Lord Ganesh Birth Story : आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या जन्माची कथा माहितेय का ?

Lord Ganesh Birth Story 

Lord Ganesh Birth Story कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करायची म्हटलं की, आपण सर्वात आधी गणपती बाप्पांचं स्मरण करतो. त्यांची पूजा करतो. त्यांना सर्व देवांमध्ये प्रथम स्थान देण्यात आलंय. म्हणून त्यांना प्रथमेश असंही म्हटलं जातं.

आपल्या महाराष्ट्रात तर गणेशउत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. अकरा दिवस गणपती बाप्पांची घराघरात प्राणप्रतिष्ठा केली जाते. त्यांची पूजा केली जाते. उत्सव साजरा केला जातो आणि मग 11 व्या दिवशी त्यांचं विसर्जन केलं जातं. या दिवशी सर्वच भक्तांचे डोळे पाणावलेले असतात. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या हा जयघोष सगळीकडे होत असतो.

मग आपल्या लाडक्या गणपती बाप्पांच्या जन्माची गोष्ट तुम्हाला माहिती आहे का ? गणपती बाप्पांचा जन्म कसा झाला ? (Lord Ganesh Birth Story) आता त्यांचं जे रूप आहे, ते रूप त्यांना कसं मिळालं ? हे तुम्हाला माहिती आहे का ? आज आपण त्याबद्दलचं जाणून घेऊया. विविध पुराणांमध्ये गणपती बाप्पांच्या जन्माबद्दल वेगवेगळ्या कथा सांगितल्या जातात. परंतु जी कथा सर्वात जास्त प्रचलित आहे ती शिवपुराणामध्ये सांगितली जाते.

Lord Ganesh Birth Story 

शिवपुराणानुसार एकदा माता पार्वती यांनी आंघोळीला जाण्यापूर्वी अंगाला उटणं लावलं आणि मग हे उटणं उतरल्यानंतर त्यांनी एक मूर्ती बनवली आणि या मूर्तीमध्ये प्राण टाकले. तेव्हा या मूर्तीतून एक खूपचं सुंदर मुलाची उत्पत्ती झाली. माता पार्वती यांनी या मुलाला स्वतःचा पुत्र म्हणून संबोधलं आणि त्याला सांगितलं की, आता मी स्नान करायला चाललेय. तू येथे पहारा दे आणि कुणीही आलं, तरी त्याला आतमध्ये येऊ देऊ नकोस. हा मुलगा यासाठी हो म्हणाला आणि दरवाजावर पहारा देऊ लागला.

तेवढ्यात तेथे भगवान शंकर त्यांच्या गणांबरोबर आले. या नवीन बालकाला तेथे पाहून भगवान शंकर यांनी विचारलं की, तू कोण आहेस ? गणपती बाप्पा म्हणाले, मी माता पार्वती यांचा मुलगा आहे आणि त्यांनी मला येथे पहारा देण्यास सांगितलंय.

गणपती बाप्पाच्या जन्माची कथा

महादेव गणपती बाप्पाला म्हणाले, मला पार्वतीला भेटायला आत जायचंय. परंतु गणपती बाप्पांनी त्यासाठी नकार दिला आणि ते म्हणाले, मातेने मला सांगितलंय की, कोणालाही आतमध्ये येऊ द्यायचं नाही. तुम्ही येथेच त्यांची वाट पहा. जेव्हा त्या बाहेर येतील, तेव्हा तुमची भेट होईल.

(Lord Ganesh Birth Story) हे ऐकून महादेव यांच्याबरोबर असलेले त्यांचे गण खूप चिडले आणि म्हणाले, तू कुणाशी बोलतोय, तुला समजतंय का ? हे कैलासचे अधिपती आहेत. भगवान शंकर आहे. पार्वती मातेचे पती आहेत. त्यांना आतमध्ये जाऊ दे. परंतु गणपती बाप्पांनी त्यासाठी नकार दिला आणि म्हणाले, मला पार्वती माताने कोणासही आतमध्ये जाऊ देण्यास नकार दिलाय. त्यामुळे कोणीही असो, मी त्यांना आतमध्ये जाऊ देणार नाही.

गणपती बाप्पांचं हे उत्तर ऐकून महादेवांचे गण खूप चिडले आणि त्यांनी चक्क गणपती बाप्पावर हल्ला केला. गणपती बाप्पा आणि महादेवांचे गण यांमध्ये भीषण युद्ध सुरू झालं. एवढासा बालक आपल्यासमोर जास्त टिकाव धरू शकणार नाही, असं महादेवांच्या गणांना वाटलं. परंतु घडलं उलटचं. गणपती बाप्पासमोर गणांचं काहीही चाललं नाही आणि त्यांनी सर्वांनाचं हरवलं.

महाभारतातील महायोद्धा अश्वत्थामाची कथा

हा सगळा प्रकार पाहून महादेव खूप क्रोधीत झाले आणि त्यांनी चक्क त्रिशूल गणपती बाप्पांवर चालवलं. (Lord Ganesh Birth Story) या त्रिशूलाचा सामना करणं गणपती बाप्पांना जमलं नाही. त्रिशूलाने चक्क गणपती बाप्पांचं डोकं शरीरापासून वेगळं केलं.

तेवढ्यात माता पार्वती स्नान करून बाहेर आल्या.  आपल्या पुत्राचं डोकं शरीरापासून वेगळं झालंय, हे पाहून त्यांना जबरदस्त धक्का बसला आणि त्या खूप क्रोधीत झाल्या. गणपती बाप्पांची ही अवस्था पाहून त्यांनी प्रलय आणण्याचा निर्णय घेतला.

(Lord Ganesh Birth Story) माता पार्वती आता प्रलय आणणार हे पाहून सर्व देवी देवता खूप घाबरले आणि त्यांनी माता पार्वतीची स्तुती करण्यास सुरुवात केली. थोड्यावेळानंतर माता-पार्वती शांत झाल्या.

महादेव यांनी गणपती बाप्पांना (Lord Ganesh Birth Story)  पुन्हा जिवंत करण्याचं ठरवलं आणि त्यांनी गरूडाला सांगितलं की, तू जा आणि जी आई तिच्या बालकाकडे पाठ करून झोपली असेल, त्या बालकाचं डोकं घेऊन ये. गरुड सगळीकडे अशी आई आणि बालक शोधत होता. परंतु त्याला ते कुठेही सापडले नाहीत.

तेवढ्यात गरुडाला एक हत्तीणी दिसली. हत्तीणीच्या शरीराची रचना अशी असते की, ती आपल्या बाळाकडे तोंड करून झोपू शकत नाही. गरुडाने लगेचचं या छोट्याशा हत्तींनीच्या बाळाचं डोकं भगवान शंकर यांच्याकडे घेऊन आला. महादेवांनी हे हत्तीचं डोकं गणपती बाप्पाच्या शरीरावर लावलं आणि त्यांना जिवंत केलं.

गणपती बाप्पा (Lord Ganesh Birth Story) पुन्हा जिवंत झाले आहेत, हे पाहून माता पार्वतीला खूप आनंद झाला. त्यानंतर महादेवांनी गणपती बाप्पांना वरदान देत म्हटलं की, कोणत्याही शुभकार्याची सुरुवात जर गणपती बाप्पांचे नाव घेऊन केली नाही, तर ते कार्य यशस्वी होणार नाही. त्यामुळे आपण प्रत्येक शुभकार्याची सुरुवात गणेश वंदनेने, गणपती बाप्पांचे नाव घेऊनचं करतो.

तसंच कोणतंही विघ्न गणपती बाप्पांच्या नावाने दूर होईल, असाही आशीर्वाद दिला आणि सर्व गणांचा आद्य म्हणून त्यांना घोषित केलं. म्हणूनचं त्यांना विघ्नहर्ता गणेशही म्हटलं जातं.

तर अशी होती गणपती बाप्पांच्या जन्माची कथा. (Lord Ganesh Birth Story) कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोरया असं नक्कीचं लिहा आणि अशाच नवीन नवीन पौराणिक कथा आणि माहिती जाणून घेण्यासाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.

खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top