लग्नाच्या 1 वर्षानंतर मराठी अभिनेत्री शरयू सोनावणेने केला लग्नाचा खुलासा

अभिनेत्री शरयू सोनावणेने केला लग्नाचा खुलासा  

अभिनेत्री शरयू सोनावणेने केला लग्नाचा खुलासा. लोकप्रिय अभिनेत्री शरयू सोनावणे हिने नुकतंच आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून लग्नाचे फोटो शेअर करत सर्वांना सुखद धक्काच दिला आहे. आज आपण अभिनेत्री शरयू सोनावणेच्या खऱ्या आयुष्यातील नवऱ्याविषयी जाणून घेणार आहोत.

अभिनेत्री शरयू सोनावणेने केला लग्नाचा खुलासा  

अभिनेत्री शरयू सोनावणे ही ‘पिंकीचा विजय असो’ या मालिकेतील पिंकीच्या भूमिकेमुळे खूप लोकप्रिय झाली. पण तिने अचानक ही मालिका सोडली आणि आपण साखरपुडा केल्याची बातमी फॅन्ससोबत शेअर केली. शरयूने ‘जयंत लाडे’ सोबत 19 सप्टेंबर 2023 ला साखरपुडा केला होता. तिने आपल्या साखरपुड्याचे फोटो शेअर केले होते आणि यासोबत लिहलं होतं की, आयुष्यभरासाठी एका व्यक्तीला मी त्रास देण्याचं ठरवलं आहे. हॅपी अँड एंगेज्ड. गणपती बाप्पा मोरया.

Sharayu Sonawane Marriage
Sharayu Sonawane Marriage

अभिनेत्री शरयू सोनावणेने केला लग्नाचा खुलासा जयंत लाडे हा मराठी चित्रपट निर्माता आहे. त्याने अभिनेता उमेश कामत, पुष्कर श्रोत्री, स्पृहा जोशीच्या ‘अ पेईंग घोस्ट’ या चित्रपटाची निर्मिती केली होती. यासोबतच त्याने प्रवीण तरडे, उपेंद्र लिमये, संजय जाधव, भारत गणेशपुरे यांच्या ‘सूर सपाटा’ या चित्रपटाची निर्मिती केली होती. या चित्रपटात शरयू सोनावणेसुद्धा महत्वपूर्ण भूमिकेत होती.

Marathi Actress Sharayu Sonawane Marriage  

शरयूने त्यावेळेस फक्त आपल्या साखरपुड्याचे फोटो शेअर केले होते. त्यामुळे सर्वांना असंच वाटलं होतं की, तिचा फक्त साखरपुडाच झालाय. पण आता शरयूने आपल्या लग्नाचे फोटोसुद्धा शेअर केलेत, त्यामुळे सर्वांना तिचं लग्नही झाल्याचं समजलंय.

लग्नाचा वाढदिवस असल्याचं निमित्त साधून शरयूने तिच्या लग्नाचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केलेत आणि यासोबतच लिहलंय की, आपल्या अविस्मरणीय आठवणींचे 365 दिवस, वचनबद्धता आणि अंतहीन प्रेम, आमच्या सुंदर प्रवासाचं 1 वर्ष साजरं करतोय. या फोटोमध्ये शरयू पांढऱ्या रंगाच्या डिझायनर साडीत आणि तिचा नवरा पांढऱ्या रंगाच्या शेरवानीत दिसून येतोय.

Sharayu Sonawane Husband
Sharayu Sonawane Husband

पण लग्नासाठी या दोघांनी मराठमोळा पारंपरिक लूक केला होता. शरयूने आपल्या लग्नामध्ये लाल रंगाची पैठणी साडी आणि त्यावर हिरव्या रंगाचा शेला, भरजरी दागिने, हिरवा चुडा घातला होता. तर तिच्या नवऱ्याने पांढरा कुर्ता, त्यावर लाल रंगाचा शेला, लाल रंगाचं धोतर आणि डोक्यावर टोपी असा लूक केला होता.

पारू मालिकेतील या अभिनेत्याने सोडली मालिका

अभिनेत्री शरयू सोनावणेने केला लग्नाचा खुलासा. अभिनेत्री शरयू सोनावणेच्या लग्नाचे फोटो पाहून सर्वांना सुखद धक्काच बसला आहे. तिचे सहकलाकार आणि फॅन्सदेखील खूपच खुश झाले आहेत. शरयूने शेअर केलेल्या फोटोंवर तिच्या फॅन्ससोबतच अनेक कलाकारांनीही तिला लग्नाच्या वाढदिवसाच्या आणि पुढील आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.

शरयू सोनावणे लग्न
शरयू सोनावणे लग्न

अभिनेत्री शरयू सोनावणे सध्या झी मराठी वाहिनीवरील ‘पारू’ या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसतेय. तिची ही भूमिकासुद्धा प्रेक्षकांना फारच आवडतेय.

मनोरंजनविश्वातील अशाच नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला नक्की फॉलो करा. 

तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद ! 

Scroll to Top