Mukhyamantri Samuhik Vivah Yojana | मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजना

Mukhyamantri Samuhik Vivah Yojana

Mukhyamantri Samuhik Vivah Yojana

Mukhyamantri Samuhik Vivah Yojana आपल्या भारत देशामध्ये लग्न हा एक खूप मोठा सोहळा असतो. दोन व्यक्तींमध्ये जरी लग्न होत असलं, तरी दोन कुटुंब, त्यांचे नातेवाईक यानिमित्ताने एकत्र येतात. त्यांच्यात नवीन नाती निर्माण होतात. त्यामुळे हा सोहळा खूप आपुलकीने आणि उत्साहाने साजरा केला जातो.

परंतु गेल्या काही वर्षांमध्ये लग्नाला एका मोठ्या इव्हेंटच स्वरूप आलं आहे. लग्नाच्या अनेक महिने आधीपासूनचं लग्नाची तयारी सुरू होते. लग्न जवळ येताचं प्री-वेडिंग, हळद, मेहंदी आणि संगीत अशा अनेक सेरेमनी होत असतात.

लग्नासाठी मोठमोठे हॉल बुक केले जातात. हजारो लोकांना लग्नाला बोलावलं जातं. या हॉलचं डेकोरेशन केलं जातं, लाइटिंग केली जाते. जेवणामध्ये असंख्य पदार्थ असतात. फोटोग्राफर्स असतात. हजारो फोटो काढले जातात. डीजे, डान्स हे सगळं असतं. ज्यांचं लग्न आहे त्यांचे आणि कुटुंबाचे लाखो रुपयांचे महागडे कपडे असतात.

म्हणजे एकूणचं आजच्या काळात लग्न करायचं म्हटलं, तर लाखो रुपयांचा खर्च येतो. प्रत्येक माणूस आपल्या ऐपतीच्या बाहेर जाऊन खर्च करतो. जो हजार रुपये खर्च करू शकतो, तो लाख रुपये खर्च करतो आणि जो लाख रुपये खर्च करू शकतो, तो कोटी रुपये खर्च करून लग्नाला आयुष्यभरातील अविस्मरणीय सोहळा बनवण्याचा प्रयत्न करतो.

परंतु त्या लोकांचं काय ज्यांच्याकडे अशी चांगली आर्थिक परिस्थिती नाहीये. जे इतके मोठे सोहळे नाही करू शकत. आपल्या लाडक्या मुलीचं लग्न करण्यासाठी ज्यांच्याकडे पैसे नाहीयेत. अशा लोकांसाठीचं उत्तर प्रदेश सरकारने एक नवीन योजना आणली आहे आणि या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजना (Mukhyamantri Samuhik Vivah Yojana).

मग ही मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजना नेमकी आहे तरी काय ? या (Mukhyamantri Samuhik Vivah Yojana) योजनेसाठी पात्रता आणि अटी काय आहेत ? या योजनेमध्ये लग्न करणाऱ्या जोडप्यांना काय फायदा होतो ? आज आपण त्याबद्दलचं जाणून घेणार आहोत.

मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजना

उत्तर प्रदेश सरकारने आपल्या राज्यातील गरीब आणि निर्धन लोकांसाठी ही योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्या व्यक्तींना सामूहिक विवाह योजनेत Mukhyamantri Samuhik Vivah Yojana समाविष्ट करून घेतलं जातं आणि त्यांचं लग्न लावून दिलं जातं.

मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजनेचे लाभ

या (Mukhyamantri Samuhik Vivah Yojana) योजनेअंतर्गत लग्न करणाऱ्या जोडप्यांना सरकारकडून 51 हजार रुपयांची मदत केली जाते. परंतु हे 51 हजार रुपये पूर्णपणे त्यांच्याकडे दिले जात नाही, तर त्यामध्ये काही भाग आहेत.

या 51 हजार रुपयांपैकी 35 हजार रुपये जी नवरी मुलगी आहे तिच्या बँक अकाउंटवर ट्रान्सफर केले जातात. म्हणजे लग्न झाल्यानंतर तिचा संसार उभा करण्यासाठी तिला या पैशांची मदत होईल.

10 हजार रुपयांचा उपयोग या नवविवाहित जोडप्यांना लग्नामध्ये विविध संसार उपयोगी वस्तू देण्यासाठी केला जातो. या संसार उपयोगी वस्तूंमध्ये कपडे, चांदीचे पैंजण, स्टीलचा डिनर सेट, प्रेशर कुकर, ट्रॉली बॅग आणि भिंतीवरील घड्याळ दिलं जातं.

हेही वाचा : Post Office Monthly Income Scheme | पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम

तर उरलेले 6 हजार रुपयांचा वापर सामूहिक विवाह आयोजित करण्यासाठी केला जातो. म्हणजेचं अनेक जोडप्यांचे 6 हजार रुपये एकत्र करून एक मोठी रक्कम तयार केली जाते आणि यामध्ये लग्नाचा सर्व खर्च केला जातो.

ही (Mukhyamantri Samuhik Vivah Yojana) योजना त्या गरीब कुटुंबासाठी आहे ज्यांना त्यांच्या मुलीचं लग्न करायचंय. परंतु त्यांच्याकडे पैसे नाहीयेत. पैशांच्या अडचणीमुळे लग्न होऊ शकत नाही. अशा कुटुंबासाठी ही योजना खूपचं फायदेशीर आहे.

मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजनेच्या पात्रता अटी

उत्तर प्रदेश सरकारने या (Mukhyamantri Samuhik Vivah Yojana) योजनेत सहभागासाठी काही अटी घालून दिल्या आहेत

1) या योजनेसाठी अर्ज करताना विवाह योग्य मुलीच्या आई-वडिलांना हा अर्ज करता येतो.

2) मुलीचे वय 18 वर्ष आणि मुलाचं वय 21 वर्ष असणं बंधनकारक आहे. त्यासाठी वयाचा दाखला देणे आवश्यक आहे.

3) अविवाहित, विधवा आणि घटस्फोटीत मुलींच्या लग्नासाठी या योजनेत अर्ज करू शकतात.

4) ज्या जोडप्यांच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2 लाख रुपयांपेक्षा कमी आहे. त्यांनाचं या योजनेत अर्ज करण्याची सवलत आहे.

5) उत्तर प्रदेश राज्याचे कायमस्वरूपी निवासी असलेल्या व्यक्तींनाचं या योजनेसाठी अर्ज करता येतो.

मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजनेसाठी अर्ज कसा करायचा

दरवर्षी उत्तर प्रदेश सरकार सामूहिक विवाह योजनेसाठी ऑनलाईन अर्ज मागवण सुरू करतं. त्यासाठी एक ऑनलाइन पोर्टल सुरू केलं आहे.

Mukhyamantri Samuhik Vivah Yojana Online Portal

cmsvy.upsdc.gov.in

या ऑनलाइन पोर्टलवर जाऊन मुलींचे आई-वडील या योजनेत सहभागासाठी अर्ज करू शकता.

मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजनेची उद्दिष्टे

उत्तर प्रदेश सरकारने काही महत्त्वाची उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून या योजनेची सुरुवात केली आहे.

1) गरीब कुटुंबांना त्यांच्या मुलीच्या लग्नाची खूप काळजी असते. त्यामुळे बालवायातचं त्यांची लग्न लावून दिली जातात. बालविवाह रोखणं हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.

2) तसेच गरीब कुटुंबातील मुलींचे लग्न चांगल्या प्रकारे होत नाही. अशा गरीब कुटुंबांना सामूहिक विवाह योजनेत समाविष्ट करून मुलींची लग्न दिमाखात लावून देण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने ही योजना सुरू केली आहे.

3) या (Mukhyamantri Samuhik Vivah Yojana) योजनेत लग्न केल्यानंतर मुलींना त्यांच्या संसारासाठी 35 हजार रुपयांची रोख रक्कम मदत म्हणून देण्यात येते. त्याचबरोबर 10 हजार रुपयांच्या संसार उपयोगी वस्तूही देण्यात येतात. याचा फायदा त्यांच्या सुखी वैवाहिक जीवनासाठी होतो.

मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजनेचे सामाजिक फायदे

आता आपण या (Mukhyamantri Samuhik Vivah Yojana) योजनेच्या सामाजिक फायद्याबद्दल चर्चा करूया.

आजकाल लग्न म्हणजे खूप मोठा इव्हेंट झाला आहे. ज्यांच्याकडे पैसा आहे, ते धूमधडाक्यात लग्न करतात. हजारो लोकांना बोलवलं जातं. परंतु जे हजारो लोक त्यांचं लग्न पाहतात, त्यांच्या मनातही आपलंही लग्न असं व्हावं किंवा आपल्या मुला मुलींची लग्नही अशीचं व्हावी ही इच्छा तयार होते.

परंतु आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना ते करणं शक्य होत नाही. अशावेळेस काही कुटुंब आपल्या इच्छांना मुरड घालतात. तर काही लोक कर्ज घेऊन लग्न करतात. लग्नसोहळा तर एक दिवसाचा असतो, पण त्यानंतर पुढील अनेक वर्ष हे कर्ज भरावं लागतं. त्यासाठी कष्ट करावे लागतात.

सध्या तर अनेक तरुण जोडपी लग्न करण्यासाठी पर्सनल लोन काढतात. यामध्ये प्री-वेडिंग शूट पासून ते लग्नामध्ये महागडे कपडे घेण, लग्नात विविध हौस करणं अशा गोष्टी समाविष्ट असतात.

नव्याने होऊ घातलेल्या या सामाजिक पद्धतीचा रितींचा आपल्या समाजावर खूप वाईट परिणाम होत आहे. म्हणूनचं उत्तर प्रदेश सरकारने मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजना आणली आहे. ज्यामध्ये जे कुटुंब निर्धन आहेत. ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाहीये. ते सुद्धा त्यांच्या मुलींची लग्न चांगल्या प्रकारे करू शकतात.

अनेक नवीन जोडप्यांचं लग्न तर धूमधडाक्यात होतं, परंतु लग्नानंतर त्यांच्याकडे पैसे उरत नाही. संसार उपयोगी गोष्टी घेण्यासाठी त्यांना कर्ज काढावं लागतं. परंतु मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजनेत लग्न करणाऱ्या जोडप्यांना 35 हजार रुपये रोख पाठवले जातात. याचा फायदा त्यांना नवीन संसारासाठी होतो.

FAQ About Mukhyamantri Samuhik Vivah Yojana मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजनेबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न

1) प्रश्न : मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजना (Mukhyamantri Samuhik Vivah Yojana) महाराष्ट्रात सुरू आहे का ?

उत्तर : नाही, मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजना महाराष्ट्रात सुरू नाहीये. ही योजना उत्तर प्रदेश सरकार राबवते आणि उत्तर प्रदेशचे मूळ निवासि या योजनेत लाभ घेऊ शकतात.

2) प्रश्न : मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजनेचे लाभ काय आहेत ?

उत्तर : या योजनेअंतर्गत लग्न करणाऱ्या जोडप्याना उत्तर प्रदेश सरकारकडून 51 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.

3) प्रश्न : मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजनेत (Mukhyamantri Samuhik Vivah Yojana) अर्ज कसा करायचा ?

उत्तर : या योजनेत अर्ज करण्यासाठी तुम्हाला उत्तर प्रदेश सरकारच्या ऑनलाईन पोर्टलमध्ये नोंदणी करावी लागेल.

4) प्रश्न : मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजनेअंतर्गत कोणत्या संसार उपयोगी वस्तू दिल्या जातात ?

उत्तर : या योजने अंतर्गत लग्न करणाऱ्या जोडप्यांना 10 हजार रुपयांच्या संसार उपयोगी वस्तू दिल्या जातात. ज्यामध्ये प्रेशर कुकर, ट्रॉली बॅग, कपडे, भिंतीवरील घड्याळ आणि चांदीचं पैंजण अशा गोष्टी असतात.

5) प्रश्न : मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजनेसाठी आर्थिक पात्रता निकष आहेत का ?

उत्तर : होय, या योजनेसाठी आर्थिक पात्रता निकष आहेत. ज्या कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न 2 लाख रुपयांपेक्षा कमी आहे. तेच कुटुंब या योजनेत सहभागासाठी अर्ज करू शकतात.

मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजना (Mukhyamantri Samuhik Vivah Yojana) उत्तर प्रदेश सरकारने सुरू केलेली खूपचं कौतुकास्पद योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून गरीब आणि निर्धन कुटुंबातील मुलींचे लग्न धूमधडाक्यात लावून दिलं जातं. त्याचबरोबर त्यांना 51 हजार रुपयांची आर्थिक मदतही केली जाते आणि त्यांचा संसार आनंदाने सुरू होतो. या योजनेमुळे अनेक गरीब निर्धन कुटुंबांवर लग्नाच्या खर्चामुळे होणारं कर्जही वाचलं आहे.

तुमच्या मनात मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजनेबद्दल आणखीन काही प्रश्न असतील, तर नक्कीचं कमेंट करून विचारा. आम्ही त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करू आणि सरकारच्या इतर योजनांबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या संकेतस्थळावरील इतर लेखही नक्कीचं वाचा.

खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top