Marathi Love Story प्राची गाढ झोपलेली असते. अचानक तिचा डोळा उघडतो. पाणी पिण्यासाठी ती उठून बसते. तर तिच्या शेजारी तिचा नवरा अवधूत नसतो.
प्राचीला वाटतं, अवधूत बाथरूममध्ये असेल. त्यामुळे ती आपला मोबाईल वापरत बसते. पहाटेचे तीन वाजलेले असतात. मोबाईल वापरता वापरता पंधरा मिनिट निघून जातात. अजूनही अवधूत बाथरूमबाहेर येत नाही. त्यामुळे प्राची त्याला हाक मारते. “अवधूत ये ना लवकर”.
Marathi Love Story
परंतु बाथरूममधून काही ओ येत नाही. त्यामुळे प्राचीला शंका येते आणि ती बाथरूमचा दरवाजा लोटून पाहते, तर तेथे कोणीही नसतं. अवधूत येथे नाही, तर बाहेर बसलेला असेल, या विचाराने ती हॉलमध्ये येते. दुसरा बेडरम पाहते, बालकनीमध्येही पाहते. परंतु अवधूत कोठेही नसतो.
Marathi Love Story मध्यरात्री अवधूत कोठे गेला असेल, या विचाराने ती खूप घाबरते आणि लगेचचं त्याला फोन करते. अवधूत प्राचीचा फोन उचलतो. प्राची विचारते, “अवधूत कोठे आहेस ? तू एवढ्या मध्यरात्री कुठे गेलास ?” अवधूत सांगतो, “मला एक महत्त्वाचं काम होतं. येतो अर्ध्या तासात घरी.” असं म्हणून तो फोन कट करतो.
Marathi Love Story प्राचीला काही समजतचं नाही की, अवधूत मध्यरात्री का बाहेर गेलाय आणि त्यांनी काही कारणही नाही सांगितलं. प्राची हॉलमध्ये त्याची वाट पाहत बसते. अर्धा तास म्हणलेला अवधूत एक तासानंतर, साडेचार वाजता घरी पोहोचतो.
मराठी लव्ह स्टोरी
Marathi Love Story प्राची अवधूतचा विचारते, “कुठे गेला होतास एवढ्या मध्यरात्री ? खरं सांग मला.” अवधूत म्हणतो, “शांत हो प्राची. माझ्या एका मित्राला मेडिकल इमर्जन्सी आली होती. त्याच्या फॅमिलीमध्ये कोणीतरी आजारी पडलं होतं. म्हणून मदत करायला गेलो होतो.”
प्राची म्हणते, “इमर्जन्सी होती, तर सांगायचं ना मला. उठवायचं. तू नव्हतास तर मी किती घाबरले होते.” अवधूत म्हणतो, “दिवसभर काम करून तू शांत झोपी गेली होतीस. मला वाटलं, तू उठेपर्यंत मी येऊन जाईल. तशी तू एकदा झोपली की, मध्ये उठत नाहीस ना, म्हणून नाही उठवलं तुला.”
Marathi Love Story प्राची अवधूतला मिठी मारते आणि म्हणते, “किती घाबरले होते मी.” अवधूत विचारतो, “का, तुला काय वाटलं ? मी माझ्या दुसऱ्या बायकोकडे गेलो की काय मध्यरात्री.” प्राची अवधूतला जोरात चापट मारते आणि म्हणते, “खबरदार पुन्हा असं कधी बोललास तर. आणि मला तसंही माहित आहे, एवढी सुंदर बायको सोडून तू कुठेही जाणार नाहीस.”
Marathi Love Story अवधूत म्हणतो, “एकदम बरोबर ओळखलस. चल आता झोपायला.” दोघे बेडरूममध्ये येतात. अवधूत म्हणतो, “पुढील काही दिवस मला हॉस्पिटलमध्ये जावं लागेल. माझा मित्र एकटाचं आहे ना. पेशंटची काळजी घ्यायला तिथे कोणी नाहीये.” प्राची म्हणते, “ठीक आहे. पण लवकर येत जा.” अवधूत हो म्हणतो आणि दोघेही झोपी जातात.
Marathi Love Story या रात्रीनंतर अवधूत पुढील काही दिवस रोज रात्री बाहेर जायचा. परंतु प्राचीला कधी त्याच्यावर शंका नाही आली. या घटनेला जवळपास पंधरा दिवस उलटून गेले आणि अशाचं एका मध्यरात्री पुन्हा एकदा प्राचीचा डोळा उघडला. तर तिच्या शेजारी अवधूत नव्हता.
Marathi Love Story यावेळेस मात्र प्राचीला शंका आली. कारण पंधरा. तिने अवधूतला फोन नाही केला आणि हॉलमध्ये बसून अवधूतची वाट पाहू लागली.
अवधूत घरी येतो. दरवाजा उघडतो आणि दिवे चालू करतो. तर त्याला हॉलमध्ये प्राची बसलेली दिसते. प्राचीला अचानक पाहून तो चांगलाच दचकतो. प्राची त्याला विचारते, “काय झालं अवधूत, तुला इतकं दचकायला ? चोरी करून आलास का ?”
Marathi Love Story अवधूत म्हणतो, “मी कशाला करेल चोरी ? असं का विचारतेस ? मी माझ्या मित्राकडे गेलो होतो. सांगितलं ना तुला.” प्राची विचारते, “तुझ्या मित्राचा पेशंट, तर आठ दिवसापूर्वीचं घरी आलं ना. मग तू आता घरी सुद्धा त्याची काळजी घ्यायला जातोस का ?”
अवधूत म्हणतो, “नाही तो मित्र नाही, दुसरा मित्र. त्यालाही माझी गरज होती, म्हणून मी गेलो होतो.” प्राची विचारते, “असे कोणते मित्र आहेत तुझे, ज्यांना अशी मध्यरात्री गरज असते ? अवधूत मला खरं खरं सांग. नाहीतर मी आत्ताच बाबांना फोन करते. आई-बाबांना येथे बोलावून घेते आणि मग त्यांच्या समोरचं खऱ्याचं खरं आणि खोट्याचं खोटं होईल.”
मराठी प्रेमकथा
Marathi Love Story अवधूत खूप घाबरतो आणि प्राचीला म्हणतो, “कशाला पराचा कावळा करतेस, एवढ सिरीयस काही नाही. माझ्यावर विश्वास ठेव. मी काही चुकीचं करत नाहीये.” प्राची म्हणते, “तू काही चुकीचं करत नाहीये ना. मग खोटं कशाला बोलतोस ? मला खरं खरं सांग, कुठे गेला होतास आणि कशासाठी गेला होतास ? कोणाकडे गेला होतास ?”
अवधूत म्हणतो, “ठीक आहे, मी तुला सगळं खरं खरं सांगतो. पण मी जे सांगेल ते एकदम खरं असेल त्यावर अविश्वास दाखवू नको आणि घाबरू नकोस. सगळं नीट होईल.” प्राची म्हणते, “एकदा तू मला सांग. मी ठरवेल, की त्यावर विश्वास ठेवायचा की नाही”.
Marathi Love Story अवधूत प्राचीला आपल्या मोबाईलमध्ये आलेला कंपनीचा ईमेल दाखवतो आणि सांगतो, “हे पहा, मला एक महिन्यापूर्वी ही नोटीस आली आहे. आमच्या कंपनीतून खूप साऱ्या लोकांना काढताय आज त्यामध्ये मीही आहे.”
आपल्या नवऱ्याची नोकरी जातेय, हे समजल्यावर प्राचीला धक्काच बसतो. प्राची विचारते, “असं कसं झालं आणि तुझी नोकरी जाण्याचा आणि मध्यरात्री बाहेर जाण्याचा काय संबंध आहे? तू दारू वगैरे तर नाही पिऊ लागलास ना ?”
Marathi Love Story अवधूत म्हणतो, “आधी मी काय सांगतो, ते ऐकून घे. प्राची मी मागील पंधरा दिवसांपासून नवीन नोकरी शोधण्याचा प्रयत्न करतोय. परंतु मार्केटमध्ये कंडिशन खूप वाईट असल्यामुळे, मला दुसरी नोकरी नाही मिळतेय. तर मी तोपर्यंत विचार केला की, आपल्या मागे खर्च खूप आहेत, या घराचा हप्ता, गाडीचा हप्ता, आपल्या जगण्यासाठी लागणारे पैसे, तर त्यासाठी एका मित्राने मला टॅक्सी चालवण्याचा विचार सुचवला.
Marathi Love Story मला माहित होतं, हे तुला आवडणार नाही. पण नोकरी मिळेपर्यंत, काही दिवस हे करायला काहीही हरकत नाही. तसंही मला गाडी चालवायला आवडते. या विचाराने मी हे करायचं ठरवलं.
सुरुवातीला महिनाभर मला नाईट ड्युटी करायची होती. तेही फक्त चार तास. म्हणून मी रात्री बारा ते चार जात होतो. यानंतर मला मॉर्निंग ड्युटी करायची आहे. जर ही नाईट ड्युटी निघून गेली असती, तर तुझ्या लक्षातही आलं नसतं. म्हणून मी तुला काही सांगितलं नाही.”
Marathi Love Story अवधूत आपल्या नवीन कामाचे फोटोही तिला दाखवतो आणि आपण काय काम करतोय, याबद्दलही माहिती सांगतो. तेव्हा कुठे प्राचीचा त्याच्यावर विश्वास बसतो आणि तिच्या मनातील दुसऱ्या मुलीविषयीचा संशय जातो.
प्राची अवधूतला म्हणते, “सॉरी अवधूत, मी तुझ्यावर संशय घेतला. अभिमान वाटतोय मला तुझा. तू कधीही हा मानत नाहीस आणि मी उगाचं तुझ्यावर संशय घेतला. सॉरी.” असं म्हणून ती अवधूतला पुन्हा एकदा मिठी मारते. अवधूत म्हणतो, “आता तूच सांग. इतकी सुंदर आणि गोड बायको असताना, मी दुसऱ्या मुलीचा विचार तरी करू शकतो का ?”
Marathi Love Story प्राची खूप लाजते. दोघेही खुश होतात. मैत्रिणींनो आणि मित्रांनो कशी वाटली तुम्हाला आजची कथा. नक्कीचं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि अशाचं नवीन नवीन कथांसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !