प्रथमेश परबचे वडील सायकल चालवतात. प्रथमेश परब हे नाव घेतलं की, दगडू आणि टाईमपास आठवतात. अभिनेता प्रथम परबने बालक पालक, टाईमपास, 35 % काठावर पास आणि दृश्यम सारख्या चित्रपटात मनोरंजन विश्वात आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलंय.
काही महिन्यांपूर्वी त्याने त्याची गर्लफ्रेंड क्षितिजा घोसाळकरशी लग्न करून प्रेक्षकांना आनंदाचा धक्का दिला होता. आता मात्र त्याची एक मुलाखत सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होतेय. या मुलाखतीत प्रथमेशने एक मोठा खुलासा केला आहे.
प्रथमेश परबचे वडील सायकल चालवतात
प्रथमेशने सांगितलं की तो आज प्रसिद्ध आहे, अभिनेता बनलाय परंतु आजही त्याचे वडील सायकलवरूनचं कामावर जातात. त्यामुळे त्यांचं आरोग्य आजही खूप चांगलं आहे. माझ्या बाबांनी याच सायकलवर मला सायकल कशी चालवायची हे शिकवलं होतं.
त्यानंतर मी शाळेत सुद्धा सायकलवरचं जायचो. प्रथमेशने आपल्या फॅन्सला एक आवाहनही केलंय. तो म्हणाला की, आज अनेक मुलांना शाळेत जाण्याची ईच्छा आहे. परंतु शाळा त्यांच्या घरापासून दूर असल्याने आणि कोणतंही वाहन नसल्याने शाळेत जाण्यात त्यांना अडचणी येतात.
अशा मुलांसाठी जुन्या किंवा नवीन सायकल दान करण्याचं आवाहन त्याने केलंय. सायकल कोणाला दान करायची याबद्दलही त्याने माहिती सांगितलीये. एकूणच प्रथमेश परब त्याची सामाजिक जबाबदारीही ओळखून आहे, एवढं मात्र नक्की.
प्रथमेशने थोड्याचं कालावधीत मनोरंजन विश्वात जी झेप घेतलीये, ती सर्वाना आश्चर्यचकित करणारी आहे. नाटकापासून सुरू झालेला त्याचा प्रवास आज बॉलीवूडपर्यंत पोहोचलाय. अजय देवगणच्या दृश्यम चित्रपटातील त्याची भूमिका भाव खाऊन गेली होती.
श्रेया बुगडे दिसणार या नवीन कार्यक्रमात
प्रथमेश परबचं खरं नशीब बदललं ते रवी जाधव दिग्दर्शित टाईमपास या चित्रपटाने. चित्रपटात त्याने दगडू शांताराम परब ही भूमिका साकारली होती. प्राजु आणि दगडूची प्रेमकहाणी प्रेक्षकांना खूप आवडली होती. चित्रपटातील कलाकारांची कामं, चित्रपटाची गाणी, डायलॉग हे सगळंच प्रेक्षकांना तुफान आवडलं होतं.
प्रथमेश परब हा सोशल मीडियावर देखील खूप लोकप्रिय आहे. तो आपल्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्याबद्दल नेहमीचं सोशल मीडियावर शेअर करत असतो. त्याच्या लग्नाची बातमीही फॅन्सला सोशल मीडियावर समजली होती.
एकूणचं प्रथमेश परब आज कितीही मोठा स्टार असला तरी त्याच्या कुटुंबाने साधेपणा जपलाय, एवढं मात्र नक्की.
तर तुम्हाला आवडतो का प्रथमेश परब ? नक्कीचं कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !