Molkarin Marathi Story आनंदीबाई आज खूप खुश होत्या, कारण त्यांना त्यांचं हक्काचं घर मिळणार होतं. मागील चार वर्षांपासून त्या वृद्धाश्रमात रहात होत्या. त्यांचा सख्खा मुलगा आणि सून त्यांना येथे सोडून गेले होते. तेव्हापासून त्या खूप दुःखी राहायच्या. रडत बसायच्या. परंतु आता मात्र त्या खुश होत्या. माझा सख्खा मुलगा आणि सून जरी नालायक असले, तरी जगात चांगली माणसं आहेत. यावर त्यांचा विश्वास बसला होता. प्रतीक आणि प्रज्ञा हे दोघे त्यांना दत्तक घ्यायला आले होते.
Molkarin Marathi Story
आनंदीबाई प्रतीक आणि प्रज्ञाला विचारतात, “तुम्ही मला का दत्तक घेताय ?” तेव्हा प्रतीक सांगतो, “आई मी अनाथ आहे. मला कधी आईचं प्रेम नाही मिळालं. त्यामुळे आम्ही असा विचार केला, तुमच्या रूपाने आम्हाला आईचं प्रेमही मिळेल आणि आमच्या मुलांना एका आजीचं प्रेम मिळेल.” Molkarin Marathi Story हे ऐकून आनंदीबाईंना खूप आनंद होतो आणि त्या प्रतीक प्रज्ञाबरोबर जाण्यास तयार होतात.
वृद्धाश्रमातील सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्या जातात आणि प्रतिक प्रज्ञा आनंदीबाईंना घेऊन त्यांच्या घरी पोहोचतात. प्रतीक आणि प्रज्ञा या दोघांच्या लग्नाला दोन वर्षे पूर्ण झाली होती. अजून त्यांना लेकरू बाळ नव्हतं. Molkarin Marathi Story मुंबईसारख्या मोठ्या शहरात त्यांनी सहा महिन्यांपूर्वीच हा फ्लॅट घेतला होता.
त्यांच्या घरी आल्यानंतर आनंदीबाईंना खूप बरं वाटलं. सुरुवातीचे दहा-बारा दिवस तर खूप आनंदात गेले. परंतु त्यानंतर जे घडलं, त्यामुळे त्यांना मोठा धक्काचं बसला. कारण हळूहळू प्रतीक आणि प्रज्ञाच वागणं बदलू लागलं. Molkarin Marathi Story प्रज्ञा त्यांना घरची सगळी काम करायला लावायची. मग फरशी पुसण्यापासून, धुणी भांडी करण्यापर्यंत. स्वयंपाक करण्यापासून ते बाजारातून भाजीपाला आणि किराणा आणण्यापर्यंत सगळी काम आनंदीबाई करायच्या.
आधी तर आनंदीबाईंना वाटलं की, जाऊ दे, तेवढीच आपली घरात मदत होईल. परंतु हळूहळू त्यांच्या लक्षात आलं की, प्रतीक आणि प्रज्ञाने त्यांना आई म्हणून या घरात नाही आणलंय. तर एक हक्काची फुकटची मोलकरीण म्हणून आणलंय. Molkarin Marathi Story जिला फक्त दोन वेळेचं खायला आणि डोक्यावर एक छत देता येईल आणि रात्रंदिवस राबवून घेता येईल.
आनंदीबाई एक दिवस प्रतीक आणि प्रज्ञाला प्रश्न विचारतात, “काय रे पोरांनो, तुम्ही तर म्हणाला होतात की, आम्ही अनाथ आहोत. आईची माया हवी म्हणून तुम्हाला दत्तक घेतोय आणि तुम्ही तर मला इथे मोलकरीण बनवून ठेवलंय.” Molkarin Marathi Story प्रतीक म्हणतो, “नाही आई तसं काही नाहीये. आता घरातलं थोडंफार काम केलं तर काय फरक पडतो.”
आनंदीबाई म्हणतात, “खरंय तुझं, थोडेफार काम केलं, तर काही फरक पडत नाही. पण मी सगळंच काम करते आणि तुझी बायको काहीचं काम करत नाही. तीनेही थोडफार काम केलं, तर काय फरक पडेल ?” Molkarin Marathi Story हे ऐकून प्रज्ञाला खूप राग येतो आणि ती चिडून म्हणते, “आनंदीबाई मी का काम करेल, मालकीण आहे मी या घरची.”
आनंदबाई विचारतात, “तू मालकिण आहेस, मग मी काय घरची मोलकरीण आहे का ? तुम्ही दत्तक घेतलंय मला. आई म्हणून या घरात आणलंय, मोलकरीण म्हणून नाही.” प्रतीक आणि प्रज्ञा या दोघांच्याही चेहऱ्यावर स्माईल येते. तेव्हा प्रतिक म्हणतो, Molkarin Marathi Story “वा आनंदीबाई वा, किती छान ओळखलं तुम्ही. आम्ही तुम्हाला आई म्हणून नाही, तर मोलकरीण म्हणूनच या घरात आणलं आहे.”
हे ऐकून आनंदीबाईला मोठा धक्काचं बसतो. तेव्हा प्रज्ञा सांगते की, “आम्ही हे नवीन घर विकत घेतलं. त्याचा हप्ता, गाडीचा हप्ता, उद्या मुलं झाली तर त्यांच्या शिक्षणाचा खर्च, हे सगळं कळणं आम्हाला डोईजड होत होतं. Molkarin Marathi Story त्यातच घरची काम करूनही मी खूप कंटाळले होते. म्हणून एक दिवस मलाचं ही कल्पना सुचली की, वृद्धाश्रमातील एखाद्या बाईला आई म्हणून दत्तक घ्यायचं आणि मस्तपैकी फुकटची मोलकरीण म्हणून वापरायचं.”
आनंदीबाई चिडून म्हणतात, “लाजा नाही का रे वाटत तुम्हाला ? तुमच्यासारख्या माणसांमुळे अख्ख जग, अख्खी तरुण पिढी बदनाम होते.” प्रतीक म्हणतो, “काय तुम्हाला शिव्या द्यायच्या असतील, त्या द्या. Molkarin Marathi Story परंतु आता तुम्हाला आयुष्यभर याच घरात राहायचंय. येथील कामंच करायची आहेत. दुसरा कोणताही पर्याय नाहीये तुमच्याकडे. त्यामुळे गपचूप राहायचं आणि घरची काम करायची.
तुम्ही जर वृद्धाश्रमात परत जायचा विचार जरी केला तरी, तेथील लोकांना काय वाटेल, त्यांचा माणुसकीवरचा विश्वास उडून जाईल. Molkarin Marathi Story हे लक्षात ठेवा. जर एखाद चांगलं जोडपं कोणाला तिथे दत्तक घ्यायला आलं, तर त्यांच्यावरही कोणी विश्वास ठेवणार नाही. तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी हे सगळं कराल का ? मग तुमच्यात आणि आमच्यात काय फरक याचाही विचार करा.”
असं म्हणून प्रतीक आणि प्रज्ञा सिनेमा पाहायला निघून जातात आणि बाहेर जाताना दरवाज्याला कुलूप लावतात. Molkarin Marathi Story आनंदीबाईंच्या डोळ्यात पाणी येतं. यापेक्षा तर आपण वृद्धाश्रमात खूप आनंदी होतो. जिवाभावाची माणसं होती. असं त्यांना वाटतं आणि त्यांना सगळे जुने दिवस आठवतात.
या घटनेला दोन आठवडे उलटून जातात. परंतु आनंदीबाईंचं मन त्यांना खात असतं. त्या विचार करतात, नाही आता सहन करायचं नाही. या दोघांनी आपला अपमान केला आहे. Molkarin Marathi Story जगातील प्रत्येक वृद्धाश्रमातील वृद्ध माणसाचा अपमान केला आहे. अशा नालायक लोकांना धडा शिकवायला पाहिजे. असं त्या मनाशी ठरवतात. परंतु काय करावं, हे त्यांना सुचत नाही.
अचानक एक दिवस आनंदीबाईंना कल्पना सुचते. त्यांनी पाहिलेलं असतं की, प्रज्ञा ही सोशल मीडिया स्टार होती. Molkarin Marathi Story ती रोज सोशल मीडियावर तिचा एक व्हिडिओ अपलोड करायची. ज्यामध्ये ती कसा मेकअप करते, स्वतःच्या त्वचेची निगा कशी राखते, याबद्दल ती सांगत असायची.
आनंदीबाईंनी ऐकलं होतं की, रोज हजारो लोक तिला पाहतात. त्यांना एक कल्पना सुचते की, प्रज्ञा आणि प्रतीकने माझ्याबरोबर काय केलंय. ते माझा कसा छळ करतात. Molkarin Marathi Story हे लाखो लोकांना दाखवण्याची ही सुवर्णसंधी आहे. यामुळे प्रज्ञा आणि प्रतीकचं खरं रूपही जगासमोर येईल आणि त्यांच्या कचाट्यातून सुटू.
ही आयडिया सुचल्यानंतर आनंदीबाई प्रज्ञाकडे लक्ष ठेवतात. ती स्वतःचे व्हिडिओ कशी बनवते, लाईव्ह व्हिडिओ कसे शेअर करते, हे सगळं पुढील काही दिवसात त्या शिकून घेतात. Molkarin Marathi Story एक दिवस प्रज्ञा हॉलमध्ये सोफ्यावर बसून मस्तपैकी एक मासिक वाचत होती. तर तिचा नवरा प्रतीक पुस्तक वाचत होता. आनंदीबाईना वाटतं ही एक चांगली संधी आहे.
त्यांनी हेही पाहिलं होतं की, प्रज्ञाचा मोबाईल बेडरूम मध्ये चार्जिंगला लावलेला होता. त्या लगेचचं हा मोबाईल घेऊन येतात आणि आनंदीबाईच्या अकाउंट वरून लाईव्ह व्हिडिओ सुरू करतात. Molkarin Marathi Story त्या फोन अशा पद्धतीने ठेवतात की, घरात जे काही चाललंय, ते सगळं दिसलं पाहिजे. आनंदीबाई प्रज्ञा शेजारी सोफ्यावर येऊन बसतात आणि खूपचं प्रेमाने म्हणतात, “अगं सुनबाई, मला खूप भूक लागलीये, काही खायला बनवून देतेस का ?”
प्रज्ञा चिडून म्हणते, “आनंदीबाई, तुमचं डोकं बिक फिरलंय का ? घरची मोलकरीण तुम्ही आहात, मी नाही. तुम्ही मला खायला करून द्यायचं.” तेव्हा आनंदीबाई आणखीनचं करूण चेहरा करून म्हणतात, “अगं पोरी, असं का बोलतेस तू ? Molkarin Marathi Story तुम्ही तर मला वृद्धाश्रमातून दत्तक घेतलं, तेव्हा म्हणाली होतीस ना, आम्हाला आई हवी आहे. आम्ही तुम्हाला आईसारख सांभाळू आणि आता मला मोलकरीण का म्हणतेस ? घरची सगळी काम करून घेतेस ?”
प्रतीक चिडून म्हणतो, “तुमच्या डोक्यावर परिणाम वगैरे झालाय की काय ? तुम्हाला एकदा सांगितलं ना, आम्हाला फुकटची मोलकरीण हवी होती. Molkarin Marathi Story म्हणून हा आमचा सगळा प्लॅन होता. तुम्हाला आई म्हणून वृद्धाश्रमातून दत्तक घेतलं आणि येथे मोलकरीण बनवलं. आता तुम्हाला परत जाता येणार नाही. गपचूप कामाला जा, निघा इथून.”
आनंदीबाई म्हणतात, “असं का बोलतोस रे पोरा, मला माझ्या वृद्धाश्रमात परत पाठवून दे. Molkarin Marathi Story जर माझी गरज नसेल तर, मला कशाला आणलं.” प्रज्ञा म्हणते, “गरज कशी नाही, तुम्ही जोपर्यंत जिवंत आहात, येथेचं काम करायचं. असं म्हणून प्रज्ञा त्यांचा हात पकडून सोफ्याहून उठवते आणि किचनकडे धक्का देते.
हे सगळं सोशल मीडियावर लाईव्ह चालत असतं आणि याबद्दल प्रज्ञा प्रतिकला काहीही माहीत नसतं. या घटनेच्या अवघ्या पाच मिनिटानंतर प्रज्ञा आणि प्रतीकच्या मोबाईलवर असंख्य फोन कॉल येतात. सगळे लोक त्यांना जाब विचारतात की, “तुम्ही हे काय करताय ? Molkarin Marathi Story तुम्हाला लाजा नाही का वाटत ? एका वृद्धाश्रमातील बाईला तुम्ही स्वतःच्या घरात मोलकरीण म्हणून ठेवल का ? तिचा छळ करताय का ?”
प्रज्ञा आणि प्रतीकला समजतचं नाही की, हे काय होतंय. तेवढ्यात प्रज्ञाची एक मैत्रीण तिला फोन करून सांगते, तुझ्या सोशल मीडिया अकाउंटवरून हे सगळं लाइव दिसत होतं आणि हा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाला आहे। लोक तुम्हाला खूप शिव्या घालताय. Molkarin Marathi Story आता तुमचं काही खरं नाही. तुमच्या विरुद्ध पोलिस कंप्लेंटसुद्धा रजिस्टर झाली आहे.
प्रज्ञा आणि प्रतीकच्या पायाखालची जमीनचं सरकते. प्रज्ञाला समजतं हा सगळा आनंदीबाईंचा प्लॅन होता. ती आनंदी बाईंवर खूप चिडते आणि म्हणते, “तुमची हिम्मत कशी झाली, हे सगळं करण्याची ? मी तुम्हाला सोडणार नाही आणि ती आनंदीबाईवर हात उचलते. आनंदीबाई तिचा हात पकडतात आणि एक सणसणीत तिच्याचं थोबाडीत मारतात. प्रतीक चिडून म्हणतो, “हे काय करताय तुम्ही ?” Molkarin Marathi Story तर आनंदीबाई त्याच्याही थोबाडीत मारतात आणि म्हणतात, “हीच तुमची शिक्षा आहे. तुम्ही माझा गैरफायदा उचललात. मला वाटलं मला देव माणस भेटली, परंतु तुम्ही तर राक्षस निघालात राक्षस.”
तेवढ्यात दरवाजाची बेल वाजते. आनंदीबाई दरवाजा उघडतात. तर तेथे सोसायटीची खूप सारी माणसं जमलेली असतात. सोसायटीचे सेक्रेटरी पुढे येतात आणि म्हणतात, “तुम्हाला दोघांना लाज नाही का वाटत ? Molkarin Marathi Story तुमच्यासारखी नालायक माणसं आमच्या सोसायटीत नाही राहू शकत. तेवढ्यात पोलीसही तेथे येतात आणि एका वृद्ध स्त्रीचा छळ केल्याप्रकरणी, त्यांना फसवल्याप्रकरणी प्रतीक आणि प्रज्ञाला अटक करतात.
आज मी माझ्याव हक्कासाठी लढले, म्हणून आनंदीबाईना खूप आनंद होतो. त्यादिवशी त्यांनी असामान्य हिम्मत दाखवलेली असते Molkarin Marathi Story आणि संपूर्ण देशाचं, जगाचं मन जिंकून घेतलेलं असतं की, जरी त्या वृद्धाश्रमात राहत होत्या, निराधार होत्या, तरी त्यांचाही एक स्वाभिमान होता आणि त्या अन्याय सहन करणार नाहीत.
तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, कशी वाटली आजची कथा. नक्कीचं कमेंट करून सांगा आणि अशाचं नवीन नवीन कथांसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !