Marathi Story Of Jaubai कल्पना लग्न करून सूर्यवंशींच्या घरात सून म्हणून आली होती. परंतु या लग्नामुळे सगळे दुःखी झाले होते, सगळे चिडले होते. सूर्यवंशीचा छोटा मुलगा शांतनुने स्वतःच्या मर्जीने कल्पनाशी लग्न केलं होतं. पण कल्पना सूर्यवंशी ग्रुपच्या कंपनीत काम करणाऱ्या एका कामगाराची मुलगी होती.
शांतनू आणि कल्पना दोघे एकाचं कॉलेजमध्ये होते. तेथेच त्यांची ओळख झाली आणि मग दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. ही गोष्ट जेव्हा शांतनूने घरी सांगितली, तेव्हा सर्वांनी या लग्नाला विरोध केला होता. कारण आपल्याच कंपनीत काम करणाऱ्या कामगाराच्या मुलीला घराची सून कशी बनवायची, हाच प्रश्न सर्वांच्या मनात होता.पण शांतनू अडून बसला आणि शेवटी हे लग्न लागलं.
Marathi Story Of Jaubai
घरातील सर्वजण या लग्नामुळे नाराज होते. पण आता लग्न झालंच आहे, तर ते स्वीकारालाचं हवं, या भावनेने सगळे शांत होते. परंतु शांतनूची वहिनी आणि कल्पनाची मोठी जाऊ देविका मात्र खूप चिडलेली होती. Marathi Story Of Jaubai कारण तिने असं ठरवलं होतं की, तिच्या बहिणीचं लग्न शांतनुशी करून द्यायचं. या मोठ्या घराण्याची सून म्हणून तिच्या छोट्या बहिणीला आणायचं. पण शांतनुने ऐनवेळेस प्रेम विवाह केल्यामुळे तिचा सगळा प्लॅन फ्लॉप झाला होता.
देविका एका मोठ्या घराण्यातील मुलगी होती. लहानपणापासूनचं श्रीमंतीत वाढलेली. ती दिसायलाही खूप सुंदर होती आणि त्यातचं कल्पना गरीब घरातील मुलगी, Marathi Story Of Jaubai ती दिसायलाही जेमतेमचं होती. पण ती गुणांची खान होती. रूप तेवढं मात्र देवाने तिला जास्त दिलं नव्हतं.
पहिल्या दिवसापासूनचं देविका कल्पनाचा अपमान करू लागली. ती म्हणायची, “शांतनू भाऊजीने जरी तुला घरात आणलं असलं, तरी तू या घराची सून नाही शोभत. मोलकरीण शोभतेस. थोबाड आरशात पाहिलंय का ? कशी दिसतेस ? कशी राहतेस ? Marathi Story Of Jaubai कशी बोलतेस ? कशी वागतेस ? तुझं राहणीमान, तुझा क्लास आमच्या बरोबरीचा नाही. मोलकरीण ती शेवटी मोलकरीणचं.” असं म्हणून देविका नेहमी तिला हिनवायची.
पाहता पाहता कल्पना आणि शांतनु या दोघांच्या लग्नाला सहा महिने झाले होते. या दोघांचा संसार तर सुखाचा होता. दोघे एकमेकांवर खूप प्रेम करायचे. शांतनूच्या आई-बाबांनी सुद्धा कल्पनाला स्वीकारलं होतं. Marathi Story Of Jaubai परंतु देविका मात्र कल्पनाला सासुरवास करत होती. घरातील सगळ्यांना ही गोष्ट समजायची. परंतु देविकाला काही बोलण्याची कोणाची हिंमतचं नव्हती. कारण देविकाच्या वडिलांनी सूर्यवंशी ग्रुप फॅक्टरीमध्ये मोठी इन्व्हेस्टमेंट केली होती. त्यामुळे तिला दुखवण्याची हिंमत कोणातही नव्हती.
कल्पना जेवढी समजूतदार होती, तेवढीच सहनशीलही होती. त्यांना जे बोलायचं ते बोलू दे, जे करायचं ते करू दे, मी मात्र माझी पातळी सोडणार नाही. Marathi Story Of Jaubai त्या माझ्यापेक्षा मोठ्या आहेत. मी त्यांना काही बोलणार नाही, या विचाराने कल्पना सगळ मुकाट्याने सहन करायची.
एक दिवस कल्पना आणि देविका या दोघींचेही नवरे एका बिजनेस मीटिंगसाठी अमेरिकेला जायचं ठरवतात आणि पंधरा दिवसांसाठी अमेरिकेला जातात. Marathi Story Of Jaubai त्याच काळात कल्पना आणि देविकाचे सासू-सासरेही एका तीर्थयात्रेसाठी बाहेरगावी जातात. घरात फक्त कल्पना आणि देविका या दोघीचं असतात.
आता घरात कोणीचं नाहीये, इतकी चांगली संधी आपल्याला मिळणार नाही. असा विचार करून देविका तिच्या मित्र मैत्रिणींबरोबर एक मोठी पार्टी करायचं ठरवते. Marathi Story Of Jaubai सगळे घरात असताना घरात पार्टी करणं काही शक्य नाही. त्यामुळे घरातचं पार्टी करायची, असं तिने ठरवलेलं असतं आणि ती सर्व मित्र मैत्रिणींना घरी पार्टीसाठी बोलावते.
देविका कल्पनाला म्हणते, “आज संध्याकाळी माझे सगळे मित्र मैत्रिणी येणार आहेत. घरात मोठी पार्टी आहे. तर तू सगळ्यांसाठी छान छान खायला बनवायचं आणि त्यांना ते सर्व सुद्धा करायचं. कोणाचीचं तक्रार नसली पाहिजे” असं ती बजावते. Marathi Story Of Jaubai जर आपण हे काम नीट केलं, तर मोठ्या जाऊबाईंचा आपल्यावरील राग कमी होईल, त्या आपल्याशी नीट वागू लागतील, असा विचार करून कल्पना यासाठी तयार होते.
संध्याकाळी देविकाचे सगळे मित्र मैत्रीण पार्टीसाठी येऊ लागतात आणि ठरल्याप्रमाणे कल्पना सर्वांची चांगली बडदास्त ठेवते. त्यांना कोल्ड्रिंक देते. सगळे मित्र मैत्रिणी येतात. परंतु देविका अजून तिच्या खोलीच्या बाहेर आलेली नसते. सगळे तिचीच वाट पाहू लागतात. देविका कुठे गेली आहे ? Marathi Story Of Jaubai देविका कुठे आहे ? अस ते विचारतात. तेवढ्यात देविकाची एक मैत्रीण कल्पनाला हाक मारते. “ये मुली इकडे ये, कुठे आहे तुझ्या मालकीण ?”
कल्पना विचारते, “कोण मालकीण ?” ही मैत्रीण म्हणते, “तुझं डोकं फिरलंय का ? या घराची मालकीण, तुझी मालकीण, आमची मैत्रीण देविका कुठेय ? Marathi Story Of Jaubai आम्हाला पार्टीला बोलावलं आणि तीच कुठे बाहेर गेली की काय ?” कल्पना म्हणते, “तुम्ही देविका ताईबद्दल विचारताय का ? आहे ना त्या. मी त्यांना बोलून आणते.” असं म्हणून कल्पना देविकाच्या खोलीत येते.
देविकाला पाहून कल्पनाला खूप आश्चर्य वाटतं. कारण देविकाने खूपचं भडक आणि छोटा ड्रेस घातलेला असतो. कल्पना म्हणते, “ताई तुमचे सगळे मित्र मैत्रीण जमा झालेत, तुम्हाला बोलवताय ?” देविका म्हणते, “सांग त्यांना मी येतेय.” कल्पना म्हणते, “पण ताई तुम्ही हा असा कसा ड्रेस घातलाय ? Marathi Story Of Jaubai किती छोटा आहे. किती अंग दिसतंय यातून.” देविका हसते आणि म्हणते, “ही तर तुझी खरी लायकी आहे. पार्टीमध्ये कसे कपडे घालायचे, हे सुद्धा तुला माहित नाही. मला नको अक्कल शिकवू. मी काय घालायचं, काय नाही घालायचं. गपचूप बाहेर जा आणि सर्वांना स्टार्टर्स दे. हे ऐकून कल्पनाला खूप वाईट वाटतं आणि ती बाहेर येते.
देविका थोड्यावेळानंतर बाहेर येते. तिला पाहून सगळे खूप खुश होतात आणि तिच्याकडेचं पाहत राहतात. सगळे येऊन तिला मिठी मारतात. हे सगळं पाहून कल्पनाला विचित्र वाटतं. Marathi Story Of Jaubai कारण देविकाचे काही पुरुष मित्रसुद्धा तिला घट्ट मिठी मारतात आणि तिला गालावर किस करतात. कल्पनाला हे आवडत नाही.
पार्टीला सुरुवात होते. देविका मोठ्या आवाजात म्युझिक लावते आणि कल्पनाला सगळ्यांना कोल्डर्डिंक सर्व्ह करायला लावते. पार्टी जोरात सुरू असते. Marathi Story Of Jaubai सगळे मित्र-मैत्रिणी मस्त नाचत असतात. परंतु देविकाच्या दोन मित्रांचं लक्ष मात्र देविकावरच असतं. ते तिच्याकडे वेगळ्याचं नजरेने पाहत असतात.
देविकाचा एक मित्र दुसऱ्याला म्हणतो, “पाहिला का किती हॉट दिसतेय ती देविका. आज तिला काही सोडायचं नाही.” दुसरा मित्र म्हणतो, “हो नाही सोडायचं. Marathi Story Of Jaubai कॉलेजमध्ये असताना दोनदा प्रपोज केलं तर दोनदा थोबाडीत मारली होती तिने माझ्या. आता तिला धडा शिकवायची वेळ आली आहे.” असं म्हणून हा मित्र एका ग्लाससमध्ये दोन गोळ्या टाकतो आणि म्हणतो, “चल आता.”
हे दोघे देविकाजवळ येतात आणि म्हणतात, “आम्हाला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय.” असं म्हणून ते तिला बाजूला घेतात. देविका म्हणते, “काय झालं, मस्त डान्स करूया.” तर एक मित्र म्हणतो, “हो करूया, Marathi Story Of Jaubai पण तू एवढी छान दिसतेस, एवढी भारी पार्टी दिलीये आणि आमच्या हातून एकही ड्रिंक घेतली नाही, असं कसं आधी हे पी.” देविका स्माईल करते आणि या मित्राच्या हातून ड्रिंक घेऊन दोन घोटातचं संपवते. हे दोन्ही मित्र खूप खुश होतात. देविका पुढे डान्स करायला जाऊ लागते. पण तेवढ्यात तिला चक्कर आल्यासारखं होतं. हा मित्र विचारतो, Marathi Story Of Jaubai “काय होतंय तुला देविका ? डोकं गरगरतय का ? त्रास होतोय का ? चल तुझ्या खोलीत, तुला सोडून येतो” असं म्हणून हे दोघे देविकाला तिच्या खोलीत घेऊन जातात.
खोलीमध्ये येऊपर्यंत देविकाची शुद्ध पूर्णपणे हरपलेली असते. तिला कशाचंही भान राहिलेलं नसतं. हे दोन मित्र एकमेकांकडे पाहून हसतात आणि देविकाच्या अंगावर झडप घालण्याचा प्रयत्न करणार, Marathi Story Of Jaubai एवढ्यात कल्पना तेथे येते आणि या दोघांसमोर उभी राहते. एक मित्र म्हणतो, “ए मोलकरीण हो बाजूला, तुझं इथं काय काम ? जा सगळ्यांना खायला प्यायला दे.”
कल्पना म्हणते, “मोलकरीण नाही मी या घरची. पण मी कोण आहे, हे तुम्हाला सांगायची गरज नाहीये. तुम्ही फक्त एवढंच लक्षात ठेवा, आज तुमची आई म्हणून समोर आली आहे आणि संस्कार काय असतात, ते शिकवेल तुम्हाला.” या मित्राला खूप राग येतो Marathi Story Of Jaubai आणि तो कल्पनाच्या अंगावर धावून जातो, तिच्यावर हात उचलतो. पण कल्पना त्याचा हात पकडते आणि एक सणसणीत थोबाडीत मारते. हे पाहून दुसरा मित्र खूप चिडतो आणि तोही कल्पनाच्या अंगावर हात टाकतो, पण कल्पना त्याच्याही थोबाडीत मारते.
कल्पना तिच्या हातात फ्लॉवर पॉट घेते आणि म्हणते, “या पुढे, आता तुमचा जीवचं घेते. पाहू काय होईल ते.” असं म्हणून ती त्यांच्या अंगावर धावून जाते. हे दोघे मित्र तिथून पळून जातात. कल्पना बाहेर येते Marathi Story Of Jaubai आणि बाकीच्यांना म्हणते, “हे दोघे जसे पळालेत ना, तसचं तुम्ही सगळ्यांनी पळायचं, नाहीतर असं मारेल ना तुम्हाला, निघा इथून.” वेदिकाचे सगळे मित्र मैत्रीण खूप घाबरतात आणि निघून जातात. कल्पना घराचा दरवाजा लावून घेते.
कल्पना वेदिकाच्या रूममध्ये येते. तर ती बेशुद्ध झालेली असते. कल्पना लगेचं किचनमध्ये जाऊन मिठाचं पाणी तयार करून आणते आणि वेदिकाला हे पाणी पाजते. Marathi Story Of Jaubai वेदिका उलटी करते आणि तिने ज्या गोळ्या खाल्लेल्या असतात, त्याचा प्रभाव कमी होऊन तासाभरात ती पूर्ण शुद्धीत येते.
वेदिका कल्पनाला विचारते, “मला काय झालं होतं आणि मी येथे कशी आले ? तू मला काही पाजलं का ?” कल्पना म्हणते, “ताई मी नाही, तुमच्या त्या दोन मित्रांनी तुम्हाला बेशुद्ध होण्याचं औषध पाजलं Marathi Story Of Jaubai आणि तुमच्या अब्रूवर हात टाकण्याचा प्रयत्न करत होते ते.” हे कोण वेदिकाला मोठा धक्काचं बसतो आणि ती म्हणते, “हे काय बोलतेस तू ?”
कल्पना म्हणते, “ताई बरोबर बोलतेय मी. जेव्हा तुम्ही डान्स करत होता, तेव्हा हे दोन मित्र तुमच्याकडे एकटक पाहत होते आणि त्यांचं बोलणं माझ्या कानावर पडलं की, कॉलेजमध्ये हिने माझ्या थोबाडीत मारली होती. Marathi Story Of Jaubai आता तिला धडा शिकवायचा आणि त्यांनी तुमच्या ग्लासमध्ये दोन गोळ्या टाकल्या. तेव्हा मला संशय आला, काहीतरी घोळ आहे.
म्हणून मी तुमच्या मागे मागे आले आणि इथे आल्यावर ते तुमच्या इज्जतीवर हात टाकणार होते, तेव्हा मी त्यांना अडवलं आणि येथून हाणून मारून हाकलून दिलं.” हे सगळं ऐकून वेदिकाला मोठा धक्काचं बसतो Marathi Story Of Jaubai आणि तिच्या डोळ्यात पाणी येतं. ती रडू लागते. कल्पना तिच्याजवळ येते आणि तिचा हात हातात घेऊन म्हणते, “वहिनी रडू नका. काही वाईट घडलेलं नाहीये.”
वेदिका म्हणते, “मला याचं जास्त वाईट वाटतंय की, तू आज माझी इज्जत वाचवली आणि मागील सहा महिन्यांपासून मी तुला किती त्रास देत होते. किती छळ केला तुझा. Marathi Story Of Jaubai तुझ्या गरिबीवरून, दिसण्यावरून, वागण्या बोलण्यावरून मी सतत तुला बोलत राहिले. पण तू किती मोठी आहेस, हे आज मला कळलं.”
हे ऐकून कल्पनाला खूप आनंद होतो आणि कल्पना म्हणते, “ताई विसरून जाऊया सगळं. आपण दोन्ही सख्या जावा आहोत, मस्त राहूया. आपल्या घराचं नंदनवन करूया. Marathi Story Of Jaubai घरातील मोठी माणसं, मुलं कितीही चांगली असली, पण जर घरातील सुना चांगल्या नसल्या, तर ते घर कधीही सुखी राहू शकत नाही.
त्यामुळे यानंतर पुन्हा जुन्या गोष्टी नाही आठवायच्या.” वेदिका हसते आणि म्हणते “तू माझी छोटी जाऊ आहेस, Marathi Story Of Jaubai पण एखाद्या आजीबाईसारखी मला समजावून सांगतेस.” कल्पनाही हसू लागते.
त्या दिवसानंतर कल्पना आणि वेदिका सगळे वाईट विचार सोडून देतात आणि सख्या जावांप्रमाणे नाही तर सख्या बहिणीप्रमाणे आनंदाने राहतात. Marathi Story Of Jaubai या दोघींच्या बदललेल्या वागण्यामुळे घरातील सर्वांनाचं आश्चर्य वाटतं आणि घराचं नंदनवन होतं. सगळे खूप आनंदी आणि सुखी राहतात.
तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, आवडली का आजची गोष्ट. नक्कीचं कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन कथांसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !