Marathi Ukhane For Male 2024 लग्न झाल्यावर नव्या नवरीने उखाणा घ्यायचा, ही तर सगळीकडेचं रीत आहे. मुली उखाणा घेण्यासाठी प्रॅक्टिस करतात. उखाणे पाठ करून ठेवतात. परंतु खरी फजिती होते नवरोबांची. कारण अनेकदा नवरीबरोबर नवऱ्यालासुद्धा उखाणा घ्यायला सांगितलं जातं आणि मग तो नेहमीप्रमाणे भाजीत भाजी मेथीची, बायको माझ्या प्रीतीची हाच उखाणा घेतो.
परंतु तुम्हाला जर भारीतला उखाणा घ्यायचा असेल, असा उखाणा जो सोपा असेल, तुमच्या लवकर लक्षात राहील आणि लग्न समारंभात तुमचा वट वाढवेल, तर आज आम्ही तुमच्यासाठी असेच दहा सोपे आणि सुंदर उखाणे घेऊन आलो आहोत. तर चला पाहूयात.
Marathi Ukhane For Male 2024
1) जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने,
—– च्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो मी प्रेमाने
2) नजरेस नजर मिळताचं, मनी आले आनंदाचे उधाण, अन —– च्या प्रेमळ नजरेने झालो मी बेभान
3) लग्न म्हणजे नवं पर्व, नवी सुरुवात,
सन्मानाने दिलाय आज माझ्या हाती तुझा हात,
वचन देतो तुला देईल साताजन्मांची साथ
—- स्वागत आहे तुझं आपल्या कुटुंबात
4) एक होती चिऊ आणि एक होता काऊ,
—– चं नाव घेतलं बर का ताई माई अक्का आणि भाऊ
5) आकाशात पडतो रात्री चांदण्यांचा सडा,
—– तुला वचन देतो आपल्या प्रेमाला जाणार नाही तडा
6) लग्नाच्या साडीत दिसतेस तू जणू काही स्वर्गातील अप्सरा,
अन —– चा मराठमोळा साज पाहून खिळल्या सर्वांच्या नजरा
7) हळूच लाजणे, गालात हसणे, मोहक तुझी अदा
—- तुझ्या मोहक सौंदर्यावर, झालो मी फिदा
8) कामाची सुरुवात होते श्रीगणेशापासून
—– चे नाव घ्यायला सुरुवात केली आजपासून
9) यमुनेच्या प्रवाहात ताजमहालचे पडते प्रतिबिंब
—- चे नाव घेण्यास मी नाही करत विलंब
10) ताजमहाल बांधायला कारागीर होते कुशल
—- चे नाव घेतो कारण आहेस तू माझ्यासाठी स्पेशल
आवडले का तुम्हाला हे सर्व Marathi Ukhane For Male 2024 उखाणे. तुम्ही यापैकी कोणता उखाणा घेणार किंवा तुमच्या मित्राला, भावाला कोणता उखाणा शेअर करणार. नक्कीचं कमेंट करून सांगा.
नवीन नवरी बाईंसाठीसुद्धा आम्ही स्पेशल 11 उखाणे सांगितले आहेत, तो लेखही या Marathi Ukhane For Female लिंकवर क्लिक करून नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !