Mukhyamantri Rajshree Yojana
Mukhyamantri Rajshree Yojana राजस्थान सरकार आपल्या राज्यातील नागरिकांसाठी विविध योजना राबवत असते. मग ते राज्यातील लहान मुलं मुली असो किंवा वरिष्ठ नागरिक. आता राजस्थान सरकारने राज्यातील बालिकांसाठी एक खूपचं चांगली योजना सुरू केली आहे आणि या योजनेचे नाव आहे मुख्यमंत्री राजश्री योजना.
राजस्थान या राज्यात जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलीला या योजनेचा खूप छान फायदा मिळतोय. त्यामुळे राज्यातील मुलींचे आई-वडील खूप खुश आहेत आणि या योजनेचा फायदा मिळवत आहेत. मग ही मुख्यमंत्री राजश्री योजना नेमकी आहे तरी काय ? Mukhyamantri Rajshree Yojana या योजनेचा लाभ कोणाला मिळतो ? मुख्यमंत्री राजश्री योजनेच्या पात्रता आणि अटी काय आहेत ? या योजनेचे लाभ काय आहेत ? आज आपण त्याबद्दलचं जाणून घेणार आहोत.
मुख्यमंत्री राजश्री योजनेची उद्दिष्टे
ही Mukhyamantri Rajshree Yojana योजना सुरू करण्यामागे राजस्थान सरकारचा एक सामाजिक उद्देश आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की, आपल्या देशामध्ये जेव्हा एखाद्या कुटुंबात मुलगी जन्माला येते. तेव्हा आई-वडिलांना तिच्या शिक्षणाची, तिच्या लग्नाची काळजी सतावू लागते. मुलीला कुटुंबावरील मोठा भार समजला जातो. त्यामुळे आपल्या देशात कन्या भ्रूण हत्या, मुलींचे बालविवाह, त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणं, अशा खूप कुप्रथा आहेत. या कूप्रथांना समूळ नष्ट करण्यासाठी राजस्थान सरकारने मुख्यमंत्री राजश्री योजनेची घोषणा केली आहे.
मुख्यमंत्री राजश्री योजनेद्वारे (Mukhyamantri Rajshree Yojana) सरकार राज्यातील मुलींचं सामाजिक आणि कौटुंबिक महत्त्व वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. ज्यामुळे त्यांचं स्थान समाजात आणि कुटुंबात उंचावलं जाईल आणि त्यांना आयुष्यातील या विविध त्रासांना सामोरे जावे लागणार नाही. तसंच अनेक मुलींची उच्च शिक्षण घेण्याचीही इच्छा असते. परंतु आई वडिलांच्या कमकुवत आर्थिक परिस्थितीमुळे त्यांचं हे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. आता सरकारचं मुलींना आर्थिक लाभ देत आहे. म्हणजे या पैशांचा उपयोग मुली त्यांचं उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी ही करू शकतात.
मुख्यमंत्री राजश्री योजनेचे लाभ
राजस्थान सरकारने 1 जून 2016 रोजी मुख्यमंत्री राजश्री योजना Mukhyamantri Rajshree Yojana राजस्थानमध्ये लागू केली होती. या योजनेअंतर्गत 1 जून 2016 नंतर राजस्थानमध्ये जन्मणाऱ्या मुलींना वयाची 12 वर्षे पूर्ण होईपर्यंत 50 हजार रुपयांचा लाभ दिला जातो, आर्थिक मदत केली जाते.
मुलींना मिळणारे हे 50 हजार रुपये 6 विविध टप्प्यांमध्ये दिले जातात. आता हे 6 विविध टप्पे कोणते आहेत, आपण त्याबद्दल जाणून घेऊया.
1) या 50 हजार रुपयांमधील पहिला हप्ता मुलीचा जन्म झाल्यानंतर अडीच हजार रुपयांच्या स्वरूपात दिला जातो.
2 ) या योजनेचा दुसरा हप्ता मुलीच्या पहिल्या वाढदिवसाला अडीच हजार रुपयांच्या माध्यमातून दिला जातो.
3) जेव्हा मुलगी पहिलीत जाते, तेव्हा तिला राजस्थान सरकार या योजनेचा तिसरा हफ्ता म्हणून चार हजार रुपये देतं.
4) जेव्हा मुलगी सातवीत जाते, तेव्हा राजस्थान सरकारतर्फे मुलींना चौथा हप्ता 5 हजार रुपयांचा दिला जातो.
5) मुलगी दहावीला गेल्यानंतर राजस्थान सरकार या योजनेचा पाचवा हप्ता 11000 रुपये देतं.
6) बारावीला गेल्यानंतर राजस्थान सरकार या योजनेचा शेवटचा हप्ता मुलींना 25 हजार रुपये देतं.
अशाप्रकारे या सहा हप्त्यांमध्ये मुलगी 18 वर्षांची होईपर्यंत राजस्थान सरकार 50 हजार रुपयांचा आर्थिक लाभ मुलींना देतं. हे सर्व पैसे मुलीच्या आई-वडिलांच्या बँक खात्यावर जमा केले जातात.
हेही वाचा : National Pension Scheme 2024 | नॅशनल पेन्शन स्कीमची संपूर्ण माहिती
मुख्यमंत्री राजश्री योजनेसाठी पात्रता अटी
या Mukhyamantri Rajshree Yojana योजनेत पात्र होण्यासाठी राजस्थान सरकारने काही पात्रता आणि अटी आखून दिल्या आहेत. आपण त्या जाणून घेऊयात.
1) लाभार्थी मुलीचे आई-वडील राजस्थान राज्याचे मूळ निवासी असावेत.
2) मुलीचा जन्म 1 जून 2016 या तारखेनंतर व्हायला हवा.
3) मुलीच्या आई-वडिलांकडे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे.
4) मुलीचा जन्म राजस्थान सरकारच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये व्हायला हवा.
5) मुलीचं शिक्षण राजस्थान सरकारने मान्यता दिलेल्या शिक्षण संस्थेतचं व्हायला हवं.
6) एका कुटुंबातील फक्त दोन मुलींना या योजनेचा लाभ मिळेल, तिसऱ्या मुलीला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
मुख्यमंत्री राजश्री योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
या Mukhyamantri Rajshree Yojana योजनेत अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे खालीलप्रमाणे आवश्यक कागदपत्रे असायला हवीत.
1) मुलीच्या आई-वडिलांचं आधार कार्ड
2) मुलीचा जन्माचा दाखला
3) मुलीच्या आई-वडिलांचे बँक खाते पासबुक
4) मुलीच्या शाळेचा दाखला
5) मुलगी दहावी आणि बारावी इयत्तेत गेली आहे, त्याचं प्रमाणपत्र
5) पासपोर्ट साईज फोटो
6) मोबाईल नंबर
मुख्यमंत्री राजश्री योजनेसाठी अर्ज कसा करायचा
मुख्यमंत्री राजश्री योजनेसाठी (Mukhyamantri Rajshree Yojana) तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने अर्ज करावा लागेल.
1) राजस्थान सरकारने या योजनेसाठी एक पोर्टल लॉन्च केलं आहे. या पोर्टलवर लॉग इन करून तुम्हाला मुख्यमंत्री राजश्री योजनेसाठी असलेला अर्ज डाऊनलोड करावा लागेल.
2) या डाऊनलोड केलेल्या अर्जाची प्रिंटआउट काढून तुम्हाला या अर्जात वैयक्तिक माहिती भरावी लागेल.
3) अर्ज भरून झाल्यानंतर आवश्यक कागदपत्रे या अर्जाला जोडावी लागतील.
4) सर्वात शेवटी हा अर्ज तुम्ही तुमच्या जवळच्या ग्रामपंचायत, नगरपंचायत किंवा कलेक्टर ऑफिसमध्ये जमा करायचा आहे.
5) अर्जाची छाननी केल्यानंतर या योजनेसाठी अर्जदार पात्र ठरतील आणि त्यांना मुख्यमंत्री राजश्री योजनेचा लाभ मिळेल.
मुख्यमंत्री राजश्री योजनेचं सामाजिक महत्त्व
सध्या आपण 21 व्या शतकात जगतोय. तरीही आपल्या देशात कन्या भ्रूण हत्या, मुलींचे बालविवाह आणि त्यांना समाजात दुर्लक्षित केलं जाणं अशा समस्या आहेत. या समस्यांचा समूळ नाश करण्यासाठी भारत सरकारने बेटी बचाओ बेटी पढाओ ही योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
या योजनेअंतर्गत भारतातील विविध राज्यांनी आपापल्या योजना लॉन्च केल्या आहेत. जसं की, आपल्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री लेक लाडकी योजना लॉन्च करण्यात आली. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रात जन्माला येणाऱ्या मुलींना 1 लाख 1 हजार रुपयांचा आर्थिक लाभ दिला जातो.
तशीच राजस्थान सरकारची मुख्यमंत्री राजश्री योजना आहे. या योजनेमध्ये राज्यात जन्मलेल्या मुलींना 50 हजार रुपयांचा आर्थिक लाभ मिळतो. या सर्व योजनांचा मुख्य उद्देश आपल्या देशातील मुलींबद्दलच्या कुप्रथांना आळा घालणं आणि त्या समूळपणे नष्ट करणं हाच आहे.
अनेक पालकांना मुलीचा जन्म झाल्यानंतर त्यांच्या शिक्षणाची आणि लग्नाची काळजी लागून राहिलेली असते. त्यांना मुलगी ही जबाबदारीचं ओझं वाटते. अशा पालकांच्या मुलींना जर सरकारकडून आर्थिक लाभ मिळाला, तर त्यांना मुलींच्या शिक्षणाची आणि लग्नाची काळजी राहणार नाही आणि ते मुलांप्रमाणेचं आपल्या मुलींनाही प्रेमाने आणि आदराने वाढवतील.
मुलींचं सामाजिक महत्त्व वाढवण्यासाठीचं या Mukhyamantri Rajshree Yojana योजना सुरू करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर या पैशांचा उपयोग मुलींना त्यांच्या शिक्षणासाठीही करता येईल. अनेकदा मुलींना त्यांचा आवडीचं शिक्षण पालकांचा दयनीय आर्थिक परिस्थितीमुळे घेता येत नाही. परंतु सरकारकडून मिळालेल्या आर्थिक मदतीचा फायदा त्यांना आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी नक्कीचं होईल, यात शंका नाही.
FAQ About Mukhyamantri Rajshree Yojana मुख्यमंत्री राजश्री योजनेबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न
1) प्रश्न : Mukhyamantri Rajshree Yojana महाराष्ट्रात सुरू आहे का ?
उत्तर : नाही, ही योजना महाराष्ट्रात सुरू नाहीये. राजस्थान सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री राजश्री योजना राजस्थान राज्यात जन्मलेल्या मुलींसाठीचं उपलब्ध आहे.
2) प्रश्न : मुख्यमंत्री राजश्री योजनेत मुलींना काय लाभ मिळतो ?
उत्तर : या योजनेअंतर्गत लाभार्थी मुलींना वयाची 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत सहा हप्त्यांमध्ये 50 हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते.
3) प्रश्न : मुख्यमंत्री राजश्री योजना अंतर्गत पैसे कधी मिळतात ?
उत्तर : या योजनेअंतर्गत मुलींना पैसे जन्मानंतर, 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर, पहिलीला गेल्यानंतर, सहावीला गेल्यानंतर, दहावीला पाहिल्यानंतर आणि बारावीला गेल्यानंतर मिळतात.
4) प्रश्न : Mukhyamantri Rajshree Yojana सुरू करण्याचा उद्देश काय आहे ?
उत्तर : मुलींबद्दल असलेल्या सामाजिक कुप्रथांना आळा घालण्यासाठी आणि त्यांचा सामाजिक स्तर उंचावण्यासाठी राजस्थान सरकारने मुख्यमंत्री राजश्री योजनेची सुरुवात केली आहे.
5) प्रश्न : राजस्थानातील मुख्यमंत्री राजश्री योजना आणि महाराष्ट्रातील लेक लाडकी योजना सारखीचं आहे का ?
उत्तर : होय, या दोन्ही योजना मुलींचा सामाजिक स्तर उंचावण्यासाठी त्यांना आर्थिक मदत देतात. परंतु राजस्थानातील मुख्यमंत्री राजश्री योजनेअंतर्गत मुलींना पन्नास हजार रुपयांचा आर्थिक लाभ दिला जातो. तर महाराष्ट्रातील लेक लाडकी योजनेअंतर्गत मुलींना एक लाख एक हजार रुपयांचा आर्थिक लाभ दिला जातो.
राजस्थान सरकारने सुरू केलेली Mukhyamantri Rajshree Yojana खूपचं चांगली सुरुवात आहे. मुलींचा सामाजिक स्तर उंचावण्यासाठी आणि त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी या योजनेचा फायदा नक्कीचं होईल यात शंका नाही. राजस्थानमध्ये सरकारने सुरू केलेली फ्री स्कुटी योजना सुद्धा खूपचं लोकप्रिय आहे. या योजनेअंतर्गत बारावीच्या परीक्षेत चांगले मार्क मिळवलेल्या मुलींना सरकारतर्फे फ्री स्कुटी दिली जाते.
संपूर्ण भारतात वेगवेगळ्या राज्यांमध्ये मुलींसाठी अशा विविध योजना सुरू आहेत. ज्याचा आर्थिक फायदा त्यांना आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी होतोय. या योजनांचं नक्कीचं कौतुक करायला हवं आणि लाभार्थी मुलींनी या योजनेचा फायदाही घ्यायला हवा.
मुख्यमंत्री राजश्री योजनेबद्दल तुमच्या मनात आणखीन काही प्रश्न असतील, तर नक्कीचं कमेंट करून विचारा. आम्ही त्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करू आणि सरकारच्या आणखी योजनाबद्दल जाणून घेण्यासाठी आमच्या संकेतस्थळावरील इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !