Maharashtra Vidhawa Pension Yojana
Maharashtra Vidhawa Pension Yojana महाराष्ट्र सरकारची एक महत्त्वकांक्षी योजना असून या योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकार समाजातील विधवा महिलांचं आर्थिक सबलीकरण करत आहे.
सध्या आपण 21 व्या शतकात जगत असलो, तरीही समाजात काही कुप्रथा, कुरीती अजूनही सुरू आहेत. यामध्ये विधवांना वेगळ्या नजरेने पाहणे समाविष्ट आहे. विधवा महिलांना आयुष्य जगण्यासाठी विविध अडचणींना सामोरे जावे लागतं, हेही आपल्या समाजात दिसून येतं.
एखाद्या स्त्रीचा नवरा हे जग सोडून गेल्यानंतर तिला विधवा म्हणून संबोधलं जातं. जर ती स्त्री तिच्या नवऱ्यावर पूर्णपणे अवलंबून असेल, तिच्याकडे उत्पन्नाचा दुसरा कोणताही आर्थिक स्त्रोत नसेल, तर मग नवऱ्याच्या जाण्यानंतर तिला स्वतःचा आणि जर तिला मुलं असतील, तर त्यांचा खर्च भागवणे खूपचं अवघड जातं.
अशा विधवा स्त्रियांना मदत करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने Maharashtra Vidhawa Pension Yojana महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत महिलांच्या बँक खात्यांवर दरमहा पैसे पाठवले जातात. मग ही योजना नेमकी आहे तरी काय ? महाराष्ट्र विधवा पेन्शन योजनेचे फायदे कसे मिळवता येतील ? या योजनेसाठी अर्ज कसा करायचा ? या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय अटी आहेत ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आज आपण येथे जाणून घेणार आहोत.
महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना नेमकी काय आहे ?
समाजातील ज्या स्त्रिया स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी त्यांच्या पतीवर पूर्णपणे अवलंबून होत्या आणि आता त्यांचे पती या जगात नाहीत, अशा स्त्रियांना उदरनिर्वाहासाठी दरमहा महाराष्ट्र सरकारतर्फे पेन्शन म्हणून काही ठराविक रक्कम दिली जाते. महाराष्ट्र सरकारतर्फे राबवल्या जाणाऱ्या या योजनेला महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना असं नाव देण्यात आलं आहे.
या रकमेचा फायदा विधवा महिला त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी करू शकतात. कारण आपल्या समाजातील विधवा महिलांची अवस्था फारशी चांगली नाहीये. अशावेळेस जर त्यांना दरमहा काही ठराविक रक्कम पेन्शन म्हणून दिली गेली तर त्यांना या रकमेचा मोठा फायदा होऊ शकतो.
Maharashtra Vidhawa Pension Yojana महाराष्ट्र विधवा पेन्शन योजनेचे उद्दिष्ट काय आहे
समाजातील विधवा स्त्रियांना आर्थिक मदत करणं हे महाराष्ट्र सरकारच्या या योजनेचे उद्दिष्ट आहे. विधवा महिलांचा पती हे जग सोडून गेल्यानंतर त्यांना स्वतःचा आणि कुटुंबाचं उदरनिर्वाह करणं खूप कठीण जातं.
अशावेळेस त्यांना जर दरमहा आर्थिक मदत दिली गेली, तर त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतात आणि त्यांना भविष्याबद्दल सकारात्म दृष्टीकोन येऊ शकतो. म्हणूनचं अशा महिलांचं आर्थिक सबलीकरण करण्यासाठी आणि त्यांना भविष्यात सकारात्मक दिशा देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ही योजना राबवण्याचं ठरवलंय.
PM Surya Ghar Yojana 2024| प्रधानमंत्री सूर्य घर योजनेची संपूर्ण माहिती
राज्य सरकारने ही योजना तयार करताना फक्त विधवा महिलांचाचं विचार केलेला नाहीये, तर या महिलांच्या अपत्यांचाही विचार केलाय. विधवा महिलेला जर एखादं अपत्य असेल तर त्यांना दरमहा ६०० रुपयांऐवजी ९०० रुपयांची मदत केली जाईल. म्हणजेच या महिलांना त्यांच्या मुलांचं संगोपन करणं खूप सोपं जाईल.
महाराष्ट्र विधवा पेन्शन योजनेअंतर्गत मिळणारे लाभ
या योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकार दरमहा 600 रुपये विधवा महिलांच्या बँक खात्यावर डीबीटी द्वारे पाठवते.
ज्या विधवा महिलांना अपत्य आहे, त्या महिलांना दरमहा 900 रुपयांची पेन्शन दिली जाते.
Maharashtra Vidhawa Pension Yojana अटी काय आहेत ?
महाराष्ट्र राज्य सरकारने सुरु केलेल्या या पेन्शन योजनेसाठी काही अटी आहेत आणि या अटींची पूर्तता केली जाणं आवश्यक आहे. जर सादर विधवा महिला या अटींची पूर्तता करत असेल तरच तिला या योजनेचा लाभ घेता येईल. या सर्व अटी खालीलप्रमाणे आहेत.
- या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी विधवा महिलेचे वय 18 ते 65 वर्ष असावे.
- जर विधवा महिलेला अपत्य नसेल, तर तिला दरमहा 600 रुपये पेन्शन दिली जाईल.
- जर विधवा महिलेला अपत्य असेल, तर तिला दरमहा 900 रुपये पेन्शन दिली जाईल.
- या महिलेचा मुलगा पंचवीस वर्षांचा होईपर्यंत दरमहा ही पेन्शन मिळेल. त्यानंतर त्या विधवा महिलेची जबाबदारी तिच्या मुलाची असेल.
- Maharashtra Vidhawa Pension Yojana लाभ घेण्यासाठी लाभार्थी विधवा महिलेचं वार्षिक आर्थिक उत्पन्न 21 हजार रुपयांपेक्षा जास्त नसावं.
- दारिद्र्यरेषेखालील सर्व विधवा महिला महाराष्ट्र विधवा पेन्शन योजनेसाठी अर्ज करू शकतात.
- विधवा महिलेने पुनर्विवाह केलेला असेल, तर ती या योजनेसाठी पात्र ठरू शकत नाही.
- महाराष्ट्र विधवा पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी महिलेचं बँक अकाउंट असणं गरजेचं आहे. कारण याच बँक अकाउंटवर दरमहा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फरद्वारे विधवा पेन्शन पाठवण्यात येईल.
- महाराष्ट्र विधवा पेन्शन योजनेसाठी पात्र ठरल्यानंतर जर एखाद्या महिलेने पुनर्विवाह केला, तर तिची पेन्शन बंद केली जाते.
- ही योजना फक्त महाराष्ट्र राज्यातील कायमस्वरूपी रहिवासी असलेल्या महिलांसाठीचं उपलब्ध आहे.
महाराष्ट्र विधवा पेन्शन योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागतात ?
Maharashtra Vidhawa Pension Yojana या योजनेचा लाभ घेण्यासाठी सदर लाभार्थी महिलेला एक अर्ज सादर करावा लागेल आणि अर्जासोबत काही कागदपत्रंही जोडावी लागतील. या कागदपत्रांची लिस्ट खालीलप्रमाणे आहे.
- विधवा महिलेचं ओळखपत्र (आधार कार्ड)
- विधवा महिलेच्या पतीचं मृत्यू प्रमाणपत्र
- विधवा महिलेचा रहिवासी दाखला
- विधवा महिलेचा वयाचा दाखला
- विधवा महिलेचं बँक अकाउंट पासबुक
- विधवा महिलेच्या कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला
- विधवा महिलेचा पासपोर्ट फोटो
- विधवा महिलेचा मोबाईल नंबर
या सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर Maharashtra Vidhawa Pension Yojana विधवा महिला महाराष्ट्र विधवा पेन्शन योजनेसाठी अर्ज करू शकतात.
महाराष्ट्र विधवा पेन्शन योजनेसाठी अर्ज कसा करायचा
या योजनेसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो. ग्रामीण भागात तलाठी कार्यालय, तहसीलदार कार्यालय आणि शहरी भागात जिल्हाधिकारी कार्यालय येथे सदर योजनेचे अर्ज सादर करता येतील.
सदर अर्ज तुम्ही ऑनलाईन पद्धतीने डाऊनलोड करू शकता आणि आवश्यक असलेल्या कागदपत्रांची जोडणी करून हा अर्ज सादर करायचा असतो. सरकारी कार्यालयातील अधिकारी या सादर केलेल्या अर्जाची छाननी करतील आणि मग सर्व कागदपत्रे योग्य असल्यास सदर महिलेच्या बँक अकाउंटवर दरमहा 600 रुपये पेन्शन पाठवली जाते.
महाराष्ट्र विधवा पेन्शन योजनेबाबत काही महत्त्वाची माहिती
- Maharashtra Vidhawa Pension Yojanaही योजना महाराष्ट्र सरकारने जानेवारी 2020 मध्ये सुरू केली.
- महाराष्ट्र विधवा पेन्शन योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील विधवा महिलांना दरमहा ठराविक रक्कम पेन्शन स्वरूपात देण्यात येते. ज्यामुळे त्यांचं आर्थिक सबलीकरण होईल आणि इतरांवर अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही.
- आपल्या समाजात आजही विधवा महिलांकडे वेगळ्या नजरेने पाहिलं जातं. त्यांना पतीच्या मृत्यूनंतर हलाखीचं जीवन जगावं लागतं. अशा महिलांकडे जर उत्पन्नाचा कोणताही स्त्रोत नसेल, तर पतीच्या मृत्यूनंतर त्यांचं आयुष्य खूप कठीण बनतं. त्यामुळेचं महाराष्ट्र सरकारने आपली जबाबदारी ओळखत विधवा महिलांसाठी ही योजना सुरू करायचं ठरवलं.
- या योजनेसाठी काही ठराविक अटी आहेत, त्या अटींची पूर्तता केल्यानंतर दरमहा विधवा महिलांच्या अकाउंटवर एक ठराविक रक्कम जमा केली जाते.
- फक्त विधवा महिलांनाचं नाही, तर त्यांची मुलं जर सज्ञान नसतील, तर ते सज्ञान होईपर्यंत या मुलांसाठीही सरकारकडून अधिकची रक्कम दरमहा विधवा महिलांच्या अकाउंटवर पाठवली जाते.
- महाराष्ट्र विधवा पेन्शन योजनेअंतर्गत सरकार विधवा महिलेच्या अकाउंटवर दरमहा 600 रुपये पेन्शन म्हणून पाठवते आणि जर या महिलेला अपत्य असेल, तर 900 रुपये दरमहा पेन्शन दिली जाते.
- या योजनेसाठी वयोमर्यादा 18 ते 65 वर्षे आहे.
- दारिद्र्य रेषेखालील महिलांना महाराष्ट्र विधवा पेन्शन योजनेचा लाभ घेता येतो.
- एकूणचं महाराष्ट्र सरकारने विधवा महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी एक खूप मोठं पाऊल उचललं आहे आणि याचा फायदा महाराष्ट्र राज्यातील अनेक विधवा महिलांना होतोय.
- महाराष्ट्र विधवा पेन्शन योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आर्थिक उत्पन्नाची एक महत्वाची अट आहे आणि ती म्हणजे या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी सदर विधवा महिलेच्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न वार्षिक 21000 रुपयांपेक्षा जास्त नसावं.
- एकदा या पेन्शन योजनेचा लाभ सुरु झाला तर तो कायमस्वरूपी सुरु राहील असं नाहीये, तो बंदही होऊ शकतो. दोन परिस्थितींमध्ये महाराष्ट्र विधवा पेन्शन योजनेचा लाभ बंद होऊ शकतो. जर विधवा महिलेचा मुलगा पंचवीस वर्षांचा झाला, तर त्या विधवा महिलेची जबाबदारी मुलाची असेल आणि या पेन्शन योजनेचा लाभ बंद होईल.
- जर विधवा महिलेने पुनर्विवाह केला, तर तिला या Maharashtra Vidhawa Pension Yojana पेन्शन योजनेचा लाभ मिळणं बंद होतं.
FAQ About Maharashtra Vidhva Pension Yojana महाराष्ट्र विधवा पेन्शन योजनेबाबत वारंवार विचारले जाणारे प्रश्न
- प्रश्न : महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना नेमकी आहे तरी काय ?
उत्तर : महाराष्ट्र राज्यातील विधवा महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी महाराष्ट्र सरकार दरमहा एक ठराविक रक्कम विधवा महिलांना पेन्शन म्हणून त्यांच्या बँक अकाउंटवर पाठवते. असं या योजनेचं स्वरूप आहे.
- प्रश्न : Maharashtra Vidhawa Pension Yojana पात्र ठरण्यासाठी वयोमर्यादा किती आहे ?
उत्तर : या योजनेत पात्र ठरण्यासाठी वयोमर्यादा 18 ते 65 वर्ष अशी निर्धारित करण्यात आली आहे.
- प्रश्न : महाराष्ट्र विधवा पेन्शन योजनेसाठी पात्र महिला महाराष्ट्र राज्याची कायमस्वरूपी रहिवासी असणे बंधनकारक आहे का ?
उत्तर : होय, Maharashtra Vidhawa Pension Yojana योजनेत पात्र होण्यासाठी संबंधित महिला महाराष्ट्र राज्याची कायमस्वरूपी रहिवासी असणे बंधनकारक आहे.
- प्रश्न : महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना कधी सुरू करण्यात आली ?
उत्तर : ही योजना महाराष्ट्र सरकारने जानेवारी 2020 मध्ये सुरू केली आहे.
- प्रश्न : महाराष्ट्र विधवा पेन्शन योजनेअंतर्गत विधवा महिलांना किती आर्थिक मदत दिली जाते ?
उत्तर : Maharashtra Vidhawa Pension Yojana योजनेअंतर्गत विधवा महिलांना दरमहा 600 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. जर विधवा महिलेला सज्ञान नसलेलं अपत्य असेल, तर तिला दरमहा 900 रुपयांची आर्थिक मदत केली जाते.
महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना ही महाराष्ट्र सरकारने आणलेली खूपच चांगली योजना आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकार समाजातील विधवा महिलांचं आर्थिक सबलीकरण करण्याचं उद्दिष्ट ठेवतंय.
तुमच्या मनात Maharashtra Vidhawa Pension Yojana या योजनेबद्दल आणखी काही प्रश्न असतील तर नक्कीचं कमेंट करून विचारा आणि आम्ही त्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करू. महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांबद्दल आम्ही या संकेतस्थळावर लेख प्रसिद्ध केले आहेत. आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
धन्यवाद !