अजमेर – पुष्कर – नाथद्वारा – हल्दीघाटी – उदयपूर – दिल्ली – 6 दिवस

4) दिल्ली – अमृतसर – वाघा बॉर्डर – आनंदपुर साहेब – दिल्ली – 4 दिवस

5) दिल्ली – जम्मू – वैष्णोदेवी – जम्मू – दिल्ली – 5 दिवस

6) दिल्ली – रामेश्वरम – मदुराई – दिल्ली – 8 दिवस

7) दिल्ली – तिरुपती – बालाजी – दिल्ली – 8 दिवस

8) दिल्ली – द्वारकाधीश – नागेश्वर – सोमनाथ – दिल्ली – 5 दिवस

9) दिल्ली – जगन्नाथ पुरी – कोणार्क मंदिर – सोमनाथ – दिल्ली – 6 दिवस

10) दिल्ली – शिर्डी – शनिशिंगणापूर – त्रंबकेश्वर – दिल्ली – 6 दिवस

11) दिल्ली – उज्जैन – ओंकारेश्वर – दिल्ली – 6 दिवस

12) दिल्ली – बोधगया – सारनाथ – दिल्ली – 6 दिवस

13) दिल्ली – अयोध्या – दिल्ली – 4 दिवस

मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजनेचे महत्त्व

प्रत्येक माणूस आयुष्यभर कामाच्या व्यापात असतो. रोजचं काम करणं, पैसे कमावणं, कुटुंबाच्या जबाबदाऱ्या, मुलांच्या जबाबदाऱ्या यामध्ये तो कधी तरुणाचा म्हातारा होतो, हे त्यालाही कळत नाही आणि या सगळ्यात देवाचं दर्शन घेणं, तीर्थ यात्रा करणं हे त्याच्या आयुष्यात कुठेतरी मागे राहून जातं.

आयुष्यात सगळेचं ठरवतात की, जेव्हा माझ्या डोक्यावरील जबाबदाऱ्या कमी होतील. तेव्हा मी देव देव करणार. देवाचं नाव घेणार. तीर्थयात्रा करणार. सर्व देवस्थानांचं दर्शन घेणार. परंतु जेव्हा जबाबदाऱ्या डोक्यावरून कमी होतात. तेव्हा शरीर साथ देत नाही किंवा आर्थिक उत्पन्न कमी असतं। त्यामुळे देवस्थानांच दर्शन करणं, तीर्थयात्रा करणं हे स्वप्न अपूर्ण राहून जातं.

वरिष्ठ नागरिकांचं हे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्याचा विडा दिल्ली सरकारने उचलला आहे आणि ही Mukhyamantri Tirth Yatra Yojana योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत दरवर्षी दिल्लीतील 77 हजार लोकांना तीर्थयात्रा घडवण्याचं उद्दिष्ट दिल्ली सरकारने ठरवलंय.

इतक्या मोठ्या प्रमाणात वरिष्ठ नागरिकांना तीर्थयात्रा घडवणं, हे काही सोप्प काम नाहीये. त्यासाठी खूप मोठी मॅनेजमेंट हवी. कारण वरिष्ठ नागरिकांना एका दिवसात जास्तीत जास्त किती प्रवास जमेल, त्यांच्या तब्येतीची काळजी घेणे, या सगळ्या गोष्टींकडेही लक्ष ठेवावं लागतं.

त्यामुळे या तीर्थयात्रेदरम्यान दळणवळणाचा खर्च असो, जसं की एसी ट्रेन, मग तीर्थस्थानी पोहोचल्यानंतर हॉटेलचा खर्च असो, राहण्याची खाण्यापिण्याची सोय असो, हा सगळा खर्च दिल्ली सरकार उचलतं.

तसंच 71 वर्षांवरील वरिष्ठ नागरिकांसाठी एक सहाय्यक बरोबर ठेवण्यासही मंजुरी देण्यात आली आहे. हा सहाय्यक व्यक्ती 21 वर्षांपेक्षा जास्त वयाचा असावा आणि त्याचा संपूर्ण खर्चसुद्धा दिल्ली सरकारचं उचलतं. म्हणजे जास्तीची कोणतीही रक्कम या वरिष्ठ नागरिकास द्यावी लागणार नाही। आर्थिक भार त्याच्यावर पडणार नाही.

मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजना ही फक्त दिल्लीतचं नाही, तर भारतातील प्रत्येक राज्यात, प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात सुरू व्हायला हवी. यात शंका नाही. यामुळे वरिष्ठ नागरिकांच्या आयुष्यातील तीर्थयात्रा करण्याची ही महत्त्वाची इच्छा नक्कीचं पूर्ण होऊ शकेल.

FAQ About Mukhyamantri Tirth Yatra Yojana मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजनेबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न

1) प्रश्न : Mukhyamantri Tirth Yatra Yojana महाराष्ट्रात सुरू आहे का ?

उत्तर : नाही, मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजना महाराष्ट्रात सुरू नाहीये. ही योजना दिल्ली सरकारने सुरू केली असून दिल्लीतील मूळ निवासी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

2) प्रश्न : मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजनेअंतर्गत कोणत्या नागरिकांना तीर्थयात्रा घडवली जाते ?

उत्तर : या योजनेअंतर्गत 60 वर्षांवरील वरिष्ठ नागरिकांना तीर्थयात्रा घडवली जाते.

3) प्रश्न : Mukhyamantri Tirth Yatra Yojana अंतर्गत कोणत्या देवस्थानला भेट दिली जाते ?

उत्तर : दिल्ली सरकारने तीर्थयात्रा योजनेसाठी विविध टूर पॅकेजेस डिझाईन केले आहेत. ज्यामध्ये जवळपास देशभरातील सर्व तीर्थक्षेत्रांना भेट दिली जाते.

4) प्रश्न : मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजनेसाठी किती खर्च येतो ?

उत्तर : या योजनेत पात्र झालेल्या वरिष्ठ नागरिकांना एकही रुपया खर्च करण्याची गरज नाहीये. तीर्थयात्रेचा संपूर्ण खर्च दिल्ली सरकार करतं.

5) प्रश्न : मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजनेत वरिष्ठ नागरिक घरातील एखाद्या व्यक्तीला सोबत नेऊ शकतो का ?

उत्तर : होय, ज्या वरिष्ठ नागरिकांचे वय 71 वर्षांपेक्षा जास्त आहे. ते आपल्याबरोबर 21 वर्षांपेक्षा जास्त वय असलेली एक व्यक्ती सहाय्यक म्हणून नेऊ शकते.

दिल्ली सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजना Mukhyamantri Tirth Yatra Yojana खरोखरचं खूप कौतुकास्पद आहे. या योजनेचा दिल्लीतील वरिष्ठ नागरिकांना खूप लाभ होतोय आणि त्यांचं तीर्थयात्रा करण्याचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण होत आहे.

तुमच्या मनात मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजनेबद्दल आणखीन काही प्रश्न असतील, तर नक्कीचं कमेंट करून विचारा. आम्ही त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करू आणि अशाचं नवीन नवीन योजनांच्या माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.

खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top