LIC Jeevan Tarun Yojana
LIC Jeevan Tarun Yojana तुम्ही आपल्या देशातील कोणत्याही मध्यमवयीन व्यक्तीस विचारलं की, तुम्हाला सर्वात जास्त कोणत्या गोष्टीची काळजी आहे. तर त्यांचं उत्तर एकचं असेल आणि ते म्हणजे, मला माझ्या मुलांच्या भविष्याची खूप काळजी आहे.
मी जे भोगलंय, जे भोगतोय आणि जे कष्ट करतो आहे. तो त्रास माझ्या मुलांना होऊ नये. त्यांना माझ्यापेक्षा चांगलं शिक्षण, चांगलं करिअर मिळावं यासाठी प्रत्येक माणूस रात्रंदिवस झटत असतो, कष्ट करत असतो.
परंतु महागाई दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पुढील भविष्यात शिक्षणाचा खर्च, व्यवसाय, नोकरी करण्याचा खर्च, घरादारांच्या किमती या सर्व वाढणार आहेत. त्यामुळे आज आपण कमावलेले पैसे भविष्यात पुरेसे ठरतीलचं, याची गॅरंटी देता येत नाही. त्यामुळे आपल्या मुलांच्या स्वर्णीम भविष्यासाठी आजचं त्यांच्या नावाने गुंतवणूक करणं कधीही चांगलं.
म्हणूनचं आता बाजारात अशा अनेक योजना आहेत, स्कीम्स आहेत, ज्या तुम्हाला तुमच्या मुलांच्या भविष्याबद्दल विविध स्वप्न दाखवतात. त्याच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी आणि करिअरसाठी विविध ऑप्शन्स देतात. आज आपण अशाच एका योजनेबद्दल जाणून घेणार आहोत. ही योजना तुमच्या मुलांचं भविष्य नक्कीच सुरक्षित करू शकते. त्यांच्या भविष्याला योग्य दिशा देऊ शकते. या योजनेचे नाव आहे एलआयसी जीवन तरुण योजना LIC Jeevan Tarun Yojana.
मग ही एलआयसी जीवन तरुण योजना नेमकी आहे तरी काय ? या LIC Jeevan Tarun Yojana योजनेमध्ये कशी आणि किती गुंतवणूक करता येते ? परतावा काय आहे ? लाभ कोणकोणते आहेत. आज आपण त्याबद्दल जाणून घेणार आहोत.
एलआयसी जीवन तरुण योजनेची माहिती
एलआयसी ही भारतीयांची सर्वात जास्त विश्वास असलेली विमा कंपनी आहे. विविध वयोगटातील व्यक्तींसाठी LIC योजना लाँच करत असते आणि आता त्यांनी लहान मुला मुलींच्या भविष्यासाठी एक योजना आणलीये आणि या योजनेचं नाव आहे एलआयसी जीवन तरुण LIC Jeevan Tarun Yojana. ही एक मनी बॅक योजना असून आपल्या लहान मुलांच्या भविष्यासाठी सिक्युरिटी आणि सेविंग असे ऑप्शन ती देते.
तुमची मुलं जशी जशी मोठी होत जातील, त्यानुसार त्यांच्या शैक्षणिक आणि इतर गरजा या योजनेमार्फत पूर्ण होऊ शकता. आपण या योजनेबद्दल आणखी माहिती जाणून घेऊया.
एलआयसी जीवन तरुण योजनेची वैशिष्ट्ये
एलआयसी जीवन तरुण LIC Jeevan Tarun Yojana ही एक वैशिष्ट्यपूर्ण योजना आहे. जी तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी खूपच उपयोगी आहे. आपण या योजनेची वैशिष्ट्ये जाणून घेऊयात.
1) ही एक पार्टीसिपेटिंग लिमिटेड पे ट्रॅडिशनल योजना आहे.
2) तुमच्या मुलांसाठी ही योजना सुरू केल्यानंतर पुढील 20 वर्ष तुम्हाला प्रीमियम भरावा लागतो. परंतु या योजनेचा मॅच्युरिटी पिरियड 25 वर्षांचा असल्याने ही पॉलिसी 25 वर्षांनी मॅच्युअर होते.
3) मॅच्युरिटीनंतर तुम्ही भरलेले पैसे म्हणजेचं व्याजासहित समअश्यूर्ड आणि मॅच्युरिटी बेनिफिटही दिला जातो.
4) या पॉलिसीमध्ये वीस वर्षांपर्यंतचं प्रीमियर भरावा लागतो आणि पुढील पाच वर्ष प्रीमियर भरण्याची गरज नसते. या पाच वर्षांमध्ये तुम्ही मॅच्युरिटी नंतर मिळणारी काही रक्कम काढू शकतात. त्यासाठी चार ऑप्शनस दिले आहेत.
5) पहिला ऑप्शन असा आहे की, या पाच वर्षांमध्ये तुम्ही काहीचं रक्कम घ्यायची नाही. तुम्हाला 25 वर्षानंतर पॉलिसी मॅच्युअर झाल्यावरचं 100% समअश्यूर्ड आणि मॅच्युरिटी बेनिफिट दिला जाईल.
6) दुसऱ्या ऑप्शनमध्ये तुम्ही या पाच वर्षांमध्ये प्रत्येक वर्षी 5 टक्के समअश्यूर्ड रक्कम घ्याल आणि अशाप्रकारे तुम्ही 25% रक्कम या पाच वर्षात घेतल्यानंतर 25 व्या वर्षानंतर तुम्हाला 75 टक्के समअश्यूर्ड आणि मॅच्युरिटी बेनिफिट दिला जाईल.
7) तिसऱ्या ऑप्शनमध्ये या पाच वर्षांमध्ये तुम्ही दरवर्षी 10 टक्के समअश्यूर्ड रक्कम घ्याल आणि 25 वर्षानंतर शेवटी तुम्हाला समअश्यूर्ड 50% रक्कम आणि मॅच्युरिटी बेनिफिट दिला जाईल.
8) तर चौथ्या आणि शेवटच्या ऑप्शनमध्ये तुम्ही तुमच्या समअश्यूर्ड पैकी दरवर्षी 15 टक्के रक्कम घ्याल आणि मॅच्युरिटीनंतर तुम्हाला समअश्यूर्डची 25% रक्कम आणि मॅच्युरिटी बेनिफिट दिला जाईल.
एलआयसी जीवन तरुण योजनेच्या पात्रता अटी
1) तुमचं मूल जर 90 दिवस ते 12 वर्ष या वयोगटातील असेल, तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
2) या योजनेमध्ये कमीत कमी 75 हजार रुपये समअश्यूर्ड करता येते. जास्तीत जास्त कोणतीही समअश्यूर्ड करण्याची लिमिट नाहीये.
3) या LIC Jeevan Tarun Yojana योजनेचा मॅच्युरिटी पिरेड 25 वर्षांचा असून 20 वर्षांपर्यंत तुम्हाला प्रीमियम भरायचा आहे. उरलेले 5 वर्ष प्रीमियम भरण्याची गरज नाहीये.
4) तुम्ही या पॉलिसीचा प्रीमियम 3 महिने, 6 महिने, 9 महिने किंवा वार्षिक याप्रमाणे भरू शकतात.
हेही वाचा : Public Provident Fund (PPF) 2024 | पब्लिक प्रॉव्हिडंट फंड
एलआयसी जीवन तरुण पॉलिसीची गरज
तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीचं आला असेल की, या LIC Jeevan Tarun Yojana पॉलिसीची, या योजनेची आम्हाला काय गरज आहे ? कदाचित काही वर्षांपूर्वी अशा पॉलिसीची गरज नव्हती. परंतु दिवसेंदिवस जसं आपल्या देशाचं, आपल्या समाजाचं आधुनिकीकरण होत चाललंय. तसं तसं भविष्यात कोणत्याही गरजेसाठी, आर्थिक संकटासाठी तयार राहणं खूप महत्त्वाचं आहे.
काही वर्षांपूर्वी एका गावातील, एका गल्लीतील मग ते शहरातील असो सर्वच मुलं एका शाळेत जायची. त्यांची फीसही कमी जास्त नव्हती. परंतु आज तसं राहिलेलं नाहीये. आज एकाचं गल्लीतील 10 मुलं दहा वेगवेगळ्या शाळांमध्ये जातात. त्यांना वेगवेगळ शिक्षण मिळतं आणि हे सगळं त्यांच्या आई-वडिलांच्या आर्थिक परिस्थितीवर अवलंबून असतं.
तुमच्याकडे किती पैसे आहेत, यावर तुम्ही कसं शिक्षण घेतात, ते आता ठरत चाललंय. फक्त उच्च किंवा माध्यमिक शिक्षणचं नाही तर प्राथमिक शिक्षणातसुद्धा आई-वडिलांकडे असलेल्या पैशांवर मुलं कोणतं शिक्षण घेतील, हे ठरतंय.
उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशी जाण्याची अनेक मुलांची इच्छा असते. आपल्या मुलांना भविष्यात काय शिक्षण घ्यायचंय, भारतात शिक्षण घ्यायचंय की परदेशात घ्यायचं आहे. त्यासाठी किती पैसे लागतील. तो कोर्स आज इतक्या रुपयांचा आहे. पण भविष्यात तो किती महाग होईल. या गोष्टी आज आपण नाही ठरवू शकत. वीस वर्षांनी काय परिस्थिती असेल, ते आज आपल्याला नाही कळू शकत. त्यामुळे भविष्यासाठी तयार राहणं नेहमीचं चांगलं.
LIC जीवन तरुण पॉलिसीसारख्या LIC Jeevan Tarun Yojana योजना आपल्याला भविष्यासाठी तयार करतात. जिथे आपण पुढील 25 वर्षांचा विचार करून आजपासूनचं गुंतवणूक सुरू करतो आणि आपल्या मुलांचे भविष्य सुरक्षित करण्याचा प्रयत्न करतो. जेणेकरून जर त्यांना भविष्यात कोणतंही शिक्षण घ्यायचं असेल, तर त्यांना त्यासाठी पैशांची कमी राहणार नाही.
सध्या आपण पाहतोय की, अनेक तरुण मुलांना उच्च शिक्षण घ्यायचंय. विदेशात जाऊन शिकायचंय. परंतु त्यांच्या पालकांकडे पैसे नसल्याने त्यांची ही स्वप्न अपुरी राहून जातात आणि मग पुढे भविष्यात त्यांना निराशा येते. जर आपल्याही मुलांना भविष्यात या संकटांचा सामना करावा लागू नये, अशी इच्छा असेल तर एलआयसीची ही जीवन तरुण पॉलिसी नक्कीचं फायदेशीर आहे, यात शंका नाही.
FAQ About LIC Jeevan Tarun Policy एलआयसी जीवन तरुण पॉलिसीबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न
1) प्रश्न : एलआयसी जीवन तरुण पॉलिसीचा LIC Jeevan Tarun Yojana मुख्य उद्देश काय आहे ?
उत्तर : ज्या पालकांना त्यांच्या मुलांच्या भविष्यात शिक्षणासाठी मोठी रक्कम हवी आहे, त्यांनी या योजनेत गुंतवणूक करावी, असा एलआयसीचा उद्देश आहे.
2) प्रश्न : एलआयसी जीवन तरुण पॉलिसी कोणत्या वयोगटातील मुलांसाठी खरेदी करता येते ?
उत्तर : ही पॉलिसी 90 दिवस ते 12 वर्ष या वयोगटातील मुलांसाठी खरेदी करता येते.
3) प्रश्न : एलआयसी जीवन तरुण पॉलिसीत LIC Jeevan Tarun Yojana मिनिमम समअश्यूर्ड किती आहे ?
उत्तर : या विमा पॉलिसीमध्ये मिनिमम समअश्यूर्ड 75 हजार रुपये आहे. तर जास्तीत जास्त रकमेची कोणतीही लिमिट नाहीये.
4) प्रश्न : एलआयसी जीवन तरुण पॉलिसी कधी मॅच्युअर होते ?
उत्तर : एलआयसी जीवन तरुण पॉलिसी 25 वर्षानंतर मॅच्युअर होते आणि या पॉलिसीसाठी 20 वर्षे प्रीमियम भरावा लागतो.
5) प्रश्न : एलआयसी जीवन तरुण पॉलिसीमध्ये मॅच्युरिटी बेनिफिट मिळतो का ?
उत्तर : होय, या योजनेत मॅच्युरिटी बेनिफिट आणि समअश्यूर्ड या दोन्ही गोष्टींचा फायदा पॉलिसीधारकांना मिळतो.
एलआयसी जीवन तरुण पॉलिसी त्या पालकांसाठी खूप फायदेशीर आहे, ज्यांना त्यांच्या बालकांच्या भविष्याची खूप काळजी आहे. भविष्यात उच्च शिक्षणासाठी जास्त पैसे लागतील, हा विचार करून ते आज ही पॉलिसी खरेदी करू शकतात आणि त्यांच्या बालकांचे भविष्य सुरक्षित करू शकतात.
आजकाल जेथे शिक्षण दिवसेंदिवस महाग होत चाललंय, तेथे आपल्या पाल्यांना पुढील भविष्यात नक्कीचं शिक्षणासाठी खूप सारे पैसे लागतील. हा विचार करणे प्रत्येक पालकांसाठी खूप गरजेचं आहे आणि त्यात एलआयसी ही सगळ्यांची विश्वासातील विमा कंपनी आहे. जेथे तुमचे पैसे सुरक्षित राहतात आणि मिळणारा परतावा सुद्धा गॅरंटीड असतो. त्यामुळे या योजनेला अनेक पालकांचा भरगोस प्रतिसाद मिळत आहे.
तुमच्या मनात एलआयसी जीवन तरुण पॉलिसीबद्दल LIC Jeevan Tarun Yojana आणखीन काही प्रश्न असतील, तर नक्कीचं कमेंट करून विचारा. आम्ही त्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करू आणि अशाच नवीन नवीन गुंतवणुकीच्या पर्यायांबद्दल जाणून घेण्यासाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !