Mahabharat Interesting Facts महाभारताचं युद्ध पांडवांनी जिंकलं, परंतु पांडवांच्या सैन्यापेक्षा कौरवांच्या सैन्यात असे अनेक महायोध्दा होते, ज्यांना हरवण कोणत्याही पांडवाला शक्य नव्हतं. मग तो अर्जुन असो किंवा भीम. परंतु भगवान श्रीकृष्ण यांच्या मार्गदर्शनाखाली पांडवांनी या सर्व महायोद्धांचा पराभव केला आणि महाभारताचं युद्ध जिंकलं.
कौरवांच्या सैन्यात असेच एक महायोद्धा होते, ज्यांना हरवणं कोणालाही शक्य नव्हतं आणि ते होते भीष्म पितामह. भीष्म पितामह यांना इच्छामृत्यूचं वरदान प्राप्त होतं आणि जोपर्यंत ते रणांगणावर होते, तोपर्यंत कौरवांना हरवणं अशक्य होतं.
Mahabharat Interesting Facts
अर्जुन आणि इतर पांडवांनी त्यांची संपूर्ण ताकद लावली, परंतु भीष्मपितामह यांना कोणतीही हानी पोहोचवणं त्यांना शक्य होत नव्हतं. तेव्हा श्रीकृष्ण यांच्या मार्गदर्शनाखाली अर्जुनाने भीष्म पितामह यांच्यावर असंख्य बाण चालवले. जे बाण भीष्म पितामह यांच्या शरीराच्या आरपार झाले आणि त्यांना बाणांच्या शय्येवर झोपावं लागलं.
परंतु जेव्हा अर्जुन हे बाण भीष्म पितामह यांच्यावर चालवत होता. तेव्हा भीष्म पितामह तसेच निशस्त्र उभे होते. त्यांनी अर्जुनाच्या बाणांना प्रतिउत्तर का दिलं नाही ? त्याच्या बाणांना का रोखलं नाही ? काय असं कारण होतं यामागे ? आज आपण त्याबद्दलचं जाणून घेणार आहोत.
अर्जुनने जेव्हा भीष्म पितामह Mahabharat Interesting Facts यांच्यावर बाण चालवले आणि हे बाण भीष्म पितामह यांच्या शरीराच्या आरपार जात होते, तेव्हा भीष्म पितामह हे निशस्त्र उभे होते. त्यांनी हे सगळे बाण स्वतःच्या शरीरात जाऊ दिले, कारण त्यांच्यासमोर शिखंडी नावाचा योद्धा उभा होता. हा शिखंडी अर्जुनाच्या समोर उभा होता आणि अर्जुन त्याच्या पाठीमागून हे बाण चालवत होता.
How Bhishma Pitamah Died In Mahabharat
भीष्म पितामह यांनी प्रतिज्ञा केली होती की, ते कधीही कोणत्या महिलेवर शस्त्र उगारणार नाहीत. त्यामुळे शिखंडी समोर आल्यानंतर ते निशस्त्र झाले आणि अर्जुनाने याचाच फायदा घेत त्यांच्यावर बाण चालवले.
परंतु तुम्हाला आता हा प्रश्न पडला असेल की, शिखंडी Mahabharat Interesting Facts हा तर पुरुष होता. मग भीष्मपितामह यांनी शस्त्र खाली का टाकली ? या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्याआधी आपण शिखंडीच्या पुनर्जन्माबद्दल जाणून घेऊया.
आपल्या सर्वांना माहितीये की, भीष्म पितामह हस्तिनापूरच्या गादीचे एकमेव वंशज होते. परंतु त्यांच्या वडिलांनी राजा शंतनुने दुसरे लग्न केल्यानंतर भीष्म पितामह यांनी भीष्मप्रतिज्ञा केली की, मी कधीही स्वतः राजा बनणार नाही. आजन्म ब्रम्हचारी राहील आणि सिंहासनाचा सेवक म्हणून आयुष्यभर काम करत राहील.
त्यांच्या या प्रतिज्ञेनुसार विचित्रवीर्य राजा बनला. भीष्म पितामह Mahabharat Interesting Facts यांनी विचित्रवीर्यचं लग्न करण्यासाठी काशीराज यांच्या तीन मुली आंबा अंबिका आणि अंबालिका यांचं हरण केलं. परंतु हरण केल्यानंतर त्यांना समजलं की, आंबा आधीच राजा शालव यांच्यावर प्रेम करते. हे समजल्यानंतर भीष्म पितामह यांनी अंबाला राजा शालव यांच्याकडे पाठवलं. परंतु राजा शालवने अंबाला स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे अंबा खूप चिडली. हे सगळं भीष्ममुळे झालंय, असा विचार तिने केला आणि त्यांचा बदला घेण्यासाठी भीष्मचे गुरु असलेले भगवान परशुराम यांच्याकडे ती गेली.
महाभारतात भीष्म पितामह यांचा मृत्यू कसा झाला
भीष्मने Mahabharat Interesting Facts आंबाबरोबर जे काही केलं, ते ऐकून भगवान परशुरामही चिडले. ते अंबाला घेऊन भीष्म पितामह यांच्याजवळ आले आणि म्हणाले की, तुला आता आंबाबरोबर लग्न करावं लागेल, परंतु भीष्म पितामह यांनी लग्नासाठी नकार देत सांगितलं की, मी आजीवन ब्रह्मचारी राहील अशी प्रतिज्ञा घेतली आहे. त्यामुळे मी तिच्याशी लग्न करू शकत नाही.
हे ऐकून अंबा आणखीनचं चिडली आणि तिने भगवान परशुराम यांना विनंती केली की, तुम्ही भीष्म पितामह यांना धडा शिकवा, त्यांना शिक्षा द्या. तेव्हा भगवान परशुराम आणि भीष्म पितामह या दोघांमध्ये घमासान युद्ध सुरू झालं.
गंगापुत्र भीष्म आणि भगवान परशुराम हे दोघेही तुल्यबळ होते. त्यामुळे दोघांच्याही युद्धाचा कोणताही परिणाम निघत नव्हता. या दोघांनीही एकमेकांवर ब्रह्मास्त्र चालवलं. परंतु त्याचवेळेस भगवान शंकर प्रकट झाले आणि त्यांनी या दोघांचं युद्ध थांबवलं.
तेव्हा अंबा महादेव यांना म्हणाली की, मला भीष्मचा Mahabharat Interesting Facts बदला घ्यायचा आहे. त्याचा मृत्यू व्हायला हवा. तेव्हा भगवान शंकर म्हणाले की, गंगा पुत्र भीष्म यांना इच्छामृत्यूचे वरदान प्राप्त आहे. त्यामुळे तुझ्या या जन्मात तरी ते शक्य नाही. परंतु मी तुला वरदान देतो, तुझा पुनर्जन्म झाल्यानंतर तू भीष्म पितामह यांच्या मृत्यूचं कारण बनशील.
हे वरदान मिळाल्यानंतर अंबाने देहत्याग केला आणि मग तिचा पुनर्जन्म पांचालचा राजा दृपदच्या घरी झाला. तेथेही अंबाचा जन्म मुलगी म्हणूनचं झाला होता. परंतु राजा द्रुपपने शिखंडीला मुलासारखचं वाढवलं. पुढे एका यक्षने त्याचं पुरुषत्व शिखंडीला दिलं आणि शिखंडी स्त्रीचा पुरुष बनला.
Who Was Shikhandi In Mahabharat
जेव्हा कौरव आणि पांडव यांच्यामध्ये महाभारताचं युद्ध Mahabharat Interesting Facts सुरू झालं. तेव्हा भीष्मपितामह कौरवांच्या सेनेचे सेनापती होते. त्यांच्या अस्त्र शस्त्राचा सामना करणं कोणत्याही पांडवाला जमण्यासारखं नव्हतं. त्यामुळे भीष्मपितामह पांडवांच्या सेनेचा संहार करत होते. असंचं चालत राहिलं, तर पांडव युद्ध हरतील, हे श्रीकृष्णांना समजलं.
आणि त्यांनी एक योजना तयार केली. भगवान श्रीकृष्ण यांनी शिखंडीला मैदानात उतरवलं. शिखंडी हा अर्जुनाच्या रथावर आला. शिखंडीला पाहून भीष्मपितामह यांनी त्यांची अस्त्र खाली ठेवली. कारण त्यांनी प्रतिज्ञा केली होती की, कोणत्याही स्त्रीवर ते कधीही शस्त्र चालवणार नाहीत. शिखंडी आता जरी पुरुष होता, परंतु आधी तो एक स्त्री होता. त्यामुळे त्याला एक स्त्री मानूनचं भीष्म पितामह निशस्त्र झाले.
गणपती बाप्पाच्या जन्माची गोष्ट माहितेय का ?
त्यानंतर भगवान श्रीकृष्ण Mahabharat Interesting Facts यांच्या सांगण्यावरून अर्जुनाने त्यांच्यावर बाण चालवायला सुरुवात केली. भीष्म पितामह यांच्या शरीराच्या आरपार असंख्य बाण गेले आणि मग भीष्म पितामह कुरुक्षेत्राच्या मैदानावर कोसळले. परंतु तरी त्यांचा मृत्यू झाला नाही, कारण त्यांना इच्छा मृत्यूचं वरदान प्राप्त होतं. पुढे अनेक दिवसानंतर त्यांनी देहत्याग केला.
अशाप्रकारे भगवान शंकर यांनी अंबाला दिलेलं वरदान अंबाच्या पुढच्या जन्मात शिखंडीच्या रूपाने पूर्ण झालं आणि शिखंडी भीष्म पितामह यांच्या मृत्यूचं कारण बनली.
तर अशी होती शिखंडी आणि भीष्मपितामह Mahabharat Interesting Facts यांची गोष्ट. तुम्हाला ही गोष्ट माहीत होती का, नक्कीच कमेंट करुन सांगा. आमच्या चॅनलवरील इतर पौराणिक कथाही नक्कीचं पहा आणि अशाचं नवीन नवीन पौराणिक कथा आणि माहिती जाणून घेण्यासाठी आमचे इतर लेखही नक्कीच वाचा.
खूप खूप धन्यवाद !