MPSC Success Marathi Story मुलाच्या शिक्षणासाठी आई-बापाने शेती विकली आणि तो मुलगा परतला….

MPSC Success Marathi Story

MPSC Success Marathi Story रामदास हा हाडाचा शेतकरी. लहानपणापासून आजपर्यंत त्याने फक्त शेतीचाचं विचार केला होता. या काळ्या मातीला त्याने आई मानलं होतं आणि रात्रंदिवस घाम गाळून त्याने या शेतातून सोनं पिकवलं होतं. परंतु आज त्याचे अश्रू थांबत नव्हते. कारण ज्या शेतीला त्याने आई मानलं होतं, आज तीच शेती विकण्याची वेळ त्याच्यावर आली होती.

रामदासची बायको कांता त्याला समजावून सांगते, “अहो नका ना रडू, मला माहितीये तुम्हाला किती दुःख होतय. परंतु आपल्या मुलावर विश्वास ठेवा. एक दिवस तो आपली शेती परत विकत घेईल.” रामदास आपले डोळे पुसतो आणि म्हणतो, “मला सुद्धा तोच विश्वास आहे. म्हणून तर ही शेती विकतोय. आपला मुलगा गुणाचा आहे. एक ना एक दिवस तो ही शेती परत घेईल.”

MPSC Success Marathi Story 

आपल्या मुलावर पूर्ण विश्वास ठेवत, रामदास हा शेतीचा कागदपत्रांवर सही करतो आणि शेतजमीन विकून टाकतो. रामदासला पैशांची गरज होती. त्याचा मुलगा पुण्याला एमपीएससी परीक्षेचा अभ्यास करत होता. त्याला राज्यसेवेत नोकरी करायची होती. MPSC Success Marathi Story परंतु घरची परिस्थिती गरीब असल्यामुळे क्लाससाठी भरायला पैसे नव्हते. आपला मुलगा त्याचं स्वप्न पूर्ण करेल आणि एक दिवस आपली शेतजमीन परत मिळवेल, या विचारानेच रामदासने काळजावर दगड ठेवून हा निर्णय घेतला होता. शेती विकली होती.

या शेतजमीतून जेवढे पैसे मिळाले. त्याने ते सर्व आपल्या मुलाला शहरात पाठवून दिले आणि पत्रात लिहिलं की, या पैशांचा सदुपयोग कर. हा पैसा नाही आपल्या जमिनीचा आशीर्वाद आहे. ती वाट पाहतेय, तू परत येशील आणि ही जमीन विकत घेशील. रामदास आणि कांताचा मुलगा स्वप्निल हा खूपच होतकरू आणि हुशार मुलगा होता. आपल्या मेहनतीच्या जोरावर त्याने आजपर्यंत खूप यश संपादन केलं. MPSC Success Marathi Story परंतु राज्य शासनात नोकरी मिळवायची, हे त्याचं लहानपणापासून स्वप्न आणि त्यासाठी तो रात्रंदिवस झगडत होता. त्यानेही बाबांच्या पत्राला उत्तर दिलं, बाबा मी रात्रंदिवस एक करेल, यश नक्कीच मिळवेल. तुम्ही काळजी करू नका.

आपली शेतजमीन तर गेली. आता काय काम करायचं” हाच प्रश्न रामदास आणि कांतासमोर होता. तेव्हा त्यांना असं वाटलं, आपल्याला शेती सोडून दुसर काहीही येत नाही. MPSC Success Marathi Story त्यामुळे ज्या मालकाला ही शेती विकली होती. त्याच्याकडेचं ते गेले आणि विनंती केली, “तुम्ही आम्हाला तुमच्या शेतात मजूर म्हणून काम द्या आम्ही शेतीचं सगळं करू, आम्हाला महिन्याला पगार द्या फक्त.”

रामदासची जमीन विकत घेतलेला माणूस गावचा मोठा सावकार होता. गावात कुठेही जमीन विकायला असली की, तर्क लगेच बळकवायचा आणि ती परत नाही करायची, हाच त्याचा विचार असायचा. रामदासची जमीन नदीच्या कडेला होती. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून सावकाराचा या जमिनीवर डोळा होता. MPSC Success Marathi Story परंतु रामदासने जमीन कधीही विकली नाही. आता मात्र आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी त्याचा नाईलाज झाला. परंतु याआधी अनेक वेळेस या रामदासने आपला अपमान केला आहे. त्यामुळे ही संधी सोडायची नाही, असं सावकाराने ठरवलं आणि रामदासला शेतमजूर म्हणून ठेवलं.

रामदासला कळून चुकलं होतं, हा सावकार आपल्यावर चिडला आहे. MPSC Success Marathi Story बदला घेणार आहे. परंतु आपल्या काळ्या आईच्या सानिध्यात राहण्यासाठी, शेतीच्या सानिध्यात राहण्यासाठी, रामदास हा अपमान सहन करायला तयार होतो.

इकडे रामदासचा मुलगा रात्रंदिवस परीक्षेचा अभ्यास करत असतो. आपल्या वडिलांनी आपल्यासाठी खूप मोठा त्याग केला आहे, MPSC Success Marathi Story त्यामुळे काहीही करून यावेळेस यश मिळवायचं, सरकारी अधिकारी होऊन दाखवायचं, असं त्यांने मनाशी ठरवलं होतं आणि तो मेहनत करत होता.

तर रामदास आणि कांता स्वतःच्याचं शेतात शेतमजूर म्हणून काम करत होते. दिवस-रात्र घाम गाळत होते. परंतु सावकार रोज शेतावर यायचा आणि रामदास कांताचा अपमान करायचा. तो म्हणायचा, MPSC Success Marathi Story “तुम्ही जोपर्यंत या शेतात मालक म्हणून काम करायचा, तेव्हा चांगलं काम करायचा, परंतु आता तुम्ही कामचुकार झाले आहात. नीट काम करत नाही. तुम्हाला मी पगार देणार नाही”, असं बोलून तो नेहमी त्यांचा अपमान करायचा. परंतु रामदास आणि कांता शांतपणे ऐकून घ्यायचे.

काही महिन्यांचा काळ निघून गेला. रामदास आणि कांता हे दोघे शेतात होते. शेतात पीक चांगलं उभं राहिलं होतं. परंतु अचानक एका रोगामुळे शेतीचं मोठ नुकसान झालं आणि सावकाराला आयती संधीचं सापडली. MPSC Success Marathi Story सावकार तावातावाने शेतात आला आणि त्याने रामदासला जाब विचारला, “हे सगळं कसं झालं, तू काय इथं पिऊन पडला होतास की काय ?”

रामदास शांतपणे म्हणतो, “अहो सावकार कीड लागली पिकाला, येथे काय बैल नाही घुसला, ज्याला मी थांबवू शकत होतो. तुम्हाला मी सांगितलं होतं, पिकावर फवारणी करून घ्या. परंतु तुम्ही माझं नाही ऐकलं. MPSC Success Marathi Story पैसे वाचवायच्या नादात तुम्ही त्यासाठी नकार दिला आणि हे घडलं, त्यात माझी काय चूक ?”

सावकाराला खूप राग येतो आणि तो म्हणतो, “लायकीत राहून बोलायचं. मी या शेताचा मालक आहे, तू नाहीस. MPSC Success Marathi Story तू येथे एक मजूर आहे आणि मी काही बोललो, तर सहन करायचं, ऐकून घ्यायचं, जास्त शहाणपणा नाही करायचा.”

रामदास म्हणतो, “मी काही चुकीचं बोललेलो नाहीये. जरी मी शेतमजूर असलो’ तरी तुम्ही माझ्या मेहनतीचा पैसा मला देतात. मी काही चुकीचं ऐकून घेणार नाही. चुकीचे आरोप सहन करणार नाही. येथे चूक माझी नाही, तर चूक तुमची झाली आहे.” MPSC Success Marathi Story सावकारला खूप राग येतो आणि तो विचार करतो, “हा या शेतात मजूर म्हणून काम करतोय, तरी याचा माज उतरलेला नाही त्याला चांगला धडा शिकवायला हवा.” असा विचार करून सावकार गड्याला चाबूक आणायला सांगतो.

सावकार म्हणतो, “तू असा नाही ऐकायचा. तुला चांगलाचं चाबकाने फोडून काढतो. सावकार चक्क रामदासवर चाबूक उगारतो. परंतु हा चाबूक कोणीतरी मागे पकडतं. सावकाराला समजतचं नाही की, MPSC Success Marathi Story असं का होतंय ? तो पूर्ण जोर लावतो, परंतु चाबुक जागचा काही हलत नाही. सावकार मागे वळून पाहतो, तर चक्क रामदास आणि कांताचा मुलगा स्वप्नील उभा असतो आणि त्याच्याबरोबर काही पोलीसही असतात.

आपल्या मुलाला पाहून रामदास आणि कांताला खूप आनंद होतो. हे दोघेही स्वप्निलकडे धावत जातात आणि स्वप्निलला जवळ घेतात. MPSC Success Marathi Story रामदास विचारतो, “अरे पोरा तू या पोलिसांना का घेऊन आला आहेस ? हे आपले सावकार आहेत, चिडतात कधीकधी, त्यासाठी त्यांच्याविरुद्ध तक्रार करायची का ?”

तर सावकारही पुढे येतो आणि म्हणतो, “ए स्वप्नील, तुला काय वाटतं तू मला पोलिसांची भीती दाखवशील आणि मी घाबरेल का ? MPSC Success Marathi Story तुझे आई बाप माझ्या शेतात काम करतात, यांनी माझ्या शेताचा नुकसान केलंय, त्यामुळे मी त्यांना ओरडत होतो.”

मराठी गोष्टी

स्वप्निल स्मितहास्य करतो आणि म्हणतो, “तुम्ही या शेताचे मालक आहात, याचा अर्थ असा होत नाही की, तुम्ही येथे काम करणाऱ्यावर हात उचलू शकता.” सावकार म्हणतो, “मला जास्त शहाणपणा शिकवू नको. MPSC Success Marathi Story चार बूक जास्त शिकला म्हणजे, तुला जास्त अक्कल नाही आली आणि माझ्याकडे एवढा पैसा आहे ना, पूर्ण पोलीस स्टेशनला विकत घेईल, मग हे दोन चार पोलीस काय धरून बसलास ?”

स्वप्निलला खूप राग येतो आणि तो चक्क या सावकाराच्या थोबाडीत मारतो. सावकार जमिनीवरच पडतो. रामदास आणि कांता खूप घाबरतात. MPSC Success Marathi Story रामदास म्हणतो, “अरे हे काय केलंस पोरा. तो तुझ्याविरुद्ध पोलीस तक्रार करेल ना. गावातील पोलीस त्याच्या ओळखीचे आहेत.” सावकारही उठतो आणि म्हणतो, “आता तुला नाही सोडत मी. आत्ताच्या आत्ता तुझी तक्रार करेल. मग पहा तुझ काय होतं ? तुला सोडणार नाही.”

सावकार या पोलिसांना म्हणतो, “तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहिलंत ना, याने माझ्यावर हात उचलला, मला मारलं. MPSC Success Marathi Story तुम्ही त्याला आत्ताच्या आत्ता अटक करा.” हे पोलीस म्हणतात, “आम्ही त्यांना नाही अटक करणार, तुम्हाला अटक करणार. कारण तुम्ही मजुरांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला, त्यांचा अपमान केला आणि पोलिसांना विकत घेण्याची भाषा केली. त्यामुळे साहेबांनी हे सगळं केलंय.”

सावकार विचारतो, “हा कसला साहेब, हा तर माझ्या शेतात काम करणाऱ्या शेतमजुराचा मुलगा आहे. शहरात जाऊन काहीतरी शिकतो.” हे पोलिस सांगतात, “ते आपल्या गावचे नवीन पीएसआय आहेत.” MPSC Success Marathi Story हे ऐकून सावकाराच्या पायाखालची जमीनच सरकते. तर रामदास आणि कांता या दोघांना धक्काचं बसतो. रामदास विचारतो, “पोरा तू पास झालास का ? तुला सरकारी नोकरी मिळाली तेही पोलिसात.”

स्वप्निल म्हणतो, “हो बाबा मी सरकारी नोकरी मिळवली आहे. मी पास झालो. माझं आणि तुमच स्वप्न पूर्ण झालंय MPSC Success Marathi Story आणि आता तुम्हाला या शेतात मजुरी करण्याची गरज नाही येत्या काही दिवसांमध्ये मी हे शेतही परत विकत घेईल आणि तुम्ही पुन्हा या शेतीचे मालक व्हाल.”

रामदास आणि कांताच्या डोळ्यात पाणी येतं. तर सावकार हा चांगलाच घाबरलेला असतो आणि तेथून काढता पाय घेण्याचा प्रयत्न करतो. स्वप्निल त्याला म्हणतो, “सावकार परत असं करायचं नाही. MPSC Success Marathi Story एवढ्या वेळेस सोडतोय आणि लवकरचं आमची ही जमीनही परत विकत घेईल. त्यामुळे आमची जमीन लुबाडण्याचा प्रयत्न नाही करायचा. दुसऱ्या कोणाला विकायची नाही.”

सावकार स्वप्नीलसमोर हात जोडून म्हणतो, “हो साहेब, मी तुमच्या शब्दाच्या बाहेर आहे का ?” आणि तो तिथून धावत सुटतो. त्याला पाहून रामदास आणि कांता हसू लागतात. MPSC Success Marathi Story परंतु त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू असतात. आपल्या स्वप्नीलने स्वप्न पूर्ण केलं. तो आज एक सरकारी अधिकारी बनला. पोलीस अधिकारी बनला. म्हणून हे दोघे खूप खुश असतात. स्वप्निल ही आपल्या आई बाबांना पुन्हा एकदा या शेतीचा मालक बनवायचं ठरवतो.

तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, कशी वाटली आजची कथा. नक्कीचं कमेंट करुन सांगा आणि अशाचं नवीन नवीन कथांसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.

खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top