जगातील सर्वात जास्त करोडपती, अरबती हे शब्द ऐकायला किती छान वाटतं ना. प्रत्येकाला असं वाटतं की, आपलाही असा उल्लेख व्हायला हवा.. कुणीतरी आपल्याला करोडपती म्हणायला हवं परंतु हे काही सोप्प नाहीये. करोडपती आणि अरबपती होण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. पण तुम्हाला अशा एका शहराबद्दल माहित आहे का, जेथे जगातील सर्वात जास्त करोडपती राहतात. एवढंच नाही तर या शहरातील प्रत्येक 24 वा माणूस हा करोडपती आहे. आज आपण या शहराबद्दल जाणून घेऊया.
जगातील सर्वात जास्त करोडपती
या शहराचं नाव आहे न्यूयॉर्क. अमेरिकेतील न्यूयॉर्कचं नाव तर तुम्ही नक्कीचं ऐकलं असेल. सध्या या शहराची लोकसंख्या जवळपास 83 लाख आहे आणि या शहरातील 3 लाख 49 हजार लोक श्रीमंत नाही, तर करोडपती आहेत.
म्हणजेचं या शहरात राहणारा प्रत्येक 24 वा माणूस हा करोडपती आहे. त्याला पैशांची कोणतीही कमी नाहीये. जगातील सर्वात जास्त करोडपती असलेल्या शहरांच्या लिस्टमध्ये न्यूयॉर्कचा पहिला नंबर लागतो.
तसंच न्यूयॉर्कमध्ये 60 लोक हे अतिश्रीमंत आहेत. ज्यांच्याकडे दहा हजार करोड डॉलरपेक्षा जास्त संपत्ती आहे. आपण अमेरिकेला श्रीमंत म्हणतो, त्याचं एक उत्तम उदाहरण न्यूयॉर्क शहर आहे. ज्या शहरातील प्रत्येक 24 वा माणूस हा करोडपती आहे, तो देश किती संपन्न असेल हा विचारचं केलेला बरा.
भारतातील सर्वात श्रीमंत शहर
आता तुमच्या मनात एक प्रश्न नक्कीचं आला असेल की, मग आपल्या भारतातील सर्वात जास्त करोडपती राहत असलेलं शहर कोणतं ? परंतु या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्याआधी जगातील सर्वात जास्त करोडपती राहत असलेल्या लिस्टमध्ये पहिल्या 10 मध्ये कोणतंही भारतीय शहर नाहीये.
तर भारतात बेंगलोर या शहरात सर्वात जास्त करोडपती लोक राहतात. आपल्या महाराष्ट्रातील मुंबईचा नंबर त्यानंतर लागतो. परंतु मुंबई ची लोकसंख्या बंगलोरपेक्षा जास्त असल्याने कदाचित मुंबई या लिस्टमध्ये बेंगलोरपेक्षा मागे राहते.
आपल्या देशातील लोकसंख्येचा विचार करता आपल्या देशातील कोणतंही शहर या लिस्टमध्ये टॉपवर जाणं थोड अवघड दिसतंय. कारण जिथे न्यूयॉर्कची लोकसंख्या फक्त 83 लाख आहे. तेथे भारतातील मुंबई आणि दिल्ली यासारख्या शहरांची लोकसंख्या 2 ते 3 कोटींच्या वर जाते.
तर तुम्हाला काय वाटतं याबद्दल नक्कीचं कमेंट करून सांगा आणि अशाचं नवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !