Mukhyamantri Gramin Path Vikreta Yojana
Mukhyamantri Gramin Path Vikreta Yojana आपल्या देशामध्ये कितीही मोठे मोठे मॉल झाले, शॉपिंग कॉम्प्लेक्स झाले, तरीसुद्धा स्वस्त आणि मस्त खरेदी करायची असल्यास लोक रस्त्यावरील विक्रेत्यांकडून खरेदी करतात. यालाचं स्ट्रीट शॉपिंग असंही म्हटलं जातं.
स्ट्रीट शॉपिंग ही स्वस्तही असते. त्याचबरोबर सर्वांना परवडणारीही असते. म्हणून अनेक लोक मॉलमध्ये फिरायला जात असले, तरीसुद्धा त्यांचा मुख्य उद्देश्य हा खरेदीचा नसतो आणि खरेदी करण्यासाठी ते स्ट्रीट शॉपिंग करतात.
स्ट्रीट शॉपिंगमध्ये फक्त खरेदी करणाऱ्यांचा फायदा होत नाही, तर रस्त्यावरील विक्रेत्यांचा सुद्धा फायदा असतो. त्यांची रोजंदारी या व्यवसायावर चालते. रस्त्यावर वस्तू विक्री करणारे लोक हे गरीब कुटुंबातील असतात. त्यांचा या व्यवसायातूनचं उदरनिर्वाह चालत असतो.
या विक्रेत्यांना रस्त्यावर व्यवसाय करताना खूप अडचणींना तोंड द्यावं लागतं. कधी त्यांना नगरपालिका, महानगरपालिका यांच्याकडून ₹ सतावलं जातं, तर त्यांना जागेवर व्यवसाय करू दिला जात नाही. तर कधी व्यवसायातील मंदीमुळे त्यांना कर्जबाजारी व्हावं लागतं. त्यांना त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी कोणती बँक सुद्धा कर्ज देत नाही. कारण त्यांच्याकडे व्यवसायाबद्दल कोणतेही कागदपत्र नसतात.
असे रस्त्यावरील छोटे विक्रेते आपल्या अर्थव्यवस्थेसाठी खूप महत्त्वाचे असतात. म्हणूनचं सरकारने त्यांच्यासाठी एखादी चांगली योजना आणायला हवी. त्यांनाही त्यांच्या व्यवसायात मदत मिळावी असं काहीतरी करायला हवं.
आणि आता हाच विचार मध्य प्रदेश सरकारने केला आहे. मध्य प्रदेश सरकारने मुख्यमंत्री ग्रामीण पथ विक्रेता ऋण योजना (Mukhyamantri Gramin Path Vikreta Yojana) सुरू करण्याचा निर्णय घेतलाय.
मग ही मुख्यमंत्री पथ विक्रेता ऋण योजना नेमकी आहे तरी काय ? या योजनेचा नेमका लाभ काय आहे ? या योजनेत किती रुपयांचा कर्ज मिळतं ? हे कर्ज कसं परत केलं जातं ? या कर्जावर व्याज किती आकारलं जातं ? पात्रता आणि अटी काय आहेत ? Mukhyamantri Gramin Path Vikreta Yojana कागदपत्रे कोणती लागतात ? आज आपण त्याबद्दल जाणून घेणार आहोत.
मुख्यमंत्री ग्रामीण पथ विक्रेता ऋण योजना
या Mukhyamantri Gramin Path Vikreta Yojana योजनेअंतर्गत मध्यप्रदेश सरकारने रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांसाठी एक खूपचं चांगली सुरुवात केली आहे. राज्यातील ज्या व्यक्तींना एखादा छोटासा लघुउद्योग सुरू करायचा आहे, किंवा जे व्यक्ती आधीपासूनचं एखादा लघुउद्योग करताय. त्यांना या योजनेअंतर्गत दहा हजार रुपयांचं कर्ज दिलं जाईल. तसंच ज्या व्यक्तींना व्यवसाय संबंधित प्रशिक्षण हवं आहे, या योजनेमध्ये त्याबद्दलचीही सोय करण्यात आलीये.
मुख्यमंत्री ग्रामीण पथ विक्रेता योजनेची वैशिष्ट्ये
ही Mukhyamantri Gramin Path Vikreta Yojana योजना खूपचं वैशिष्ट्यपूर्ण आहे. आपण एकेक करून ही सर्व वैशिष्ट्ये जाणून घेऊया.
1) पथ म्हणजेचं रस्ता. रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांबद्दल आजपर्यंत कोणत्याही सरकारने योजना आणली नव्हती. ही योजना त्यांच्यासाठीचं बनवली गेलीये.
2) राज्यातील ज्या बेरोजगार तरुणांना एखादा लघुउद्योग करायचा आहे. त्या तरुणांना या योजनेअंतर्गत लघुउद्योग करण्यासाठी दहा हजार रुपयांची मदत दिली जाते.
3) रस्त्यावर व्यवसाय करणारे जे विक्रेते आधीपासूनचं व्यवसाय करताय आणि त्यांना कर्ज हवं आहे. त्यांना या योजनेमार्फत दहा हजार रुपयांचं कर्ज दिलं जातं.
4) या Mukhyamantri Gramin Path Vikreta Yojana योजनेअंतर्गत दिलं जाणाऱ्या कर्जावर कोणतंही व्याज सरकार आकारत नाही.
5) या कर्जाची परतफेड करण्यासाठी सरकार लाभार्थ्यांना विशेष सवलतही देत असतं आणि कर्जाची परत फेड करण्याची मुदतही सोयीस्कर असते.
मुख्यमंत्री पथविक्रेता ऋण योजनेसंबंधित पात्रता आणि अटी
या Mukhyamantri Gramin Path Vikreta Yojana योजनेचा लाभार्थी होण्यासाठी राज्य सरकारने काही अटी आणि शर्ती ठेवल्या आहेत. आपण त्याबद्दल जाणून घेऊया.
1) अर्ज करणारी व्यक्ती मध्यप्रदेश राज्याची मूळ निवासी असावी.
2) या Mukhyamantri Gramin Path Vikreta Yojana योजनेचा लाभार्थी होण्यासाठी अर्जदाराला आपल्या व्यवसायाबद्दलची संबंधित कागदपत्रे द्यावी लागतील.
West Bengal Yuvshri Yojana 2024 | पश्चिम बंगाल युवश्री योजना
मुख्यमंत्री पथ विक्रेता ऋण योजनेत अर्ज कसा करायचा
या Mukhyamantri Gramin Path Vikreta Yojana योजनेचा लाभार्थी होण्यासाठी मध्यप्रदेश सरकारने एक ऑनलाईन पोर्टल सुरू केलं आहे. या पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करून योजनेचा लाभ घेता येऊ शकतो.
सर्वात आधी या पोर्टलवर लॉगिन करून संबंधित माहिती भरावी लागते. मग आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतात. अर्ज सबमिट केल्यानंतर अधिकाऱ्यांमार्फत या अर्जाची छाननी होते आणि मग अर्जदारास कर्ज वितरित केलं जातं.
मुख्यमंत्री पथविक्रेता ऋण योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
या Mukhyamantri Gramin Path Vikreta Yojana योजनेचा अर्ज करण्यासाठी खालील प्रमाणे कागदपत्रांची आवश्यकता असते.
1) अर्जदाराचं आधार कार्ड
2) अर्जदाराचा निवासी दाखला
3) अर्जदाराच्या व्यवसायाशी संबंधित कागदपत्रे
4) अर्जदाराचं बँक अकाउंट पासबुक
5) अर्जदाराचा पासपोर्ट साईज फोटो.
मुख्यमंत्री पथ विक्रेता ऋण योजना आवश्यकता
आता अनेकांच्या मनात हा प्रश्न आला असेल की, या Mukhyamantri Gramin Path Vikreta Yojana योजनेची काय आवश्यकता आहे ? रस्त्यावर विक्री करणाऱ्या लोकांना कर्ज देण्याची काय गरज आहे ?
तर देशातील किंवा राज्यातील सरकारचं हे मुख्य कर्तव्य असतं की, आपल्या राज्यात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या भल्याचा विचार करणं. त्याला जास्तीत जास्त मदत करणं आणि जे लोक स्वतःची नोकरी करतात, एखादा मोठा व्यवसाय करतात, त्यांना कर्ज देण्यासाठी तर अनेक बँका पुढे सरसावतात.
परंतु रस्त्यावर एखादा व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्याला कुणीही कर्ज देत नाही. त्याला जर पैशांची गरज भासली, त्याला स्वतःचा व्यवसाय वाढवायचा असला, तर त्याला सावकाराकडून कर्ज घ्यावं लागतं किंवा घरातील एखादी वस्तू गहाण ठेवावी लागते. परंतु ज्यांच्याकडे हे ऑप्शन नसतात, ते काय करतील ? हा विचार करणं सरकारचं कर्तव्य आहे.
रस्त्यावरील विक्रेते छोटा व्यवसाय करत असतील, तरीसुद्धा ते देशातील अर्थव्यवस्थेला चालना देतात. ते सुद्धा या देशाचे नागरिक आहेत. म्हणून त्यांना मदत करणं, त्यांच्यासाठी एखादी योजना आणणं हे सरकारचं कर्तव्य आहे.
म्हणूनचं मध्यप्रदेश सरकारने आपलं हे कर्तव्य ओळखत रस्त्यावरील विक्रेत्यांसाठी मुख्यमंत्री पथ विक्रेता ऋण योजना Mukhyamantri Gramin Path Vikreta Yojana सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेचा पथविक्रेत्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल, यात शंका नाही.
दोन वर्षांपूर्वी कोरोना या रोगामुळे देशात मोठं लॉकडाऊन लागलं होतं. तेव्हापासूनचं या रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांची आर्थिक परिस्थिती मोठ्या प्रमाणात ढासळली आहे. हे आपल्या सर्वांनाचं माहिती आहे. कारण तेव्हा सर्वांनाचं आपल्या घरात बंदिस्त राहावं लागलं होतं.
कुणीही घराबाहेर खरेदी करण्यासाठी पडत नव्हतं. अशात या रस्त्यावरील विक्रेत्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. त्यांचे व्यवसाय बसले. त्यांना उदरनिर्वाह चालवणं खूप कठीण झालं होतं. अशा लोकांसाठी ही योजना नक्कीचं फायदेशीर ठरेल यात शंका नाही.
प्रत्येकाला आपल्या व्यवसायात पुढे जायचं असतं. प्रगती करायची असते आणि व्यवसायात प्रगती करायची असेल, तर भांडवल हा एकमेव पर्याय त्यांच्या समोर असतो. परंतु छोट्या विक्रेत्यांना कोणीही पैसे देत नाही. भांडवल देत नाही. त्यामुळे सरकारचं आता त्यांच्या मदतीसाठी पुढे सरसावलंय, ही खूपचं कौतुकास्पद बाब आहे.
मुख्यमंत्री पथ विक्रेता ऋण योजनेबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न
1) प्रश्न : मुख्यमंत्री पथ विक्रेता ऋण योजना कधी सुरू करण्यात आली ?
उत्तर : मध्यप्रदेश सरकारने जुलै 2020 मध्ये मुख्यमंत्री पथ विक्रेता ऋण योजनेला सुरुवात केली होती.
2) प्रश्न : मुख्यमंत्री पथ विक्रेता ऋण योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे ?
उत्तर : या Mukhyamantri Gramin Path Vikreta Yojana योजनेअंतर्गत मध्यप्रदेश सरकार राज्यातील पथ विक्रेत्यांना दहा हजार रुपयांची आर्थिक मदत करून त्यांना त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी प्रोत्साहित करतं.
3) प्रश्न : मुख्यमंत्री पथ विक्रेता ऋण योजनेमध्ये किती रुपयांचं कर्ज मिळतं ?
उत्तर : या योजनेअंतर्गत मध्य प्रदेश सरकार लाभार्थ्यांना दहा हजार रुपयांचं कर्ज देतं.
4) प्रश्न : मुख्यमंत्री पथ विक्रेता ऋण योजनेत मिळालेल्या कर्जावर राज्य सरकार किती व्याज आकारतं ?
उत्तर : या Mukhyamantri Gramin Path Vikreta Yojana योजनेअंतर्गत वाटप केलेल्या कर्जावर मध्यप्रदेश सरकार कोणतंही व्याज आकारत नाही. हे बिनव्याजी कर्ज आहे.
5) प्रश्न : मुख्यमंत्री पथ विक्रेता ऋण योजनेअंतर्गत कर्जाशिवाय आणखीन कोणत्या गोष्टींची तरतूद आहे ?
उत्तर : या योजनेअंतर्गत ज्या तरुणांना नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे, त्या तरुणांना ट्रेनिंगही दिलं जातं.
मध्यप्रदेश सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री पथ विक्रेता ऋण योजना Mukhyamantri Gramin Path Vikreta Yojana खरंच खूप उल्लेखनीय आणि कौतुकास्पद अशी योजना आहे. याआधी देशामध्ये अनेक योजना सुरू केल्या गेल्या आहेत. परंतु रस्त्यावर एखाद्या सामानाची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांबद्दल कोणत्याही सरकारने विचार केला नव्हता की, त्यांच्याही अडचणी काय आहेत, त्यांनाही आर्थिक समस्यांना तोंड द्यावं लागतं, रस्त्यावर उभ राहून व्यवसाय करणं हे काही सोपं काम नाहीये. परंतु मध्य प्रदेश सरकारने त्यांना बिनव्याजी कर्ज देण्याची ही योजना आखून खूपचं चांगलं पाऊल उचललंय.
या Mukhyamantri Gramin Path Vikreta Yojana योजनेचा लाभ घेऊन पथ विक्रेता नक्कीचं त्यांच्या आर्थिक अडचणींचा सामना करू शकतात. त्यांचा व्यवसाय वाढवू शकतात आणि व्यवसाय वाढवण्यासाठी त्यांना मिळणारं हे बिनव्याजी कर्ज नक्कीचं त्यांना फायदेशीर ठरेल, यातही शंका नाही.
आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये आपण पथ विक्रेत्यांकडून अनेक वस्तूंची खरेदी करत असतो. रोज भाजीपाल्याची खरेदी असो, दैनंदिन घरातील वापराच्या वस्तूंची खरेदी असो, कपड्यांची खरेदी असो, या वस्तू पथ विक्रेत्यांकडे स्वस्त दरामध्ये मिळतात. याच वस्तू जर आपण चांगल्या दुकानांमध्ये घ्यायला गेलो, तर ते महाग पडतं. ज्यामुळे महागाई वाढलीये, ही जाणीव समाजात तयार होऊ शकते. म्हणून पथविक्रेते असणं हे खूप महत्त्वाचे आहे.
मुख्यमंत्री पंथ विक्रेता ऋण योजनेबद्दल Mukhyamantri Gramin Path Vikreta Yojana तुमच्या मनात आणखीन काही प्रश्न असतील, तर नक्कीचं कमेंट करून विचारा. आम्ही त्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करू आणि अशाचं नवीन नवीन सरकारी योजनांबद्दल जाणून घेण्यासाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !