Malaidar Lassi Marathi Recipe 2024
Malaidar Lassi Marathi Recipe 2024 एप्रिल महिना सुरू झालाय आणि भयंकर कडक उन्हाळाही सुरू झालाय. जबरदस्त कडाक्याच्या उन्हामुळे आपल्या जीवाची अगदी लाही लाही होतेय. हवेतील उष्णतेमुळे प्रत्येकाचा गळा कोरडा पडतोय त्यामुळे सगळेच पाणी आणि इतर थंड पेय पिऊन आपलं शरीर थंडगार ठेवण्याचा प्रयत्न करताय. थंडगार पाणी, कोल्ड्रिंक्स, ताक, लस्सी, ज्यूस, फालुदा, लिंबू पाणी असे अनेक थंड पेय सगळेजण पिताना दिसताय.
थंड पेय पिण्यासाठी हॉटेलमध्ये तसेच रस्त्याच्या कडेला असणाऱ्या गाड्यांवर अनेकजण गर्दी करताना दिसताय.
पण कोल्ड्रिंक्स आणि बाहेरची घातक पेय पिण्यापेक्षा आपण घरच्याघरी थंडगार आणि शरीरासाठी आरोग्यदायी असे खूप सारे पदार्थ बनवू शकतो. आपण ताक, लस्सी, लिंबू पाणी, ज्यूस असं खूप काही घरीच बनवू शकतो.
त्यातल्या त्यात मलाईदार लस्सी ही तर सर्वांचीच खूप फेव्हरेट आहे. थंडगार मलाईदार लस्सी पिल्यानंतर उन्हाचा सगळा थकवा निघून जातो आणि एकदम फ्रेश वाटतं. लस्सी पिण्याचे शरीराला असंख्य फायदेसुद्धा आहेत. घरच्या घट्टसर फ्रेश दहीपासून बनलेल्या लस्सीची टेस्ट काही वेगळीच असते.
आज आम्ही तुमच्यासाठी अगदी सोप्यात मलाईदार लस्सी Malaidar Lassi Marathi Recipe 2024 घरच्याघरी बनवण्याची रेसिपी घेऊन आलो आहोत. तुम्ही ही रेसिपी नक्कीच एकदा बनवून पहा.
मलाईदार लस्सी बनवण्यासाठी लागणारं साहित्य :
मलाईदार लस्सी Malaidar Lassi Marathi Recipe 2024 बनवण्यासाठी काय साहित्य लागतं ते आपण पाहूया.
- 2 कप दही
- अर्धा कप साखर
- 3-4 वेलची
- अर्धा कप दूध
- 2 चमचे दुधाची साय
- काजू, बदाम, पिस्ताचे बारीक काप
- थोडंसं मीठ
- 2 आईस्क्रीम कप
मलाईदार लस्सी बनवण्याची कृती :
- मलाईदार लस्सी Malaidar Lassi Marathi Recipe 2024 बनवायला आपण सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपल्याला अर्धा कप साखर घ्यायचीय. ही साखर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची आणि वरून 3-4 वेलची साल काढून टाकायची आणि ही साखर मिक्सरमध्ये वाटून घ्यायची. वेलची घातल्यामुळे खूप छान सुगंध येतो. ही आपण बाजूला ठेवूया.
- लस्सी बनवण्यासाठी आपण 2 कप दही घेऊया. हे दही एका डब्यात टाकून 2 तास फ्रीजरमध्ये ठेवायचं कारण आपण लस्सीमध्ये बर्फाचा वापर करणार नाही तर थंडगार दह्याचा वापर करणार आहोत. यामुळे लस्सी घट्ट आणि थंडगार होते. बर्फ टाकल्यामुळे आपल्या लस्सीला थोड्यावेळाने पाणी सुटतं आणि ती पातळ होते.
- आपलं दही एकदम गाढं आहे. असंच दही आपल्याला लस्सी बनवण्यासाठी घ्यायचं आहे. हे दही आपल्याला गोलाकार मोठ्या भांड्यात काढून घ्यायचंय. हे दही रवीने चांगलं फेटून घेऊया. यामध्ये आपल्याला अर्धा कप दूध घालायचंय. मिक्सरमध्ये वाटून घेतलेली साखर यात टाकूया. हे सगळं आपल्याला रवीने मिक्स करून घ्यायचंय.
- तुम्हाला जर लस्सी पातळ हवी असेल तर तुम्ही दूध जास्त वापरू शकता. पण लस्सी घट्ट हवी असेल तर थोडं दूध कमी टाकायचं.
- रवीने छान घुसळून घ्यायचं. यामध्ये साखरेचं प्रमाण हे आपलं दही किती आंबट आहे यावर अवलंबून असतं. दही जास्त आंबट असेल तर साखर जास्त लागेल. पण जर दही फ्रेश असेल तर साखर कमी लागेल. तुम्हाला लस्सी आंबट आवडते की गोड यावर तुम्ही साखरेचं प्रमाण घेऊ शकता.
- आपण अर्धा कप साखर वापरली आहे. रवीने हे सलग घुसळत राहायचं. आपली दाणेदार लस्सी बनतेय. यामध्ये आता थोडीशी दुधाची साय घालायची आणि मिक्स करून घ्यायचं. थोडेसे ड्रायफ्रूटस घालायचे आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचं.
- आता सर्वात शेवटी थोडंसं किंचित चवीपुरतं मीठ घालून मिक्स करायचं. मीठ आधी घालायचं नाही नाहीतर त्याला पाणी सुटतं.
आपली मलाईदार लस्सी Malaidar Lassi Marathi Recipe 2024 तयार झाली आहे. तुम्ही थोडीशी टेस्ट करू शकता म्हणजे काही त्यात टाकायचं असेल तर टाकू शकता. ही लस्सी आता तुम्ही सर्व्ह करू शकता.
यासाठी 2 काचेचे ग्लास घ्या. त्यात ही लस्सी ओतून घ्या आणि मार्केटमधून आणलेले 2 आईस्क्रीमचे कप घेऊन ही आईस्क्रीम लस्सीवर टाका. आता यावर काजू, बदाम आणि पिस्ताचे छोटे काप टाकून गारनिशिंग करून घ्या.
मलाईदार लस्सी Malaidar Lassi Marathi Recipe 2024, आईस्क्रीम आणि ड्रायफ्रूटस हे खूपच जबरदस्त कॉम्बिनेशन आहे. यामुळे लस्सीचा स्वाद अतिशय उत्तम लागतो. तुम्ही ही लस्सी घरच्यांना सर्व्ह करू शकता. सर्वांना ही लस्सी खूपच आवडेल.
लस्सीचे प्रकार
आपण आज साधी मलाईदार लस्सी Malaidar Lassi Marathi Recipe 2024 बनवली आहे पण लस्सीचे खूप सारे प्रकारसुद्धा असतात. आपण लस्सीचे प्रकार पाहूया.
- मँगो लस्सी
सध्या मार्केटमध्ये आंबे विकायला आलेले आहेत. रसरशीत आंब्याचा गर दह्यासोबत मिक्स करून तुम्ही ही मँगो लस्सी बनवू शकता. यामध्ये गोडपणासाठी थोडीशी साखर टाकू शकता. मँगो लस्सी सर्वांचीच खूप आवडती आहे.
- चॉकलेट लस्सी
चॉकलेट हे तर आपल्या सगळ्यांचंच अत्यंत फेव्हरेट आहे. अशात चॉकलेट लस्सी बनवली तर सगळ्यांनाच आवडेल. चॉकलेट लस्सी बनवण्यासाठी दह्यामध्ये तुम्ही चॉकलेटची पावडर किंवा चॉकलेटचं सिरप करून घालू शकता. चॉकलेटच्या फॅन्ससाठी ही लस्सी खूपच छान होईल.
- रोझ लस्सी
रोझ लस्सी बनवण्यासाठी दह्यामध्ये रोझ सिरप टाकायचं आणि रवीने मिक्स करून घ्यायचं. गोड होण्यासाठी यामध्ये तुम्ही साखर टाकू शकता. रोझ फ्लेवरमुळे ही लस्सी खूपच टेस्टी लागते.
- बनाना लस्सी
केळी ही आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते. बनाना लस्सी बनवण्यासाठी केळीचे तुकडे दह्यामध्ये मिक्स करतात आणि गोडपणा येण्यासाठी साखर टाकतात. ही बनाना लस्सी खूपच टेस्टी आणि तब्येतीसाठी उपयोगी असते.
- केशर लस्सी
केशर लस्सी बनवण्यासाठी केशरचे धागे दहीमध्ये मिसळतात आणि गोडपणासाठी यामध्ये साखर टाकू शकता. केशर टाकल्यामुळे ही लस्सी दिसायला आणि चवीलाही खूपच आकर्षक बनते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ही लस्सी तुम्हाला खूप ताजंतवानं बनवू शकते.
- स्ट्रॉबेरी लस्सी
स्ट्रॉबेरी हे अनेकांचं आवडतं फळ आहे. स्ट्रॉबेरीपासून अनेक प्रकारचे पदार्थ बनवले जातात. स्ट्रॉबेरीची लस्सी खूप चविष्ट बनते. स्ट्रॉबेरीचे काप करून दह्यामध्ये मिसळून ही लस्सी बनवतात. थोडीशी साखर मिसळून आपण ही लस्सी गोड बनवू शकतो.
- पुदिना लस्सी
पुदिन्याची पानं दहीसोबत मिक्स करून ही पुदिना लस्सी बनवली जाते. पुदिन्याच्या पानांसोबत जिरे, काळं मीठ, काळी मिरी हे मसालेसुध्दा दह्यात टाकून लस्सी बनवतात. पुदिन्यामुळे लस्सीला हिरवा रंग येतो तो दिसायला आणि चवीलाही खूप छान वाटतो. पुदिन्याचा थंडपणा आणि मलाईदार दही हे खूपच छान कॉम्बिनेशन आहे. ही लस्सी तुम्ही दुपारी किंवा संध्याकाळी पिऊ शकता.
- पाईनापल लस्सी
अननसाचे काप करून ते दहीमध्ये मिक्स करून ही पाईनापल लस्सी बनवली जाते. पाईनापल लस्सी चवीला मस्त आंबट गोड लागते. तुम्ही ही वेगळ्या प्रकारची लस्सी नक्की बनवून पहा.
Sakhar Amba Marathi Recipe 2024 | साखर आंबा रेसिपी
- बदाम लस्सी
बदाम हे आरोग्यासाठी खूपच पौष्टिक असतात. बदाम लस्सी बनवण्यासाठी बदामाची पेस्ट किंवा बदामाच्या दुधात दही मिसळतात. गोड बनवण्यासाठी तुम्ही साखर टाकू शकता. बदाम आणि दही मिळून ही लस्सी खूपच पौष्टिक आणि चवदार बनते.
- नारळ लस्सी
नारळाचं दूध किंवा नारळाचे तुकडे करून त्यात दही मिसळून ही लस्सी बनवली जाते. नारळ आणि दही मिळून ही खूपच उत्तम लस्सी बनते. ही टेस्टी लस्सी अत्यंत हेल्दी आहे.
- जिरे लस्सी
जिऱ्याचा वापर करून बनवलेली ही लस्सीसुद्धा खूपच उत्तम बनते. भाजलेले जिरे दह्यासोबत मिळसून ही जिरे लस्सी बनवली जाते. ही जिरे लस्सी अतिशय आरोग्यदायी आहे. तुम्ही कुटुंबियांना किंवा मग घरी आलेल्या पाहुण्यांना ही लस्सी प्यायला देऊ शकता.
या उन्हाळ्यामध्ये तुम्ही या सर्व वेगवेगळ्या फ्लेवरच्या लस्सी नक्कीच ट्राय करू शकता.
Important Recipe For Malaidar Lassi Marathi Recipe 2024
- लस्सी Malaidar Lassi Marathi Recipe 2024 बनवण्यासाठी दही डब्यात टाकून 2 तास फ्रीजरमध्ये ठेवायचं म्हणजे आपली लस्सी घट्ट बनते. बर्फ टाकल्यावर थोड्यावेळाने पाणी सुटतं आणि लस्सी पातळ होते.
- लस्सी पातळ हवी असेल तर दूध जास्त टाकू शकता पण लस्सी घट्ट हवी असेल तर दूध कमी टाकायचं.
- दही आंबट असेल तर साखर जास्त टाकायची आणि दही फ्रेश असेल तर साखर कमी लागेल. तुम्ही आवडीप्रमाणे साखर कमी जास्त करू शकता.
- किंचितसं मीठ सर्वात शेवटी घालायचं. आधी घालायचं नाही नाहीतर पाणी सुटतं.
तुम्ही या टिप्स वापरून मलाईदार लस्सी Malaidar Lassi Marathi Recipe 2024 अगदी सहज घरीच बनवू शकता.
FAQ’s About Malaidar Lassi Marathi Recipe 2024
- मलाईदार लस्सी (Malaidar Lassi Marathi Recipe 2024) कशी बनवली जाते ?
लस्सी ही दह्यापासून बनवली जाते. यामध्ये दही, साखर, वेलची, दूध, दुधाची साय, ड्रायफ्रूटस, मीठ, आईस्क्रीम या सर्व गोष्टी असतात. उन्हाच्या तडाख्यापासून ही थंडगार लस्सी आपलं संरक्षण करते आणि आपल्या शरीरात एनर्जी वाढवते.
- लस्सी पिल्याने काय फायदा होतो ?
लस्सी पिणं आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. लस्सीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं त्यामुळे अपचन, गॅस, ऍसिडिटीसारख्या समस्या दूर होतात. लस्सी पिल्यामुळे पचन चांगलं होतं आणि पोट चांगलं राहतं. हाडं मजबूत होतात, शरीरातील पाण्याची कमी दूर होते, शरीरातील एनर्जी वाढते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
आपली मलाईदार लस्सी Malaidar Lassi Marathi Recipe 2024 तयार आहे. ही टेस्टी लस्सी तुम्ही घरच्यांना सर्व्ह करू शकता आणि या कडक उन्हाळ्यात थंडगार लस्सीचा आस्वाद घेऊ शकता. ही लस्सी सर्वांना नक्कीच आवडेल. इतकी टेस्टी लस्सी अगदी सोप्यात जर घरीच बनत असेल तर मग बाहेरची लस्सी पिण्याची काहीच गरज नाही. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तर अशी लस्सी वारंवार बनवून प्यायला हवी कारण आपल्या शरीराला एनर्जीची भरपूर गरज असते. तुम्ही ही लस्सीची रेसिपी एकदा नक्कीच बनवून पहा.
तुम्हाला ही Malaidar Lassi Marathi Recipe 2024 रेसिपी आवडली का नक्कीच सांगा. अशाच टेस्टी नवनवीन रेसिपी शिकण्यासाठी आमचे दुसरे आर्टिकलसुद्धा नक्कीच वाचा.
तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.