Mansoon Places Near Pune पावसाळ्यात भेट द्या पुण्याजवळील या 3 निसर्गरम्य तलावांना

Mansoon Places Near Pune

Mansoon Places Near Pune पावसाळा सुरू झाला आहे आणि तुम्हाला जर अशा एखाद्या शांत ठिकाणी या पावसात फिरायला जाण्याची इच्छा असेल, जिथे तुम्ही बोटिंग करू शकता. कॅम्पिंग करू शकता. शांततेचा अनुभव घेऊ शकता. तर आज आम्ही तुमच्यासाठी पुण्याजवळ असलेल्या काही तलावांबद्दल माहिती घेऊन आलो आहोत. जेथे तुमचा वीकेंड खूप छान जाईल. तर चला आज या ठिकाणांबद्दल जाणून घेऊया.

Mansoon Places Near Pune

मुळशी तलाव : पुण्यापासून 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या मुळा नदीवर जे मुळशी धरण आहे, त्या धरणामुळे मुळशी तलाव तयार झाला आहे. पक्षांचे माहेरघर असलेला हा मुळशी तलाव पक्षी प्रेमींसाठी पक्ष्यांच्या अध्ययनासाठी खूप योग्य आहे. ज्यांना तलावाच्या काठी बोटिंग करायचंय, कॅम्पिंग करायचंय, त्यांच्यासाठीही हा तलाव आदर्श आहे. तसंच ट्रेकिंग करण्याची इच्छा असलेल्यासाठीही येथे सह्याद्रीच्या पाऊलखुणा आहेत.

Mansoon Places Near Pune
Mansoon Places Near Pune

पवना तलाव : जर मुळशी तलावावर तुम्ही अनेक वेळेस जाऊन आला आहात आणि तुम्हाला अजून एखादा ऑप्शन हवा असेल, तर पवना तलाव तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय असू शकतो. पुण्यापासून 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या पवना धरणामुळे तयार झालेला पवना तलाव पावसाळ्यात आणखीनचं सुंदर दिसतो.

पावसाळ्यात लोणचं खराब होऊ नये म्हणून करा हे उपाय

ज्या लोकांना तलावाकाठी कॅम्पिंग करायचंय, त्यांच्यासाठी तर पवना तलाव अगदी योग्य आहे. येथे अनेक कॅम्पिंग ऑप्शन्स आहेत, येथे तुम्ही कॅम्पिंगचा आनंद घेऊ शकता. बोन फायर आणि मासेमारीसारख्या ऍक्टिव्हिटीजही करू शकतात. तसंच ज्यांना ट्रेकिंग करायची आहे, त्यांच्यासाठीही येथे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. लोहगड, तिकोना आणि तुंग या ऐतिहासिक किल्ल्यांच्या ट्रेकिंगच्या संधी येथे उपलब्ध आहेत.

Mansoon Places Near Pune
Mansoon Places Near Pune

शिवसागर तलाव : पुण्यापासून 150 किलोमीटरवर असलेल्या कोयना धरणामुळे तयार झालेला शिवसागर तलाव पावसाळ्यात अनेक पर्यटकांना खुणावत असतो. ज्या लोकांना घनदाट जंगलांनी वेढलेला आणि डोंगरवाटा जवळ असलेला तलाव पाहण्याची इच्छा आहे. त्यांच्यासाठी तर शिवसागर तलाव एकदम उत्तम ऑप्शन आहे. येथे तुम्ही वॉटर स्पोर्ट म्हणजेच बोटिंग आणि वॉटर स्कूटरचाही आनंद घेऊ शकतात. त्याच प्रकारे ज्यांना पक्ष्यांची आवड आहे, त्यांना येथे विविध पक्षांचे दर्शन होऊ शकतं.

Mansoon Places Near Pune
Mansoon Places Near Pune

तर या पावसाळ्यात एखाद्या अशाच नवीन रम्य शांत तलावाला भेट देण्याची तुमची इच्छा आहे का ? आणि तुम्ही यापैकी कोणता ऑप्शन निवडाल ? नक्कीचं कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीच वाचा.

खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top