Lost Mobile Tracking System सध्या जर तुम्ही कोणालाही विचारलं की, तुमचं सर्वात जास्त प्रेम कोणावर आहे, तर तो म्हणेल माझ्या मोबाईलवर. तुम्हाला अशी अनेक वेडीपिशी झालेली माणसं भेटली असतील, ज्यांचा मोबाईल चोरीला गेला आहे, किंवा हरवला आहे.
मोबाईल जर चोरीला गेला किंवा हरवला तर अनेकांना टेन्शन येतं. कारण आजकाल आपल्या मोबाईलमध्ये खूप महत्त्वाच्या गोष्टी असतात. आपले पर्सनल फोटोग्राफ, व्हिडिओज, कॉन्टॅक्ट. त्याचबरोबर बँकेशी रिलेटेड माहिती, अनेक डॉक्युमेंट हे सगळं मोबाईलमध्ये सेव्ह असतं. त्यामुळे या गोष्टींचा कोणीही गैरवापर करू नये, असंही आपल्याला वाटतं.
Lost Mobile Tracking System
म्हणूनचं आज आम्ही तुम्हाला अशा एका सिस्टीमबद्दल सांगणार आहोत, अशा एका पोर्टल बद्दल सांगणार आहोत, ज्याचा वापर करून तुम्ही तुमचा हरवलेला मोबाईल ट्रॅकही करू शकता आणि काही क्षणात ब्लॉकही करू शकता. या ट्रेकिंग सिस्टीमचं नाव आहे, “संचार साथी पोर्टल” (Sanchar Saathi Portal).
असा करा हरवलेला मोबाईल काही क्षणात ट्रॅक आणि ब्लॉक | Lost Mobile Tracking System
केंद्र सरकारने CEIR च्या मदतीने एक नवीन ट्रेकिंग स्टीम लॉन्च करायचं ठरवलंय. या लॉस्ट मोबाईल ट्रेकिंग सिस्टीमचे नाव आहे, “संचार साथी पोर्टल.”
संचार साथी पोर्टलच्या मदतीने तुम्हाला हरवलेला किंवा चोरी गेलेला मोबाईल ट्रॅकही करता येईल आणि ब्लॉकही करता येईल.
खालील स्टेपसचा वापर करून तुम्ही अवघ्या काही क्षणात Lost Mobile Tracking System हे काम करू शकतात.
१) सर्वप्रथम “www.sancharsaathi.gov.in” या वेबसाईटला भेट द्या.
२) येथे आल्यावर “citizen centric services” हा पर्याय निवडा.
३) येथे तुम्हाला “block your lost/stolen phone” पर्याय भेटेल.
४) यानंतर तुमच्यासमोर एक फॉर्म ओपन होईल. या फॉर्ममध्ये तुम्हाला तुमच्या मोबाईलचा आय एम ई आय IMEI नंबर, मोबाईलचं मॉडेल, मोबाईल विकत घेतल्याचा इन्व्हाईस, मोबाईल हरवल्याची तारीख, वेळ, जिल्हा, राज्य, तुमचं नाव, पत्ता, ई-मेल अशी माहिती नोंदवावी लागेल.
५) यानंतर तुम्हाला तुम्ही ज्या पोलीस स्टेशनमध्ये मोबाईल चोरीला गेल्याची किंवा हरवल्याची तक्रार केली आहे, त्या पोलीस स्टेशनचा पत्ता, जिल्हा, राज्य आणि एफ आय आरची(FIR) कॉपीसुद्धा अपलोड करावी लागेल.
६) आणि Lost Mobile Tracking System मग शेवटी तुम्हाला Disclaimer टिक करून फॉर्म सबमिट करायचा आहे.
७) या सर्व प्रक्रियेनंतर तुमचा फॉर्म सबमिट होईल आणि तुमचा मोबाईल ब्लॉक करण्यात येईल.
एकूणच या Lost Mobile Tracking System ट्रेकिंग सिस्टिमचा फायदा तुमचा हरवलेला किंवा चोरी गेलेला मोबाईल ट्रॅक करण्यासाठी आणि ब्लॉक करण्यासाठी होतो. ही नवीन ट्रेकिंग सिस्टम खूपच फायद्याची आहे. याचा वापर करून तुमच्या मोबाईलचा गैरवापर टाळता येईल आणि तुमची माहितीही सुरक्षित राहील.
हा Lost Mobile Tracking System लेख तुम्हाला फायदेशीर वाटल्यास नक्कीचं कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !