अभिनेते मिलिंद गवळी हे आपल्या ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अनिरुद्धच्या भूमिकेमुळे खूपच लोकप्रिय झाले आहेत. त्यांनी साकारलेली ही भूमिका प्रेक्षकांना फारच आवडते. यासोबतच ते आपल्या फिटनेसकडेही खूप लक्ष देताना दिसतात. ते स्वतःला नेहमी फिट ठेवतात.
त्यांना बाईक्स चालवायलाही खूप आवडतं. नुकताच त्यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून बाईक चालवत असल्याचा व्हिडिओ शेअर केलाय आणि यासोबतच एक पोस्टसुद्धा लिहली आहे. त्यात त्यांनी आपला बाईक चालवण्याचा अनुभव आणि सरावबद्दल सांगितलं आहे.
अभिनेते मिलिंद गवळी
या पोस्टमध्ये त्यांनी लिहलंय की,
” सराव ” practice makes a man perfect. एखाद्या गोष्टीचं passion असणं खूपच चांगलं आहे, passion आपल्याला आयुष्यामध्ये काहीतरी achieve करण्यासाठी आवश्यकच असतं, तसंच confidence असणं, हि सुद्धा खूप महत्त्वाची गोष्ट आहे, confidence मुळे आपल्याला आयुष्यामध्ये काय करायचं आहे, ते करण्यासाठी आपल्याला एक प्रकारची energy, जिद्द आणि उत्साह मिळतो, पण overconfidence असणं, हे जरा घातक आहे,
बर्याच वेळेला एखादी नवीन गोष्ट आपल्याला करायची असते आणि त्यासाठी आपण प्रयत्न करतो, आणि मग हळूहळू आपल्याला त्या गोष्टीची आवड निर्माण होते, ते करण्याचं passion आपल्यामध्ये येतं, मग ते करण्याचा आपल्यात एक सराव होतो, मग आपला confidence वाढतो, ती गोष्ट आपण सातत्याने confidently करू लागतो, आणि मग नकळत एक overconfidence आपल्यामध्ये यायला लागतो.
मला बालपणी सायकल चालवता येत नव्हती म्हणून सायकल चालवण्याचा मी सराव केला, सायकल चालवण्याचं passion निर्माण झालं, confidence वाढला आणि मग स्कूटर आणि मोटरसायकल चालवायला पण शिकलो, College मद्धे आठ वर्ष मोटर सायकल चालवली, आठ वर्षात एकदाच, एक म्हातार्या आजी अचानक समोर आली म्हणून पटकन ब्रेक दाबला आणि मोटरसायकल खाली पडली, म्हाताऱ्या आजीबाईला वाचवलं आणि मलाही काही लागलं नाही पण bike मात्र खाली पडली, त्यानंतर असंख्य वेळा सिनेमांमध्ये बाईक चालवली, stunts केले, मग चालत्या मोटरसायकल वरून हात सोडून लावण्याचा सराव पण केला, over confidence कधी अंगात घूसला काही कळलच नाही,
आणि परवा दिगू बाबा आणि मिथिलाकडे गेलो असताना त्यांनी नवीन घेतलेली एनफिल्ड हिमालयन बाईक चालवायला घेतली, आणि टर्न sharp turn मारताना मला control करता च आला नाही, आणि बाईक खाली पडली, मी स्वतःला सावरलं पण मी बाईक सावरू शकलो नाही, नंतर 200 किलोची बाईक मला एकट्याला उचलता आली नाही,
माझा overconfidence मलाच नडला, मी basics विसरलो होतो, तो म्हणजे “सराव”, कुठल्याही गोष्टीचा सराव केल्याशिवाय overconfident होऊ नये.
Milind Gawali Bike Accident
अभिनेते मिलिंद गवळी शेअर केलेल्या पोस्टवर अनेक चाहत्यांनी कमेंट्स करत त्यांच्या बाईक चालवण्याचं कौतुक केलंय. एकाने त्यांना खूप छान फिटनेस असल्याचं म्हटलंय तर दुसऱ्याने तुम्ही ठीक आहात ना असंही विचारलंय.
काही दिवसांपूर्वी ‘आई कुठे काय करते‘ मालिकेकडून अभिनेते मिलिंद गवळी अभिनेत्री रुपाली भोसलेसोबत गुढीपाडव्यानिमित्त ठाण्यात निघालेल्या महिलांच्या मोटारसायकल रॅलीमध्ये भाग घेतला होता. त्यावेळी त्यांनी स्वतःचं मोटारसायकलसुद्धा चालवली होती. त्यावेळीही सर्वांनी त्यांच्या मोटारसायकल चालवण्याचं कौतुक केलं होतं.
मनोरंजनविश्वातील अशाच नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला नक्की फॉलो करा.
तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद !