Lowest Gold Price Today सोन्याच्या किमतीत सध्या जोरदार तेजी आहे, हे तर आपल्या सर्वांना माहिती आहे. एप्रिल महिन्यात 10 ग्राम सोन्याचा भाव चक्क 75 हजार रुपये पार करून गेला होता. आता तो काहीसा कमी होऊन 71 हजार रुपयांच्या आसपास आहे.
Lowest Gold Price Today
परंतु हा भाव आहे 999 प्युरीटी असलेल्या 24 कॅरेट सोन्याचा. पण तुम्हाला माहितीये का, तुम्हाला 1 तोळा सोनं फक्त 42 हजार रुपयांना मिळू शकतं. तुमचा यावर विश्वास बसणार नाही, पण हे सत्य नाही. परंतु हे 24 कॅरेट सोनं नसून फक्त 14 कॅरेट सोनं आहे. (Lowest Gold Price Today) 14 कॅरेट सोन्याचा भाव फक्त 42 हजार रुपये प्रति तोळा (10 ग्राम) आहे.
आपल्या देशात सोन्याच्या खाणी कोठे आहेत ?
24 कॅरेट आणि 14 कॅरेट व्यतिरिक्त 18 कॅरेट आणि 22 कॅरेट सोनं सुद्धा असतं आणि या सोन्याचे भाव कमी जास्त असतात. सध्या मार्केटमध्ये (Lowest Gold Price Today) 22 कॅरेट सोन्याचा भाव 65 हजार 900 रुपये आहे. 18 कॅरेट सोन्याचा भाव सध्या मार्केटमध्ये 54 हजार रुपये आहे.
सोनं मिळतंय फक्त 42000 रुपये तोळा
तुम्हाला जितकं प्युअर सोनं हवं असेल, त्यानुसार सोन्याचा भाव कमी जास्त होत असतो. 14 कॅरेट पासून 24 कॅरेट पर्यंतचं सोनं तुम्ही निवडू शकता. त्यानुसार भाव कमी जास्त होईल. सोन्याच्या शुद्धतेनुसारचं त्याची किंमत ठरते.
ही तर झाली सोन्याची गोष्ट आता आपण चांदीचा भाव पाहुया. 999 प्युरिटी असलेल्या 1 किलो चांदीचा भाव 80 हजार रुपये पार करून गेला आहे.
जगभरातील फायनान्शियल एक्स्पर्टस सांगत आहेत की, या काळात सोनं आणि चांदी हेच गुंतवणुकीसाठी सर्वात उत्तम पर्याय आहेत. कारण जगभरात मंदी येण्याची शक्यता आहे आणि मोठ्या अर्थव्यवस्था बुडाल्यामुळे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणं चांगला पर्याय नाहीये. त्यापेक्षा सोन्या आणि चांदीचा भाव येत्या पाच वर्षात मोठ्या प्रमाणात वाढेल. यामुळे आज यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना मोठा फायदा होईल.
पुढील काही काळात सोन्या आणि चांदीचा भाव कमी होऊ शकतो. परंतु मागणी घटल्यामुळे असं होईल आणि त्यानंतर पुन्हा सोनं आणि चांदीच्या भावात तेजी पाहायला मिळेल. त्यामुळे गुंतवणूकदारांनी घाबरून न जाता यामध्ये गुंतवणूक करणं योग्य आहे.
तर तुम्ही गुंतवणूक करण्यासाठी कोणता पर्याय निवडाल, शेअर मार्केट, सोनं, चांदी की रियल इस्टेट ? कोठे सर्वात जास्त परतावा मिळतो ? नक्कीचं कमेंट करून सांगा आणि अशाचं नवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !