Mother Daughter Heart Touching Story : अवघ्या तीन महिन्याच्या तान्ह्या बाळाला सासू सासर्‍याकडे गावी सोडून

Mother Daughter Heart Touching Story

Mother Daughter Heart Touching Story “सुनबाई अजून तुला चार सहा महिने सुट्टी नाही का घेता यायची ? आपली छकुली खूपचं लहान आहे गं. अवघ्या तीन महिन्याची. आईशिवाय राहणं नाही जमायचं तिला. थोडा विचार कर तिचा.”

निशिगंधा तिची सून वैदहीला समजवण्याचा प्रयत्न करत होती की, तू तुझ्या तीन महिन्यांच्या छकुलीला इकडे गावात आमच्याकडे सोडून नको जाऊ.

वैदेही म्हणते, “आई तुम्हाला कळत नाही का, कॉर्पोरेट नोकरी आहे माझी. सहा महिन्यांची प्रेग्नेंसी लिव्ह भेटली मला. डिलिव्हरी आधी तीन महिने आणि डिलिव्हरीनंतर तीन महिने. आता मी माझं काम पाहू की बाळाला सांभाळू.”

Mother Daughter Heart Touching Story

वैदहीचे सासरे दीपकराव म्हणतात, “सुनबाई जेवढी तुझी कॉर्पोरेट नोकरी महत्त्वाची आहे. तेवढीच छकुली सुद्धा महत्त्वाची आहे ना आणि आम्ही कोठे म्हणतोय की, आम्ही छकुलीला सांभाळायला तयार नाही. पण तिला कमीत कमी वर्षभराची तरी होऊ दे. इतक्या लहान बाळाला आईचं दूध हवं असतं. आईची माया हवी असते. ती आम्ही कशी देणार ?”

तेवढ्यात वैदहीचा नवरा प्रथमेश म्हणतो, “बाबा आम्हाला सगळं कळतंय. परंतु आता आमचाही नाईलाज झाला आहे. आमचं करियरसुद्धा तेवढचं महत्त्वाचं आहे ना. आता बाळ झालंय, तर तिचं शिक्षण, तिचं लग्न, सगळं भविष्य आम्ही किती पैसे कमावू त्यावरचं अवलंबून आहे ना. तुम्ही तर पैसे नाही कमावून ठेवले, मग आम्हालाचं दिवसरात्र कष्ट करावे लागतील.”

हे ऐकून दीपक आणि निशिगंधा या दोघांना खूप वाईट वाटतं. Mother Daughter Heart Touching Story दीपक खूप चिडतो आणि तो काही बोलणार, इतक्यात निशिगंधा त्याला इशारा करते आणि म्हणते, एक शब्दही बोलू नका. निशिगंधा म्हणते, “ठीक आहे. तुम्ही दोघे जा. आम्ही सांभाळू तिला.”

वैदही आणि प्रथमेश हे दोघे अवघ्या तीन महिन्यांच्या मुलीला छकुलीला गावाकडे सासू-सासऱ्यांकडे सोडून शहरात नोकरीसाठी निघून जातात. सुरुवातीला दर पंधरा दिवसांनी येणारे वैदही आणि प्रथमेश हळूहळू महिनाभराने, मग तीन महिन्याने आणि कधीकधी Mother Daughter Heart Touching Story तर सहा महिन्यांनी छकुलीला भेटायला यायचे.

जशी जशी छकुली मोठी होत होती, तशी तशी या दोघांचा संपर्क तिच्याशी कमी होत चालला होता. त्यांचं शहरातील जीवन, कॉर्पोरेट नोकरी, पार्ट्या, मित्र मैत्रीण यामध्ये त्यांना सासू-सासऱ्याची अडचण वाटायची आणि छोट्या छकुलीचीसुद्धा.

बोलता बोलता छकुली दहा वर्षांची पूर्ण झाली. Mother Daughter Heart Touching Story तेव्हा एक दिवस वैदेहीची मैत्रीण जया तिला म्हणाली की, “तुमची मुलगी कुठे असते ?” वैदेही सांगते, “गावाकडे माझ्या सासू-सासर्‍यांजवळ.” तेव्हा जया तिला सांगते, “गावाकडे तुमच्या मुलीला चांगलं शिक्षण नाही भेटणार. उद्या ती शहरातचं येणार, तेव्हा ती बाकीच्या मुलांपेक्षा मागे पडेल.”

वैदही म्हणते, “आमचं गाव खूप मोठ आहे. तेथे चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळतं. तेथेही ती कॉन्व्हेंट शाळेत शिकते.” तर जया तिला समजावून सांगते, “गावामध्ये कितीही कॉन्व्हेंट शाळा असली तरी सगळं मराठीतच होतं. त्यामुळे तू तुझ्या मुलीला शहरात येथे घेऊन ये, येथे शिकव.”

Marathi Emotional Story

वैदेही म्हणते, “माझ्यासुद्धा मनात तो विचार Mother Daughter Heart Touching Story आला होता. परंतु ती अजून खूप लहान आहे. फक्त दहा वर्षांची. तिच्या मागेपुढे कराव लागेल आणि मला वेळ नाहीये. मी माझ्या नोकरीकडे पाहू की तिच्याकडे पाहू ?”

जया म्हणते, “अगं माझी मुलगी सुद्धा दहा-बारा वर्षांचीचं आहे. सुरुवातीला थोडा त्रास देईल, पण त्यानंतर स्वतःची काम स्वतःच करू लागेल ती. सकाळी एकदा स्वयंपाक करून ठेवला की, दिवसभर खात बसतात मुलं. त्यांची काळजी नाही करायची. Mother Daughter Heart Touching Story तेवढीच स्वावलंबी होईल ती, नाहीतर तुझे सासू-सासरे तिला लाडोबा बनवून ठेवतील आणि मग पुढे तुम्हाला त्रास होईल.”

ही गोष्ट वैदहीला पटते आणि ती छकुलीला शहरात आणायचं ठरवते. संध्याकाळी घरी गेल्यानंतर, ती प्रथमेशलाही याबद्दल सांगते. प्रथमेशला तयार होतो म्हणतो, “आपण या रविवारीचं छकुलीला आणायला गावाकडे जाऊया.”

इकडे छकुली गावात आजी बाबांबरोबर रमलेली असते. आता हेचं तिचं विश्व असतं. आई-बाबा शहरात आहेत, Mother Daughter Heart Touching Story फक्त एवढंच तिला माहीत असतं. त्यांची तोंड ओळख असते. परंतु त्यांच्याबद्दल कोणतही प्रेम, कोणती आत्मीयता तिच्या मनात नसते. आई-बाबांकडे जाऊन राहायचं, हा विचारही तिच्या मनाला शिवलेला नसतो.

दीपकरावांना वाटतं की, “आता आयुष्यभर छकुली आपल्याबरोबरच राहणार. लग्न करूनचं ती, आपल्यापासून दूर होईल. म्हातारपणात एकटेपणापेक्षा छकुलीची साथ त्यांना खूप आवडत असते आणि आता वैदही प्रथमेश तिला घ्यायला परत कधीचं येणार नाही. असंही त्यांना वाटतं.

रविवारच्या दिवशी वैदही आणि प्रथमेश हे दोघे गावाकडे घरी पोहोचतात. त्यांना आलेलं पाहून निशिगंधा आणि दीपकला खूप आनंद होतो. दीपकराव म्हणतात, “आला का तुम्ही ? खूपच उशीर झाला. सहा महिने झालेत.” प्रथमेश चिडून म्हणतो, “बाबा आल्या आल्या टोमणा देण्याची काही गरज नाही. तेथे आम्ही खूप बिझी असतो. असं तुम्हाला भेटायला नाही येऊ शकत.”

निशिगंधा चिडून म्हणते, “मग आता तरी उपकार करायला कशाला आला आहेस ? नसता आला तरी चाललं असतं ना.” वैदहीला खूप राग येतो आणि ती काही उत्तर देणार, तर प्रथमेश तिचा हात दाबतो आणि गप्प राहायला सांगतो.

तेवढ्यात छकुली तेथे येते. छकुलीला पाहून प्रथमेश आणि वैदही खूप खुश होतात. Mother Daughter Heart Touching Story परंतु छकुली त्यांना जास्त काही रिस्पॉन्स देत नाही आणि आजोबांना म्हणते, “आजोबा आज रविवार आहे ना. तर आम्ही सगळ्या मैत्रिणी मस्तपैकी शेतात जाऊन दुपारचं जेवण करणार आहोत. तुम्ही या आमच्याबरोबर.”

मराठी इमोशनल स्टोरी

हे ऐकून वैदही प्रथमेशच्या कानात कुजबूज करते, “खरंच आपली मुलगी गावात राहून गावठी बनत चाललीये. तिला आपल्याबरोबर शहरात नेणं एकदम, राईट डिसिजन आहे.” हे पाहून निशिगंधा विचारते “सुनबाई काय कानात कुजबूत चालली आहे. जे बोलायचं ते स्पष्ट बोल.”

वैदेही म्हणते, “सासूबाई आम्हाला कानात कुदबूज करायची गरज नाही. Mother Daughter Heart Touching Story आम्ही दोघे छकुलीला येथून कायमचं आमच्याबरोबर शहरात घेऊन जाण्यासाठी आलोय. तिची बॅग पॅक करून द्या. आम्ही तिला दुपारी घेऊन जाऊ.”

हे ऐकून निशिगंधा, दीपकराव आणि छकुलीला मोठा धक्काच बसतो. त्यांचा तर विश्वासचं बसत नाही. निशिगंधा विचारते, “हे काय बोलतेस तू, सुनबाई ? छकुलीला तुम्ही परत घेऊन जाताय शहरात ?” प्रथमेश म्हणतो, “हो आई मग काय, आयुष्यभर आम्ही तिला Mother Daughter Heart Touching Story इथेच ठेवणार आहोत का ? तिला काय गावठी बनवायचं आहे का ?” शहरात राहिली तर चार गोष्टी चांगल्या शिकेल, करिअर कसं करायचं, भविष्य कसं घडवायचं हे शिकेल.”

दीपकराव चिडून म्हणतात, “मग जेव्हा तीन महिन्याच्या छकुलीला इथं सोडून गेला होतास, तेव्हा ही काळजी नाही का वाटली ? छकुली गावठी बनेल, आमच्या सारखी बनेल, अस वाटतं तुम्हाला. तेव्हा तर स्वतःच्या स्वार्थासाठी तीन महिन्याच्या लेकराला सोडून Mother Daughter Heart Touching Story गेला होतात.” वैदही चिडून म्हणते, “बाबा तेव्हा आमचा नाईलाज होता आणि आम्ही छकुलीसाठी दर महिन्याला हजारो रुपये पाठवून देत होतो.”

निशिगंधा म्हणते, “वा सुनबाई वा, तू तर आईची एक नवीन Mother Daughter Heart Touching Story व्याख्या मांडली. तीन महिन्यांच्या लेकीला आईचं प्रेमझ आईचं दूध, आईची माया हवी असते. पण तुम्ही तर तिची हजारो रुपयांवर बोळवण केली.”

प्रथमेश म्हणतो, “आई बस झाले तुझे टोमणे आणि हा इमोशनल अत्याचार. तुमच्या गावाकडची माणसं असा विचार करतात. शहरातील माणसं प्रॅक्टिकल असतात. मागील दहा वर्षात आम्ही खूप प्रगती केली आहे आणि आता त्याचा फायदा आमच्या मुलीलाचं होणार आहे आणि आज ना उद्या तुम्हाला सुद्धा होईल.”

दीपकराव म्हणतात, “नको रे बाबा, आम्हाला तुमचे पैसे नकोय. तुम्ही नोकरीत जी काय प्रगती केली, त्याचा फायदा नकोय. आम्हाला फक्त आमची नात, आमची छकुली हवी आहे. जोपर्यंत तिचं लग्न होत नाही, तोपर्यंत तिला आम्ही आमच्यापासून दूर नाही होऊ देणार.”

हे ऐकून प्रथमेश आणि वैदहीला जबरदस्त धक्का बसतो. वैदही म्हणते, “बाबा हे काय बोलताय  तुम्ही ? ही आमची मुलगी आहे. आमच्या बरोबर तिने रहायलाचं नको, अशी तुमची इच्छा आहे का ?” निशिगंधा म्हणते, “नाही सुनबाई, आमची तशी इच्छा नाहीये. पण हा तुझाचं निर्णय होता ना, तीन महिन्याच्या तान्ह्या बाळाला आमच्याकडे द्यायचा, मागील दहा वर्षांपासून आम्हीचं सांभाळतोय तिला. आमचा जीव गुंतलाय तिच्यामध्ये.आम्ही तिला आमच्यापासून दूर नाही होऊ देऊ शकत.”

प्रथमेश म्हणतो, “तुमचा जीव गुंतलाय, मग आमचा जीव नाही का गुंतला ? आमच्या पोटची मुलगी आहे ती. आम्ही तीन महिन्याच्या तान्ह्या बाळाला सोडून गेलो पण ते तिच्या भविष्यसाठीचं. वैदेही प्रथमेशला म्हणते, “यांना बोलून काही फायदा नाही  चल आपण तिला घेऊन जाऊ.” Mother Daughter Heart Touching Story असं म्हणून वैदही चक्क छकुलीचा हात पकडते आणि तिला घेऊन जाऊ लागते.

छकुली रडू लागते आणि वैदहीकडून हात सोडवण्याचा प्रयत्न करते. निशिगंधाला खूप राग येतो आणि ती छकुलीचा हात दूर करते आणि म्हणते, “लहान मुलांशी कसं वागायचं हे सुद्धा कळत नाही का तुला ?” वैदेही म्हणते, “तुम्ही नका मला शिकव,  माझ्या मुलीशी कसं वागायचं ते” आणि ती पुन्हा एकदा छकुलीचा हात पकडू लागते तर छकुली निशिगंधाला घट्ट मिठी मारते.

प्रथमेश वैदहीला शांत रहायला सांगतो आणि छकुली जवळ येऊन म्हणतो, Mother Daughter Heart Touching Story “बेटा आम्ही तुझे आई बाबा आहोत ना. तू आमच्याजवळ राहायला हवं ना. असं का करतेस ?” छकुली म्हणते, “बाबा मला माहित आहे. तुम्ही माझे आई बाबा आहात. परंतु आजी-आजोबांनी मला इतकी वर्ष सांभाळालं, मला येथेच राहायचंय, तुमच्याजवळ येऊन नाही राहायचं.”

वैदहीच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती छकुलीला म्हणते, “मला माफ कर. मी तुझा हात जोरात ओढला. परंतु मी तुझी आई आहे. एक आई तुझ्यापासून किती दिवस लांब राहील. इतक्या दिवस मी माझ्या छातीवर कसा दगड ठेवला होता’ ते मला माझंचं माहित आहे Mother Daughter Heart Touching Story आणि ती निशिगंधा आणि दीपकसमोर हात जोडून म्हणते, “आई बाबा तुम्हीचं विचार करा, एका आईला तिच्या बाळापासून दूर ठेवणं चुकीचचं आहे की नाही ?”

निशिगंधा आणि दीपक एकमेकांकडे पाहतात. काय उत्तर द्यावं, हे त्यांना कळतचं नाही. छकुली म्हणते, “तुम्ही मला विचारान मला कोणाकडे राहायचंय. तुम्ही माझ्या आयुष्याचा निर्णय नाही घेऊ शकत. लहान असताना आई-बाबा मला इथे सोडून गेले आणि मोठी झाल्यावर परत घेऊन जात आहेत. पण मला कुठे राहायचं, हे कोणीच विचारत नाहीये.

प्रथमेश म्हणतो, “ठीक आहे, तू सांग तुला कोठे राहायचं ?” छकुली म्हणते, Mother Daughter Heart Touching Story “मला तुम्ही सगळे हवे आहात. मला आजी-आजोबाचं प्रेम हव आहे आणि जेव्हा मी शाळेत जाते, तेव्हा मला सगळे विचारतात, तुझे मम्मी पप्पा कोठे आहेत ? मला तुम्हीही हवे आहात. एक तर तुम्ही दोघे इथे येऊन रहा नाहीतर माझ्याबरोबर आजी बाबालाही तिथे घेऊन चला.”

वैदेही आणि प्रथमेश एकमेकांकडे पाहतात आणि त्यांना समजतं की, जर छकुलीला आपल्याबरोबर न्यायचं असेल, तर आई बाबालाही न्यावं लागेल. पुढचं पुढे पाहू, असा विचार करून हे दोघे त्यासाठी तयार होतात. परंतु निशिगंधा आणि दीपक नकार देतात. Mother Daughter Heart Touching Story छकुली त्यांना मनवते आणि नातीच्या प्रेमासाठी  हे दोघे तयार होतात.

छकुली आजी आजोबालाही तिच्याबरोबर शहरात घेऊन जाते आणि त्यानंतर सगळे तेथे आनंदाने राहतात. छकुलीला आजी आजोबाचही प्रेम भेटतं आणि आई-बाबचंही.

तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, कशी वाटली आजची कथा. नक्कीचं कमेंट करून सांगा आणि अशाचं नवीन नवीन कथांसाठी आमचे इतर व्हिडिओ नक्कीच पहा.

खूप खूप धन्यवाद ! 

Scroll to Top