Most Expensive Tea In World चहाला वेळ नसते, परंतु वेळेला चहा लागतो. असं तुम्ही अनेक ठिकाणी ऐकलं असेल. कदाचित तुम्ही स्वतःही म्हणत असाल. भारत देशाचं सर्वात लोकप्रिय पेय म्हणजे चहा. सकाळ, दुपार, संध्याकाळ असो की, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा कोणताही ऋतू असो. कोणतीही वेळ असो, अनेकांना चहा लागतो म्हणजे लागतोच. प्रत्येक जण आपल्या आवडीनुसार आणि बजेटनुसार चहा पीत असतो. मग एक रुपयाच्या चहा पॅकेटपासून ते आसाम चहा, दार्जिलिंग चहा, असे चहाचे असंख्य प्रकार तुम्ही आजपर्यंत चाखले असतील. परंतु आज आम्ही तुम्हाला जगातील सर्वात महागड्या पाच चहाबद्दल (Most Expensive Tea In World) सांगणार आहोत .
हे आहेत जगातील सर्वात महागडे चहा (Most Expensive Tea In World)
१) दा होंग पाओ : हा चीनमध्ये उगवणारा चहा जगातील सर्वात महागडा Most Expensive Tea In World चहा आहे. या चहाची किंमत 1.2 मिलियन डॉलर प्रति किलोग्रॅम अशी आहे. या चहाचं शेवटचं उत्पादन 2005 साली घेण्यात आलं होतं. हा चहा पिण्यासाठी तुम्हाला करोडपती नाही, तर अब्जाधीश असायला हवं, एवढं मात्र नक्की.
२) पांडा डंग टी : हा चहा सुद्धा चीनमध्येचं उगवला जातो. या चहाच्या नावाप्रमाणेचं पांडा या प्राण्याच्या विष्ठेपासून तयार होणाऱ्या खताचा उपयोग करून हा चहा उगवला जातो. हा चहासुद्धा खूप महागडा आहे. 70000 डॉलर प्रति किलोग्रॅम अशी या चहाची किंमत आहे.
महाराष्ट्रातील टॉप 10 हनिमून डेस्टिनेशन
३) येलो गोल्ड टी : हा चहा वर्षातून फक्त एकदाच कापला जातो. कापल्यानंतर उन्हामध्ये सुकवला जातो आणि मग 24 कॅरेट सोन्यामध्ये लपेटला जातो. यानंतर चहाची विक्री होते. या चहाची किंमत 8000 डॉलर प्रति किलोग्रामपेक्षाही जास्त आहे.
४) सिल्वर टिप्स इंपिरिअल टी : हा चहाचा प्रकार आपल्या देशातचं दार्जिलिंगमध्ये उगवला जातो. नावाप्रमाणेच या चहाच्या पानांचे कोपरे सिल्वर रंगाचे असतात. म्हणून त्याला सिल्वर टिप्स इंपिरिअल टी असं म्हटलं जातं. या चहाला 1800 डॉलर प्रति किलोग्रामचा भाव मिळाला होता.
५) ग्योकुरो टी : चीन आणि भारताच्या चहानंतर हा चहा जपानमध्ये उगवला जातो. या चहाची जगभरात खूप मागणी आहे आणि जवळपास 650 डॉलर पती किलोग्रॅम या भावाने हा चहा विकला जातो.
एकूण आज जगभरात चहाचे करोडो शौकीन आहेत आणि तुम्हाला एखाद्या गोष्टीचा शौक असला, तर मग त्यासाठी कितीही किंमत चुकवायला अब्जाधीश मागेपुढे पाहत नाही. अशा अब्जाधीश लोकांमुळेच या चहाचा भाव एवढा वाढला आहे. Most Expensive Tea In World तर तुम्हाला यांमधील कोणता चहा चाखायला आवडेल, नक्कीच कमेंट करुन सांगा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीच वाचा.
खूप खूप धन्यवाद !