मारुती सुझुकी मित्रांनो आपल्या देशात प्रत्येकाचंच स्वतःचं घर आणि एक चारचाकी घेण्याचं स्वप्न असतं. एकदा स्वतःचं हक्काचं घर झालं की प्रत्येकजण आधी चारचाकी घेण्याचा प्रयत्न करतो.
मग प्रत्येकजण आपल्या बजेटनुसार आणि आपल्या आवडीचे फीचर्स पाहून कार खरेदी करत असतो. अशीच एक कार मागील मे महिन्यात सर्वात जास्त ग्राहकांची पसंतीस उतरली आहे आणि विक्रीचे रेकॉर्डस् सुद्धा मोडले आहेत.
मारुती सुझुकी
मित्रांनो जून महिन्याची सुरुवात झाली आहे आणि मागील मे महिन्यात अनेक कार कंपन्यांच्या विक्रीमध्ये जबरदस्त वाढ झाल्याचं दिसून आलं. पण या सगळ्या कारच्या बाजारामध्ये एका कारने विक्रीच्या बाबतीत पहिला नंबर पटकावला आहे. मारुती सुझुकीच्या बलेनो कारने आपल्या जबरदस्त फीचर्समुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.
मारुतीने मे महिन्यात एकूण 18 हजार 773 बलेनो कार्सची विक्री केली आहे. तर एप्रिल महिन्यात कंपनीने 13 हजार 970 युनिट्स विकले होते म्हणजे मे महिन्यात 34 टक्क्यांनी जास्त विक्री झाली.
बलेनोपाठोपाठ मारुती स्विफ्ट आणि वॅगन आर विकली गेली. त्यानंतर ह्युंदाई क्रेटा आणि टाटा नेक्सोनचा नंबर लागतो.
मारुती सुझुकीची कार विक्रीत नंबर 1
मारुतीने सगळ्यात आधी 2015 साली भारतात आपली बलेनो कार लॉंच केली होती. मारुती सुझुकीची ही भारतातील एकमेव हॅचबॅक कार आहे. नुकतीच कंपनीने नवीन फीचर्ससह ही कार पुन्हा एकदा लॉंच केली आहे.
नवीन फीचर्समुळे कारची किंमत 12 हजार रुपयांनी वाढली आहे. या कारची किंमत सध्या 6.61 लाख ते 9.81 लाखापर्यंत आहे. ही कार पेट्रोल इंजिनसह कंपनी फिट CNG किटसह येते.
ही कार 9 व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. बलेनो पेट्रोलवर 22 किमी प्रति लिटरचं मायलेज देते तर CNG वर 30 किमी प्रति किलोग्रॅम मायलेज देते.
मारुती सुझुकी बलेनोमध्ये 6 एअरबॅग, स्पीड अलर्ट, सीट बेल्ट रिमायंडर, ब्रेक असिस्ट, सीट बेल्ट टेंशनर, रिव्हर्स पार्किंग सेंसर, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम, इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्युशन, ऑल पॉवर विंडो, ऑटो क्लायमेट कंट्रोल, सेंट्रल लॉकिंग, हॅलोजन प्रोजेक्टर हेडलॅम्प, LED टेललॅम्प सारखे जबरदस्त फीचर्स आहेत. बेस व्हेरिएंटमध्ये ESP आणि हिप होल्ड असिस्टन्ससारखे फीचर्स मिळतात.
भारतासह जागतिक बाजारपेठेतही ही कार खूप पसंत केली जातेय आणि खूप विकतेय.
हे सर्व जबरदस्त फीचर्स अगदी किफायतशीर किमतीत मारुती सुझुकीच्या बलेनोमध्ये मिळतायत त्यामुळे या कारला खूप पसंती मिळतेय.
मित्रांनो तुम्हाला हा आर्टिकल उपयोगी वाटला असेल तर आमचे दुसरे आर्टिकलसुद्धा नक्की वाचा.
धन्यवाद !