Misal Pav Marathi Recipe 2024
Misal Pav Marathi Recipe 2024 झणझणीत मिसळ पाव हे आपल्या महाराष्ट्रातील सर्वांचं आवडतं फास्ट फूड आहे. अनेकजण आपला सुट्टीचा दिवस रविवार हा झणझणीत मिसळ पाव खाऊनच एन्जॉय करतात. मित्रांचे ग्रुप हे मिसळ पाव खाण्यासाठी आवडत्या ठिकाणी जातात आणि मस्त एन्जॉय करतात. मिसळ पाव हा अनेकांचा अतिशय फेव्हरेट नाश्ता आहे.
आपल्याकडे प्रत्येक शहराची आपली स्पेशल मिसळ पावची रेसिपी आहे. नाशिकची मिसळ खूप लोकप्रिय आहे पण पुण्याची मिसळसुद्धा अतिशय प्रसिद्ध आहे आणि कोल्हापूरची झणझणीत मिसळ तर जगात भारी आहे. मुंबईची मिसळसुद्धा एकच नंबर असते. मालवणी मिसळसुद्धा भारी असते. मग आता कुठली मिसळ सगळ्यात भारी यावरून वादविवाद होतच असतात.
सध्या सगळीकडे अनेक मिसळ पावचे स्पेशल हॉटेल सुरू झालेत जिथे झणझणीत चवीची मिसळ आपल्याला खाता येते. आपल्यातील अनेकांनी अशा हॉटेलमध्ये जाऊन नक्कीच मिसळीची चव घेतली असेल.
पण बाहेरच्या सारखी अगदी झणझणीत मिसळ घरात बनवणं अतिशय सोपं आहे. आपल्या आवडीची मिसळ आपण घरीसुद्धा बनवू शकतो त्यामुळे आता बाहेर जाऊन खाण्याची काहीच गरज नाही.
आज आम्ही तुमच्यासाठी मिसळ पाव बनवण्याची अगदी सोपी Misal Pav Marathi Recipe 2024 रेसिपी घेऊन आलो आहोत. ही मिसळ पावची रेसिपी तुम्ही नक्कीच बनवून पहा.
मिसळ बनवण्याचं साहित्य :
- 2 चमचे तेल
- 20 ग्रॅम कापलेलं सुकं खोबरं
- 2 छोटे चमचे तीळ
- 1 छोटा चमचा खसखस
- 8-10 लसणाच्या पाकळ्या
- 1 इंच आल्याचे तुकडे
- थोडीशी कोथिंबीर
- थोडी कढीपत्त्याची पानं
- गरजेनुसार पाणी
- 2-3 मोठे चमचे तेल
- 1 छोटा चमचा मोहरी
- अर्धा छोटा चमचा जिरे
- 1 मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा
- 1 छोटा बारीक चिरलेला टोमॅटो
- 1 छोटा चमचा हळद
- 1-2 छोटे चमचे लाल तिखट
- 2 छोटे चमचे काश्मिरी लाल तिखट
- 1 छोटा चमचा गरम मसाला
- 2-3 चमचे गोडा मसाला
- चिमूटभर साखर
- अर्धा कप मोड आलेली मटकी
- 1 छोटा मध्यम आकारात कापलेला बटाटा
- 2 कप गरम पाणी
- चवीनुसार मीठ
मिसळ पाव सर्व्ह करण्यासाठी लागणारं साहित्य :
- थोडीशी कोथिंबीर
- लिंबू
- फरसाण
- शेव
- थोडासा चिरलेला कांदा
- थोडीशी चिरलेली कोथिंबीर
- पाव
मिसळ बनवण्याची कृती :
- झणझणीत मिसळ Misal Pav Marathi Recipe 2024 बनवण्यासाठी सर्वात आधी आपण वाटण तयार करून घेणार आहोत त्यासाठी कढईमध्ये 2 चमचे तेल, 20 ग्रॅम काप केलेलं सुकं खोबरं, 2 छोटे चमचे तीळ, 1 छोटा चमचा खसखस, 8-10 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याच्या तुकड्याचे काप टाकून 2 ते 3 मिनिटे परतायचं आहे.
- आता थोडीशी कोथिंबीर आणि कढीपत्त्याची पानं टाकूया. हे आपल्याला 2 ते 3 मिनिटे परतून घ्यायचं आहे. कारण तीळ आणि खसखस लवकर शिजतात. खोबरं आपण मसाल्यामध्ये तेलामध्ये नंतर शिजवणार आहोत.
- 2-3 मिनिटे परतल्यानंतर आपण मिक्सरमध्ये याचं वाटण तयार करून घेणार आहोत. थोडं थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतर थोडंसं पाणी घालून मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं. आपलं छान वाटण तयार झालंय.
- आता आपण आपली उसळ तयार करूया त्यासाठी एका कढईमध्ये 2-3 मोठे चमचे तेल घ्यायचं. तेल छान गरम झाल्यावर त्यात 1 छोटा चमचा मोहरी, अर्धा छोटा चमचा जिरे, 1 मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा टाकायचा.
- कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा. 2-3 मिनिटे कांदा शिजल्यावर 1 छोटा टोमॅटो बारीक चिरून टाकायचा. कांदा, टोमॅटो छान शिजल्यावर आपण जे वाटण तयार केलं होतं ते घालूया. हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आणि तेल सुटेपर्यंत 10 ते 12 मिनिटे छान शिजवून घ्यायचंय.
- आता यामध्ये सुके मसाले टाकून घ्यायचे आहेत. यामध्ये 1 छोटा चमचा हळद, 1-2 छोटे चमचे लाल तिखट, 2 छोटे चमचे काश्मिरी लाल तिखट, 1 छोटा चमचा गरम मसाला, 2-3 चमचे गोडा मसाला आणि चिमूटभर साखर टाकून हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. हा मसाला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा.
- यामध्ये आता आपण अर्धा कप मोड आलेली मटकी आणि 1 छोटा बटाटा मध्यम आकाराचे काप करून घालायचा. हे छान मिक्स करून घ्यायचं आणि 2 कप गरम पाणी घालायचं. गरम पाणी टाकल्याने मसाल्याची चव टिकून राहते. रस्सा छान मिक्स करून घेऊया. यात चवीनुसार मीठ टाकायचं.
- सगळं छान मिक्स करून घ्यायचं आणि आपला हा रस्सा 10 ते 12 मिनिटे उकळून घ्यायचा. जितका जास्त आपला हा कट शिजेल त्याची चव तितकीच छान उतरते. वेळ झाल्यानंतर आपली मटकी आणि बटाटा छान शिजला का ते दाबून बघायचं आणि शिजल्यानंतर गॅस बंद करायचा.
- काही वेळाने आपल्या मिसळीचा कट छान आलेला असेल. आपला कट, रस्सा आणि उसळसुद्धा तयार आहे. आता एका वाटीमध्ये आपली उसळ काढून घेऊया आणि कट एका वाटीमध्ये काढून घेऊया. जे बाकीचं उरेल तो आपला रस्सा आहे.
- आता आपण ही मिसळ Misal Pav Marathi Recipe 2024 सर्व्ह करून घेऊया. एका वाटीमध्ये आपण उसळ काढून घेतलेली आहे यामध्ये आपण मिक्स फरसाण घालूया. फरसाण हे फ्रेश आणि कडक असायला हवं. त्यानंतर यावर थोडा बारीक चिरलेला कांदा घालूया. तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही यामध्ये पोहेसुद्धा टाकू शकता.
Basundi Recipe In Marathi 2024 | बासुंदी रेसिपी मराठी
त्यावर थोडीशी कडक शेव, थोडीशी कोथिंबीर, मिसळीचा रस्सा टाकायचा आणि वरून पुन्हा थोडीशी शेव, थोडासा कांदा, थोडीशी कोथिंबीर, एक लिंबाची फोड टाकायची. जर तुम्हाला आणखी तिखट हवं असेल तर तुम्ही आपण काढलेला कटसुद्धा यावर टाकू शकता. या कट तर्रीशिवाय मिसळीची मजा नाही.
आपली झणझणीत मिसळ Misal Pav Marathi Recipe 2024 तयार आहे. सॉफ्ट पावसोबत तुम्ही सर्व्ह करू शकता. सोबत तुम्ही फ्रेश दही, पापड आणि गोड म्हणून जिलेबीसुद्धा खाऊ शकता.
आजकाल मिसळसुद्धा खूप वेगवेगळ्या प्रकारची मिळते.
दूध मिसळ, पाणीपुरी मिसळ, पोहे मिसळ, मिसळ शेजवानी, वऱ्हाडी मिसळ, समोसा मिसळ, पेरी पेरी तंदुरी मिसळ, दही मिसळ, वडा मिसळ, उपवासाची मिसळ, पिझ्झा फ्लेवर मिसळ, पास्ता फ्लेवर मिसळ, मंगळोरी मिसळ, हिरवी मिसळ अशा वेगवेगळ्या मिसळ आपण नक्कीच ट्राय करून पाहायला पाहिजे.
Important Tips For Misal Pav Marathi Recipe 2024
- मिसळ Misal Pav Marathi Recipe 2024 बनवताना त्यात रस्सा बनवण्यासाठी गरम पाणी घालायचं म्हणजे मसाल्यांची चव टिकून राहते.
- रस्सा 10 ते 12 मिनिटे शिजवायचा. जितका जास्त तुमचा रस्सा शिजेल त्याची चव तितकीच छान लागते.
- तुम्हाला मिसळीत पोहे घालायचे असतील तर तुम्ही घालू शकता त्यामुळे चव छान लागते.
- तुम्हाला जर मिसळ जास्त तिखट हवी असेल तर तुम्ही आपण केलेला कट जास्त घेऊ शकता. कट तर्रीशिवाय मिसळला मजा नाही.
तुम्ही या सर्व टिप्स वापरून झणझणीत मिसळ पावची रेसिपी घरीच बनवू शकता.
FAQ’s About Misal Pav Marathi Recipe 2024
- Misal Pav Marathi Recipe 2024 कशापासून बनवली जाते ?
मिसळ पाव सर्वांचा खूप आवडता नाश्ता आहे. ही मिसळ मोड आलेली मटकीपासून बनवलेली असते. त्यात बटाटा, सुकं खोबरं, कांदा, टोमॅटो, साखर आणि भरपूर सारे मसालेसुद्धा टाकलेले असतात. मिसळ पावसोबत आवडीने खाल्ली जाते. तर्रीदार झणझणीत मिसळ खायला सर्वांनाच आवडते.
- मिसळ पाव आरोग्यासाठी चांगला आहे का ?
पारंपरिक मिसळ पावमध्ये मोड आलेली मटकी आणि भिजवलेले चणे असतात त्यामुळे त्यात भरपूर प्रोटीन असते. प्रोटीनचा हा चांगला स्रोत आहे. मिसळमध्ये फॉलिक ऍसिडसुद्धा भरपूर असते.
हेही उत्तम आहे पण मिसळमध्ये वापरला जाणारा फरसाण, बटाटा आणि पाव चांगलं नसतं त्यामुळे आपण फरसाण आणि बटाटे न वापरून पावऐवजी गव्हाची पोळी खाऊन मिसळीला आणखी हेल्दी बनवू शकतो.
- कुठली मिसळ सर्वात जास्त लोकप्रिय आहे ?
मिसळ पाव आपल्या महाराष्ट्रात सगळीकडेच उत्तम मिळते पण नाशिकची मिसळ ही आपल्या अप्रतिम मसाल्यांसाठी आणि उत्कृष्ट चवीसाठी अतिशय प्रसिद्ध आहे. अनेकजण नाशिकच्या मिसळीचे फॅन आहेत आणि इथल्या मिसळीचा आस्वाद घेण्यासाठी लांबून येत असतात.
- Misal Pav Marathi Recipe 2024 एवढं का लोकप्रिय आहे ?
मिसळ पाव हे आपल्या महाराष्ट्रीयन माणसाचा खूपच आवडता खाद्यपदार्थ आहे. हा मिसळ पाव आपल्या महाराष्ट्रात उदयास आलेला असून आपल्या खाद्यसंस्कृतीचं प्रतीक आहे. आपल्या अप्रतिम चवीमुळे मिसळ पाव खायला सर्वांनाच आवडतो. मिसळ पाव खाल्ल्यामुळे छान पोटसुद्धा भरतं.
- मिसळ पाव किती दिवस चांगलं राहू शकतं ?
मिसळ पाव (Misal Pav Marathi Recipe 2024) हा खासकरून नाश्त्यासाठी खाल्ला जाणारा पदार्थ आहे आणि गरमागरम खाल्ल्याने त्याची चवही उत्कृष्ट लागते. मिसळ पाव हा बनवल्यानंतर दिवसभरातच गरमागरम खायला हवा म्हणजे टेस्टी लागतो.
आपली अगदी हॉटेलसारखी झणझणीत मिसळ तयार आहे ती तुम्ही पावसोबत घरच्यांना सर्व्ह करू शकता. सुट्टीच्या दिवशी तुम्ही या मिसळीचा जबरदस्त प्लॅन नक्की बनवू शकता. तुम्ही खूपच एन्जॉय कराल. इतक्या सोप्यात अशी टेस्टी मिसळ घरीच बनवता येत असेल तर मग बाहेर मिसळ खायला जाण्याची काहीच गरज नाही. तुम्ही एकदा ही मिसळ पावची रेसिपी अवश्य बनवून पहा. ही रेसिपी तुमच्या घरातील सर्वांना खूपच आवडेल.
तुम्हालासुद्धा ही झणझणीत मिसळ पावची रेसिपी Misal Pav Marathi Recipe 2024 आवडली का नक्कीच सांगा. अशाच टेस्टी रेसिपी शिकण्यासाठी आमचे दुसरे आर्टिकलसुद्धा नक्कीच वाचा.