Maharashtra Lek Ladki Yojana 2024 | लेक लाडकी योजनेसाठी अर्ज

Maharashtra Lek Ladki Yojana 2024

Maharashtra Lek Ladki Yojana 2024

Maharashtra Lek Ladki Yojana 2024 महाराष्ट्र राज्यासाठी गेम चेंजर ठरू शकते. महाराष्ट्र सरकारने 2024 – 2025 सालच्या अर्थसंकल्पात लेक लाडकी योजनेची घोषणा केलीये. या घोषणेअंतर्गत महाराष्ट्रातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या मुलींना आर्थिकदृष्ट्या संपन्न बनवण्याचं उद्दिष्ट महाराष्ट्र सरकारने ठेवलं आहे.

या 21व्या शतकात मुली मुलांपेक्षा कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीये, उलट चार पावलं पुढेच आहेत. मग ते दहावी बारावीच्या बोर्ड परीक्षांचे निकाल असो किंवा मग मेडिकल आणि इंजीनियरिंग यासारख्या उच्च शिक्षणाचे वर्ग. येथेही मुलींनी बाजी मारली आहे. सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांमध्येही आजकाल मुलींचं प्रमाण लक्षणीय आहे. परंतु तरीही आपल्या समाजात असा एक मोठा वर्ग आहे, जिथे मुलींचा जन्म म्हणजे कुटुंबावर खूप मोठी जबाबदारी, खूप मोठं आर्थिक ओझं असं समजलं जातं. अशा समजामुळेचं मुलगा आणि मुलगी यांच्या जन्मदरात तफावत आढळून येते. मुलींचे कुपोषण, मुलींचे बालविवाह अशा समस्याही वाढत चालल्या आहेत. या समस्यांचा सामना करण्यासाठी लेक लाडकी योजनेची मुहूर्तमेढ रोवण्यात आली.

लेक लाडकी योजना समाजातील कुप्रथांना आळा घालेल

फक्त सरकारच नाही तर समाजातील प्रत्येक व्यक्तीची ही जबाबदारी आहे कि आपण या समस्यांवर तोडगा काढावा. शिक्षण आणि सामाजिक प्रबोधन या दोन मार्गांद्वारे आपण समाजातील या कुप्रथांना आळा घालू शकतो. समाजात या कुप्रथा आहेत आणि वाढत चालल्या आहेत, त्याचं मुख्य कारण म्हणजे आपल्या समाजातील गरिबी. ज्यामुळे मुलींना ओझं आणि जबाबदारी समजलं जातं. त्यामुळे जर मुलीच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारली तर नक्कीच ही समस्या दूर होऊ शकते. म्हणूनच महाराष्ट्र सरकार लेक लाडकी योजनेद्वारे ज्या कुटुंबात मुलीचा जन्म झाला आहे, त्यांना आर्थिक मदत पुरवण्याचा प्रयत्न करतंय.

मग ही लेक लाडकी योजना नेमकी आहे तरी काय ? या योजनेची उद्दिष्ट काय आहेत ? या योजनेसाठी अर्ज कसा करावा ? या योजनेचा लाभ कोणत्या कुटुंबातील मुलींना घेता येणार आहे ? त्यासाठी वयोमर्यादा काय आहे ? आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणत्या अटींची पूर्तता करावी लागेल ? आज आपण त्याबद्दलचं जाणून घेऊया.

Maharashtra Lek Ladki Yojana 2024 लेक लाडकी योजनेचे उद्दिष्ट काय आहेत ?

महाराष्ट्र सरकारने Maharashtra Lek Ladki Yojana 2024 सामान्य कुटुंबातील मुलींसाठी जाहीर केलीये आणि या योजनेचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे मुलींना आर्थिक संपन्न बनवण.

आजच्या काळातही अनेक कुटुंबांमध्ये मुलींना ओझं समजलं जातं. त्यांचं शिक्षण, त्यांचं लग्न करून देण ही एक मोठी जबाबदारी समजली जाते.

या कारणांमुळे मुलींचा गर्भ असताना गर्भापात करणे अशा घटनाही वारंवार समोर येत असतात. तसंच अनेक मुलींची इच्छा असतानाही आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना शिक्षण घेता येत नाही. मुली सज्ञान होण्याआधी त्यांचं लग्न लावून दिलं जातं.

या समस्यांवर उतारा म्हणूनचं सरकारने ही योजना आणली आहे. या योजनांमुळे आर्थिकदृष्टया कमकुवत कुटुंबावरील आर्थिक ओझं कमी होईल आणि या कुटुंबातील मुलींना त्यांचं आवडतं काम, त्यांचं आवडतं करिअर निवडण्याची संधी मिळेल. मुलींच्या वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर त्यांची आर्थिक अडचण दूर होईल.

सध्या आपल्या राज्यात मुलींचे बालविवाह, मुलींचा वाढता मृत्यूदर, मुलींचं कुपोषण, शाळाबाह्य मुलींचे जास्त प्रमाण अशा खूप साऱ्या समस्या आहेत. या समस्या समूळ नष्ट करण्यासाठी लेक लाडकी योजना फायदेशीर ठरेल, असं सरकारला वाटतंय.

लेक लाडकी योजनेचे फायदे काय आहेत ?

महाराष्ट्र सरकारने आर्थिक संकल्पात केलेल्या तरतुदीनुसार 1 एप्रिल 2023 नंतर कुटुंबात जन्माला येणाऱ्या मुलींना वयाची 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत 1 लाख 1 हजार रुपयांचा आर्थिक फायदा मिळेल. हे पैसे मुलींच्या अकाउंटवर शासनातर्फे थेट लाभार्थी हस्तांतरण म्हणजेचं डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर (DBT) द्वारे पाठवले जातील.

तुम्हाला हा प्रश्न नक्कीचं पडला असेल की, 1 एप्रिल 2023 आधी जमलेल्या मुलींचं काय ? तर सरकारच्या या योजनेनुसार 1 एप्रिल 2023 नंतर जमलेल्या मुलींनाच Maharashtra Lek Ladki Yojana 2024 या योजनेचा लाभ घेता येईल. याआधी जन्मलेल्या मुलींना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

ज्या कुटुंबात २ मुली आहेत, अशा कुटुंबानाही या योजनेचा लाभ घेता येईल.

लेक लाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न किती असावं, हा प्रश्नही तुमच्या मनात नक्कीच आला असेल. तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीच्या कुटुंबाचे उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावं. लेक लाडकी योजना महाराष्ट्र सरकारद्वारे राबवलेली योजना असून फक्त महाराष्ट्र राज्यातील रहिवाशांना या योजनेचा लाभ घेता येईल. महाराष्ट्र राज्याबाहेरी लोकांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. या योजनेद्वारे समाजातील कुप्रथांना आळा घालण्यासाठी, मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी, कुपोषण, बालविवाह यासारख्या समस्या समूळ नष्ट करण्यासाठी सरकारने लेक लाडकी योजना राबवण्याचं ठरवलंय.

या Maharashtra Lek Ladki Yojana 2024 लाभ घेण्यासाठी मुलीच्या पालकांना कोणतीही गुंतवणूक करावी लागणार नाही. सरकारने घालून दिलेल्या अटींची पूर्तता केल्यानंतर मुलीला या योजनेचा लाभ मिळेल. लाभार्थी मुलींना डीबीटीद्वारे त्यांच्या बँक अकाउंटवर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर करण्यात येणार आहे. त्यामुळे मुलींचं बँक अकाउंट असणं आवश्यक आहे.

लेक लाडकी योजनेत किती आणि कसे पैसे मिळतात ?

या योजनेनुसार मुलीचा जन्म झाल्यावर 5 हजार रुपये, मुलगी इयत्ता पहिलीत गेल्यानंतर 6 हजार रुपये, दहावीत गेल्यानंतर 7 हजार रुपये, अकरावीत गेल्यानंतर 8 हजार रुपये आणि मुलगी वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यावर 75 हजार रुपये देण्यात येतील. अशाप्रकारे त्या मुलीस वयाची 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत 1 लाख 1 हजार रुपये एवढा लाभ मिळेल.

याआधीची योजना माझी कन्या भाग्यश्री सुरू आहे का ?

सध्या महाराष्ट्रात 1 ऑगस्ट 2017 पासून माझी कन्या भाग्यश्री ही योजना राबविण्यात येत होती. या योजनेअंतर्गत मुलीचा जन्म झाल्यानंतर मुलीच्या पालकांना 5 हजार रुपये आर्थिक लाभ देण्यात येत होता. ही योजना नागरिकांमध्ये खूपच लोकप्रिय झाली होती. कारण मुलीचा जन्म झाल्यावर या योजनेअंतर्गत मुलीच्या आईच्या बँक अकाउंटवर पाच हजार रुपयांची रोख रक्कम पाठवली जात होती. ज्या रकमेचा उपयोग आई आणि बाळाच्या आरोग्यासाठी केला जायचा. परंतु या योजनेत फक्त एवढीच तरतूद केलेली होती. त्यानंतर मुलीला कोणताही लाभ मिळत नव्हता.

परंतु लेक लाडकी योजना हि माझी कन्या भाग्यश्री योजनेची सुधारित आवृत्ती आहे. या नवीन योजनेत मुलीला वयाची १८ वर्ष पूर्ण होईपर्यंत वयाच्या विविध टप्प्यांवर १ लाख १ हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात येईल.

त्यामुळेच आता माझी कन्या भाग्यश्री ही योजना बंद करण्यात आली असून, लेक लाडकी योजना सुरू करण्यात आली आहे.

ज्या कुटुंबांकडे पिवळं किंवा केशरी रंगाचं रेशन कार्ड आहे, त्याच कुटुंबातील मुलींना या योजनेचा लाभ घेता येईल.

Maharashtra Lek Ladki Yojana 2024 (लेक लाडकी योजनेच्या) अटी काय आहेत ?

Maharashtra Lek Ladki Yojana 2024 लाभ मिळण्यासाठी खालीलप्रमाणे काही अटी पूर्ण कराव्या लागतील.

१) लाभार्थी कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रंगाचं रेशनकार्ड असावं.

२) मुलीचा जन्म 1 एप्रिल 2023 नंतर झालेला असावा.

३) जर कुटुंबात दुसरी मुलगी जन्माला आली असेल, तर आई किंवा वडिलांपैकी एकाने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे.

४) ज्या कुटुंबाचं उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, त्या कुटुंबाला लेक लाडकी योजनेचा लाभ घेता येईल.

५) कुटुंबात जन्म घेणाऱ्या मुलीचे आई किंवा वडील जर एखाद्या सरकारी विभागात सरकारी नोकरी करत असतील, तर त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

लेक लाडकी योजनेसाठी अर्ज कुठे करायचा ?

महाराष्ट्र सरकार लवकरचं बाल विकास सेवा आयुक्तालयातर्फे एक ऑनलाईन पोर्टल सुरू करणार आहे. या ऑनलाइन पोर्टलवर (Maharashtra Lek Ladki Yojana 2024) लेक लाडकी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तुम्ही नोंदणी करू शकता.

जर तुम्हाला ऑफलाईन नोंदणी करायची असेल, तर तुमच्या घराजवळ असलेल्या अंगणवाडीतील अंगणवाडी सेविकेकडून तुम्हाला या योजनेचा फॉर्म मिळवता येईल.

लेक लाडकी योजनेसाठी कोणती कागदपत्र आवश्यक आहेत ?

या Maharashtra Lek Ladki Yojana 2024 लाभ मिळवण्यासाठी तुमच्याकडे खालीलप्रमाणे कागदपत्रे असणं गरजेचं आहे.

१) पिवळं किंवा केशरी रंगाचं रेशनकार्ड

२) मुलीचा जन्म झालेल्या आई-वडिलांचे आधार कार्ड

३) मुलीच्या कुटुंबाचा पत्त्याचा पुरावा

४) जन्मलेल्या मुलीच्या कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला

५) बँकेचे पासबुक

याव्यतिरिक्त वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर येणाऱ्या लाभांनुसार कागदपत्र उपलब्ध करून द्यावी लागतील.

FAQ’s On Maharashtra Lek Ladki Yojana 2024 लेक लाडकी योजनेबद्दल तुमच्या मनात असलेल्या प्रश्नांची उत्तरे

१) प्रश्न : लेक लाडकी योजनेचा फायदा महाराष्ट्रातील सर्वचं मुलींना मिळणार आहे का ?

उत्तर : या प्रश्नाचे उत्तर नाही असं आहे. लेक लाडकी योजनेअंतर्गत खूप अटींची पूर्तता करावी लागणार आहे. जसं की ज्या मुलींचा जन्म 1 एप्रिल 2023 नंतर झाला आहे. त्यांनाच या योजनेचा लाभ घेता येईल. त्याचबरोबर मुलीच्या कुटुंबाकडे पिवळ किंवा केसरी रंगाचं रेशनकार्ड असण आवश्यक आहे आणि कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न 1 लाखांपेक्षा कमी असावं.

२) प्रश्न : लेक लाडकी योजनेअंतर्गत मुलींना काय फायदा मिळेल ?

उत्तर : ही योजना महाराष्ट्रातील मुलींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राबवण्यात येत आहे. मुलीचा जन्म झाल्यापासून ती 18 वर्षांची होईपर्यंत वयाच्या विविध टप्प्यांवर या योजनेअंतर्गत मुलींना 1 लाख 1 हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात येईल.

३) प्रश्न : Maharashtra Lek Ladki Yojana 2024 फायदा घेण्यासाठी आई-वडिलांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणं गरजेचे आहे का ?

उत्तर : जर जन्माला येणारी मुलगी त्या आई-वडिलांचं दुसरं अपत्य असेल, तर आई-वडिलांपैकी एकाने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे गरजेचे आहे. त्याशिवाय या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

४) प्रश्न : जर आई-वडिलांपैकी एकाला सरकारी नोकरी असेल, तर लेक लाडकी योजनेचा लाभ घेता येईल का ?

उत्तर : नाही, जर आई-वडिलांपैकी एकाला सरकारी नोकरी असेल, तर लेक लाडकी योजनेचा लाभ घेता येणार नाही.

एकूणचं महाराष्ट्र सरकारची लेक लाडकी योजना ही मुलींना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी खूपच महत्त्वाची आहे. गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलींना या योजनेचा खूप फायदा होईल. त्यामुळे लाभार्थ्यांनी नक्कीचं या योजनेचा लाभ घ्यावा.

Maharashtra Lek Ladki Yojana 2024 या योजनेसंदर्भात आणखी काही प्रश्न असतील, तर नक्कीचं कमेंट करा आणि आम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न नक्की करू.

धन्यवाद !

Scroll to Top