Lokshabha Election Pahila Tappa लोकसभा निवडणुकांची घोषणा झाल्यापासून सगळेजण निवडणूक कधी सुरू होतेय, मतदानचा पहिला टप्पा कधी येतोय, याचीच वाट पाहत होते आणि शेवटी तो दिवस उजाडला आहे. शुक्रवार 19 एप्रिल रोजी संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणूक 2024 चा पहिला टप्पा पार पडेल.
आपल्या महाराष्ट्रातली पाच लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडणार आहे. मग कोणते आहेत, हे पाच मतदारसंघ आणि येथे कोणामध्ये लढत होईल, आपण त्याबद्दल जाणून घेऊया.
Lokshabha Election Pahila Tappa
महाराष्ट्रात विदर्भातील पाच मतदारसंघांमध्ये लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यामध्ये मतदान होणार आहे. हे पाच लोकसभा मतदारसंघ आहेत, नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली – चिमूर आणि चंद्रपूर.
या पाचही मतदारसंघात सर्वच पक्षांनी जोरदार प्रचार केलाय आणि आमचाचं उमेदवार निवडून येईल, अशी प्रत्येकालाचं गॅरंटी वाटतेय. मग आता कोण जिंकणार, हे तर मतमोजणीच्या दिवशीचं कळेल. परंतु या पाचही मतदारसंघातील सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावायला हवा. लोकशाहीबद्दलचं आपलं कर्तव्य पूर्ण करायला हवं, एवढं मात्र नक्की.
आधार कार्डची संपूर्ण माहिती मराठीत
आता आपण पाहूया या पाचही मतदारसंघांमध्ये कोणत्या प्रमुख उमेदवारांमध्ये लढाई होईल.
1) नागपूर : नागपूर लोकसभा मतदारसंघात एनडीएचे उमेदवार नितीन गडकरी आणि महाविकास आघाडीचे उमेदवार विकास ठाकरे यांच्यामध्ये सरळ सरळ लढत होईल. मागील दोनही लोकसभा निवडणुकांमध्ये नितीन गडकरी मोठ्या फरकाने विजयी झाले होते.
2) रामटेक : रामटेक लोकसभा मतदारसंघात एनडीएचे उमेदवार राजू पारवे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार श्यामकुमार बर्वे यांच्यात लढत होईल. मागच्या लोकसभा निवडणुकीत रामटेक मतदारसंघ भाजपाने जिंकला होता.
3) भंडारा-गोंदिया : भंडारा-गोंदिया मतदारसंघात एनडीएचे उमेदवार सुनील मेंढे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर प्रशांत पटोले यांच्यामध्ये मुख्य लढत होईल.
4) चंद्रपूर : चंद्रपूर मतदारसंघात एनडीएचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्यामध्ये मुख्य लढत होईल.
5) गडचिरोली चिमूर : गडचिरोली चिमूर मतदार संघात एनडीएचे उमेदवार अशोक नेते विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार नामदेव किसन यांच्यात मुख्य लढत होईल.
Lokshabha Election Pahila Tappa निवडणुकीच्या रिंगणात असलेला प्रत्येक उमेदवार मतदारांना विविध आश्वासन देत असतो आणि मतदारही आपल्या आवडत्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी उत्सुक असतात. Lokshabha Election Pahila Tappa लोकशाहीचा हा उत्सव सर्वांनी मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा करायला हवा. आपल्या मतदानाचा अधिकार वापरायला हवा आणि लोकशाही बद्दलचं आपलं कर्तव्य पूर्ण करायला हवं, एवढं मात्र नक्की.
अशाच नवीन नवीन आणि इंटरेस्टिंग माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !