Mahabank Yuva Yojana महाराष्ट्र बँकेच्या या योजनेबद्दल संपूर्ण माहिती

Mahabank Yuva Yojana

Mahabank Yuva Yojana मित्रांनो प्रत्येक माणसाला उत्तम भविष्यासाठी बचत ही खूपच महत्वाची असते आणि ही बचतीची सवय त्याला लहानपणापासूनच लागली तर त्याच्यासाठी हे खूपच फायदेशीर ठरू शकतं.

आजच्या काळात बचत करण्यासाठी असो किंवा मग आर्थिक व्यवहार करण्यासाठी प्रत्येक माणसाकडे बँक अकाऊंट असणे खूपच गरजेचं आहे.

लहान मुलांनासुद्धा पैशांची बचत कशी करावी आणि आपल्याजवळील पैशांचा योग्य वापर कसा करावा हे लहान वयापासूनच शिकवणं गरजेचं आहे कारण या वयापासूनच त्यांच्यावर बचतीचे आणि आर्थिक व्यवस्थापणाचे संस्कार झाले तर ते त्यांना आयुष्यभर खूप फायदेशीर ठरेल आणि त्यांना आयुष्यात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार नाही.

Mahabank Yuva Yojana 

मित्रांनो आज आपण बँक ऑफ महाराष्ट्रच्या महाबँक युवा योजनाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

बँक ऑफ महाराष्ट्रची महाबँक युवा योजना (Mahabank Yuva Yojana) ही लहान मुलांना बँकेच्या व्यवहारांची सवय व्हावी, आपल्या पैशांचा योग्य वापर कसा करावा हे शिकवण्यासाठीच बनवण्यात आली आहे. याबाबतीत पालकही त्यांना योग्य ती मदत करू शकतील.

महाबँक युवा योजनेअंतर्गत बँक खाते उघडण्यासाठी वयोमर्यादा काय आहे ?

या Mahabank Yuva Yojana योजनेअंतर्गत बँक खाते उघडण्यासाठी मुलांचं वय हे 10 वर्ष ते 18 वर्षापर्यंत असावं लागतं.

हे Mahabank Yuva Yojana खातं उघडण्यासाठी कागदपत्रे काय लागतात.

1. मुलाचं आधारकार्ड

2. पालकांची काही कागदपत्रे

ही कागदपत्रे बँकेत जमा करावी लागतात.

या अकाऊंटमध्ये किती ठेव ठेवावी लागते :

बँक खातेधारक मुलाकडून 10 रुपयांची ठेव घेऊन बँक खातं सुरू केलं जातं.

Mahabank Yuva Yojana
Mahabank Yuva Yojana

प्रत्येक बँक खात्यावर ठराविक रक्कम ठेवणं बंधनकारक असतं पण या बँक खात्यावर ठराविक रक्कम ठेवली नाही तरी दंड आकारला जात नाही.

या अकाऊंटसोबत चेकबुक दिले जात नाही. पण 18 वर्षांनंतर चेकबुक हवे असेल तर चार्ज घेऊन चेकबुक देण्यात येतं.

महाबँक युवा योजनेअंतर्गत बँक अकाऊंटमध्ये तुम्ही किती आवर्ती ठेव जमा करू शकता :

विद्यार्थी एक ठराविक मासिक हफ्ता ठरवू शकता म्हणजे दरवर्षी शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला शालेय फी आणि अन्य शालेय खर्च सहजपणे पूर्ण होऊ शकतील. यामध्ये कोणताही टीडीएस चार्ज कट केला जात नाही.

मुदत ठेव : तुम्हाला जर ठराविक कालावधीनंतर 50000 रुपये ते 100000 रुपये मिळवायचे असतील तर तुम्हाला दरवर्षी ठराविक तारखेला ठराविक रक्कम जमा करणे आवश्यक आहे.

RTGS म्हणजे काय ?

महाबँक युवा योजनेअंतर्गत तुम्हाला कर्ज किती मिळू शकतं :

जर Mahabank Yuva Yojana तुमचं बँक अकाऊंट सहा महिन्यांपेक्षा जास्त जुनं असेल तर विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेताना शैक्षणिक कर्जसुद्धा दिलं जातं.

महाबँक युवा योजनेच्या बँक खात्याअंतर्गत इतर कोणते लाभ मिळतात :

शैक्षणिक फी, होस्टेल फी भरण्यासाठी पालकांच्या खात्यातून ठेव योजनेअंतर्गत मुलांच्या खात्यात कोणत्याही शुल्काशिवाय रक्कम ट्रान्सफर करू शकता.

पालकांच्या खात्यातून त्याच शाखेतल्या खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यासाठी कोणतेही शुल्क घेतले जात नाही.

एकच शाखेत मुलाच्या बँक अकाऊंटमधून त्याच्या आवर्ती ठेव खात्यात निःशुल्क पैसे ट्रान्सफर केले जातात.

ठरवलेल्या खर्चाच्या मर्यादेसह विनाशुल्क एटीएम डेबिट कार्ड दिलं जातं.

मोबाईल बिलचा भरणा हा निःशुल्क केला जातो.

बँक ऑफ महाराष्ट्रच्या महाबँक युवा योजनेअंतर्गत (Mahabank Yuva Yojana) उघडलं जाणारं बँक अकाऊंट हे लहान वयातील मुलांना बँकिंग सेवांची सवय लावण्यासाठी आणि त्यांच्यावर आर्थिक व्यवस्थापणाचे संस्कार करण्यासाठी बनवली गेली आहे. ही योजना लहान मुलांसाठी खूप उपयुक्त आहे.

मित्रांनो तुम्हाला हा आर्टिकल उपयोगी वाटला असेल तर आमचे दुसरे आर्टिकलसुद्धा नक्की वाचा.

खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top