Marathi Actresses Settled In Foreign आपण सगळे नेहमीचं मराठी चित्रपट, मराठी मालिका आणि मराठी नाटक पाहत असतो. त्यातल्या त्यात एखादी मराठी मालिका आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनते. त्यात काम करणारे कलाकार आपले फेवरेट होतात. परंतु ही मालिका संपल्यानंतर अनेक दिवस हे कलाकार आपल्याला दिसत नाहीत आणि कधी कधी याचं कारण खूप वेगळं असतं. आज आम्ही तुम्हाला अशाच 3 प्रसिद्ध मराठी अभिनेत्रींविषयी सांगणारा आहोत. ज्यांनी एकेकाळी मराठी टेलिव्हिजनचा पडदा गाजवला. परंतु आता त्या भारत देशात राहत नाही. त्या कायमच्या विदेशात स्थायिक झाल्या आहेत.
Marathi Actresses Settled In Foreign
या लिस्टमध्ये सर्वात पहिला नंबर लागतो अभिनेत्री मृणाल दुसानीस हिचा. माझ्या प्रियाला प्रित कळेना, या मालिकेतून घराघरात पोहोचलेली सर्वांची लाडकी बनलेली अभिनेत्री म्हणजे मृणाल दुसानिस. या मालिकेनंतर तिने तू तिथे मी, असं सासरं नको ग बाई आणि हे मन बावरे या प्रसिद्ध मालिकांमध्ये काम केलं.
हे मन बावरे या मालिकेच्या दरम्यानचं तिचं लग्न नीरज मोरे या अमेरिकेतील सॉफ्टवेअर इंजिनियरशी झालं आणि लॉकडाऊनआधी ती अमेरिकेला निघून गेली. सध्या तिला नूरवी नावाची एक गोंडस मुलगी आहे आणि ती नवऱ्याबरोबर अमेरिकेतचं स्थायिक झालीये. प्रेक्षक तिला खूप मिस करतात. परंतु आता ती भारतात परत आली आहे आणि लवकरचं अभिनय करताना दिसणार आहे.
या प्रसिद्ध अभिनेत्री विदेशात झाल्या स्थायिक
या लिस्टमध्ये दुसरे नाव आहे, नेहा गद्रे या अभिनेत्रीचं. मन उधान वाऱ्याचे या मालिकेतून ती खूप प्रसिद्ध झाली होती. त्याचबरोबर मोकळा श्वास या चित्रपटातील तिची भूमिकासुद्धा सर्वांनाच आवडली होती. परंतु लग्नानंतर सध्या ती ऑस्ट्रेलिया या देशात स्थायिक झाली आहे आणि तिने नवीन क्षेत्रात करिअरसुद्धा सुरू केलं आहे.
या लिस्टमध्ये तिसरा नंबर लागतो उमा पेंढारकर या अभिनेत्रीचा. तिने स्वामिनी या मालिकेतून कला विश्वात पदार्पण केलं होतं आणि त्यानंतर अग्गबाई सुनबाई या मालिकेत ती मुख्य भूमिकेत दिसून आली होती. परंतु ही मालिका संपल्यानंतर तिचा नवरा ऋषिकेश न्यूझीलंडमध्ये स्थायी झाला. नवऱ्याबरोबर उमाही भारत देश सोडून न्यूझीलंडमध्ये स्थायिक झाली आहे.
सध्या ती तेथे एक youtube चॅनल चालवते आणि Marathi Actresses Settled In Foreignया माध्यमातून आपल्या आयुष्याशी निगडित अपडेट्स ती फॅन्सला देत असते.
तर यापैकी तुमची फेवरेट अभिनेत्री कोण होती ? तुम्ही कोणाला मिस करतात, Marathi Actresses Settled In Foreign नक्कीच कमेंट करुन सांगा आणि अशाच नवीन नवीन आणि इंटरेस्टिंग माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीच वाचा.
खूप खूप धन्यवाद !