LIC Kanyadan Policy In Marathi | एलआयसी कन्यादान पॉलिसी

LIC Kanyadan Policy In Marathi

LIC Kanyadan Policy In Marathi

LIC Kanyadan Policy In Marathi आपल्या देशात जेव्हा कोणत्याही घरात मुलगी जन्माला येते, तेव्हा त्या आई-वडिलांना तिच्या लग्नाची काळजी सतावू लागते. मुलीचं लग्न करणं आई-वडिलांना एक खूप मोठी जबाबदारी वाटते. तिच्यासाठी चांगला मुलगा, चांगलं घर शोधण्यापासून ते लग्नाचा खर्च या सगळ्या गोष्टी त्यांच्या डोक्यात मुलीच्या जन्माच्या पहिल्या दिवसापासूनचं फिरत असतात.

त्यातचं आता लग्न म्हणजे खूप मोठा सोहळा झाला आहे. लग्नाचे कपडे, हॉल, सजावट, विविध फंक्शन्स यामध्ये खूप जास्त पैसे खर्च होतात. मग मुलीच्या लग्नासाठी इतके जास्त पैसे कसे जमवावे याबद्दल प्रत्येक पालक विचार करत असतो.

मुलीच्या लग्नाबद्दल आई-वडिलांची ही चिंता दूर करण्यासाठीचं अनेक खाजगी आणि सरकारी कंपन्यांनी विविध गुंतवणूक योजना आणल्या आहेत. आज आपण अशाचं एका योजनेबद्दल जाणून घेणार आहोत. या योजनेचे नाव आहे एलआयसी कन्यादान पॉलिसी LIC Kanyadan Policy.

मग ही एलआयसी कन्यादान पॉलिसी नेमकी आहे तरी काय ? एलआयसी कन्यादान पॉलिसीमध्ये (LIC Kanyadan Policy In Marathi) किती प्रीमियम भरावा लागतो ? या पॉलिसीचा मॅच्युरिटी पिरेड किती आहे आणि मॅच्युरिटी बेनिफिट किती दिला जाईल ? आज आपण त्याबद्दलचं सर्व काही जाणून घेणार आहोत.

एलआयसी कन्यादान पॉलिसी माहिती

एलआयसी ही एक सरकारी विमा कंपनी असून भारतीयांचा सर्वात जास्त विश्वास याच कंपनीवर आहे. एलआयसी नेहमी भारतीयांच्या गरजा लक्षात ठेवून विविध पॉलिसी आणत असते. मग ती लहान मुलं असो किंवा वरिष्ठ. सगळ्यांसाठी एलआयसीकडे एकापेक्षा एक चांगल्या पॉलिसीज आहेत.

भारतीय पालकांच्या मनात त्यांच्या मुलींच्या लग्नाविषयी असलेली स्वप्न आणि खर्चाबद्दलची काळजी ओळखूनचं एलआयसीने एलआयसी कन्यादान योजना LIC Kanyadan Policy In Marathi राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या पॉलिसीअंतर्गत तुम्ही गुंतवणूक करून मुलीच्या लग्नासाठी एक मोठी रक्कम एकरकमी मिळवू शकतात.

एलआयसी कन्यादान योजनेची वैशिष्ट्ये

आता आपण जाणून घेऊया, या LIC Kanyadan Policy In Marathi योजनेमध्ये जास्तीत जास्त किती रक्कम मॅच्युरिटी बेनिफिट म्हणून मिळू शकते. प्रीमियम किती भरावा लागेल आणि मुदत किती असेल. एकूणचं आपण या योजनेची सर्व वैशिष्ट्ये जाणून घेऊयात.

1) एलआयसी कन्यादान पॉलिसीचा मॅच्युरिटी पिरेड 13 वर्षांपासून ते 25 वर्षांपर्यंतचा आहे.

2) या पॉलिसीमध्ये तुम्ही जितका जास्त प्रीमियम भराल, तितका जास्त मॅच्युरिटी बेनिफिट तुम्हाला मिळेल.

3) उदाहरणार्थ जर तुम्ही या पॉलिसीमध्ये 121 रुपये दर दिवस म्हणजेचं महिन्याचे 3 हजार 600 रुपये भरले, तर 25 वर्षानंतर मॅच्युरिटीच्या वेळेस तुम्हाला 27 लाख रुपये तुमच्या मुलीच्या लग्नासाठी मिळू शकतात.

4) 3600 रुपयांचा प्रीमियम जर तुम्हाला जास्त वाटत असेल, तर रोज फक्त 75 रुपये म्हणजे महिन्याचे 2250 रुपये भरून तुम्ही 14 लाख रुपयांचा मॅच्युरिटी बेनिफिट मिळू शकतात.

5) असंही नाहीये की, या पॉलिसीमध्ये तुम्हाला भरावा लागणाऱ्या प्रीमियम आणि मॅच्युरिटी पिरेड बद्दल काही Restriction आहेत. तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे मॅच्युरिटी पीरियड आणि तुम्हाला जेवढा जमेल तेवढा प्रीमियम भरू शकतात. यानुसारचं तुम्हाला शेवटी मिळणारा मॅच्युरिटी बेनिफिट कमी किंवा जास्त होईल.

6) एलआयसीच्या इतर पॉलिसीप्रमाणे तुम्ही या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला आयकरातूनही सूट मिळते. आयकर नियम 80C अंतर्गत दीड लाख रुपयांपर्यंतची रक्कम ही करमुक्त असते.

7) एलआयसी कन्यादान योजनेमध्ये LIC Kanyadan Policy In Marathi डेथ बेनिफिटही दिला जातो. तर पॉलिसी होल्डरचा मृत्यू मॅच्युरिटी आधी झाल्यास त्याच्या कुटुंबाला दहा लाख रुपये दिले जातात आणि मॅच्युरिटी पूर्ण झाल्यावर मॅच्युरिटी बेनिफिटही दिला जातो.

8) एलआयसीची ही पॉलिसी खरेदी करणं खूप सोपं आहे. तुम्ही एलआयसीच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा एखाद्या अजेंटच्या माध्यमातून या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करू शकतात.

एलआयसी कन्यादान पॉलिसीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

तुम्हाला या LIC Kanyadan Policy In Marathi पॉलिसीमध्ये गुंतवणूक करायची असेल, तर खालीलप्रमाणे कागदपत्र असणं आवश्यक आहे.

1) आधार कार्ड

2) रहिवासी दाखला

3) उत्पन्नाचा दाखला

4) पासपोर्ट साईज फोटो

5) मुलीच्या जन्माचा दाखला

ही सगळी कागदपत्र जमा करून तुम्ही एलआयसी कन्यादान योजनेमध्ये गुंतवणूक करू शकता.

एलआयसी कन्यादान योजनेची उद्दिष्टे

ज्या पालकांना त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी एकरकमी जास्त पैसे हवे आहेत आणि दीर्घ काळासाठी गुंतवणूक करायची आहे. त्यांच्यासाठी ही योजना खूपचं फायदेशीर आहे. अशा लोकांसाठी एलआयसीने ही योजना सुरू केली.

हेही वाचा : LIC Jeevan Tarun Yojana | एलआयसी जीवन तरुण योजनेची संपूर्ण माहिती

एलआयसी कन्यादान योजनेचे सामाजिक महत्त्व

सध्या आपण आजूबाजूला पाहतोय की, लग्न म्हणजे हे खूप मोठा सोहळा झाला आहे. लग्नासाठी पैसा पाण्यासारखा वाहिला जातो. मग ते श्रीमंत कुटुंब असो, मध्यमवर्गीय असो किंवा गरीब. प्रत्येकजण आपल्या ऐपतीपेक्षा जास्त लग्नामध्ये खर्च करत असतं.

आधी एक दीड दिवसांचा लग्न सोहळा आता चार पाच दिवसांचा झाला आहे. साखरपुडा, मेहंदी, संगीत, हळद, मुख्य लग्नसोहळा यांसारखे फंक्शन पाच पाच दिवस केले जातात. त्यासाठी मोठ मोठे हॉल बुक केले जातात. डीजे, बँड, सजावट, फोटोग्राफर अशा गोष्टींवर पाण्यासारखा पैसा खर्च केला जातो.

याआधी लाख, दीड लाख रुपयांमध्ये संपूर्ण लग्न सोहळा पार पडायचा. परंतु आता एवढे पैसे तर लग्नाआधीचं फोटोशूट म्हणजेच प्री-वेडिंग फोटोशूटसाठी लागतात.

हा प्रश्न सुद्धा स्वतःला विचारला जाणं खूप महत्त्वाचं आहे की, लग्नावर इतके पैसे खर्च करणे योग्य आहे का ? परंतु या प्रश्नाचं उत्तर नेहमी एकचं मिळतं आणि ते म्हणजे लग्न आयुष्यातून एकदाच होतं आणि आम्हाला आमचा मुला मुलींची हौस करायची आहे. त्यासाठी कितीही पैसा खर्च झाला तरी चालेल.

हौस आणि स्वप्न ही प्रत्येकालाचं पूर्ण करायची असतात. परंतु त्यासाठी प्रत्येकाकडेचं पैसा असेल, हे सांगता येत नाही. अनेकदा मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबांकडे एवढा पैसा नसतो. त्यामुळे ते आपल्या आयुष्यभराची सर्व कमाई या लग्नामध्ये खर्च करतात. अनेकदा तर कर्जही काढतात आणि उरलेलं आयुष्य त्याचे हप्ते भरत बसतात.

लग्नाच्या खर्चामुळे अनेक आई-वडील कर्जबाजारी झाले आहेत. अनेकांनी चुकीचे मार्ग सुद्धा पत्करले आहेत. त्यामुळे भविष्याचा विचार करून काही वर्षांनी आपल्या मुलीचं लग्न करायचंय हा विचार करून आजचं त्यासाठी पैसे जमवणं, आजच त्यासाठी गुंतवणूक करून ठेवणं, हा पर्याय कधीही चांगला असतो.

या सर्व बाबींचा विचार करूनचं आता अशा अनेक योजना आहेत, ज्या मुलीच्या लग्नासाठी गुंतवणुकीचा पर्याय उपलब्ध करून देतात. आज आपण पाहत असलेली एलआयसी कन्यादान योजना LIC Kanyadan Policy In Marathi ही खूपच उपयोगी आणि भविष्यासाठी सुरक्षित अशी योजना आहे.

त्यामुळे ज्या पालकांना आपल्या मुलीच्या लग्नाच्या खर्चासाठी एक रकमी जास्त पैसे हवे आहेत आणि आजपासूनचं एक दीर्घकालीन बचत योजनेमध्ये त्यांना पैसे गुंतवायचे आहेत, त्यांच्यासाठी एलआयसीची कन्यादान योजना खूपचं उपयुक्त आहे. त्यांनी या योजनेचा विचार करायला काही हरकत नाही, हे मात्र नक्की.

FAQ About LIC Kanyadan Policy एलआयसी कन्यादान योजनेबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न

1) प्रश्न : LIC Kanyadan Policy In Marathi म्हणजे काय ?

उत्तर : भारतीय सरकारी विमा कंपनी एलआयसीने सुरू केलेली कन्यादान योजना त्या पालकांसाठी आहे, ज्यांना आपल्या मुलींच्या लग्नासाठी एक रकमी जास्त पैसे हवे आहेत. या रकमेत दर दिवशी फक्त 121 रुपये भरून तुम्ही 25 वर्षानंतर 27 लाख रुपये एकरकमी मिळवू शकतात.

2) प्रश्न : एलआयसी कन्यादान योजनेचा मॅच्युरिटी पिरेड किती आहे ?

उत्तर : या पॉलिसीचा मॅच्युरिटी पिरेड तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार 12 वर्ष ते 25 वर्ष घेऊ शकतात.

3) प्रश्न : LIC Kanyadan Policy In Marathi किती प्रीमियम भरावा लागतो ?

उत्तर : या LIC Kanyadan Policy In Marathi योजनेच्या मॅच्युरिटीला तुम्हाला किती रक्कम हवी आहे, त्यानुसार तुमचा प्रीमियम ठरतो. या योजनेसाठी तुम्ही दरमहा, त्रैमासिक, सहामासिक आणि वार्षिक असा प्रीमियम भरू शकतात.

4) प्रश्न : एलआयसी कन्यादान पॉलिसी कोणाला विकत घेता येते ?

उत्तर : ही पॉलिसी त्याच पालकांना विकत घेता येते, ज्यांना मुलगी आहे. पॉलिसी विकत घेतेवेळी मुलीचा जन्माचा दाखला देणे बंधनकारक आहे.

5) प्रश्न : एलआयसी कन्यादान पॉलिसी धारकाचा मॅच्युरिटीआधी मृत्यू झाल्यास पॉलिसीचं काय होतं ?

उत्तर : या योजनेच्या पॉलिसीधारकाचा मॅच्युरिटी आधीचं आकस्मिक मृत्यू झाला, तर त्याच्या कुटुंबाला 10 लाख रुपयांची मदत दिली जाते आणि मॅच्युरिटी पिरेडनंतर मॅच्युरिटी बेनिफिटही दिला जातो.

एकूणचं एलआयसीची कन्यादान पॉलिसी LIC Kanyadan Policy In Marathi त्या पालकांसाठी खूपचं लाभदायक आहे. ज्यांना त्यांच्या मुलीच्या लग्नाच्या खर्चाची खूप काळजी आहे. मुलीचं लग्न धूमधडाक्यात व्हावं, अशी त्यांची इच्छा आहे. दर दिवसाचे फक्त 121 रुपये भरून एकरकमी 27 लाख रुपये या योजनेत मिळू शकतात आणि ही रक्कम लग्न करण्यासाठी पुरेशी आहे.

अनेक खाजगी कंपन्यांच्याही पॉलिसीज आहेत, योजना आहेत, जेथे गुंतवणूक आणि परतावा खूप मोठ्या प्रमाणात दिला जाईल, असं सांगितलं जातं. परंतु या योजना बाजारातील विविध घडामोडींवर अवलंबून असतात. त्यामुळे परताव्याबद्दल कोणतीही शाश्वती देता येत नाही. परंतु एलआयसी ही भारतीय सरकारची विमा कंपनी असल्याने येथे तुम्ही गुंतवलेली रक्कम आणि परतावा याबद्दल कोणतीही शंका बाळगण्याचं कारण नाही. तुम्ही गुंतवलेली रक्कम ही सुरक्षित राहते. त्यामुळे या योजनेकडे अनेक मुलींच्या पालकांचा कल आहे.

तुमच्या मनात एलआयसी कन्यादान पॉलिसीबद्दल LIC Kanyadan Policy In Marathi आणखीन काही प्रश्न असतील, तर नक्कीचं कमेंट करून विचारा. आम्ही त्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करू आणि अशाच नवीन नवीन गुंतवणुकीच्या योजनांबद्दल जाणून घेण्यासाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.

खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top