Mahindra XUV 3XO भारतातील ऑटोमोबाईल मार्केट खूप कॉम्पिटिटिव्ह झालं आहे. काही वर्षांपूर्वी मारुती सुझुकी आणि ह्युंदाई यांसारख्या कंपन्यांचीचं या मार्केटवर चलती होती. परंतु आता भारतीय कंपन्या टाटा आणि महिंद्राने सुद्धा मार्केटमध्ये चांगलाचं जम बसवला आहे. त्यातल्या त्यात टाटाच्या गाड्या तर लोकांचा विश्वास जिंकताय आणि चांगला सेल करताय.
टाटाचं नशीब बदलणारी गाडी होती टाटा Nexon. ती लोकांना खूप आवडलेली. आताही दरमहा nexon ची मोठ्या प्रमाणात विक्री केली जाते. परंतु अवघ्या काही दिवसांपूर्वी महिंद्राने आपली नवीन गाडी Mahindra XUV 3XO लॉन्च केली आणि या गाडीची सुरुवातीची किंमत फक्त 7 लाख 49 हजार रुपये आहे. या गाडीची तुलना टाटा nexon शी होतेय. परंतु महिंद्राने या गाडीची किंमत nexon पेक्षा खूप कमी ठेवलीये.
Mahindra XUV 3XO
त्यामुळेचं की काय टाटाने लगेचचं nexon चं एक नवीन बेस वेरिएंट लॉंच केलंय. ज्याची किंमत फक्त 7 लाख 99 हजार रुपये आहे. तसंच टाटाने nexon च्या इतर व्हेरिअंटवर सुद्धा मोठी सूट दिली आहे. टॉप व्हेरिअंटवर तर चक्क 1 लाख रुपयांची सूट देण्यात आली आहे.
असं म्हटलं जात आहे की, मार्केटमध्ये आपली जागा कायम ठेवण्यासाठी आणि महिंद्राच्या नवीन गाडीला (Mahindra XUV 3XO) स्पर्धा देण्यासाठी टाटाने nexon च्या किमती कमी केल्या आहेत. मागील काही वर्षात टाटा आपल्या गाडीच्या NCAP फाइव स्टार रेटिंग आणि मजबुतीमुळे चांगली चर्चेत आहे. Tata ने गाडीच्या डिझाईनमध्ये सुद्धा अनेक बदल घडवून आणले आहेत. त्याचबरोबर इलेक्ट्रिक गाड्या सुद्धा लॉन्च केल्या आहेत.
Tata Nexon Prices Slashed
त्यामुळे सध्या टाटा ही भारतातील दुसरी सर्वात मोठी ऑटोमोबाईल कंपनी आहे. त्या खालोखाल महिंद्रानेसुद्धा आता अनेक नवीन गाड्या लॉन्च करण्याचा निर्णय घेतलाय. त्यांच्या इलेक्ट्रिक गाड्या सुद्धा बाजारात येणार आहेत. म्हणजे टाटा आणि महिंद्रा या दोन भारतीय कंपन्यांमध्ये येत्या काही दिवसात चांगलीचं कॉम्पिटिशन पाहायला मिळेल, एवढे मात्र नक्की.
तर तुम्हाला कोणत्या कंपनीच्या गाड्या आवडतात टाटा की महिंद्रा ? नक्कीचं कमेंट करून सांगा आणि अशाचं नवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !