LIC Aadhaar Shila Policy In Marathi | एलआयसी आधार शीला पॉलिसीची माहिती

LIC Aadhaar Shila Policy In Marathi

LIC Aadhaar Shila Policy In Marathi

LIC Aadhaar Shila Policy In Marathi आपल्या देशात जीवन विमा इन्शुरन्स म्हटलं की, सगळ्यांच्याचं मनात एकच नाव येतं आणि ते म्हणजे एलआयसी. एलआयसी म्हणजे लाईक इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. एलआयसी एक सरकारी विमा कंपनी असून एलआयसीमध्ये गुंतवलेल्या पैशांवर कोणतीही जोखीम नसते, निश्चित परतावा आणि मूळ पैशाची हमी यांसारख्या गोष्टीमुळे भारतीयांचा एलआयसीवर 100 टक्के विश्वास आहे.

एलआयसीसुद्धा भारतीयांच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देत नाही आणि नेहमी आपल्या देशावासीयांसाठी चांगल्या चांगल्या पॉलिसी आणत असते. आता एलआयसीने देशातील महिलांसाठी खूपचं सुंदर प्लॅन बनवला आहे. या नवीन पॉलिसीचे नाव आहे एलआयसी आधारशीला पॉलिसी LIC Aadhaar Shila Policy In Marathi. ही फक्त महिलांसाठीची योजना आहे आणि या योजनेत गुंतवणूक करून महिला चांगला परतावा मिळवू शकतात.

काही दशकांपूर्वी महिला आपल्या कुटुंबावर, कुटुंबातील व्यक्तींवर पैशांसाठी अवलंबून राहायच्या. परंतु या 21 व्या शतकातील महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात काम करताय. स्वतःचे पैसे कमवत आहेत. त्यामुळे आता महिलांसमोर सुद्धा कमावलेल्या पैशांची गुंतवणूक कुठे करावी, हा प्रश्न आहे. महिलांची ही समस्या लक्षात घेऊन एलआयसीने एलआयसी आधार शीला पॉलिसी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

मग ही एलआयसी आधारशीला पॉलिसी नेमकी आहे तरी काय ? या LIC Aadhaar Shila Policy In Marathi कशी आणि किती गुंतवणूक करावी लागते ? किती काळासाठी गुंतवणूक करायला लागते ? या योजनेमध्ये परतावा किती मिळतो ? पात्रता आणि अटी काय आहेत ? आज आपण त्याबद्दलच जाणून घेणार आहोत. तर चला सुरू करूया.

एलआयसी आधारशीला पॉलिसीची वैशिष्ट्ये

फक्त महिलांसाठीचं तयार केली गेलेली एलआयसी आधारशीला पॉलिसी LIC Aadhaar Shila Policy In Marathi खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे. आपण एक एक करून या पॉलिसीची सगळी वैशिष्ट्ये जाणून घेऊया.

1) ही एक नॉन लिंकड वैयक्तिक इन्शुरन्स पॉलिसी आहे.

2) एलआयसीच्या या पॉलिसीमध्ये फक्त स्त्रियाचं गुंतवणूक करू शकतात. पुरुषांना गुंतवणूक करण्याची अनुमती नाही.

3) वय वर्ष 8 ते 55 या वयोगटातील महिला एलआयसी आधारशीला पॉलिसीमध्ये गुंतवणूक करू शकतात.

4) या पॉलिसीमध्ये कमीत कमी 75000 ते जास्तीत जास्त 3 लाख रुपये सम अश्यूर्ड आहे.

5) या पॉलिसीचा मॅच्युरिटी अवधी कमीत कमी दहा वर्ष ते जास्तीत जास्त वीस वर्षांचा आहे.

6) सम अश्यूर्ड आणि पॉलिसीचा अवधी यानुसार तुम्हाला किती प्रीमियम भरायचा आहे, ते ठरवलं जातं. पॉलिसीचा प्रीमियम तुम्ही दरमहा, त्रैमासिक, सहामासिक किंवा वार्षिकही भरू शकतात.

7) या पॉलिसी अंतर्गत लोन फॅसिलिटीही दिली जाते. तुमचे जेवढे पैसे जमा आहेत, त्या पैशांच्या टक्केवारीमध्ये तुम्हाला लोन मिळू शकतं.

8) जर पॉलिसीधारकाचा मॅच्युरिटी आधी मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला या पॉलिसीचा लाभ दिला जातो.

9) पॉलिसी मॅच्युरिटीच्या वेळेस महिलांचे वय जास्तीत जास्त 70 वर्ष असू शकतं.

एलआयसी आधारशिला पॉलिसीच्या पात्रता आणि अटी

जर तुम्हाला या LIC Aadhaar Shila Policy In Marathi पॉलिसीमध्ये गुंतवणूक करायची असेल, तर त्यासाठी एलआयसीने काही पात्रता आणि अटी ठरवल्या आहेत, आपण त्या पाहुयात.

1) एलआयसीच्या या पॉलिसीमध्ये फक्त महिलाचं गुंतवणूक करू शकतात.

2) गुंतवणूक करणाऱ्या महिलेचे वय 8 वर्ष ते 55 वर्ष या वयोगटातचं असायला हवं.

3) या योजनेत कमीत कमी 10 वर्ष ते जास्तीत जास्त 20 वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागते.

4) मॅच्युरिटीच्या वेळेस महिलेचे वय जास्तीत जास्त 70 वर्ष असू शकतं.

5) या LIC Aadhaar Shila Policy In Marathi गुंतवणूक करण्यासाठी महिला शारीरिकरित्या सक्षम असायला हवी. म्हणूनचं पॉलिसी घेताना महिलेने मेडिकल सर्टिफिकेट देणं बंधनकारक आहे.

एलआयसी आधारशीला पॉलिसीमध्ये गुंतवणूक कशी करावी

या LIC Aadhaar Shila Policy In Marathi गुंतवणूक करण्यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्हीही पद्धती अवेलेबल आहेत. तुम्ही एलआयसीच्या वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने ही पॉलिसी खरेदी करू शकता किंवा ऑफलाइन पद्धतीमध्ये एजंटद्वारे ही पॉलिसी खरेदी करून गुंतवणूक करू शकतात.

एलआयसी आधारशीला पॉलिसीमध्ये किती फायदा होतो

आता आपण एका उदाहरणाद्वारे जाणून घेऊया, या LIC Aadhaar Shila Policy In Marathi पॉलिसीमध्ये किती पैसे गुंतवल्यानंतर किती परतावा मिळू शकतो.

जर एखाद्या महिलेने या पॉलिसीमध्ये दर दिवशी 90 रुपये गुंतवले, याचा अर्थ दरमहा 2700 रुपये आणि एका वर्षामध्ये बत्तीस हजार चारशे रुपये गुंतवले.

या महिलेने दरवर्षी 32,400 प्रमाणे 10 वर्षे पैसे गुंतवले, तर ती दहा वर्षांमध्ये तीन लाख वीस हजार चारशे रुपये या योजनेमध्ये गुंतवेल.

दहा वर्षानंतर जेव्हा ही पॉलिसी मॅच्युअर होईल, तेव्हा या महिलेला अकरा लाख रुपयांपेक्षाही जास्त परतावा मिळेल. हा रिटर्न इतर कोणत्याही योजनेमध्ये मिळणाऱ्या परताव्यापेक्षा जास्त आहे. ही गुंतवणूक खूप उपयोगी आणि सुरक्षित आहे, यात शंका नाही.

एलआयसी आधारशीला पॉलिसीचं महत्त्व

सध्या केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकारकडून महिलांसाठी विविध योजना आणल्या जात आहेत. परंतु मुख्यत्वे या योजना त्या महिलांसाठी असतात, ज्या आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहे. अशा महिलांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी सरकार त्यांना दरमहा काही पैसे त्यांच्या अकाउंटवर जमा करतं.

परंतु त्या महिलांचं काय ज्या महिला बऱ्यापैकी पैसे कमवतात. त्यांना दरमहा उत्पन्न आहे आणि आपण कमावलेले पैसे एखाद्या चांगल्या योजनेमध्ये गुंतवावे अशी त्यांची इच्छा आहे.

हेही वाचा : Shravan Bal Yojana In Marathi | श्रावण बाळ योजनेची संपूर्ण माहिती

अशा महिलांसाठी मार्केटमध्ये खूप साऱ्या योजना आहेत, गुंतवणुकीचे पर्याय आहेत. परंतु काही पर्याय हे जोखमीचे आहेत. जेथे शेअर मार्केट, म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवले जातात. अशावेळेस परतावा तर सोडा, परंतु मूळ रक्कमही परत येईल, याची गॅरंटी नसते. त्यामुळे अनेक महिला अशा एखाद्या गुंतवणुकीच्या पर्यायाच्या शोधात आहेत, जेथे त्यांची मूळ रक्कम सुरक्षित राहील आणि चांगला परतावाही मिळेल, जोखीमसुद्धा कमी असेल किंवा नसेलचं.

अशा महिलांसाठी एलआयसीने आधार शीला पॉलिसी LIC Aadhaar Shila Policy In Marathi लॉन्च केली आहे. ही पॉलिसी त्यांच्यासाठी खूपचं फायदेशीर आहे. कारण एलआयसी ही एक सरकारी विमा कंपनी असल्यामुळे महिलांनी जी मूळ रक्कम गुंतवली आहे, ती तर शंभर टक्के सुरक्षितचं राहते. त्याचबरोबर या योजनेत जो परतावा सांगितला आहे की तो मिळेल. तो मॅच्युरिटी नंतर मिळतोचं. कारण एलआयसी गुंतवणूकदारांनी गुंतवलेले पैसे कोणत्याही शेअर मार्केट किंवा म्युचल फंडमध्ये गुंतवत नाही. त्यामध्ये कोणतीही रिस्क नसते, कोणतीही जोखीम नसते. मूळ रक्कम आणि परतावाही सुरक्षित राहतो.

त्यामुळे ज्या महिलांना आपण कमावलेले पैसे एखाद्या अशा योजनेत गुंतवायचे आहेत, जिथे जोखीम नसेल, गुंतवलेल्या पैशांची हमी असेल, परतावा चांगला असेल. तर एलआयसीची आधारशीला पॉलिसी त्यांच्यासाठी परफेक्ट आहे, या तिळमात्र ही शंका नाही.

FAQ’s About LIC Aadhaar Shila Policy एलआयसी आधारशीला पॉलिसीबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न

1) प्रश्न : LIC Aadhaar Shila Policy सुरक्षित आहे का ?

उत्तर : होय, ही गुंतवणूकीची योजना एलआयसीने सुरू केली आहे. एलआयसी सरकारी विमा कंपनी असल्याने त्यांच्याकडे गुंतवलेली रक्कम आणि परतावा पूर्णपणे सुरक्षित असतो.

2) प्रश्न : एलआयसी आधारशीला पॉलिसीमध्ये मॅच्युरिटी पिरेड किती वर्षांचा असतो ?

उत्तर : या पॉलिसीमध्ये कमीत कमी दहा वर्ष ते जास्तीत जास्त वीस वर्षांचा मॅच्युरिटी पिरियड असतो.

3) प्रश्न : एलआयसी आधार शिला पॉलिसीमध्ये किती रुपयांचा प्रीमियम भरावा लागतो ?

उत्तर : तुम्हाला किती रुपयांचा सम अश्यूर्ड हवा आहे आणि किती वर्षांचा मॅच्युरिटी पिरेड आहे, यावर अवलंबून किती प्रीमियम भरायचाय ते ठरतं.

4) प्रश्न : एलआयसी आधारशीला पॉलिसीमध्ये कोणत्या महिला गुंतवणूक करू शकतात ?

उत्तर : या पॉलिसीमध्ये वय वर्ष 8 ते 55 या वयोगटातील महिला गुंतवणूक करू शकतात. मॅच्युरिटीच्या वेळेस महिलेचे वय जास्तीत जास्त 70 वर्षे असू शकतं.

5) प्रश्न : एलआयसी आधारशीला पॉलिसी LIC Aadhaar Shila Policy In Marathi अंतर्गत जीवन विमा मिळतो का ?

उत्तर : होय, ही एक गुंतवणूक योजना असली तरीही एलआयसीची पॉलिसी असल्यामुळे, येथे गुंतवणुकीच्या पर्यायाबरोबरचं जीवन विमाही मिळतो. जीवन विमाची रक्कम तुम्ही गुंतवलेल्या पैशांवर आणि मॅच्युरिटी बेनिफिटवर अवलंबून असतो.

एलआयसी आधारशीला पॉलिसी LIC Aadhaar Shila Policy In Marathi त्या महिलांसाठी खूपचं उपयोगी आहे, ज्यांना आपण कमावलेल्या पैशांची गुंतवणूक अशा एखाद्या योजनेत करायची आहे, जेथे जोखीम कमी असेल. त्याचबरोबर इतर फायदेही असतील, जसं की एलआयसीच्या पॉलिसीमध्ये तुम्ही गुंतवलेल्या पैशांवर तुम्हाला चांगला परतावा मिळेल. तसंच मूळ रकमेवर कोणतीही जोखीम असणार नाही.

एलआयसीची आधार शीला पॉलिसी फक्त तुम्ही गुंतवलेले पैसेचं चांगल्या परताव्याबरोबर तुम्हाला परत करत नाही, तर जोपर्यंत तुमचे पैसे एलआयसीमध्ये गुंतलेले आहेत, तोपर्यंत तुम्हाला जीवन विम्याचा लाभही मिळतो. म्हणजे एका वेळेस दोन फायदे देणारी अशी एकमेव पॉलिसी आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या इतर योजनांमध्ये असा फायदा मिळत नाही.

त्यामुळेचं एलआयसीच्या पॉलिसीमध्ये महिला मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत आणि ही पॉलिसी महिलांमध्ये चांगलीच लोकप्रिय झाली आहे.

तुमच्या मनात एलआयसी आधारशीला पॉलिसीबद्दल LIC Aadhaar Shila Policy In Marathi आणखी काही प्रश्न असतील, तर नक्कीच कमेंट करून विचारा. आम्ही त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करू आणि अशाच नवीन नवीन गुंतवणुकीच्या योजनाबद्दल जाणून घेण्यासाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.

खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top