Marathi Serial TRP : “मालिकेचा टीआरपी कमी झाल्यावर प्रोड्युसर चक्क … ” प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा

Marathi Serial TRP

Marathi Serial TRP टीव्हीवरील मालिका म्हटलं की, अनेक मतप्रवाह समोर येतात. अनेकांना या मालिका खूप आवडतात, हव्याहव्याशा वाटतात. तर काहींना मात्र वेळेचा अपव्यय, समाजाला चुकीचा संदेश देणाऱ्या वाटतात. परंतु जेव्हापासून आपल्या देशात टेलिव्हिजनला आणि त्यातल्या त्यात प्रायव्हेट टीवी चैनलला सुरुवात झाली आहे. मालिका प्रेक्षकांच्या फेवरेट आहेत आणि राहतील यात शंका नाही.

Marathi Serial TRP 

भारतातील प्रत्येक भाषेत मालिकांची निर्मिती केली जाते. आपली मराठी भाषाही त्याला अपवाद नाही. अनेक मराठी वाहिन्यांवर रोज चालणाऱ्या मालिका आपण पाहतो. त्यातल्या काही चांगल्या तर काही वाईट आहेत. काही काल्पनिक, तर काही सत्य घटनेवर आधारित असतात.

प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला मालिका विश्वाचा खरा चेहरा

या मालिकेत काम करणारे कलाकार हे चांगलेच लोकप्रिय असतात. अनके मालिकेतील कलाकारांची तर चित्रपटात काम करणाऱ्या कलाकारांपेक्षा जास्त लोकप्रियता आहे.

तसंच अनेकांना रोजगार देणारं एक प्रभावी माध्यम म्हणून या मालिकांकडे पाहिलं जातं. कला क्षेत्रातील अनेक तरुण-तरुणींना या मालिकांचं आकर्षण असतं. येथे काम केल्यावर खूप पैसा आणि प्रसिद्धी मिळेल ते असं त्यांना वाटतं.

परंतु आता मालिका विश्वातील एक प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने एका मुलाखतीत मराठी मालिका विश्वाचा खरा चेहरा, पडद्यामागचं सत्य सांगितलं आहे. जे ऐकून अनेकांना धक्काचं बसेल.

ही प्रसिद्ध अभिनेत्री दिसणार हिंदी मालिकेत

टीव्हीवरील डेली सोप (Marathi Serial TRP) प्रेक्षकांचं खरंच मनोरंजन करतात का ?

टीव्हीवरील मालिकांना डेली सोप असं म्हटलं जातं. डेली सोपचा अर्थ रोज येणाऱ्या मालिका. शनिवार आणि रविवार हे दोन दिवस सोडून आठवड्याचे पाच किंवा सहा दिवस या मालिका अविरत सुरू असतात. रविवारी त्यांचे महाएपिसोडसुद्धा येतात. परंतु प्रेक्षकांसमोर हे एपिसोड आणण्यासाठी अनेक लोकांची रात्रंदिवस मेहनत सुरू असते.

मालिकेचा अर्ध्या तासाचा किंवा 24 मिनिटांचा एक एपिसोड पूर्ण करण्यासाठी कधी कधी एक ते दोन दिवससुद्धा लागतात. कलाकारांबरोबरच तंत्रज्ञांची खूप मोठी टीम यामागे मेहनत करत असते. (Marathi Serial TRP) आपल्याला टीव्हीच्या पडद्यावर फक्त कलाकार दिसतात. परंतु त्यांच्या मागे 150 ते 200 जणांची मोठी टीम रात्रंदिवस झटत असते.

मालिकेचे मुख्य कलाकार खूप लोकप्रिय होतात. त्यांना पैसे सुद्धा चांगले मिळतात. परंतु त्याचबरोबर त्यांच्यावर खूप दबावसुद्धा असतो. जेव्हा मालिकेची लोकप्रियता चांगली असते, तेव्हा काही फरक पडत नाही. पण मालिकेची लोकप्रियता म्हणजेच टीआरपी Marathi Serial TRP कमी झाल्यावर मात्र निर्मात्यांकडून, दिग्दर्शकांकडून या कलाकारांवर दबाव टाकला जातो.

त्यामुळे हे प्रसिद्धी आणि पैसा तर चांगली गोष्ट आहे, हा दबाव सहन करणं सुद्धा एक कलाच आहे आणि कलाकारांना ती यायलाच हवी. 24 मिनिटांचा एक एपिसोड बनवण्यासाठी एक ते दोन दिवस लागतात आणि आता तर डेली सोप असल्यामुळे एका दिवसात एक एपिसोड तयार व्हायलाच हवा. त्यामुळे शूटिंगच्या वेळा ह्या खूप त्रासदायक असतात. डे, नाईट शिफ्ट सुद्धा करावी लागते. 12 ते 14 तास काम करावं लागतं.

अशा वेळेस कलाकारांना, अनेक दिवस त्याचं साड्या, तेच कपडे, तोच मेकअप पुन्हा पुन्हा करावा लागतो. कामासाठी नेहमी तयार रहावं लागतं. घरी एखादा कार्यक्रम असेल, पर्सनल आयुष्यात काहीतरी फंक्शन असेल, तरी त्यासाठी वेळ काढणं हे खूप अवघड असतं.

मालिकेतील कलाकारांचा होतोय छळ

कारण Marathi Serial TRP अशा कार्यक्रमांना आधीच सुट्टी मागून घ्यावी लागते. त्यानुसार मग तुमचे सीन्स, तुमचे संवाद अड्जस्ट केले जातात. जर तुम्ही मोठे कलाकार असाल, तर तुम्ही कॉन्ट्रॅक्ट साइन करताना आपल्या विविध अटी लावू शकतात की, मी सकाळी 9 ते रात्री 9 काम करेल. रात्री काम करणार नाही.

परंतु अनेक Marathi Serial TRP नवख्या कलाकारांना या अटी घालण्याची मुभा नसते. त्यांना तर काम हवं असतं, त्यामुळे त्यांना निर्माते आणि दिग्दर्शक यांच्या मर्जीनेच काम करावं लागतं.

एकूणच कोणत्याही क्षेत्रात यश मिळवायचं असेल, तर सुरुवातीला थोडाफार त्रास सहन करावा लागतोच. मनोरंजनविश्वाचं हे सत्य आहे. आपल्याला टेलिव्हिजनच्या पडद्यावर किंवा सोशल मीडियावर हे कलाकार जितके सुखी, चकचकीत आणि आनंदी दिसतात. खऱ्या आयुष्यात मात्र त्यांचा तेवढाच मोठा स्ट्रगल, तेवढेच जास्त कष्ट करावे लागतात.

खराब मालिकेचं खापर कलाकारांवर फोडलं जातंय

सध्या Marathi Serial TRP टीव्हीवर अशा अनेक मालिका सुरू आहेत. ज्या पाहून प्रेक्षकांचा राग अनावर होतोय. प्रेक्षक या मालिकेत काय सुरू आहे ? असा विचार करून चिडतात. तेव्हा मालिकेत दिसणाऱ्या कलाकारांवरच टीका केली जाते. त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केलं जातं. परंतु कलाकारांना फक्त अभिनय करण्याची मुभा असते. मालिकेत काय दाखवलं जाईल, कोणते सिन्स असतील, डायलॉग कसे असतील, गोष्ट कशी असेल, हे काही कलाकारांना ठरवता येत नाही. निर्माता, दिग्दर्शक चैनलच्या हातात हे सगळं असतं.

एकूणच सध्या मराठी मालिका Marathi Serial TRP विश्वाला सुगीचे दिवस आले आहेत. अनेक हिंदी मालिकाएवढी लोकप्रियता मराठी मालिकांना, मराठी कलाकारांना मिळत आहे. परंतु त्यामुळे प्रेक्षकांच्या अपेक्षांवर खरं उतरण्याचं ओझं सुद्धा वाढलंय. त्यामुळे कलाकारांना आणि मालिकेच्या सेटवर काम करणाऱ्या तंत्रज्ञांना रात्रंदिवस मेहनत करावी लागते.

आता हा प्रत्येकाचा विषय आहे की, त्याला कोणत्या वातावरणात आणि किती काम करायचंय.

तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं मराठी मालिका विश्वाविषयी Marathi Serial TRP आणि आता ही माहिती जाणून घेतल्यानंतर तुम्हालाही वाटतं का अनेक गोष्टींचं नियमन केलं जाण्याची गरज आहे, नक्कीच कमेंट करुन सांगा.

आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.

खूप खूप धन्यवाद !