Mahabharat 5 Shrap : महाभारतातील सर्वात मोठे श्राप ज्यामुळे महाभारत घडलं

Mahabharat 5 Shrap

Mahabharat 5 Shrap आज आपण जगात घडलेल्या महायुद्धांबद्दल चर्चा करतो. तिसरं महायुद्ध घडलं, तर काय होईल याबद्दल बोलत असतो. परंतु या पृथ्वीच्या इतिहासात घडलेलं सर्वात भयानक आणि संहारक युद्ध होतं कुरुक्षेत्र येथे झालेलं महाभारताचं युद्ध. प्रभू श्रीकृष्ण, अर्जुन, भीम, युदिष्ठीर, दुर्योधन, भीष्मपितामह, कर्ण, गुरु द्रोणाचार्य, कृपाचार्य आणि अश्वत्थामा यांसारख्या रथी आणि महारथींचा समावेश असलेलं हे युद्ध महाभयंकर होतं.

संपूर्ण राज्य आपल्याला मिळावं, अशी महत्त्वकांक्षा असलेला दुर्योधन, अपमानाचा बदला घेण्यासाठी रात्रंदिवस तडफडणारी द्रौपदी, द्रौपदीच्या अपनाचा बदला घेण्यासाठी सज्ज झालेले पाच पांडव, नेहमी अन्याय झाला म्हणून दुखावलेला सुर्यपूत्र कर्ण, सर्वात बलशाली परंतु सिंहासनाला दिलेल्या शब्दांमुळे लाचार असलेले भीष्म पितामह अशा अनेक महायोद्धाचा समावेश असलेलं एकमेव युद्ध असेल हे.

महाभारताचे युद्ध घडण्याची अनेक कारणे होती, अगदी कौरव आणि पांडवांच्या जन्माआधीपासूनचं महाभारताचे युद्ध घडेल, यासाठी परमेश्वराने अनेक लीला रचल्या होत्या. यादरम्यान अनेक शाप  आणि वरदानही दिली गेली होती. आज आपण अशाचं काही शापांबद्दल (Mahabharat 5 Shrap) जाणून घेऊया ज्यामुळे महाभारताच्या युद्धाचे परिणाम बदलले.

Mahabharat 5 Shrap 

महाभारतातील सर्वात महत्त्वाचा आणि पहिला शाप मिळाला होता पांडवांचे वडील पांडू यांना. महाराजा पांडू एकदा शिकारीसाठी जंगलात गेले, त्यावेळेस त्यांना हरणांची एक जोडी दिसली. त्यांनी या हरणांच्या जोडीला बाण मारला. बाण या हरणांना लागला. जेव्हा महाराजा पांडू त्यांच्याजवळ गेले, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की, ती हरणांची जोडी नव्हती, तर किदंब नावाचे ऋषी कामयोग घेत होते. महाराजा पांडूने आपल्याला बाण मारला आहे, हे पाहून किदंब ऋषी खूप चिडले आणि त्यांनी पांडूला शाप दिला की, ज्यावेळेस तू तुझ्या पत्नीजवळ संभोगासाठी जाशील, त्या क्षणी तुझा मृत्यू होईल आणि या शापामुळेचं महाराजा पांडूचा मृत्यू झाला आणि मग पुढे धृतराष्ट्र हस्तीनापूरचे महाराज बनले.

दुसरा शाप मिळाला होता अर्जुनाला. एकदा अर्जुन  इंद्रदेवांना भेटण्यासाठी स्वर्गात गेला. तेव्हा अर्जुनचं सुंदर रूप पाहून उर्वशी नावाची अप्सरा त्याच्यावर घायाळ झाली. ती त्याच्याजवळ गेली, तेव्हा अर्जुनने कौटुंबिक नात्यांचा दाखला देत तिच्यापासून लांब जाण्याचा निर्णय घेतला आणि तिला माते असं म्हणून संबोधलं. त्यामुळे उर्वशी खूप चिडली आणि तिने अर्जुनाला शाप दिला की, तू नपुंसक होशील. पुढे या शापाचा फायदा अर्जुनला एक वर्षाच्या अग्यातवासात झाला.

महाभारत युद्धाला कारणीभूत असलेले 5 श्राप

महाभारतातील एक असं पात्र आहे, ज्याच्याबद्दल जितक्या लोकांच्या मनात राग आहे, त्यापेक्षा जास्त लोकांच्या मनात आदरही आहे. ते म्हणजे सूर्यपुत्र कर्ण. कुंतीचा पुत्र असलेल्या कर्णाला कधीही त्याचा हक्क मिळाला नाही. उलट सगळ्यांनीच त्याला हिणवलं. सूर्यपुत्र कर्णलाही अनेकांनी शाप दिले होते.

त्यातील पहिला शाप Mahabharat 5 Shrap म्हणजे सूतपुत्र असल्यामुळे गुरु द्रोणाचार्य यांनी त्याला धनुर्विद्या शिकवण्यास मनाई केली. तेव्हा कर्ण भगवान परशुराम यांच्याकडे धनुर्विद्या शिकण्यासाठी केला. परंतु भगवान परशुराम हे फक्त ब्राह्मणांनाचं धनुर्विद्या शिकवत होते. त्यामुळे कर्ण त्यांना खोटं बोलला की, मी ब्राह्मण आहे. भगवान परशुराम यांनी त्याला खूप छान धनुर्विद्या शिकवली. कर्ण उत्तम धनुर्धर बनला.

परंतु एके दिवशी जेव्हा भगवान परशुराम  थकल्यामुळे कर्णाच्या मांडीवर डोकं ठेवून झोपले होते, त्याच वेळेस एक माशी त्याच्या मांडीला चावा घेऊ लागली. भगवान परशुराम यांची झोप मोड होऊ नये, म्हणून कर्णाने हा त्रास सहन केला. त्याच्या मांडीतून रक्त वाहू लागलं. पण तेवढ्यात भगवान परशुराम झोपेतून जागे झाले आणि हा प्रकार पाहून त्यांना खूप राग आला. ते म्हणाले की, Mahabharat 5 Shrap तू माझ्याशी खोटं बोलला आहे. कोणताही ब्राह्मण इतक्या वेदना सहन करू शकत नाही. तू नक्कीच क्षत्रिय आहे आणि त्यांनी खोटं बोलल्यामुळे कर्णाला श्राप दिला की, तू खोटं बोलून धनुर्विद्या शिकलास, त्यामुळे ज्यावेळेस तुला धनुर्विद्येची सर्वात जास्त गरज असेल, त्यावेळेस तू ती विसरशील. महाभारताच्या युद्धात तेच झालं आणि ऐनवेळी कर्ण त्याची धनुर्विद्या विसरला आणि अर्जुनाने त्याचा वध केला.

सूर्यपुत्र कर्णला दुसरा शाप Mahabharat 5 Shrap एका गाईच्या मालकाने दिला होता. सराव करत असताना कर्णाच्या बाणाने चुकून एका गाईचा मृत्यू झाला, तेव्हा गायीच्या मालकाने त्याला शाप दिला की, तू सुद्धा एक दिवस असाच मरशील.

सूर्यपुत्र कर्णला तिसरा शाप असा मिळाला होता, ज्यामुळे महाभारताच्या युद्धात त्याचा मृत्यू झाला. एकदा कर्णला एक लहान मुलगी रडताना दिसली. त्याने तिला विचारले, काय झालं ? तर मुलीने सांगितलं की, माझ्या हातून मातीचं भांडी खाली पडलं आणि तूप जमिनीवर सांडलं आहे. कर्णाने ही माती हातात घेतली आणि माती पिळून तूप काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा धरती माता त्याच्यावर खूप चिडली आणि म्हणाली, या मुलीसाठी Mahabharat 5 Shrap तू माझी पिळवणूक करतोय. एक दिवस मीही तुझ्या रथाचं चाक पकडून ठेवेल, ज्यामुळे तुला युद्ध करता येणार नाही. आणि महाभारताच्या युद्धात असंचं झालं. कर्णाच्या रथाचं चाक मातीत रुतून बसलं.

पांडवांनी गुरू द्रोणाचार्य यांचा वध केला, त्यामुळे द्रोणाचार्य यांचा मुलगा अश्वत्थामा खूप चिडला आणि त्याने अर्जुनची सून असलेली उत्तरा जी त्यावेळेस गर्भवती होती आणि तिच्या पोटात पांडवांचा वंश होता. तिच्या गर्भावर ब्रह्मास्त्र चालवून पांडवांच्या वंशाचा समूळ नाश करण्याचा प्रयत्न केला.

महाभारतातील अश्वत्थामा अजून जिवंत आहे का ?

हे पाहून Mahabharat 5 Shrap भगवान श्रीकृष्ण यांचा क्रोध अनावर झाला. त्यांनी उत्तराला तर वाचवलं, परंतु अश्वत्थामाने केलेले हे पाप पाहून त्याला शिक्षा द्यायचं ठरवलं. त्यांनी पांडवांना सांगून अश्वत्थामाच्या माथ्यावर जो मनी होता, तो काढून घेण्यास सांगितलं. हा मनी काढल्याने अश्वतामाच्या माथ्यावर मोठी जखम झाली आणि त्यातून रक्त वाहू लागलं.

श्रीकृष्ण Mahabharat 5 Shrap अश्वत्थामाला म्हणाले की, तू आता जे केलंय, ते खूप मोठ पाप आहे. मी तुला श्राप देतो की, काळाच्या अंतापर्यंत तू या पृथ्वीवर असाचं भटकत राहशील. तुझ्या माथ्यावरील या जखमेतून रक्त सतत वाहत राहील. तुझ्या अंगातून दुर्गंधी येत असेल. त्यामुळे तू माणसांमध्ये राहू शकणार नाही. तुला जंगलातच राहावं लागेल.

हा शाप मिळाल्यानंतर अश्वत्थामा घोर जंगलात निघून गेला आणि आजही तो जिवंत आहे.

यानंतरचा शाप Mahabharat 5 Shrap समूळ नारी जातीला मिळालाय. महाभारताचं युद्ध जिंकल्यानंतर कुंतीने युधिष्ठिरला सांगितलं की, कर्ण तिचा पहिला मुलगा होता.  तेव्हा युधिष्ठिरला खूप राग आला आणि त्याने सर्व स्त्रियांना हा शाप दिला की,  स्त्रिया कधीही गुपित ठेवू शकणार नाहीत, त्या ती गोष्ट लगेच दुसऱ्याला सांगतील आणि असं म्हटलं जातं या शापाच्या प्रभावामुळे स्त्रियांच्या पोटात कोणतीही गोष्ट राहत नाही आणि त्या सगळं शेअर करतात.

महाभारताच्या युद्धात कौरव वंशाचा संपूर्ण नाश झाला. गांधारीच्या शंभर कौरव पुत्रांचा मृत्यू झाला. त्यामुळे तिने रागावून भगवान श्रीकृष्ण यांना शाप दिला की, जसं माझ्या वंशाचा समूळ नाश झाला आहे, तसाच तुमच्या रघुवंशाचाही नाश होईल आणि झालंही तसंच.

तर हे होते महाभारतातील असे काही शाप (Mahabharat 5 Shrap)  यामुळे महाभारतात पुढे अनेक गोष्टी घडल्या. तुम्हाला आवडली का ही माहिती नक्कीच कमेंट करून सांगा आणि आमच्या चैनलवरील इतर पौराणिक कथाही नक्कीचं पहा. अशाच नवीन नवीन पौराणिक कथा आणि माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.

खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top