Mahila Samman Bachat Patra Yojana | महिला सन्मान बचत पत्र योजना

Mahila Samman Bachat Patra Yojana

Mahila Samman Bachat Patra Yojana

Mahila Samman Bachat Patra Yojana ज्या देशातील महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत, त्या देशाची अर्थव्यवस्था सक्षम आहे असं म्हटलं जातं. भारतीय अर्थव्यवस्था जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या पाच अर्थव्यवस्थापैकी एक आहे आणि या अर्थव्यवस्थेच्या वाढीत भारतातील महिलांना समाविष्ट करून घेण्यासाठी भारत सरकारने एक नवीन योजना आणली आहे.

भारताच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2023 – 2024 या आर्थिक वर्षाच्या बजेटमध्ये (Mahila Samman Bachat Patra Yojana) महिला सन्मान बचत पत्र योजना जाहीर केली आहे. ही योजना भारतीय पोस्टअंतर्गत चालवली जाईल आणि महिला या योजनेत एक रकमी पैसे गुंतवून चांगला परतावा मिळवू शकतात. मग आता ही महिला सन्मान बचत पत्र योजना नेमकी आहे काय ? या योजनेत सहभागी होण्यासाठी अटी काय आहेत ? महिला सन्मान बचत पत्र योजनेत किती रक्कम गुंतवावी लागेल ? Mahila Samman Bachat Patra Yojana कोण कोणती कागदपत्रे लागतील ? आज आपण त्याबद्दलचं जाणून घेणार आहोत.

महिला सन्मान बचत पत्र योजनेची उद्दिष्ट

भारतीय अर्थसंकल्प 2023 – 2024 मध्ये महिला सन्मान बचत पत्र योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेत भारतातील कोणतीही महिला स्वतःसाठी किंवा आपल्या मुलीसाठी पोस्टात महिला सन्मान बचत पत्र खरेदी करू शकते. या योजनेचा कालावधी दोन वर्षांचा ठराविक आहे. 2025 मध्ये ही योजना बंद केली जाईल.

महिला सन्मान बचत पत्र योजनेचे (Mahila Samman Bachat Patra Yojana) मुख्य उद्दिष्ट भारतीय महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवणं, अर्थव्यवस्थेत त्यांची भागीदारी वाढवणं हे आहे.

महिला सन्मान बचत पत्र योजनेत कशी गुंतवणूक करायची

या Mahila Samman Bachat Patra Yojana योजनेत गुंतवणूक करण्यासाठी संपूर्ण भारतातील कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये महिला सन्मान बचत पत्र योजना अकाउंट उघडता येईल. अकाउंट उघडणारी महिलाचं असायला हवी. फक्त भारतीय महिलांसाठी ही योजना सुरू करण्यात आलीये.

महिला सन्मान बचत पत्र योजनेत किती रक्कम गुंतवता येईल

सध्या भारत सरकारने महिला सन्मान बचत पत्र योजनेत गुंतवलेल्या रकमेची मर्यादा कमीत कमी 1000 ते जास्तीत जास्त 2 लाख रुपयांपर्यंत ठरवली आहे.

ही रक्कम दोन वर्षांसाठी तुम्हाला गुंतवावी लागेल. सध्या सरकार या योजनेवर 7.5% व्याजदर देत आहे.

महिला सन्मान बचत पत्र योजनेची वैशिष्ट्ये

1) भारतातील 1 लाख 59 हजार पोस्ट ऑफिसमध्ये या योजनेची सुरुवात झाली असून कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये महिला सन्मान बचत पत्र योजनेचं (Mahila Samman Bachat Patra Yojana) अकाउंट उघडू शकता.

2) भारत सरकारने सुरू केलेली ही एक छोटी बचत योजना असून यामध्ये बाजारपेठेतील चढ उतारांचा कोणताही फरक पडत नाही आणि तुम्हाला गुंतवलेल्या रकमेवर 7.5 टक्के व्याजदराने निश्चित परतावा मिळतो.

3) ही योजनेची मुदत 2 वर्षांसाठी असून तुम्हाला जर 2 वर्षांआधी जमा केलेली रक्कम काढायची असेल, तर त्यासाठी दोन पर्याय देण्यात आले आहेत.

हेही वाचा : Senior Citizen Savings Scheme | वरिष्ठ नागरिक बचत योजना माहिती

4) तुम्हाला जर या जमा केलेल्या रकमेतून ठराविक रक्कमचं काढायची असेल, तर एक वर्षानंतर तुम्ही 7.5% व्याजदर घेऊन 40% रक्कम काढू शकता.

5) परंतु तुम्हाला जर संपूर्ण गुंतवलेली रक्कम काढायची असेल, हे अकाउंट बंद करायचं असेल, तर सहा महिन्यानंतर तुम्ही असंही करू शकता. पण त्यासाठी तुम्हाला 7.5% नाही, तर जमा केलेल्या रकमेवर फक्त 5.5% व्याजदर मिळेल.

6) भारतीय नागरिकत्व असलेली कोणतीही महिला या Mahila Samman Bachat Patra Yojana योजनेत रक्कम गुंतवू शकते. परंतु 18 वर्षे खालील मुलींसाठी त्यांची आई हे अकाउंट उघडू शकते.

महिला सन्मान बचत पत्र योजनेसाठी लागणारी कागदपत्रे

Mahila Samman Bachat Patra Yojana यासाठी खालीलप्रमाणे कागदपत्र आवश्यक आहेत.

1) अर्जदाराचं आधार कार्ड
2) अर्जदाराचं पॅन कार्ड
3) अर्जदाराचं राशन कार्ड
4) अर्जदाराचा मोबाईल नंबर
5) अर्जदार महिलेचा पासपोर्ट साईज फोटो

महिला सन्मान बचत पत्र योजनेचं अकाउंट कसं उघडायचं

1) जर तुम्हाला सरकारद्वारे सुरू केलेल्या या योजनेत अकाउंट उघडायचं असेल, तर तुमच्या जवळचं असलेल्या पोस्ट ऑफिसला भेट द्यावी लागेल.

2) पोस्ट ऑफिसमध्ये तुम्हाला महिला सन्मान बचत पत्र योजनेचा फॉर्म मिळेल. या फॉर्मवर जी माहिती भरण्यास सांगितली आहे, ती माहिती भरून तुम्हाला अर्ज पोस्ट ऑफिसमध्ये जमा करायचा आहे.

3) त्यानंतर या योजनेच्या (Mahila Samman Bachat Patra Yojana) अटीनुसार जी जी कागदपत्र आवश्यक आहेत, ती सदर अर्जाला जोडावी लागतात.

4) अर्ज आणि कागदपत्र जमा केल्यानंतर या योजनेच्या अटीनुसार कमीत कमी 1000 ते जास्तीत जास्त 2 लाख रुपयांपर्यंतची रक्कम तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये जमा करावी लागेल.

5) यानंतर तुम्हाला पोस्ट ऑफिसकडून तुम्ही महिला सन्मान बचत पत्र योजना सुरू केली आहे, याबद्दलची पावती मिळेल. पुढे तुम्हाला दोन वर्षानंतर हे पैसे परत मिळवण्यासाठी किंवा त्याआधी या योजनेतून पैसे काढण्यासाठी आणि अकाउंट बंद करण्यासाठी ही पावती जवळ असणं खूप गरजेचं आहे.

महिला सन्मान बचत पत्र योजनेचा फायदा

आता आपण पाहूया की, या Mahila Samman Bachat Patra Yojana योजनेत किती पैसे जमा केल्यावर तुम्हाला किती परतावा मिळू शकतो.

1) या योजनेअंतर्गत तुम्ही जर 1000 रुपये जमा केले, तर 7.5 टक्के वार्षिक व्याजदराने या योजनेच्या शेवटी दोन वर्षानंतर तुम्हाला 1160 रुपये परतावा मिळेल.

2) जर तुम्ही या योजनेत 1 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला 7.5 टक्के व्याजदराने 1 लाख 16 हजार 22 रुपये परतावा मिळेल.

3) महिला सन्मान बचत पत्र योजनेअंतर्गत 2 लाख रुपये गुंतवल्यास 2 वर्षानंतर 2 लाख 32 हजार 44 रुपये परतावा मिळेल.

सध्या अनेक बँकांमध्ये मिळणाऱ्या व्याजदरापेक्षा हे व्याज नक्कीचं जास्त आहे. त्यामुळे अनेक महिला या योजनेत गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत.

महिला सन्मान बचत पत्र योजना कशी वेगळी आहे

अनेकांच्या मनात हा विचार येऊ शकतो की, सरकारने ही (Mahila Samman Bachat Patra Yojana) योजना का सुरू केली ? सरकारद्वारे इतरही अनेक बचत योजना सध्या सुरू आहेत. मग या योजनेत असं वेगळं काय आहे ?

या योजनेचं सर्वात मोठ वेगळेपण म्हणजे महिला सन्मान बचत पत्र योजना फक्त 2 वर्षांसाठी सुरू करण्यात आली आहे. म्हणजे दोन वर्षातचं 7.5 टक्के व्याजदराने तुम्हाला परतावा मिळेल.

सध्या भारत सरकारद्वारे ज्या इतर योजना सुरू आहेत, त्यामध्ये 5 वर्ष ते 15 वर्षांपर्यंत गुंतवणूक करावी लागते आणि मगचं त्यावर चांगला परतावा मिळतो. पण फक्त दोन वर्षात परतावा देणारी ही एकमेव योजना आहे.

महिला सशक्ति करण्यासाठी उचललेले एक मोठ पाऊल

महिला सन्मान बचत पत्र योजना (Mahila Samman Bachat Patra Yojana) ही भारत सरकारने महिला सशक्तीकरणासाठी उचललेलं एक खूप मोठ पाऊल आहे.

कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था उंचावण्यासाठी, पुढे नेण्यासाठी त्या देशातील लोकांनी जास्तीत जास्त बचत करणं, हे खूप महत्त्वाचं असतं. ही योजना महिलांना बचत करण्यास प्रोत्साहित करते.

नोटबंदी दरम्यान असं पाहिलं गेलं होतं की, घरातील महिलांकडे खूप मोठ्या प्रमाणात बचत केलेली रक्कम होती. आता ती रक्कम त्या घरातच ठेवतात. ही रक्कम सर्क्युलेशनमध्ये येत नाही. म्हणजेचं अर्थव्यवस्थेचा फायदा होत नाही. त्यामुळे महिलांना त्यांनी जमा केलेली, बचत केलेली रक्कम बँकेत ठेवून परतावा मिळण्याची हमी दिल्यामुळे घरात पडलेली ही रक्कम अर्थव्यवस्थेमध्ये येते आणि याचा फायदा महिलांबरोबरचं देशाच्या अर्थव्यवस्थेलाही होतो.

त्याचबरोबर जर घरातच पैसे बचत करून ठेवले, तर त्यात कोणतीही वाढ होत नाही. परंतु बँकांमध्ये किंवा या योजनेत पैसे ठेवल्याने त्यामध्ये व्याज मिळतं. पैशांची वाढ होते. त्यामुळे आणखीन बचत करण्यासाठी महिला नक्कीचं उत्साहीत होतील.

FAQ About Mahila Samman Bachat Yojana महिला सन्मान बचत पत्र योजनेबद्दल विचारले जाणारे प्रश्न

1) प्रश्न : Mahila Samman Bachat Patra Yojana कधी सुरू करण्यात आली ?

उत्तर : ही योजना भारत सरकारने आर्थिक वर्ष 2023 – 2024 मध्ये सुरू केलीये आणि या योजनेचा कालावधी फक्त 2 वर्षेच आहे.

2) प्रश्न : या योजनेअंतर्गत किती रक्कम जास्तीत जास्त गुंतवली जाऊ शकते ?

उत्तर : महिला सन्मान बचत पत्र योजनेत जास्तीत जास्त रक्कम गुंतवण्याची मर्यादा 2 लाख रुपये ठरवली गेली आहे.

3) प्रश्न : या योजनेत कोण गुंतवणूक करू शकत ?

उत्तर : ही योजना भारत सरकारने सुरू केली असून, फक्त भारतीय नागरिक असलेल्या महिलाच या योजनेत गुंतवणूक करू शकतात.

4) प्रश्न : Mahila Samman Bachat Patra Yojana गुंतवलेल्या रकमेवर किती व्याजदर मिळतं ?

उत्तर : या योजनेत गुंतवलेल्या रकमेवर साडेसात टक्के वार्षिक व्याजदर मिळतो.

5) प्रश्न : महिला सन्मान बचत पत्र योजनेअंतर्गत गुंतवलेली रक्कम कालावधी पूर्ण होण्याआधी काढू शकता का ?

उत्तर : काही अटी शर्तीसोबत या योजनेअंतर्गत जमा केलेली रक्कम कालावधी पूर्ण होण्याआधी ही काढता येऊ शकते.

एकूणचं महिला सन्मान बचत पत्र योजना (Mahila Samman Bachat Patra Yojana) भारत सरकारने सुरू केलेली खूपच चांगली योजना असून भारतीय महिलांना त्यांनी केलेल्या बचतीचा योग्य परतावा मिळेल आणि महिला आर्थिक सशक्तिकरण होण्यासही मदत होईल.

तुमच्या मनात महिला सन्मान बचत पत्र योजनेबद्दल आणखीन काही प्रश्न असतील, तर नक्कीचं कमेंट करून विचारा. आम्ही त्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करू आणि भारत सरकार आणि राज्य सरकारच्या अशाच नवीन नवीन योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.

धन्यवाद !

Scroll to Top