LIC Nivesh Plus Scheme In Marathi | एलआयसी निवेश प्लस योजना

LIC Nivesh Plus Scheme In Marathi

LIC Nivesh Plus Scheme In Marathi

LIC Nivesh Plus Scheme In Marathi LIC म्हणजेचं लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भारतीयांसाठी विश्वासाचे दुसरे नाव आहे. जर कोणत्याही भारतीयाला जीवन विमा काढायचा असेल, तर एलआयसी हा पर्याय सर्वात आधी समोर उभा असतो. याचं मुख्य कारण म्हणजे एलआयसी ही भारत सरकारची कंपनी आहे. यामध्ये तुम्ही कितीही पैसे गुंतवले, तर ते कधीही बुडत नाही. सरकार त्याची गॅरंटी देतं.

LIC म्हणजे जीवन विमा हे समीकरण बनलेलं होतं. परंतु मागील काही वर्षांत एलआयसीने अनेक गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध करून दिले आहे. या गुंतवणुकीच्या पर्यायांचा सर्वात मोठा फायदा हा आहे कि गुंतवणूकदारांनी गुंतवलेले पैसे सुरक्षित राहतात. तसेच LIC या स्कीममध्ये गुंतवणूक केल्याबद्दल ग्राहकांना दुसरे अनेक बेनेफिटही देते. जसं कि जीवन विमा आणि दुर्घटना विमा. परंतु एलआयसी फक्त जीवन विमाचं देत नाही, तर इन्व्हेस्टमेंटचे अनेक ऑप्शनसुद्धा एलआयसी उपलब्ध करून देत आहे. म्हणूनचं आज आपण एलआयसीची अशी एक योजना पाहणार आहोत, ज्यामध्ये थोडी रिस्क तर आहे, पण तुमचे पैसे लवकरचं डबल होऊ शकतात. त्याचबरोबर तुम्हाला जीवन विमासुद्धा मिळतो. मग कोणती आहे ही एलआयसीची स्कीम आपण त्याबद्दलचं जाणून घेऊया.

LIC निवेश प्लस स्कीम

या योजनेचं नाव आहे LIC निवेश प्लस स्कीम (LIC Nivesh Plus Scheme In Marathi). ही सिंगल प्रीमियम, नॉन पार्टिसिपेटिंग, व्यक्तिगत जीवन विमा पॉलिसी आहे. एलआयसीच्या इतर पॉलिसीमध्ये जेथे फक्त जीवन विमा दिला जातो. तेथे या पॉलिसीमध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंटचं ऑप्शनही दिलं जातं. ही इन्वेस्टमेंट एकाचं वेळेस करायची असते एलआयसी पॉलिसीच्या सुरुवातीलाचं.

एलआयसी या (LIC Nivesh Plus Scheme In Marathi) योजनेमध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी अनेक ऑप्शन्स देते. हे ऑप्शन्स आहेत, ग्रोथ फंड, बॅलन्स फंड, सिक्युर फंड आणि बॉंड फंड. तुम्ही यांपैकी कोणत्याही एका फंडमध्ये गुंतवणूक करू शकतात. त्याचबरोबर पॉलिसी धारकाला बेसिक फंड अशुअर करण्याचा ऑप्शनही उपलब्ध आहे. म्हणजेच तुम्ही एक कस्टमाइज्ड इन्व्हेस्टमेंट प्लॅन तुमच्या गरजेनुसार खरेदी करू शकतात. अनेक योजनांमध्ये तुमच्याकडे हा ऑप्शन नसतो. परंतु एलआयसी हा ऑप्शन तुम्हाला देते.

एलआयसी निवेश प्लस योजनेची वैशिष्ट्ये

जसं की आपण याआधी चर्चा केलीये एलआयसीने सुरु केलेली ही खूपच युनिक अशी विमा प्लस इन्वेस्टमेंट योजना आहे. आपण (LIC Nivesh Plus Scheme In Marathi) या योजनेची वैशिष्ट्ये जाणून घेऊया.

1) या योजनेमध्ये 90 दिवसांच्या बालकापासून ते 65 वर्षांची व्यक्ती गुंतवणूक करू शकते.

2) तुमच्या इच्छेनुसार तुम्ही पॉलिसीचा पिरियड निवडू शकता. या योजनेचा मॅच्युरिटी पिरियड 10 ते 35 वर्षांदरम्यान आहे. परंतु पाच वर्षांचा लॉक इन पिरियड सुद्धा विचारात घ्यायला हवा.

3) पॉलिसी घेताना जर पॉलिसी धारकाचं वय 65 वर्ष आहे. तर फक्त 20 वर्षांसाठीचं या योजनेत गुंतवणूक करता येते. मॅच्युरिटी पीरियडचं वय जास्तीत जास्त 85 वर्षेचं आहे.

4) या योजनेत कमीत कमी 1 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागते. परंतु जास्तीत जास्त गुंतवणुकीची कोणतीही मर्यादा नाहीये. जर पॉलिसी मॅच्युअर होईपर्यंत तुम्ही जिवंत असाल, तर तुम्हाला मॅच्युरिटी बेनिफिटही दिला जातो.

5) एलआयसीची ही निवेश प्लस योजना (LIC Nivesh Plus Scheme In Marathi) तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईनही खरेदी करू शकता.

6) भारत सरकारच्या योजना जसं की पोस्ट ऑफिसच्या इन्व्हेस्टमेंट स्कीम किंवा एलआयसीच्या इन्व्हेस्टमेंट स्कीम यामध्ये कोणतीही रिस्क नसते. परंतु निवेश प्लस या स्कीममध्ये शेअर बाजाराशी रिलेटेड रिस्क आहे. परंतु तुम्ही पॉलिसी घेताना ही रिस्क कमी किंवा जास्त करू शकता. जर तुम्ही जास्त जोखीम घ्यायचं ठरवलं, तर 15 टक्के दराने पाच वर्षातचं तुमचे पैसे डबल होऊ शकतात.

7) सध्या अशी कोणतीही सरकारी स्कीम उपलब्ध नाहीये, ज्यामध्ये फक्त 5 वर्षात पैसे डबल होतात. काही वर्षांपूर्वी किसान विकास पत्र या योजनेमध्ये फक्त पाच वर्षात पैसे दुप्पट व्हायचे. परंतु आता जवळपास 10 वर्षांमध्ये येथे पैसे दुप्पट होत आहेत.

8) त्यामुळे ज्या लोकांना त्यांचे पैसे दुप्पट करायचे आहेत. त्याचबरोबर ते जोखीम घेण्यासाठी तयार आहेत. अशा लोकांसाठी एलआयसी निवेस प्लस ही योजना खूपचं फायद्याची आहे.

हेही वाचा : Mukhyamantri Samuhik Vivah Yojana | मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजना

एलआयसी निवेश प्लस योजनेचे फायदे

आता आपण या (LIC Nivesh Plus Scheme In Marathi) योजनेत मिळणाऱ्या फायद्यांबद्दल जाणून घेऊया.

1) या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला जीवन विमा आणि दुर्घटना विमासुद्धा मिळतो. तुम्ही किती गुंतवणूक केली आहे, यावरून तुमच्या जीवन विमा आणि दुर्घटना विमाची रक्कम ठरवली जाते. एलआयसी व्यतिरिक्त अन्य कोणत्याही संस्थेकडील इन्व्हेस्टमेंट स्कीममध्ये जीवनविमा आणि दुर्घटना किंवा मिळत नाही. हा या योजनेचा खूप मोठा फायदा आहे.

2) जर या योजनेमध्ये पॉलिसी होल्डरचा मृत्यू जोखीम सुरू झाल्यानंतर झाला, तर त्याला जीवन विमा आणि युनिट फंड या दोघांचाही फायदा दिला जातो.

3) एलआयसी निवेश प्लस इन्वेस्टमेंट स्कीममध्ये तुम्हाला मॅच्युरिटी बेनिफिटही मिळतो. मॅच्युरिटी पिरेडपर्यंत जर पॉलिसी होल्डर जिवंत असेल, तर त्याला युनिट फंड आणि त्या मूल्याचं मॅच्युरिटी बेनिफिट सुद्धा मिळतं.

निवेश प्लस इन्वेस्टमेंट स्कीममध्ये गुंतवणूक कशी करता येईल

एलआयसीच्या या (LIC Nivesh Plus Scheme In Marathi) योजनेमध्ये तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने गुंतवणूक करू शकता.

ऑनलाइन गुंतवणुकीचा पर्याय निवडल्यास तुम्हाला एलआयसीच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन ही योजना निवडावी लागेल आणि ऑनलाईन फॉर्म भरावा लागेल.

https://licindia.in/mr/lic-s-nivesh-plus-plan-no.-849-uin-no.-512l317v01-

ऑफलाइन पद्धतीने तुम्ही एलआयसी एजंटच्या ऑफिसमध्ये जाऊन या योजनेत गुंतवणूक करू शकता.

एलआयसी निवेश प्लस योजनेसाठी आवश्यक अटी

1) या (LIC Nivesh Plus Scheme In Marathi) योजनेत इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी अर्जदार भारतीय निवासी असावा.

2) 90 दिवसांपासून ते 65 वर्षांपर्यंतची कोणतीही व्यक्ती या योजनेत गुंतवणूक करू शकते.

3) या योजनेत तुम्हाला सुरुवातीलाचं एक रकमी पैसे भरावे लागतात.

4) एलआयसी निवेश प्लस योजनेत गुंतवणूक करण्यासाठी कमीत कमी 1 लाख रुपये भरावे लागतात.

5) या योजनेत गुंतवणूक करण्याची कोणतीही अप्पर लिमिट नाहीये. तुम्ही कितीही गुंतवणूक करू शकता.

6) एलआयसी निवेश प्लस योजनेमध्ये 5 वर्षांचा लॉक इन पिरियड आहे. त्याआधी तुम्ही पॉलिसी सरेंडर करू शकत नाही.

7) या योजनेत तुम्ही कमीत कमी 10 वर्ष ते जास्तीत जास्त 35 वर्षांपर्यंत गुंतवणूक करू शकतात.

एलआयसी निवेश प्लस योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

1) अर्जदाराचं आधार कार्ड

2) अर्जदाराचं पॅन कार्ड

3) अर्जदाराचा उत्पन्नाचा दाखला

4) अर्जदाराचा निवासी दाखला

5) अर्जदाराचा पासपोर्ट साईज फोटो.

FAQ About LIC Nivesh Plus Scheme | एलआयसी निवेश प्लस योजनेबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न

1) प्रश्न : LIC निवेश प्लस योजना (LIC Nivesh Plus Scheme In Marathi) काय आहे ?

उत्तर : एलआयसीने सुरु केलेली ही एक युनिक इन्वेस्टमेंट स्कीम असून यामध्ये तुम्हाला एक रकमी गुंतवणूक करता येते. त्याचबरोबर जीवन विमा आणि दुर्घटना विमाचाही लाभ मिळतो.

2) प्रश्न : निलेश प्लस योजनेमध्ये किती रुपयांची गुंतवणूक करता येते ?

उत्तर : या योजनेत कमीत कमी 1 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागते. जास्तीच्या गुंतवणुकीसाठी कोणतीही लिमिट ठरवली गेली नाहीये. परंतु तुम्ही जेवढे जास्त पैसे गुंतवाल, त्यानुसार तुम्हाला त्या पैशांचा स्रोत सांगावा लागेल.

3) प्रश्न : एलआयसी निवेश प्लस योजनेमध्ये किती रुपयांचा जीवन विमा आणि दुर्घटना विमा मिळतो ?

उत्तर : या (LIC Nivesh Plus Scheme In Marathi) योजनेत तुम्ही किती रुपयांची गुंतवणूक केली आहे, त्या आधारावरचं जीवन विमा आणि दुर्घटना विमाची रक्कम ठरवली जाते. जितक्या जास्त पैशांची गुंतवणूक तितकी जास्त विम्याची रक्कम.

4) प्रश्न : एलआयसी निवेश प्लस योजनेमध्ये मॅच्युरिटी बेनिफिट मिळतो का ?

उत्तर : होय, या योजनेमध्ये मॅच्युरिटी बेनिफिट दिला जातो. तुमच्या युनिट फंडच्या रकमेवर मॅच्युरिटी बेनिफिट दिला जाईल. म्हणजे जेवढी युनिट फंडची रक्कम तेवढाच तुम्हाला मॅच्युरिटी बेनेफिट मिळेल.

5) प्रश्न : एलआयसी निवेश प्लस योजनेमध्ये (LIC Nivesh Plus Scheme In Marathi) किती वर्षांसाठी गुंतवणूक करता येते ?

उत्तर : या योजनेमध्ये कमीत कमी 10 वर्षे ते जास्तीत जास्त 35 वर्षांपर्यंत गुंतवणूक करता येते.

सध्या अनेक लोक अशा गुंतवणूक स्कीमच्या शोधात आहेत, जिथे रिस्क कमी आहे. त्याचबरोबर गुंतवणूक करणारी संस्था विश्वासार्ह आहे आणि परतावाही चांगला मिळेल. मग अशा लोकांसाठी एलआयसीने सुरु केलेली निवेश प्लस योजना (LIC Nivesh Plus Scheme In Marathi) खूपचं फायदेशीर आहे.

या योजनेमध्ये मार्केट रिस्क आहे. परंतु एलआयसी चं नाव जोडलेलं असल्यामुळे तुम्हाला तुमच्या इन्व्हेस्टमेंटबद्दल जास्त काळजी करण्याची गरज नाहीये. तुम्ही जोखीम किती घ्यायची, तेही ठरवू शकता. त्याचबरोबर ही एलआयसीची स्कीम असल्याने तुम्हाला गुंतवलेल्या रकमेवर जीवन विमा आणि दुर्घटना विमा असे फायदेही मिळतात.

अनेक वरिष्ठ नागरिकांना रिटायरमेंटनंतर खूप पैसे मिळतात. हे पैसे गुंतवायचे कुठे हा प्रश्न त्यांना सतावत असतो. बँकेच्या एफडी एवढाच सुरक्षित पण त्यापेक्षा जास्त परतावा देणाऱ्या प्लॅनच्या शोधात असे वरिष्ठ नागरिक असतात. त्यांच्यासाठी एलआयसीची ही निवेश प्लस स्कीम खूप फायद्याची आहे यात तिळमात्र शंका नाही.

तुमच्या मनात एलआयसी निवेश प्लस (LIC Nivesh Plus Scheme In Marathi) या योजनेबद्दल आणखीन काही प्रश्न असतील तर नक्कीचं कमेंट करून विचारा. आम्ही त्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करू आणि अशाच गुंतवणुकीच्या योजनांबद्दल जाणून घेण्यासाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.

खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top