Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संपूर्ण माहिती

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana नुकताच महाराष्ट्र सरकारचा अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला आणि अर्थसंकल्पात अनेक नवीन योजना सुरू करण्यात आल्या आहेत. यातील एक योजना आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेच्या घोषणेनंतर सगळीकडेचं या योजनेबद्दल चर्चा होऊ लागलीये. योजनेच्या अटी आणि शर्ती काय आहेत ? योजनेत राज्यातील कोणत्या महिलांना लाभ मिळेल ? किती लाभ मिळेल ? असे अनेक प्रश्न तुमच्याही मनात आहेत. तर चला आज आपण या योजनेची सर्व माहिती जाणून घेऊया.

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana

काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की, महाराष्ट्र राज्य सरकारने आपलं शिष्टमंडळ मध्यप्रदेश राज्यात पाठवलंय, तेथील लाडली बहना योजनेबद्दल माहिती घेण्यासाठी आणि आता अर्थसंकल्पात माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली आहे. म्हणजे ही योजना मध्यप्रदेशातील लाडली बहना योजनेवर आधारित असणार आहे.

अर्थसंकल्पात दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 वयोगटातील महिलांना या योजनेचा लाभ देण्यात येईल. परंतु या वयोगटातील सरसकट महिलांनाचं योजनेचा लाभ देण्यात येणार नाहीये. तर त्यासाठी काही अटी आणि शर्ती सुद्धा आहेत.

21 ते 60 या वयोगटातील ज्या महिला विवाहित आहेत, घटस्फोटीत आहेत किंवा विधवा आहेत. त्यांनाच या योजनेचा लाभ मिळेल. त्यामुळे ज्या महिला अविवाहित आहे, त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

या योजनेसाठी आर्थिक उत्पन्नाची अटही ठेवण्यात येईल. सध्या तरी अडीच लाख रुपयेपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ देण्यात येईल, असं सांगितलं जातंय.

तसंच ज्या महिलांच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती सरकारी नोकरी करत नसेल किंवा कोणती व्यक्ती इन्कमटॅक्स भरत नसेल, तरचं त्यांना या योजनेचा लाभ देण्यात येईल.

लाडली बहना योजनेची संपूर्ण माहिती

मध्य प्रदेश मधील योजनेत ज्या कुटुंबात फोर व्हीलर आहे, त्या कुटुंबांनाही या योजनेचा लाभ देण्यात येत नाही. महाराष्ट्र सरकारच्या योजनेमध्ये ही अट आहे की नाही हे तर येणाऱ्या काळात कळेलच.

ज्या महिला या योजनेअंतर्गत पात्र ठरतील त्यांना दरमहा पंधराशे रुपये राज्य सरकारकडून बँक अकाउंटवर वर्ग करण्यात येतील. ही योजना एक जुलैपासून सुरू होणार आहे.

या योजनेसाठी कोठे आणि कसा अर्ज करायचा याची माहिती येणाऱ्या दिवसात कळेलच. तेव्हा आम्ही ती नक्कीचं येथे अपडेट करू. तोपर्यंत अशाच नवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्की वाचा.

खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top