Marathi Ukhane For Female 2024 : नवरीबाईसाठी नवीन, सोपे आणि सुंदर उखाणे

Marathi Ukhane For Female 2024

Marathi Ukhane For Female दहावी बारावीच्या परीक्षा झाल्या, होळी झाली, गुढीपाडवा झाला, आयपीएलसुद्धा सुरू झालं आणि आता लवकरचं सुरू होणार आहे 2024 या वर्षातील लग्नसराई.

लग्नसराई सुरू होण्याआधी अनेक जोडप्यांची लग्नाची तयारीसुद्धा सुरू झाली आहे. लग्नाचे कपडे, लग्नातील विविध विधींसाठी लागणाऱ्या वस्तू या सर्वांची खरेदी सुरू आहे. परंतु लग्न होण्याआधी नववधूंची म्हणजेचं नवरी बाईंची आणखीन एक महत्त्वाची तयारी सुरू असते आणि ती म्हणजे लग्न झाल्यावर नवरोबांच्या नावाने कोणता उखाणा Marathi Ukhane For Female घ्यायचा.

लग्न लागल्यापासून ते नवीन घरात गृहप्रवेश करेपर्यंत अनेकदा नवरीकडून उखाणा घे अशी अपेक्षा केली जाते. तेव्हा कोणता उखाणा घ्यायचा ? हा प्रश्न प्रत्येक नवरीला पडतो. भाजीत भाजी मेथीची… हा उखाणा तर नाही ना घेऊ शकत. म्हणूनचं आज आम्ही तुमच्यासाठी 2024 मधील सर्वात नवीन, सोपे आणि सुंदर असे 11 उखाणे Marathi Ukhane For Female घेऊन आलो आहोत.

मग कोणते आहेत हे 11 सर्वात नवीन, सोपे आणि सुंदर उखाणे चला पाहूया.

भाऊ आणि बहिणीची इमोशनल मराठी कथा

Marathi Ukhane For Female 2024

1) सनई चौघडे वाजले, लग्न लागले सप्तसुरात

—- रावांचे नाव घेऊन प्रवेश करते नव्या घरात

2) चौरंगावर कलश, कलशावर संध्यापात्र,

संध्यापात्रात आहे तांदळाची रास,

त्या राशीवर विराजला बाळकृष्ण,

खास बाळकृष्णाला वाहिले तुळशीचे पान,

—- रावांमुळे मिळाला मला सौभाग्याचा मान

3) केळीच्या पानावर रांगोळी काढते चित्रांची,

—-रावांचं नाव घेते आता सून झाले —- घराण्याची

4) सासरची छाया, माहेरची माया,

—- राव आहेत, माझे सगळे हट्ट पुरवाया

5) मस्त लागते आंबटगोड संत्र्याची फोड,

माझ्या —- रावांचं बोलणं मधापेक्षाही गोड

6) पुण्याला जाताना लागतो लोणावळा खंडाळा घाट,

अन —- रावांसोबत बांधते आयुष्यभराची गाठ

7) सूर चांगला असेल तर, गाण्याला येते गोडी,

—- रावांचं नाव घेते, आवडली का आमची जोडी

8) हो – नाही म्हणता म्हणता लग्न जुळले एकदाचे,

—- रावांमुळे मला मिळाले सौख्य आयुष्यभराचे

9) साजूक तुपात, नाजूक चमचा,

—- रावांचे नाव घेते, आशिर्वाद असुदे तुमचा

10) प्रेम स्मरावे राधाकृष्णाचे, भक्ती आठवावी संतजनांची,

त्याग जाणावा रामसीतेचा, —- रावांचं नाव घेते,

आशीर्वाद द्या अखंड सौभाग्याचा

11) राजा राणीच्या संसाराचा प्रवास आहे नवा,

—-रावांचं नाव घ्यायला उखाणा कशाला हवा

मग तुम्हाला यापैकी कोणता Marathi Ukhane For Female उखाणा आवडला ? तुम्ही कोणत्या उखाण्यामध्ये तुमच्या आहोंचं नाव घेणार ? नक्कीचं कमेंट करुन सांगा आणि अशाचं नवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.

खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top