Mrunal Dusanis Daughter Name लोकप्रिय अभिनेत्री मृणाल दुसानिस ही सध्या पडद्यापासून दूर असली तरी प्रेक्षकांच्या मनात ती अजूनही आपली विशेष जागा जपून आहे. तिने अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. माझिया प्रियाला प्रीत कळेना, तू तिथे मी, अस्सं सासर सुरेख बाई, हे मन बावरे या एकापेक्षा एक सुंदर मालिकांमधून तिने आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं. यासोबतच तिने श्रीमंत दामोदरपंत, मुंबई लाईन या चित्रपटांमध्येही काम केलं.
अभिनय कारकिर्दीत यशाच्या शिखरावर असताना मृणालने 2016 साली नीरज मोरे या सॉफ्टवेअर इंजिनिअरसोबत लग्न केलं. त्यानंतर हे मन बावरे या लोकप्रिय मालिकेनंतर 2020 साली मृणाल अभिनयातून ब्रेक घेत आपल्या पतीसह अमेरिकेत स्थायिक झाली. 2022 मध्ये तिने गोंडस मुलीला जन्म दिला. तब्बल 4 वर्ष ती भारतापासून दूर होती पण गेल्या महिन्यात ती आपल्या पती आणि मुलीसह कायमची भारतात परतली.
Mrunal Dusanis Daughter Name
परतल्यानंतर तिने लगेचच नाशिकमध्ये येऊन गोदामाईचं दर्शन घेऊन आरतीमधेही भाग घेतला. त्यानंतर तिने आपल्या हे मन बावरे मालिकेतील सहकलाकार अभिनेता शशांक केतकरची भेट घेतली. त्या दोघांनी एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आणि या जोडीला पुन्हा बघायला आवडेल का ? असा प्रश्नही विचारला. मृणालचे फॅन्स तिला पुन्हा एकदा एखाद्या मालिकेत बघण्यासाठी खूप उत्सुक आहेत.
सध्या मृणाल भारतात परतल्यानंतर हळूहळू मनोरंजनविश्वात सक्रिय होताना दिसतेय. तिने नुकताच एक इंटरव्ह्यू दिला आहे. त्यात तिने आपली मुलगी आणि तिच्या नावाबद्दल माहिती दिली. Mrunal Dusanis Daughter Name मृणालच्या मुलीचं नाव नुर्वी आहे. ती नुकतीच 2 वर्षांची पूर्ण झाली. तिने सांगितलं नुर्वी या नावाचा अर्थ लक्ष्मी आहे. याशिवाय नुर्वी शब्दाचा अर्थ आशीर्वाद असाही आहे. तिला नुर्वी हे नाव मुलीसाठी खूप आवडलं होतं आणि आशीर्वाद या अर्थानेच तिने मुलीचं नाव ठेवलं होतं. कारण ती तिच्या आयुष्यात आशीर्वाद म्हणूनच आलीये.
मृणाल दुसानिसच्या क्युट मुलीचं नाव
मृणाल तिला आपल्या जुन्या मालिकासुद्धा दाखवत असते. तिच्या ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ मालिकेच्या गाण्यावर नुर्वीने डान्स करण्याचा प्रयत्नही केला होता. Mrunal Dusanis Daughter Name ती सध्या लहान आहे पण मोठी झाल्यावर तिला आपली आई काय काम करते. बाबा काय काम करतात ते कळेल.
लवकरच मृणाल आपल्याला एखाद्या नवीन मालिकेत भूमिका साकारताना दिसू शकते. तोपर्यंत आपण वाट पाहूया.
मनोरंजनविश्वातील अशाच नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला नक्की फॉलो करा.
तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.